(धनत्रयोदशी) Dhantrayodashi in Marathi
धनत्रयोदशी(Dhantrayodashi).
दिवाळी म्हणजे सणांचा राजा. दीपावली म्हणजेच दिव्यांच्या ओळी. घराघरांवर, मंदिरावर ,सार्वजनिक ठिकाणी या सणाला दिवेच दिवे लावलेले असतात. भारताचा हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे.
गरीब ,श्रीमंत, शिक्षित वा अशिक्षित ग्रामीण असो वा शहरातील सगळेच या सणात आनंदाने सहभागी होतात.
आपल्या संस्कृतीत दिव्याला फार महत्त्व आहे. दीप म्हणजे आनंद, उत्साह, प्रसन्नता, मांगल्य, पावित्र्य, दुर्वासनांचा नाश.
दिवाळी सणातील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी (Dhantrayodashi). याला धनतेरस असेही म्हणतात. अश्विन वद्य
त्रयोदशीला धनतेरस असे म्हणतात. या दिवशी यमाला प्रसन्न करावयाचे असते. यासाठी दीपदान करतात.
यमदीप दान.
या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा एक दिवा लावतात. दक्षिण दिशा ही धर्माची दिशा मानली जाते.
यमधर्मराज ही मृत्यूची देवता. याची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो म्हणून सर्वांनी यमदीपदान करावे अशी एक प्रथा आहे. त्यामुळे यमराज प्रसन्न होतो. घरात लक्ष्मी नांदते सर्व सुखाचा लाभ होतो. त्यादिवशी घरांवर, मंदिरांवर ,उंच जागी तेलाचे दिवे लावले जातात. या दिवशी झाडू किंवा केरसुनी खरेदी करतात, ही केरसूणी देवी लक्ष्मी स्वरूप मानली जाते.
१) धनतेरस, या दिवशी देवाचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.
२) धन ,दौलत आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करतात.
३) इंद्रदेव आणि असुर यामध्ये समुद्रमंथन चालले असताना, या दिवशी मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. यामुळे देखील धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
४) व्यापारी लोक या दिवशी स्वतःच्या हिशोबाच्या वह्या, दुकाने आणि त्यामधील सर्व साहित्याची पूजा करतात.
५) सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा या दिवशी आहे. लहान मोठी मुले फटाके वाजवतात.
६) घराबाहेर सुंदर रांगोळी काढतात. घरासमोर आकाश कंदील लावतात, याचबरोबर दिव्यांची सुरेख सजावट केली जाते.
७) घरात फराळाचा आनंद घेतात. सर्वांना शुभेच्छा देऊन एकमेकांना फराळ वाटला जातो.
आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन यांच्या बद्दल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi) दिवस साजरा केला जातो.
इंद्राने जेव्हा आसुरांबरोबर समुद्रमंथन केले. तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली. याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आले. म्हणून धन्वंतरीचीही पूजा या दिवशी केली जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
लक्ष्मीची पूजा :
या दिवशी संध्याकाळी विष्णू, कुबेर ,गणेश व द्रव्यनिधी यांची पूजा करावयाची असते. दीप अखंड तेवत ठेवतात. आपल्या संस्कृतीत लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय, वंदनीय मानले जाते. म्हणून या दिवशी लक्ष्मीची प्रार्थना करतात. हे लक्ष्मी देवी आमच्यावर प्रसन्न होऊन कृपा कर. तुला स्वच्छतेची आवड आहे. आम्ही आमचे घर व मन स्वच्छ केले आहे. आता तू आमच्या घरात सदैव राहा. आम्हाला सुखी ठेव.
यमदीपदान का करतात यासंबंधीची एक कथा :
पूर्वी हैम नावाचा एक राजा होता. परंतु त्याला पुत्र नसल्याने तो अतिशय दुःखी होता. पुष्कळ नवस केल्यानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली. राजाला खूप आनंद झाला, त्याने मोठा आनंदोत्सव केला. परंतु सटवाईने त्या राजपुत्राचे भविष्य सांगितले ‘ हा मुलगा लग्नानंतर चारच दिवसांनी मरण पावेल.’
ही भविष्यवाणी ऐकून राजा चिंतातूर झाला. राजाने आपल्या मुलासाठी यमुना नदीच्या डोहात एक मजबूत प्रसाद बांधला. त्या भोवती रक्षक नेमले. काही दिवसांनी राजपुत्राचा विवाह थाटामाटात झाला. विवाह झाल्यानंतर राजपुत्र आपल्या पत्नीसह त्या प्रासादात रहावयास गेला. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात.
महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठ मोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्प- रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्याचांदीने दिपतात. त्यामुळे यम परत फिरतो व यमलोकात जातो. अशाप्रकारे राजकुमारीने राजकुमाराचे प्राण बचावले.
म्हणूनच या दिवसास ‘यमदीपदान’ असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याचे वातीचे टोक दक्षिणेस करतात.
जे लोक अश्विन वद्य त्रयोदशीला यमदीपदान करतील व प्रदोष काळी दीपोत्सव करतील त्यांना मी (यम) अकाली मृत्यू येऊ देणार नाही. यासाठीच धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) यमदीपदान करावयाचे असते.
Other Article: (Vasubaras) वसुबारस सणाचे महत्त्व 2024