Marathi Suvichar: उत्तम मराठी सुविचार
ज्ञानावर आधारित (Marathi Suvichar) सुविचार
१) सामान्य लोक आपण वेळ कसा घालवावा याचा विचार करतात, पण बुद्धिमान लोक त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात.
स्कॉपन हॉवर
२) कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका.
आचार्य अत्रे.
३) जो खूप प्रवास करतो, त्याला खूप ज्ञानही लाभते.
टी. फुलर.
४) बुद्धिमान व्यक्तीबरोबर एक वेळे स्पर्धा केली तरी चालेल, पण मुर्खाबरोबर मित्रत्वही योग्य नाही.
स्वामी विवेकानंद.
५) ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे, ती माणसास पशुकोटीतून वर काढते.
दुर्गा भागवत.
६) जीवन ही आश्चर्याची शृंखला असते. आज आपल्याला उद्याचा राग रंग कधीच कळत नाही.
इमर्सन.
७) माणूस किती जगतो, यापेक्षा तो कसा जगतो, यालाच महत्त्व आहे.
कुसुमाग्रज.
८) मानवाची सर्वात महत्त्वाची गरज त्याचे शिक्षण नसून त्याचे चारित्र्य आहे, कारण ते त्याचे रक्षणही करते.
. हर्बट स्पेन्सर.
९) श्रद्धावान, बुद्धिमान, कर्तुत्ववान व ऐश्वर्यवाण माणसाचे कोठेही गेले तरी हार्दिक स्वागत होते.
गौतम बुद्ध.
१०) छापलेली पुस्तके वाचण्याने शिक्षण मिळत नाही. ते अनुभवानेच मिळते.
डॉ. राजेंद्र प्रसाद.
११) विश्वासावर विश्वास ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे व ईश्वरावर विश्वास ठेवणे हे महानतेचे लक्षण होय.
स्वामी विवेकानंद.
१२) कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली की दुःखास प्रारंभ होतो आणि अपेक्षाच ठेवली नाही की दुःखाचे नावच उरत नाही.
ज्ञानेश्वरी.
१३) प्रतिभावान बनण्यात एक टक्का अंत:स्फूर्ती, तर नव्याण्णव टक्के घाम गाळणे, आवश्यक
असते.
थॉमस एडिसन.
१४) एक वेळ पेहराव जुनाच ठेवा, पण नवी पुस्तके विकत घ्या व ज्ञानवृद्धी करा.
राल्फ इमर्सन.
आचरणावर आधारित (Marathi Suvichar) सुविचार
१५) धडपड म्हणजे नित्य नवीनता, जिवंतपणा आणि रमनीयताही.
वि.वि. चिपळूणकर.
१६) धन मिळविण्यापेक्षा ते मिळाल्यावर कसे खर्च करायचे हे काम जास्त कठीण आहे.
इमर्सन.
१७) गप्प बसण्याचा व बोलण्याचा काळ भिन्न भिन्न असतो.
बायबल.
१८) कर्मात यश असते, त्याच्यामागे असू शकणाऱ्या वलयात नाही.
गोएथ.
१९) परस्परांना हात द्यायचा असतो, हात दाखवायचा नसतो.
अण्णा हजारे.
२०) खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे, देशहित ज्यात आसेल, तेच करावे.
शि.म. परांजपे.
२१) मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते.
म. गांधी.
२२) शौर्याचा अतिरेक झाला की त्याला दुर्गुणांचे स्वरूप येते.
ॲडिसन.
२३) जो वेळेवर जय मिळविली, तो जगावर जय मिळवेल.
नेपोलियन.
२४) जो नेहमी पुढे राहण्याची धडपड करतो, तोच जिंकतो.
डेल कार्नेगी.
२५) अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे व मानवी प्रगती व सुख ,यांचा खरा मार्ग शांतीच आहे.
स्वामी विवेकानंद.
