Best Motivational Marathi Suvichar | जीवन बदलणारे 80+ प्रेरणादायी सुविचार

जीवनात प्रेरणा देणारे विचार म्हणजेच सुविचार! हे विचार आपल्या मानसिकतेवर खोल प्रभाव टाकतात. आजच्या लेखामध्ये तुम्हाला प्रेरणादायक मराठी सुविचार, आनंददायक विचार, आणि यशासाठी सुविचार वाचायला मिळतील.

प्रेरणादायक मराठी सुविचार | Motivational Marathi Suvichar for Daily Life

Motivational Marathi Suvichar

जीवनावर आधारित मराठी सुविचार (Life Quotes in Marathi)

Motivational Marathi Suvichar

१) आपली शरीरे म्हणजे आपली उद्याने आहेत आणि आपल्या इच्छा या माळ्याचे काम करतात. – विल्यम शेक्सपियर

२) जर तुम्हाला सशक्त व्हायचे असेल तर सशक्त असल्याचे सोंग करा. – एक जुनी म्हण

३) आरोग्यात अनेक गोष्टी येतात. जनतेला वाटणारे सौख्य, आनंद, सुरक्षितता आणि मनाचा शांतपणा. – बेंजामिन डिझरेली

४) जीवनात अपमान, अपयश, धोका यासारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसाल तर जीवन आणखी कडू होईल. – अनामिक

५) मानवाच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द म्हणजे मानव जातीने वापरलेले सगळ्यात शक्तिशाली औषधी रसायन होय. – रुडयार्ड किपलिंग

६) जर विचारांमुळे भाषा भ्रष्ट होत असली तर भाषेमुळे विचारही भ्रष्ट होऊ शकतात. – जॉर्ज ऑरवेल

७) जो माणूस स्वतःच्या मतावर ठाम असतो, त्याचे म्हणणे फारच थोड्या लोकांना पटते. – लाओ-त्सु, ताओ

८) आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या, नाहीतर त्याचं महत्त्व शून्य होतं. – व.पु. काळे

९) तुमच्याशी कोणी निर्बुद्धपणे वागले तरी त्याला सुबुद्धपणे प्रतिसाद द्या. – लाओ-त्सु, ताओ

१०) जे करणे अशक्य वाटते ते आपण पार पाडतो हे जेव्हा माणसाला कळते, तेव्हा मानवी सामर्थ्य वाढते. – बेन जॉन्सन

११) आयुष्य स्थिर नसते, फक्त मानसिक दृष्ट्या असमर्थ आणि मृत व्यक्तीच आपले विचार बदलत नाहीत. – एवरेस्ट डर्कसन

१२) जहाजात असताना आपले आणि जहाजाचे दैव एकच असते. – ब्युक मिनिस्टर फुलर

१३) आनंद आणि यश हे आपण कशाप्रकारे जगतो यावर अवलंबून असते, आपल्याकडे काय आहे यावर नाही. – जिम रॉन

१४) नेहमी स्वतःचे विचार मांडा, कारण कोकिळा आपलं गाणं गाते, पोपट दुसऱ्याची भाषा. – अनामिक

१५) ज्या व्यवसायाचा मार्ग नफ्याकडे जात नाही, तो व्यवसाय नसतोच, तो छंद असतो. – जेसन फ्राइड

१६) मी माझी शाळा माझ्या शिक्षणाच्या कधीही मधे आणली नाही. – मार्क ट्वेन

१७) तुलना दुःख निर्माण करते, प्रेम ईश्वरी शांती देते. – अनामिक

१८) लोकांना तुमची काळजी आहे हे जाणवले पाहिजे, मगच ते तुमचं ज्ञान ऐकतील. – झिग झिग्लर

१९) मानव विचारांना वास्तवात आणू शकतो. तो स्वप्न बघतो आणि ती साकार करू शकतो. – नेपोलियन हिल

२०) यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी कल्पनाशक्ती महत्त्वाची आहे. – चार्लस शेवाब

२१) प्रयत्न सोडून देणे हेच खरं अपयश आहे. जो प्रयत्न करतो, तोच यशस्वी होतो. – एल्बर्ट हब्बर्ड

