50 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार
1-15 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार
१) हिंमत मला ऊर्जा देते. ती माझ्यासाठी फायद्याची आहे. ती नसेल, मला आरामशीर वाटत असेल तर मला काळजी वाटू लागेल. -माईक निकोल्स.
२) शंका ही सुखावह स्थिती नाही पण निश्चितता ही विचित्र स्थिती आहे. – व्हॉल्टेअर.
३) एखादं पुस्तक खरोखर खूप चांगलं असेल, तर मी त्यातून खूप काही शिकतो. ते लवकरात लवकर वाचून संपवून, त्यानुसार जगायला कधी एकदा सुरुवात करेन असं होऊन जातं.- हेन्री डेव्हिड थोरो
३) काळजी घेणं ही महान गोष्ट आहे आणि तीच सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे.
फ्रेडरिक वॉन ह्युजेस
४) कोण नाही देऊ शकणार चांगला सल्ला? स्वस्त असतो तो, त्याला पैसे पडत नाही.
रॉबर्ट बर्टन.
५) इतरांबरोबर आनंदाने जगण्यासाठी ते जे देऊ शकतात तितकंच त्यांच्याकडे मागावं.
ट्रिस्टन बर्नार्ड.
६) मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद काठोकाठ भरेल.
जॉन गॉस्पेल.
७) भीतीवर मात करणे ही सुज्ञतेची सुरुवात आहे.
बर्टेण्ड रसेल.
८) ठामपणे भीतीचा सामना केलात की, तुम्हाला सामर्थ्य, धैर्य, आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. मग तुम्ही स्वतःला म्हणू शकता, या भयप्रद अनुभवातून मी तरलो आहे. त्यामुळे आता मी काहीही पेलू शकतो.
एलिनॉर रुझवेल्ट.
९) योगायोग हा निरर्थक शब्द आहे. कारणाशिवाय काहीच अस्तित्वात असू शकत नाही.
व्हॉल्टेयर.
१०) जो नशीबाची वाट पाहत बसतो त्याला भोजन मिळण्याची खात्री नसते.
बेंजामिन फ्रॅन्कलीन.
११) पृथ्वीसाठी सूर्याचं जे स्थान आहे, ते माझ्यासाठी पुस्तकाचं.
अर्ल नाइटिंगेल.
१२) जे वाचतात त्यांना इतरांपेक्षा दुप्पट दिसतं.
मिॲंडर
१३) शोकावरचा एकमेव उतारा म्हणजे कृती.
जॉर्ज हेन्री लुईस
१४) मित्रा तुला एक खास गुपित सांगतो. शेवटच्या निवाड्यासाठी थांबू नकोस. तो रोजच होत असतो.
अल्बर्ट कामू
१५) रोगी मनावर ‘ शब्द ‘ हे डॉक्टरसारखे इलाज करतात.
इस्चिलस.
जीवनाला प्रेरणा देणारे १००० हून अधिक विचार सामर्थ्य विचारांचे 👇
16-31 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार
१६) शरीरासाठी साबण ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने अश्रू आत्म्यासाठी काम करतात.
ज्यू म्हण.
१७) चिकाटी सन्मान राखते. हार मानणं म्हणजे प्रवाहाच्या बाहेर पडणं.
शेक्सपियर.
१८) महान कार्य ही ताकदीने नाही तर चिकाटीने पार पाडली जातात.
सॅम्युएल जॉन्सन.
१९) खाली पडणं हे अपयश नसून, खाली पडल्यानंतर पुन्हा उभ न राहणं हे आहे.
मेरी पिकफोर्ड.
२०) स्वतःच्या ठाई आनंद शोधणे सोपं नाही, पण तो इतरत्र शोधणे शक्यच नाही.
ॲग्नेस रेप्लिअर.
२१) माणसाच्या नशिबाचा साचा प्रामुख्याने त्याच्याच हातात असतो.
फ्रान्सिस बेकन.
२२) कारण देऊ नका, निराकरण करा.
फिल्बर्ट हबर्ट.
२३) क्षमायाचना एक मेटाकुटीला आणणारी सवय जी क्वचितच सुटते. क्षमा याचना म्हणजे अहंकारच( विरुद्ध) दुसरं टोक.
ऑलिव्हर वेन्डेल होल्म्स.
२४) तुम्हाला ज्यातून उत्कट आनंद मिळतो त्याचा पाठपुरावा करा.
जोसेफ कॅम्पबेल .
२५) सोपं काहीच नसतं;ते नाईलाजाने करायला गेलात तर ते कठीण होतं.
पब्बस टेरेन्टिअस.
