बावधनचे बगाड : नवस फेडण्याचा प्रकार

bagad

बगाड (Bagad) म्हणजे काय ?

मराठी विश्वकोशाच्या मतानुसार देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. बगाड(Bagad) म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकवून माणसाची काढलेली मिरवणूक. ज्याला नवस फेडावयाचा आहे त्याने, किंवा त्याच्या वतीने दुसरा कोणीतरी बगाडस्वार होऊ शकतो.

बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे तीस चाळीस फूट उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या सहाय्याने बगाड्यास चढविण्यात येते.सोनेश्वर मंदिरापासून बैलांच्या मदतीने बावधन गावापर्यंत धष्टपुष्ट बैलांच्या मदतीने गावापर्यंत आणण्यात येते.

खिल्लार बैलांची जोडी:

बगाड ओढण्यासाठी धष्टपुष्ट बैलांची गरज असते. यासाठी शेतकरी संपूर्ण वर्षभर आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देऊन तयार केले जाते. हे खिल्लार देखने बैल खास पाहण्यासाठी शेतकरी लोक महाराष्ट्रातून येत असतात.

प्रत्यक्ष बगाड यात्रेस प्रारंभ:

बावधन गावच्या पूर्वेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर असलेल्या कृष्णा नदी तीरावरील सोनेश्वर येथून बगाड मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावर्षीचा २०२३ बगाड्याचा मान दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला. 

सुमारे ३५० वर्षापासून ही यात्रा साजरी केली जाते असे मानले जाते.

नारळ, नोटांच्या माळा, तोरणे, झेंडे तसेच नवसाचे गोंडे बगाडास बांधण्यात येतात. काशिनाथाचे चांगभले या गजरात सोनेश्वर पासून बावधन मधील भैरवनाथाचे मंदिरापर्यंत या बगाड यात्रेस प्रारंभ होतो. 

बगाडा बरोबर वाघजाई, भैरवनाथ, ज्योतिबाच्या पालख्याही सोबत चालत असतात. या पालख्यांचेही भाविक दर्शन घेत असतात.

बगाड गाड्यास शेतातून जाताना एका वेळेस १२ बैल जुंपले जातात कारण शेतात खाच खळगे ,खड्डे ,सरी असतात. रस्ता नसतो. इतर वेळी रस्त्यावर चार बैलांवर बगाड ओढले जाते. बगाड गावच्या दिशेने जात असताना ठीक ठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या काढण्यात येतात.

पिसाळ व भोसले तरफ :

बगाडाच्या उजव्या बाजूस पिसाळ भावकीतील लोक असतात तर डाव्या बाजूला भोसले भावकीतील लोक असतात. हे लोक बगाडाचा बॅलन्स साधत असतात. बगाड कोणत्याही दिशेला लवंडू नये हे पाहतात. 

करण बगाडाच्या शिडाला मोठा दोर बांधलेला असतो व डाव्या व उजव्या बाजूला त्या दोराचे टोक असते.

यात्रेतील दुकानांची रेलचेल :

बगाड वाई पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर पोहोचते तेथे रस्त्याच्या दुरतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेयांची व फळांची दुकाने, उसाची गुऱ्हाळे, देवाच्या फ्रेमची, कटलरी ची दुकाने थाटण्यात येतात.

आपली संस्कृती :

आपली संस्कृती व आपल्या परंपरा फार श्रेष्ठ आहेत. सण हे प्रत्येक कुटुंबात साजरे केले जातात, तर उत्सव हे अनेक लोक एकत्र येऊन साजरे करतात. आपले सण आणि उत्सव हे सांस्कृतिक चैतन्याचे प्रतीक आहेत. 

ते आनंदाचे, उत्साहाचे, कौटुंबिक व सामाजिक प्रेमाचे स्त्रोत आहेत. बगाडासारख्या यात्रेतून आपल्या पूर्वजांची जीवनपद्धती त्यांच्या रूढी, परंपरा याबद्दल पुढील पिढीला माहिती मिळते.

खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले :

यावर्षी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बगाडाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज आहेत.

वाई तालुक्यातील (सातारा ) बगाड यात्रेची गावे :

आजही एकविसाव्या शतकात बगाड यात्रेची परंपरा वाई तालुक्यातील सुरूर, कवठे, पसरणी, पांडे, फुलेनगर या गावात सुरू आहे.

हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी :

यावर्षी अकरा एप्रिल २०२३ला कवठे बगाड यात्रेच्या निमित्त बगाडावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली हे यावर्षीच्या कवठे यात्रेचे वैशिष्ट्य होय.

मात्र सर्वात मोठी बगाड यात्रा बावधन येथील असून जवळपास दोन ते तीन लाख माणसे या यात्रेत हजेरी लावतात. हे या यात्रेचे वैशिष्ट्य होय.

बावधन बगाडाच्या हिरा बैलाचे निधन 2023

बावधन हे बगाड यात्रेचे सुप्रसिद्ध गाव आहे. बगाड ओढण्यासाठी जातिवंत बैल लागतात. हे जातिवंत बैल जपण्याची बावधन गावाची परंपरा आहे. गेल्या २० वर्षांहून अधिक पिसाळ तर्फेची मानाची बाजू सांभाळणाऱ्या हिरा बैलाचे नुकतेच निधन झाले. ह्या बैलाचे वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत चपळ व धिप्पाड होता. यात्रेच्या वेळी बगाडाचा गाडा रुतून बसला की या बैलाला बगाडास इतर बैलांच्या बरोबर जुंपले जायचे.

त्याला जुंपल्यावरच त्याच्या त्याच्या ताकदीने रुतलेले बगाड शेतातून निघत असे. हिराचे मालक पोपट गिरी
गोसावी हे सोनजाई डोंगरावरील संन्याशी. त्यांच्या मठात खिलार जातीच्या जातीवंत तीस ते चाळीस गाई पाळल्या जात आहेत. यातील एका गाईच्या पोटी हिरा नावाच्या बैलाचा जन्म झाला होता. पोपट गिरी गोसावी,
तुकाराम गिरी गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांचा हिरावर अत्यंत जीव होता.पोपट गिरी गोसावी यांना हिरा बैलासाठी वीस लाख रुपयांची ऑफर दिली होती. तरीही त्यांनी त्याला विकले नाही.

बावधन गावात जवळपास २५० बैल खिलार जातीचे सांभाळले जातात. या बैलांना खारीक, खोबरे, व बदाम असा खास खुराकही वर्षभर देण्यात येतो. या बैलांचे मुख्य काम बगाड ओढणे व इतर दिवशी आपल्या मालकाला शेतीकामात मदत करणे.
हिरा बैलाच्या निधनानंतर त्याचे छायाचित्र, व्हिडिओ कमालीचे व्हायरल झाले. युट्युब वर त्याच्या व्हिडिओला लाखो व्हीजन अन लाईक्स मिळाले.

Other Articles:

  1. 40+ Marathi Suvichar

सामर्थ्य विचारांचे

- प्रा.सतीश सूर्यवंशी.