२२) ध्येये योजनेच्या वाहनात बसूनच गाठता येतात. – स्टेफन ए. ब्रेनेन

२३) एकच मोठा निर्णय घ्यायचा म्हणून घाबरण्यापेक्षा, एक छोटं पाऊल पुढे टाकणं सोपं असतं. – बेन सॉंडर्स

२४) ज्यांना वाटतं की यशाची शक्ती त्यांच्या आत आहे, त्यांनाच खरे यश मिळते. – ब्रूस बार्टन

२५) ज्यांच्याकडे असामान्य जिद्द असते आणि चिकाटी असते अशी लोकं आपल्या उद्देशापासून कधीच मागे हटत नाहीत. उलट ते जसे जसे पुढे जातात त्यांची क्षमता अजून वाढत जाते.<br>जोहान वोल्फगॅंग वोन गोएथ.

यशासाठी प्रेरणादायक सुविचार (Success Quotes in Marathi)

Motivational Marathi Suvichar

२६) मला वाटतं, एखादी व्यक्ती आज कोणत्या पदावर आहे यावरून त्याचं यश ठरवू नये. तर इथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाची सुरुवात त्यांनी कोठून केली आणि आज या प्रवासात त्यांनी कोणकोणत्या अडचणींवर मात केली यावरून ठरवायला हवं.

२७) जगाची निर्मिती एका विशिष्ट प्रकारे झाली आहे. जर तुम्हाला आनंद उपभोगायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दुःखही उपभोगायलाच लागतं. तुम्हाला पहिलं अनुभवल्याशिवाय दुसरं मिळतच नाही.


२८) नेहमी महानच स्वप्न पहा. कारण तुम्ही जशी स्वप्न बघता तसे तुम्ही घडत जाता. तुमची स्वप्न आणि तुमचे आदर्शच सांगतात की तुम्ही भविष्यात काय बनणार आहात.


२९) अप्रतिम कल्पनाशक्ती आणि त्याला वास्तवतेमध्ये उतरवणे हे चांगल्या व्यावसायिकाचे प्रमुख गुण असतात. तो पहिल्यांदा एखाद्या गोष्टीची कल्पना करतो आणि नंतर ती अस्तित्वात आणतो.


३०) तुम्ही तुमचे बंगले हवेत बांधता का? छान. असंच करायचं असतं, ते हवेतच बांधायचे असतात. आता कामाला लागा आणि तुम्ही बांधलेल्या बंगल्याच्या खाली पाया बनवायला सुरुवात करा.


३१) जेव्हा योजना खूप आधीच आणि सुनियोजित बनवल्या जातात तेव्हा त्या योजना पूर्ण होण्यासाठी भोवतालची परिस्थिती आश्चर्यकारकरीत्या बदलताना दिसते.


३२) तुमची क्षमता असो वा नसो. तुमची स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी योजना तयार करा. योजना तयार झाली की, त्या दिशेने बेधडक वाटचाल सुरू करा.

३३) दूर अंतरावर असणाऱ्या अस्पष्ट गोष्टींना बघण्याचा प्रयत्न करत बसण्यापेक्षा तुमच्या हातात असणाऱ्या सुस्पष्ट गोष्टींवर काम करायला सुरुवात करा.

३४) तुम्ही ज्या भावनेने कार्य कराल तसेच घडेल, त्यामुळे मी यशस्वी होणारच याच भावनेने नेहमी कार्य करा.

३५) प्रयत्न करत रहा, यश मिळेलच.

३६) थोडेसे कष्ट आणि अजून एकच पाऊल जेव्हा यशापर्यंत पोहोचणार असतं, नेमकं तेव्हाच लोक प्रयत्न करायचं थांबतात.

३७) कधीही माघार घेऊ नका. कारण ही तीच वेळ असते जेव्हा संकट माघारी फिरणार असतं.

३८) सोपं नसलं तरी चुका करण्याची तयारी ठेवा. आणि जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही चुका कराल तेवढं चांगलं.

३९) हुशारीने केलेले नियोजन ही यशाची पहिली पायरी आहे. जो मनुष्य नियोजनपूर्वक कार्य करतो त्याला हे माहिती असतं की, तो कुठे चालला आहे, कुठपर्यंत प्रगती झाली आहे, तसेच तो ध्येयापर्यंत कधी पोहोचणार आहे ,याचाही त्याला चांगलाच अंदाज असतो.

