40+ Marathi Suvichar | Inspiring मराठी सुविचार

40+ Marathi Suvichar | Inspiring मराठी सुविचार

विविध श्रेणियांमध्ये संग्रहित अद्भुत मराठी सुविचार (Marathi Suvichar) याचे सामान्य सेट. जीवनात बदल देणारे मनोगत विचार वाचा.

१) या जगातील दुःखांपासून मुक्ती हवी तर मार्ग आपणच शोधायला हवा.

-गौतम बुद्ध.

1
२) कोणत्याही राष्ट्राची मुख्य आशा त्याच्या तरुणांना दिल्या जाणाऱ्या उचित शिक्षणावर अवलंबून असतात.

इरॅस्मस.

३) जमिनीच्या उत्खननातून प्राप्त होणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक सोन विचारांच्या उत्खननातून प्राप्त होत असतं.

नेपोलियन हिल.

४) महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात. ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते, तेच खरे ज्ञान असते.

लाओ त्से.

५) दुःखाचे ज्ञान होणे ही दुःखावर मात करण्याची पहिली महत्त्वाची पायरी असते.

गौतम बुद्ध.

६) जे अपयशाला सामोरे जायला घाबरतात, ते कधीच महान होऊ शकत नाहीत.

रॉबर्ट केनेडी.

७) मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला हे आहे.

जॉन रस्किन.

2
८) एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

कॉल्टन.

९) मनुष्य बोलण्याने जेवढा घोटाळा करतो, तेवढा गुपचूप राहिल्याने करीत नाही.

म. गांधी.Read Book

१०) मी भाकीते करत नाही. कधी केली नाहीत आणि करणार नाही.

टोनी ब्लेअर, ब्रिटनचे माजी पंतप्रधान.

११) भविष्याचा अंदाज वर्तवणारे दोन प्रकारचे असतात; एक म्हणजे स्वतः अज्ञानी असणारे आणि दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःला काही माहीत नाही हेच माहीत नसते.

जॉन कॅनेथ गॉलब्रेथ . अर्थशास्त्रज्ञ हार्वर्ड विद्यापीठ.

१२) आळस न करता उद्दिष्ट प्राप्त करा. तथागतांचे अखेरचे वचन.

डॉ.आ.ह. साळुंखे.

१३) लेखन हे खिडकीच्या तावदानासारखं स्वच्छ असायला हवं.

जॉर्ज ऑर्वेल.

१४) माझं जीवन भयानक दुर्दैवी प्रसंगांनी भरलं आहे, ज्यातील बरेचशे प्रसंग कधी घडलेच नाहीत.

मार्क ट्रेवन.

१५) वारसा हा वस्तूंचा नसतो, विचारांचा असतो.

राज ठाकरे.

3
१६) नेम ताऱ्यांचाच धरा; पण तुम्ही समजा चंद्रावर उतरलात तर त्यात सुख माना.

केविन फिट्मॉरीस.

१७) जीवनाची शोकांतिका मृत्यू नाही तर आपण जिवंत असताना आपल्यातले जे सुप्त गुण आपण मारतो ती आहे.

नॉर्मन कझिन्स.

१८) यशस्वी माणसांना ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत, त्या यशस्वी माणसांना करायची सवय असते.

इ.एम्.ग्रे.

१९) जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात, ते किमती रत्नांसारखे असतात.

हजरत इनायत खान.

२०) संपूर्ण स्वातंत्र्य, जवळ पुस्तकांचा खच आणि आकाशात चंद्राचे चांदणे या तीन गोष्टी असतील, जिथे असतील, तिथे सुख नांदणारच.

ऑस्कर वाईल्ड.

२१) वेळेचे योग्य नियोजन हे उत्तम मानसिक घडणीचे प्रतीक आहे.

सर आयझॅक पिटमॅन.

२२) वेदना या नेहमीच क्षणभंगुर असतात पण ऐन रणातून पळून जाणे मात्र आयुष्यभर जखम करून राहते.

२३) आपला सुरक्षिततेचा कक्ष ओलांडून जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पलीकडे जाल, तेव्हाच तुमचे खरे आयुष्य सुरू होईल.

नेल डोनाल्ड वॉल्श.

4
२४) तुम्ही जेव्हा स्वतःला सर्वार्थाने प्रदर्शित करता, तेव्हाच लोक तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट व सहज सुंदर परफॉर्मन्स करतील.

हॅरी फायरस्टोन.

२५) प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात जर समाधानी असेल,तर मग कुठल्याही हिरोची ( असामान्य नायकाची) गरजच पडणार नाही.

मार्क ट्वेन.

२६) प्रत्येकाने आपल्या दारासमोरचा कचरा जरी काढला तरी सगळं जग स्वच्छ होऊन जाईल.

मदर तेरेसा.

२७) आपल्यातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता प्रदर्शित करा मग कोणीही तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.

स्टीव्ह मार्टीन.

40+ Marathi Suvichar | मराठी सुविचार

२८) पैसा, सत्ता तसेच आपले उच्चतम पद प्रतिष्ठा यांची तुलना कधीच प्रगल्भ बुद्धिमत्ता, तत्वप्रणाली, ऊर्जा तसेच अथक चिकाटीशी होऊ शकणार नाही.

