Rich Dad Poor Dad Marathi Summary |
रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश
मी आजपर्यंत अनेक पुस्तके वाचत आलेलो आहे. त्यापैकी काही पुस्तके आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारी असतात. अशा पुस्तकांतून अनेक गोष्टी शिकता येतात. रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट टी.कियोसाकीचे पुस्तक आपल्याला अर्थसाक्षरते विषयी मार्गदर्शन करते. अनेक गोष्टी यातून आपल्याला शिकता येतात.
Table of Contents
ToggleRich Dad Poor Dad Marathi Summary | रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश
पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे आपल्या अवलोकनार्थ ठेवीत आहे. याचा निश्चित लाभ होईल अशी मला आशा वाटते.
महत्त्वाचे मुद्दे :
” लोक आर्थिक दृष्ट्या झगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्षे शाळेत गेलेले असतात, पण पैशाबद्दल काहीच शिकलेले नसतात. परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात, पण पैशाला कामाला लावायला कधीच शिकत नाहीत.”
– रॉबर्ट कियोसाकी.
आर्थिक साक्षरतेची गरज :
आज शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी अर्थसाक्षर नसतो. तुम्ही किती मिळवता, यापेक्षा तुम्ही किती सांभाळून ठेवता आणि किती पिढ्यांपर्यंत हे महत्त्वाचे आहे. शिकून पदवीधर होऊन बाहेर पडणारी मुलं आर्थिक बाबतीत निरक्षर असतात.
आकडे वाचता यायला हवेत :
कियोसाकी म्हणतात अकाउंटिंग हा जगातला सर्वात निरस विषय आहे. तो अतिशय गोंधळ उडवणाराही असू शकेल. पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल आणि ही श्रीमंती दीर्घकाळासाठी हवी असेल तर हाच विषय अतिशय महत्त्वाचा होतो.
अकाउंटिंग मध्ये फक्त संख्याच नाही तर आकडेही वाचता यायलाच हवेत. त्याचं आकलनही व्हायला हवं.
अर्थ साक्षरता म्हणजे तुम्हाला फायनान्शिअल स्टेटमेंट वाचता येणे आणि त्याचं आकलन होणे. ही क्षमता तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची शक्तिस्थान आणि मर्मस्थाने स्पष्टपणे दाखवीते. आर्थिक दृष्ट्या चांगल्या मार्गावर जायचं असेल, तर साधं गणित आणि चांगले सामान्य ज्ञान यांचीच गरज आहे.
मालमत्ता व कर्ज यातील फरक :
तुम्हाला मालमत्ता व कर्ज यातला फरक कळणं आवश्यक आहे आणि मालमत्ता खरेदी करायची आहे हे समजलं पाहिजे. श्रीमंत व्हायचं असेल तर हे माहीत असायलाच पाहिजे. श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात. गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज मिळवतात आणि तीच आपली मालमत्ता असल्याचं समजतात.
तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर मालमत्ता खरेदी करण्यात आयुष्य वेचा. तुम्हाला गरीब आणि मध्यमवर्गीय राहायचं असेल तर देणे विकत घेत राहा. आज आपण पैसे निर्माण करण्यावर लक्ष एकाग्र करण्याऐवजी कर्ज घेण्याकडे अधिक लक्ष देतो. ते अल्पकाळासाठी सोपं आणि उपयुक्त वाटलं तरी दीर्घकाळासाठी वाईट आहे.
श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात :
श्रीमंत लोक उत्पादनशील असतात आणि परताव्याची खात्री असलेली जोखीम पत्करतात. श्रीमंत मालमत्ता विकत घेतात. मध्यमवर्गीय जे कर्ज घेतात, तीच त्यांना मालमत्ता वाटते. खूप मेहनत करण्याऐवजी पैसा निर्माण करायचा असेल, तर आर्थिक बुद्धिमत्ता हाच उपाय आहे.