४०) अनेकांमध्ये एखादाच यशस्वी होतो कारण त्याने अनेकदा अपयशाला तोंड दिलेलं असतं, जर त्याला कधी अपयशच आलेच नसते तर त्याला अत्युच्च अशा यशाची ओळख झाली नसती.

४१) आपण जर आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य केलं तर आपण स्वतःलाच आश्चर्याचा धक्का देऊन एक कल्पनातीत व्यक्ती बनू.

४२) धोका न पत्करता मिळालेल्या यशामध्ये खरा आनंद मिळत नसतो.

४३) माणसांमध्ये असलेल्या असामान्य शक्ती आणि ऊर्जेची इतरांनाच काय, पण त्याला स्वतःलाही कल्पना नसते. तू काय करू शकतो हे जोपर्यंत तो प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्यालाही माहित पडत नाही.

४४) जोपर्यंत एखादी व्यक्ती असामान्य ध्येय साध्य करण्याविषयी विचार करत नाही तोपर्यंत ती ते साध्य करू शकत नाही.

४५) जेव्हा तुम्ही तुमच्याकडील अंगभूत क्षमतांचा पुरेपूर उपयोग करता तेव्हा तुम्हाला नक्कीच असामान्य यश आणि आनंद प्राप्त होतो.

४६) आपल्यामध्ये किती प्रचंड क्षमता आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते. या क्षमतांमुळे आपण अशा गोष्टी करू शकतो ज्यांचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो.

४७) मी असं मानत आलो आहे आणि आजही मानतो की, आपल्या भाग्यानुसार जे काही चांगलं किंवा वाईट मिळतं त्याकडे बघायलचा दृष्टिकोन बदलून आपण त्याला एक नवा अर्थ देऊ शकतो. त्याचे रूपांतर अर्थपूर्ण आणि मौल्यवान गोष्टींमध्ये करू शकतो.

४८) भट्टीत तापवल्यानंतर सोनं उजळून निघत त्याप्रमाणे यशस्वी माणसं सुद्धा समस्यांच्या भट्टीतून उजळून निघतात.

४९) कुठल्याही परिस्थितीत तुमची ऊर्जा किंवा उत्साह कमी न होऊ देण्याची चिकाटी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.

५०) उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे आपल्याला जे सर्वोत्तम करणं शक्य आहे ते आपण करत राहावं.

विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार (Suvichar for Students in Marathi)

Motivational Marathi Suvichar

५१) बहुतांश लोक हे यशप्राप्तीच्या क्षणभर आधी माघार घेतात. काही खेळ जिंकायच्या एक मिनिट आधी, तर काही विजयीरेषेच्या एक पाऊल आधी माघार घेतात. – एच. रोस पेरोट

५२) कोणतेही कार्य करताना पैशाची समस्या कधीच नसते, समस्या असते चांगल्या कल्पनेची. जर कल्पना चांगली असेल, तर योग्य वेळी योग्य ठिकाणाहून आवश्यक तेवढा पैसा नक्की मिळतो. – रॉबर्ट स्कुलर

५३) कोणतेही ध्येय साध्य करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ते प्राप्त करण्याविषयीची अतिप्रबळ इच्छा. – चार्लस इ. विल्सन

५४) या जगात सहजतेने काहीच मिळत नाही. कष्ट करा. सतत प्रचंड कष्ट करत राहणं हेच यशप्राप्तीसाठीचं गमक आहे. – हामिल्टन होल्ट

५५) जे बदलू शकत नाही ते सहन करणेच योग्य. – जेम्स हार्वर्ड

५६) ज्याला कष्ट करणं माहित नाही त्याला वीरताही प्राप्त होत नाही. जो समस्यांना सामोरं जात नाही त्याला साहसही प्राप्त होत नाही. रहस्याचा शोध घेणं हे तर मानवी जीवनाचं अंगच आहे. आपल्याला जे हवं असतं ते समस्यांच्या मातीमध्ये टाकलेल्या बीजामधूनच उगवतं. – हॅरी इमर्सन फोसडिक्स

५७) आपण ज्या ज्या प्रसंगांमधून जात आहोत ते सर्वच प्रसंग आणि घटना आपल्याला आपल्या ध्येयापर्यंतच घेऊन जात आहेत, हा विचार करूनच जीवन जगले पाहिजे. या विचारामुळेच आपल्याला आशेचा किरण सापडत जातो. – रेमंड होलीवेल