२६) जो कोणी आत्मप्रौढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील, त्याला प्रतिष्ठा लाभेल.
येशू ख्रिस्त.
२७) मनुष्य बोलण्याने जेवढा घोटाळा करतो, तेवढा गुपचूप राहिल्याने करीत नाही.
म. गांधी.
२८) जेव्हा माणसाचा तोल सुटतो, तेव्हा त्याने मौन स्वीकारून मन शांत झाल्यावरच बोलावे.
म. गांधी.
२९) चढ यशस्वीपणे चढून जाण्यासाठी प्रारंभी वेग मंद असावा लागतो.
विल्यम शेक्सपियर.
३०) जर मृत्यूने जीवनाचा शेवट होणार नसता, तर मानव निष्क्रिय होऊन जीवनाच्या आनंदास मुकला असता.
गालिब.
३१) निर्भयता हे नैतिकतेचे पहिले लक्षण आहे. भित्रा माणूस कधीही नीतिमान होऊ शकत नाही
म. गांधी.
३२) जो दान स्वीकारतो, त्याने मिळालेले दान कधीही विसरू नये व जो दान देतो, त्याने आपण दिले हे कधीही लक्षात ठेवू नये.
साधू वासवानी .
३३) सुसंस्कृतता अंगीकारण्यास काहीही द्यावे लागत नाही, पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होत जाते.
लेडी मॉंटेज.
३४) पात्रता वा क्षमता, कीर्तीहून अधिक मौल्यवान असते.
फ्रान्सिस बेकन.
३५) पूर्वानुभवाच्या मदतीने जीवनातील पुढील प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे.
जे. कृष्णमूर्ती.
३६) आपले जीवन सुखात घालवायचे असेल, तर शब्द जपून वापरावेत व ते मधुर स्वरात उच्चारावेत.
समर्थ रामदास .
३७) क्रोधाला शरण जाण्यापेक्षा त्याच्यावर ताबा मिळविण्याचे प्रयत्न करा.
बौद्ध धर्म.
मनावर आधारित सुविचार.
३८) मनाचा विरंगुळा व सच्चा मित्र म्हणजे उत्तम ग्रंथ व साहित्य होय.
लॉर्ड चेस्टरफीज.
३९) मानसिक दुर्बलतेहून अधिक भयंकर अशी मानवाची कोणतीही दुरावस्था नाही.
स्वामी विवेकानंद.
४०) मन आशावादी हवे, बरेचदा काम केले तरी यश मिळत नाही, तरीही तुम्ही काम सोडू नका.
पांडुरंगशास्त्री आठवले.
४१) आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे, तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
लो.टिळक.
४२) आपण धरणे बांधली, इमारती बांधल्या, कारखाने बांधले, पण मने बांधायचे तेवढे विसरलो.
कुसुमाग्रज.
Read Other Article: Marathi Suvichar | Inspiring मराठी सुविचार
आरोग्याविषयी (Marathi Suvichar)सुविचार
४३) शरीराला जसे आरोग्य महत्त्वाचे, तसे आत्म्यास शहाणपण.
ला.रॉशेफोकाल्ड.
४४) व्यायामाची शरीराला, तशी वाचनाची मनाला गरज आहे.
जे. ॲडिसन.
४५) आरोग्य हे केवळ शरीराच्या सुआरोग्यावर नव्हे, तर मनाच्या तंदुरुस्तीवर निर्भर करते.
मेरी बेकर.
धर्म ,ईश्वर यांविषयी (Marathi Suvichar) सुविचार
४६) खरा धर्म (व देशभक्ती) ही चैनीची वस्तू नसून, सर्व लोकांची ती मूलभूत गरज आहे.
बर्नाड शॉ.
४७) कोणत्याही माणसाबद्दलचे मत त्याच्या कृतीवरून तयार केले जावे. त्यामागील हेतूंना महत्त्व देऊ नये. करण कोणत्याही व्यक्तीच्या हृदयात काय आहे, हे केवळ ईश्वरच जाणू शकतो.