ओरिसान स्वेट मार्डेन.

२९) भविष्यकाळातही जगण्याच्या सहज प्रवृत्तीची जागा इतर कोणतीही जागृत इच्छा घेऊ शकणार नाही.

कार्ल युंग.

३०) तुम्हाला मनापासून जे करावसं वाटतं तेच करा. तुम्ही एखादी गोष्ट केलीत किंवा केली नाहीत, तरीही टीका होतेच. मग मनाचं का ऐकू नये.

एलिनोर रुझवेल्ट.

३१) जर तुम्ही लोकांच्या होकाराची वाट पहात राहिलात तर तुम्ही सतत त्यांचे गुलाम बनून जगाल. जेव्हा तुम्ही तुमचं काम करता आणि बाजूला होता तेव्हा तुम्हाला खऱ्या शांततेचा अनुभव मिळतो.

लाओ त्सु.

३२) संपत्ती आणि सत्ता माणसाला उद्धट बनवते, असभ्य करते, हेच खरं.

खुशवंत सिंग

३३) योग्य विचार योग्य ठिकाणी करणारे काही लोक सुद्धा हे जग बदलू शकतात. अखेरीस तुम्ही म्हणजेच हे जग आहात.

मार्गारेट मीड.

३४) बहुतांश सामान्य व्यक्ती, आपल्याकडे शक्ती नाहीच, असे समजून असलेली शक्ती देखील टाकून देतात.

ॲलिस वॉकर.

३५) आपल्या स्वप्नांचा मोठ्या आत्मविश्वासाने पाठपुरावा करा आणि सातत्याने प्रयत्नशील राहा. एके क्षणी यश तुम्हाला तुमच्या प्रवासातच भेटेल.अगदी आश्चर्यकारकरित्या.

हेनरी डेव्हिड थोरो.

6
३६) आपण आपल्या अमर्याद इच्छा आकांक्षांच्या सीमा ओलांडून पुढे जाऊ शकत नाही.तरी देखील आपण अपरिमित स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि त्यांचा पाठलाग केला पाहिजे.

राल्फ चॅरेल.

३७) बहुतेक समस्या या आपल्या चिंतातूर मनानेच निर्माण केलेल्या असतात. यातही आपले अनावधानच आपल्याला गोत्यात आणते.

कर्ट व्हानेगट.

३८) आपल्यातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता प्रदर्शित करा मग कोणीही तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.

स्टीव्ह मार्टीन.

Best Marathi Suvichar | मराठी सुविचार

३९) परमेश्वर आपल्याकडे अडचणी पाठवत नाही, तर तो त्या अडचणींना तोंड देण्याची ताकद आपल्याला देतो.

हेरॉल्ड कुशनर.

४०) आयुष्य कोणासाठी तरी जगणे आवश्यक आहे, कोणाच्या विरोधात नाही.

मार्टिन ग्रे.

४१) जर तुम्ही पुरेसे प्रेम करू शकलात, तर तुम्ही जगातील सर्वात आनंदी व शक्तिशाली व्यक्तिमत्व बनाल.

एम्मेट फॉक्सेस.

४२) आत्म्याला कधीच शिक्षा होऊ शकत नाही, असे मानून आत्म्याचा अनादर करता येणार नाही.

बोरिस पास्टनाक, डॉ.झिव्हॅगो.

४३) मनुष्यप्राणी स्वतःमध्ये आंतरिक बदल करून आयुष्याचे बाह्यरूप बदलू शकतो, हा आमच्या नवीन पिढीने लावलेला सर्वात मोठा शोध आहे .

विल्यम जेम्स.

४४) मी हे शिकलो की या जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक आहेत आणि मला दोघांकडून नेहमीच वेगवेगळी वागणूक मिळणार आहे.

जिया जियांग ( प्रसिद्ध लेखक.)

5
४५) जगात असे लोक आहेत जे आहे त्याच गोष्टी बघतात आणि विचारतात की असं का? मी अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींची कल्पना करतो आणि विचारतो, असं असायला काय हरकत आहे?

रॉबर्ट केनेडी.

४६) आर्थिक गणित ही ऊन, पाऊस आणि सावलीच्या खेळासारखी सतत बदलत असतात.

बेंजामिन फ्रँकलिन.

४७) माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये असलेला बंध तुटू नये,हीच सुखी होण्याची पहिली अट आहे.

लिओ टॉलस्टॉय.

४८) आपल्या नशिबावर अजूनही आपलंच नियंत्रण आहे. आपल्या आत्म्याचे आपणच दिशादर्शक आहोत.

विन्स्टन चर्चिल.

४९) काहीही घडू शकतं. कोणत्याही वेळी काहीही घडू शकत.

रोझ बर्न.

५०) कोणत्याही अनपेक्षित घटनेने कधीही अस्वस्थ होणार नाही, एवढे शूर कोणीही नसतं.

ज्युलिअस सीझर.

51) जीवनाच्या प्रत्येक विचाराच्या प्रभावाला आपल्याला शांतता आणि स्थिरता आहे.

Other Articles:

  1. Rich Dad Poor Dad Marathi Summary