५८) प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच. प्रत्येक नकारात्मकतेला सकारात्मक उत्तर असतच. प्रत्येक घटनेचा काही ना काही परिणाम असतोच. – ग्रेस स्पीअर

५९) तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळणारे यश हे तुमच्या स्वतःविषयीच्या मान्यतांवर अवलंबून असते. – रॉबर्ट कोलीयर

६०) या जगात अशी बरीच सत्य आहेत ज्याचा आपल्याला तोपर्यंत उलगडा होत नाही जोपर्यंत आपण स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेत नाही. – जॉन स्टुअर्ट मिल

६१) मी जेवढं जास्त जगत गेलो तेवढीच मला खात्री होत गेली की, अशक्त आणि शक्तिशाली तसेच महान आणि क्षुल्लक लोकांमध्ये एक मोठा फरक असतो तो म्हणजे अभेद्य निर्धाराची शक्ती. अशी शक्ती असणाऱ्या माणसाचे एकदा लक्ष्य ठरले की, जिंका किंवा मरा, हेच त्याचे ब्रीद असते. – सर थॉमस पॉवेल बक्सस्टन

६२) जीवन ही अनुभवांची श्रृंखला आहे. प्रत्येक अनुभव आपल्याला प्रगल्भ बनवत असतो. या जगाची निर्मिती आपल्या चारित्र्याची जडणघडण करण्यासाठी झालेली आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक समस्या आणि अडथळे आपल्याला पुढेच घेऊन जाण्यासाठी असतात. – हेनरी फोर्ड

६३) अदम्य साहस, विजयाची धुंदी आणि सर्जनशीलतेमध्येच माणसाला खरा आनंद मिळतो. – ॲन्टीनो दी सेंट इक्सक्युपेरी

६४) या जगात ज्या ज्या लोकांना असामान्य यश मिळालेलं आहे, त्या लोकांनी अपयशाची चवही नक्कीच चाखलेली असते. अपयशाची टांगती तलवार डोक्यावर ठेवूनच ही लोक यशाची शिडी चढत जातात. – नेपोलियन हिल

६५) आपल्या यशप्राप्तीसाठी लागणाऱ्या घटना कोणत्या क्रमाने व्हायला पाहिजेत, तो घटनाक्रम ठरवणे म्हणजेच कार्य योजना तयार करणे. – जॉर्ज मॉरेस

६६) स्वतः निर्णय घेण्याची जबाबदारी घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची जबाबदारी उचलण्यासारखं आहे. जी लोकं निर्णय स्वतः घेतात ते स्वतः त्यांच्या जीवनाला दिशा देऊ शकतात. – आर्बी एम. डेल

६७) आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीच्या मदतीने महान कार्य करणे यातच खरं यश सामावलेलं आहे. – ओरिसन स्वेट मार्टेन

६८) असामान्य गोष्टी, नवे शोध, सर्जनशील प्रयोग हे प्रतिकूल आणि निराशेच्या परिस्थितीतच जन्म घेतात. – सॅम्युअल स्माइल

६९) समस्या हे ईश्वराचं हत्यार आहे. या हत्याराद्वारे ईश्वर आपल्याला घडवत असतो. – हेनरी वार्ड बीचर

७०) सर्व यशस्वी लोक त्यांचं पहिलं, दुसरं, तिसरं, आणि चौथं अशी एकामागे एक पावलं उचलत जातात. त्या प्रत्येक यशस्वी पावलागणिक त्यांच्या पहिल्या पावलाचं महत्त्व अधिक जाणवत असतं. – राल्फ वाल्डो इमर्सन

७१) जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेता तेव्हा समाजाची किंवा इतरांची परवानगी मागायची गरज भासत नाही. जेव्हा तुम्ही परवानगी मागता, याचा अर्थ तुमच्या जीवनाचं काय करायचं हे ठरवायचा हक्कच दुसऱ्यांना देता. – जेफरी एफ. अबर्ट

७२) एका गोष्टीवर तुमचा सर्वात जास्त ताबा असतो तो म्हणजे तुमचे स्वतःचे विचार. तुमचे स्वतःचे विचारच तुमचं भवितव्य ठरवत असतात. – पॉल जी. थॉमस