२६) स्वतःसाठी अति कठीण असलेल्या गोष्टी शोधू नका, स्वतःच्या क्षमतेपलीकडच्या बाबींचाही मागोवा घेऊ नका.
द ॲप्रोफिफा.
२७) आनंदाचा शोध घेत असा किंवा दुःखाचा दोन्हींचाही प्रवास सारखाच असतो.
युडोरा वेल्टी.
२८) भरभराट झालेल्या मित्राविषयी ईर्ष्या न बाळगता त्याचा सन्मान करण्याचा गुणधर्म थोड्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
इस्चिलस.
२९) सत्य ही दुर्मिळ बाब आहे, सत्य बोलणं आनंददायक आहे.
एमिली डिकिन्सन.
३०) तुमच्या वेळेचा सदुपयोग तुम्ही इतरांनी लिहिलेले वाचण्यात घालवा. त्यामुळे इतरांना पडलेले कष्ट तुम्हाला पडणार नाहीत.
सॉक्रेटिस.
३१) वाचणारा माणूस जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेतो.
ॲल्डस हक्सले.
32-50 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार
३२) आपल्या दोघात कायम सत्य ते असू दे, हाच आपल्या जोडीदाराबरोबरचा सर्वोच्च करार असू शकतो.
राल्फ वाल्डो इमर्सन.
३३) अंतरंगात जे असत्य आहे त्याने आपली फसवणूक होते.
जॉर्ज रेडिथ.
३४) जीवन हा एक सामना असून तो खेळायलाच हवा.
एडविन अर्लिन्ग्टन रॉबिन्सन.
३५) खेळात निवडीसाठी दोन सुखर बाबी असतात. एक म्हणजे जिंकणं आणि दुसरं हारणं.
लॉर्ड बायरन.
३६) जेव्हा तुमच्या नावापुढे महान खेळाडू असं लिहिलं जातं.
तेव्हा, तुम्ही जिंकलात की हरलात हे पाहिलं जात नाही.
तर तुम्ही कसे खेळलात हे पाहिलं जातं.
ग्रँन्टलॅण्ड राईस.
३७) यशाची गुरुकिल्ली काय आहे हे मला माहित नाही, पण प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणं ही मात्र नक्कीच अपयशाची किल्ली आहे.
बिल कॉस्बी.
३८) प्रेम वाढवण्यापेक्षा झालेलं दुर्लक्ष भरून काढणं सोपं असतं.
सेंट जेरोम.
३९) आसक्तीमुळे भ्रमांना पुष्टी मिळते. जेव्हा आपण अलिप्त राहतो तेव्हा मात्र वास्तव अंगीकारता येत.
सिमोन विल.
४०) सहसा अपेक्षाभंग होतात, विशेषतः जिथे पुर्तीच वचन दिलेलं असतं तिथे.
शेक्सपियर.
४१) दुसऱ्याच्या ताटावर अवलंबून राहणाऱ्याच्या तोंडात सहसा उशिरा घास जातो.
जॉन रे.
४२) प्रत्येकाला ईश्वराची गरज असते.
होमर.
४३) काही अपमान केले जातात, तर काही केलेले नसतानाही मानले जातात.
आयझॅक वॉल्टन.
४४) यत्किंचित तुच्छतासुद्धा समोरच्याला अपमान वाटू शकते.
अलेक्झांडर पोप.
४५) जेव्हा लोक तुमच्याशी उद्धटपणा करतात ;तेव्हा तो उद्धटपणा तुमच्याबाबत नसून ,ते ज्या लोकांना आधी भेटलेले असतात त्यांच्याबाबतचा असतो.
एफ स्कॉट फित्झगेराल्ड.
४६) खरं दाखवण्याची धमक दाखवा खोट्याची गरज भासणार नाही, दोष झाकायला खोट्याची गरज भासली तर तो वाढत जातो.
जॉर्ज हबर्ट.
४७) एखादी परिस्थिती आपण जेव्हा बदलू शकत नाही तेव्हा, स्वतःला बदलवण्याच आव्हान आपल्यासमोर उभ राहतं.
व्हिक्टर फ्रॅंकल.
४८) तुम्ही स्वतःच्या चुकांमधून धडा घेतला नाही तर दुसरं कोणीतरी तो घेईल.
अनामिक.
४९) प्रत्येकाने त्याच्या चुकांना दिलेले नाव म्हणजे अनुभव.
ऑस्कर वाईल्ड.
५०) कौतुक पटकन करा. जे लोकांचं कौतुक करतात त्यांचं कौतुक करायला लोकांना आवडतं.
बर्नार्ड बरुच.
Other Articles
1 thought on “50 Amazing Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार”