शिवयोगी गुरु नंदगिरी महाराज

आदर्श पतसंस्था: नंदगिरी महाराज.

आदर्श पतसंस्थेच्या सातव्या शाखेचा शुभारंभ भुईंज येथे नंदगिरी महाराज, मठाधिपती, श्री शनेश्वर देवस्थान सोळशी, यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला.

त्यावेळी नंदगिरी महाराज यांनी उद्-घाटन भाषण अतिशय प्रभावीपणे केले, व आपली सहकार विषयक मते स्पष्ट व परखडपणे मांडली .

आपल्या भाषणात ते म्हणाले प्रशासकीय कर्मचारी हे संस्थेची रक्तवाहिणी असतात. अशा कर्मचाऱ्यांना संस्थेचे दैनंदिन प्रशासन चालवावे लागते. 

कर्मचारी जर कर्तव्यदक्ष असतील तर सहकारी संस्था व्यवस्थित चालतील. अशा कर्मचाऱ्यांवर संस्थेला तंदुरुस्त ठेवण्याची जबाबदारी आहे.

आज महाराष्ट्रात कितीतरी पतसंस्था व सहकारी बँका आहेत. दुर्दैवाने त्यातील पस्तीस टक्के पतसंस्था, बँका ह्या एनपी ए मध्ये आहेत. वीस ते पंचवीस टक्के पतसंस्था ह्या विश्वस्तांच्या (संचालकांच्या) हलगर्जीपणामुळे बुडाल्या. 

खरंतर त्यांना विश्वस्तांचा अर्थ कळला नाही. विश्वस्त याचा अर्थ तुमच्यावर विश्वास आहे असा आहे. तुम्ही(संस्थेचे) त्याचे मालक नाही, तुम्ही त्याचे राखणदार आहात.

राखणदारांनी (संचालकांनी)आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, यात संस्थेचे हित आहे. ग्राहकांचे हित आहे. कर्मचाऱ्यांचे हित आहे.

नंदगिरी महाराज पुढे म्हणाले सर्व विश्वस्तांनी (संचालकांनी) हे लक्षात घेतले पाहिजे की संस्थेची राखण करण्याचा आपला अधिकार आहे. तो अधिकार व्यवस्थितपणे पार पाडलात तर आज आपले 19 कोटींचे भांडवल 190 कोटी होण्यास वेळ लागणार नाही.

आपल्या पतसंस्थेचे प्रगती व्हावी असा मी आशीर्वाद देतो. संचालकांनी (विश्वस्तांनी) विश्वस्तांन प्रमाणे राहावे, कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसारखे राहावे. 

सर्व हितचिंतकांनी संस्थेकडे पाहताना ही संस्था माझी आहे असा दृष्टिकोन ठेवावा. सर्वसामान्यांना सहज सुलभ कर्ज सुविधा मिळावी अशी मी अपेक्षा ठेवतो. 

सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन शनि महाराजांची वक्रीदृष्टी आपणा कुणावरही पडू नये अशी प्रार्थना मी शनी चरणी करत आहे.

आदर्श संस्थेचे अधिकारी माझे मित्र देशमुख, गुजर यांच्या आग्रहामुळे मला या शुभारंभाच्या कार्यक्रमास भुईंज येथे हजर राहता आले. त्याचवेळी मठाधिपती नंदगिरी महाराजांचा प्रेमळ सहवास व आशीर्वाद मला मिळाला ,हे माझे भाग्य मी समजतो.

बाबुराव देशमुख, चेतन गोरे, यशवंत वाडकर, विशाल गुजर, विक्रांत खैरे, विठ्ठल गुळूमकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.

Other Article:

  1. 40+ Marathi Suvichar

1 thought on “शिवयोगी गुरु नंदगिरी महाराज”

Leave a Comment