७३) अथक परिश्रमानेच आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नानेच वाटेतील सर्व अडचणी नाहीशा होतात आणि असामान्य असलेलं ध्येयही साध्य होतं. – क्लाउड एम. ब्रिस्टॉन

७४) तुम्ही कधीही निसर्गाला फसवू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी आवश्यक तेवढी किंमत मोजता तेव्हाच निसर्ग तुम्हाला ती गोष्ट प्राप्त करून देतो. – नेपोलियन हिल

७५) प्रतिकूल परिस्थिती माणसाला घडवत नाही. ती तर फक्त माणसामधील गुणवत्तेची जाणीव करून देते. – इपिक्टेटस

मनःशांती आणि सकारात्मक विचार (Positive Thoughts in Marathi)

Motivational Marathi Suvichar

७६) तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये असामान्य कार्य करण्याची क्षमता असते. जेव्हा तुम्ही तुमच्या मान्यता सोडायला तयार होता त्यावेळेला तुम्हाला या क्षमतांचं दर्शन होतं. – मॅक्सवेल माल्टझ

७७) एखाद्या अपयशाने खचून न जाता, जेव्हा एखादी व्यक्ती एका- मागोमाग एक साहसी कार्य करत जाते ,तेव्हाच त्याच्या आत्म्याची खरी सुंदरता प्रकट होते. – ॲरिस्टॉटल

७८) प्रतिकूल परिस्थितीमध्येही तुम्ही जेव्हा अविरत कार्यरत राहता तेव्हा तुमच्या रस्त्यात येणाऱ्या समस्या आपोआप सुटत जातात. – डी अलेम्बर्ट

७९) तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात आणि तुमच्याकडे जे काही आहे त्याच्या आधारे तुम्ही जे करू शकता ते करा. – थिओडोर रुझवेल्ट

८०) जेव्हा सगळे थकतात आणि हातपाय गाळतात त्यानंतर तुम्ही केलेल्या शेवटच्या प्रयत्नामुळे तुम्ही विजयी ठरता. – जेम्स जे कॉर्बेट

८१) ज्या प्रमाणे पेरल्याशिवाय उगवत नाही, दुःखाचे अश्रू वाहिल्याशिवाय आनंदाचे मोल कळत नाही त्याचप्रमाणे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. – राल्फ रॅन्सम

८२) विद्वत्ता ही आपल्या जीवनातील घटना आणि त्यावरील आपलं चिंतन यांचं एकत्रिकरण असतं. – ॲरिस्टॉटल

८३) महान व्यक्ती लहान प्रसंगांमधून महान धडा घेतात. – इमेट फॉक्स

८४) तुम्हाला जीवनाकडून काय मिळालं यापेक्षा तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन तुमच्या जीवनाविषयी सांगतो. तुमच्या बाबतीत काय घडत, यापेक्षा जे घडलं आहे त्यावर तुम्ही काय करता यावरून तुमचं जीवन ठरतं. – जॉन हॉमर मिलर

८५) या जगात चिकाटीची जागा दुसरी कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही. कित्येक हुशार लोक अपयशी होताना पाहिले असतील पण गुणवंत कधीही अपयशी होत नाहीत. शिक्षणापेक्षा सुशिक्षित पणाला जास्त महत्त्व आहे. चिकाटी आणि संकल्पशक्ती हे दोन गुण स्वयंपूर्ण आहेत. – काल्विन कुलीज

८६) यश प्राप्तीच्या आधी लोकांना हार आणि अपयशांचा सामना करायलाच लागतो. जेव्हा अपयश माणसावर विजय मिळवतं, तेव्हा पहायला मिळणारी गोष्ट असते ती म्हणजे माघार. आणि बहुतेक वेळा लोक हेच करताना दिसतात. – नेपोलियन हिल

८७) काही लोक त्यांच्या कलाकृतीच्या शेवटच्या टप्प्यात आल्यावर काम सोडून देतात. अशा वेळेला केलेल्या कष्टांची पराकाष्टाच लोकांना यश संपादन करून देते. – हिरोडोटस

