Lakshmi Puja लक्ष्मीपूजन
श्री लक्ष्मी पूजन.(Lakshmi Puja)
दिवाळी सणातील तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. हा आश्विन महिन्यातला शेवटचा दिवस होय. या दिवशी आमावस्या असते. आमावस्या हा गुजराती लोकांचा दिवाळीचा मुख्य सण असतो. आमावस्येच्या दिवशी उत्तर प्रदेशातील लोक लक्ष्मीपूजनाबरोबर गणपतीची पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी सर्वांनी लक्ष्मीपूजन (Lakshmi Puja) करावयाचे असते. लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी येते व त्यामुळे आपले दारिद्र्य, दुःख नष्ट होते. आशी श्रद्धा
लक्ष्मीपूजनामागे आहे.
केरसुणीचे पूजन.
लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Puja) अगोदर लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी करावयाची असते. अमृत प्राप्तीसाठी देव -दानवांनी समुद्रमंथन केले. त्यावेळी लक्ष्मीसह 14 रत्ने वर आली. परंतु लक्ष्मी वर येण्याअगोदर अलक्ष्मी समुद्रातून वर आली.
अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य. मी कुठे राहू असे अलक्ष्मीने विचारले असता ‘ ज्या घरात सतत कलह भांडण चालू असते,
अभक्षभक्षण, देव, अतिथी यांचा अपमान, जुगार व अधार्मिक गोष्टी चालत असतील त्या घरात तू निवास कर ‘ . असे तिला सांगण्यात आले. श्री लक्ष्मीची आकाबाई आपल्या घरी येऊ नये म्हणून केरसुणीची पूजा केली जाते व नंतर लक्ष्मीची पूजा करावयाची असते.
लक्ष्मीपूजन.(Lakshmi Puja)
या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मी, इंद्र व कुबेर यांची पूजा केली जाते. सगळीकडे दिवे लावले जातात.
धने ,गुळ ,साळीच्या लाह्या व बत्तासे यांचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो व नंतर तो प्रसाद म्हणून वाटला जातो. त्यादिवशी रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते व आपल्यासाठी निवास योग्य ठिकाण शोधत असते. जेथे आनंद आहे, पावित्र्य आहे त्या घरात लक्ष्मी प्रवेश करते. लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा यासाठी आपले घर स्वच्छ,
नीटनेटके ठेवावयाचे असते.
तरच लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल. यासाठी आपण लक्ष्मीची वाट पाहत जागरण करावयाचे असते.
जमाखर्चाच्या वह्यांचे पूजन.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी, अडत बाजारवाले, दुकानदार हे लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करतात. दुकानात जमाखर्चाच्या वह्या आणल्या जातात. या वह्यांवर लक्ष्मी- सरस्वतीची प्रतीके म्हणून सोन्या-चांदीची नाणी ठेवून त्याची पूजा केली जाते.
त्याचबरोबर वजनमापे व दुकानातील साहित्य यांचीही पूजा केली जाते . नैवेद्य म्हणून साळीच्या लाह्या व बत्तासे दिले जातात. आपल्या इष्टमित्रांना, व्यवसाय बंधूंना चहा आणि पानसुपारीसाठी बोलावून त्यांना लाह्या, बत्तासे इ. प्रसाद म्हणून देतात. हा सण व्यापारी लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
“लक्ष्मीपूजना निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा“
Other Articles:
(Vasubaras) वसुबारस सणाचे महत्त्व
1 thought on “(Lakshmi Puja) लक्ष्मीपूजन in Marathi”