म. गांधी.
४८) प्रामाणिक माणूस हा ईश्वराची सर्वोत्तम कृती आहे.
पोप.
४९) सत्य पालन हाच धर्म आहे, बाकीचे सर्व अधर्म आहेत .
ज्योतिबा फुले.
५०) नीतिशास्त्र सांगते की मैत्री किंवा शत्रुत्व नेहमी बरोबरीच्या लोकांशी करावे.
वाल्मिकी.
५१) मानवी जीवनास भाकरी एवढीच श्रद्धा आवश्यक आहे.
डॉ. आंबेडकर.
५२) दुसऱ्यास उगीच मारणे हे जसे पाप, तेवढेच अन्याय डोळ्यांनी पाहणे व सहन करणे, हे महापाप होय.
संत तुकडोजी महाराज.
५३) जोवर तुमची स्वतःवर श्रद्धा नाही, तोवर तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवू शकणार नाही.
स्वामी विवेकानंद.
५४) आपल्यातील चांगले दुसऱ्यास देण्यास डगमगू नका. ईश्वर त्याच्यातील उत्तम तुम्हास देईल.
जेम्स हिंटन.
५५) ईश्वरास जाणायचे असेल तर अनेक गोष्टींवर प्रेम करण्यास शिका.
व्हिसेंट व्हॉन गॉग.
५६) तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याची वेळ येईपर्यंत प्रेम व बंधुभावाने वागा.
महंमद पैगंबर.
Get Your Copy Now: Samarthya Vicharanche (Suwichar)
कार्य, कर्तुत्व, कष्ट यावर आधारित (Marathi Suvichar) सुविचार
५७) माणसाला कर्तव्याचा मार्ग दाखवण्यास सभ्यता हा चारित्र्यगुण मार्गदर्शन करतो.
म. गांधी.
५८) जे करणे कर्तव्य आहे, ते करण्याचा निश्चय करा; आणि न चुकता नियमितपणे हा निश्चय पार पाडा.
बेंजामिन फ्रँकलिन.
५९) सर्व उदात्त कार्यामागे राहून उदात्त विचार व विचार प्रणाली हवी; प्रत्यक्ष कृती ही विचार व विचार प्रणालींहून अधिक उदात्त ठरते.
विल्यम वर्डस्वर्थ.
६०) जगात जगण्यासाठी कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.
ए. फ्रान्स.
६१) माणसाची कृती त्याच्या विचारांचा आरसा असते.
जॉन लॉक.
६२) अनुभव आणि व्यवहार यांची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही.
न.वि. गाडगीळ.
६३) स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्ण अवस्थेत पोहोचतो.
श्रीकृष्ण.
६४) कार्यग्रस्त राहा, इतरांनाही त्यात गुंतवा, या खेरीज प्रभावी औषधच असणार नाही.
डेल कार्नेजी.
६५) काही करण्याची प्रेरणा होते, तोच उचित मुहूर्त. ही वेळ टळली तर सफलता ही टळते.
चाणक्य.
६६) आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होते.
बेंजामिन डिझरेली.
६७) कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील यश तिने आज काय प्राप्त केले यावर नव्हे, तर त्यासाठी किती प्रमाणात अडथळे ओलांडले, यावरुन ठरते.
बुकर वॉशिंग्टन.
६८) वेळ येईल, संधी येईल म्हणून तिची वाट पाहत बसू नका, वेळ, संधी आपल्या कर्तबगारिने आणा.
लो.टिळक.
६९) श्रद्धा आवश्यक आहे, पण तिला कृतिशीलतेची साथ हवी.
न्यू टेस्टामेंट.
७०) जर आपण प्रयत्नांची जोड प्रार्थनेस दिली नाही, तर प्रार्थनेस यश येणार नाही.
इसाप.
3 thoughts on “60+ Marathi Suvichar: उत्तम मराठी सुविचार”