८८) चिकाटी, सातत्य आणि निरंतरता या गोष्टींमुळे यशप्राप्ती होतेच. जस जसा यांचा सराव होतो त्या जास्तच प्रखर आणि तेजस्वी होत जातात. – जोहान वोल्फगॅंग वोन गोएथ

८९) काही गोष्टींना पर्याय नसतोच. महान कार्ये ही शक्तीने नाही तर चिकाटीने पूर्ण होत असतात. – सॅम्युअल जॉन्सन

९०) निरंतरता न पाळणे यासारखं दुसरं अपयश नाही. आतून हार पत्करणं यापेक्षा वाईट काही नाही. आपल्या अस्तित्वाचा उद्देश्य कायम लक्षात ठेवणं हेच सर्वश्रेष्ठ आहे. – एल्बर्ट हब्बर्ड

९१) चिकाटी हा सर्वोत्तम गुण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निराश न होता कायम प्रयत्नशील राहणे हीच विजयाची गुरुकिल्ली आहे. – जेम्स व्हिटकोम रीले

९२) तुम्ही जिथे आहात तिथपासून आणि तुमच्याकडे जे आहे त्यासह सुरुवात करा. – थिओडोर रुजवेल्ट

९३) इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचा ध्येयप्राप्तीचा संकल्प जास्त महत्त्वाचा आहे, हे कायम लक्षात ठेवा. – अब्राहम लिंकन

९४) जर सकारात्मक दृष्टिकोन असेल आणि चिकाटी असेल तर एखादी व्यक्ती तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त मोठं यश संपादन करू शकते. – सॅम्युअल स्माईल

९५) लोक हरतात याचं एकच कारण म्हणजे ते माघार घेतात. जेव्हा परिस्थिती त्यांच्या विरुद्ध दिसायला लागते तेव्हा लोकांचा विश्वास उडतो. अशा वेळेला ते ठाम राहू शकत नाहीत. जर आपल्यापैकी प्रत्येकाने असंभव साध्य करण्याची तयारी दाखवली तर आपण कोणतीही गोष्ट असंभव नाही ही संकल्पना खरी सिद्ध करून दाखवू शकतो. फक्त भीती नष्ट केलीत तर तुम्ही जे हवं ते सर्व साध्य करू शकता. – डॉ. सी. इ. वेल्व

९६) जेव्हा संकटे येतात तेव्हा मी कधीही निराश होत नाही कारण प्रत्येक संकटावर केलेली मात मला जीवनात एकेक पाऊल पुढे नेत असते. – थॉमस एडिसन

९७) एक तर मला रस्ता मिळतो किंवा मी तो तयार करतो. – हॅनीबल

९८) यशप्राप्तीसाठी जीवनामध्ये अडथळे येण्याची आवश्यकता असतेच. जीवनात येणारा प्रत्येक अडथळा व समस्या तुम्हाला झुंज द्यायला शिकवते. त्यामुळे तुमच्या मधील कलागुणांना आणि कौशल्याला जास्त चांगल्या प्रकारे प्रकट होण्याची संधी मिळते. प्रत्येक समस्येनंतर तुम्ही जास्त कर्तुत्ववान आणि आत्मविश्वासी बनता. – ओग मॅंडीनो

९९) जन्म न घेता जीवन जगणं हे जितकं अशक्य आहे तितकच धोका न पत्करता नफा मिळवण. साहसा शिवाय अनुभव आणि कष्टाशिवाय फळ मिळवणं अशक्य आहे. – ए. पी. गोंथे

१००) तुम्ही साहसी असलंच पाहिजे. साहसाचा खरा अर्थ असतो की, आपला उत्साह न गमावता एका मागोमाग एका अपयशाचा सामना करत पुढील यात्रा करत राहणे. – विन्स्टन चर्चिल

Conclusion

ह्या प्रेरणादायक मराठी सुविचारां मधून तुम्हाला नक्कीच जीवनात सकारात्मकता मिळेल. दररोज एक विचार वाचा आणि शेअर करा. तुमच्या मित्रमंडळींसोबत हे विचार WhatsApp स्टेटसवर किंवा सोशल मीडियावरही शेअर करा.

📚 Other Articles You May Like – 100+ Best Marathi Suvichar | Marathi Suvichar for School Students

English Content You May Like – blog.marathiantarang.com

YouTube – Marathi Antarang

Leave a Comment