योग्य ठिकाणी गुंतवणूक करा :
नीट अभ्यास करून गुंतवणूक केली, छोटी रक्कम मोठ्या रकमेत बदलते. तुमचा उद्योग ओळखा :
- आपल्याला प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही, असा कोणताही व्यवसाय.
- स्टॉकस्, शेअर्स.
- बॉंडस्
- म्युच्युअल फंडस्
- उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्ता.
- नोट्स ( प्रॉमिसरी नोट्स, हुड्या.)
- बौद्धिक संपदा (लेखन, पेटंट यावरील रॉयल्टी )
पैशाबाबत सर्वात चांगली गोष्ट ही की तो 24 तास काम करतो. पिढ्यान पिढ्या काम करीत राहतो. तुम्हाला हरण्यामुळे दुबळे होण्याची भीती वाटत असेल तर सुरक्षित खेळा. समतोल गुंतवणूक करा.
शिक्षण घ्यायला सुरुवात करा:
आपण एखाद्या विषयात अज्ञानी आहोत याची जाणीव झाली की पहिल्यांदा त्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात करा. किंवा त्या विषयावरच पुस्तक शोधा. फाजील आत्मविश्वासावर मात करण्याचा अभ्यास हाच उपाय आहे.
तुमच्यापैकी ज्यांना पैशाचं स्वामी व्हायचं आहे, त्यांनी स्वतःला लवकरात लवकर शिकून तयार करणे केव्हाही चांगलं. पैसाही बदल घडवून आणणारी अतिशय शक्तिशाली गोष्ट आहे.
आपण एखाद्या विषयात अज्ञानी आहोत याची जाणीव झाली की पहिल्यांदा त्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात करा. किंवा त्या विषयावरच पुस्तक शोधा. फाजील आत्मविश्वासावर मात करण्याचा अभ्यास हाच उपाय आहे.
जेव्हा आपण पैशाविषयी बोलत असतो तेव्हा भावना ही आर्थिक बुद्धिमत्ता कमी करते, हेही सत्य आहे. पैसा हा प्रत्येक निर्णय भावनिक करतो.
आर्थिक बुद्धिमत्ता :
तुम्हाला पैशाचं स्वामी व्हायचं असेल तर तुम्ही त्यापेक्षा हुशार असायला हवं. पैशाला जे सांगितलं जातं, तेच तो करतो.तो तुमची आज्ञा पाळेल. त्यामुळे त्याचे गुलाम होण्यापेक्षा स्वामी व्हा. तीच आर्थिक बुद्धिमत्ता आहे.
सुरक्षित गुंतवणूक करा :
तुम्हाला हरण्यामुळे दुबळ होण्याची भीती वाटत असेल, तर सुरक्षित खेळा. समतोल गुंतवणूक करा. तुमचं वय 25 पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जोखीम घ्यायला घाबरत असाल, तरीही सुरक्षित खेळा.
फक्त त्याची सुरुवात लवकर करा. अडचणीच्या वेळी पैसा हाताशी असावा म्हणून साठ वयाचा पैसा लवकरात लवकर साठवायला घ्या, करण पैसे साठायला वेळ लागतो.
आपल्यासाठी केलं आहे आणि करा हे दोन शब्द महत्वाचे आहेत. त्यामुळे आर्थिक फायदे मिळवण्यापूर्वी कृती करा. लगेच करा. तुमच्या आर्थिक बुद्धिमत्तेला जागं करा. तुमची बुद्धिमत्ता जागं केलं जाण्याचीच वाट पाहत आहे.
सारांश :
श्रीमंती किंवा पैशाची कमतरता तुमच्या भावनांवर अवलंबून असते. बहुसंख्य लोक पैशासंबंधी निर्णय भावनेवर घेतात. माणसाचे आर्थिक आयुष्य दोन भावनांवर नियंत्रित असते. भीती आणि लोभ.
भावनिक होऊन पैसे खर्च केल्यावर व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते. भीती आणि लोभ यांच्या चक्रात मनुष्य अडकतो.
कियोसाकी याला रॅट रेस म्हणतात. समाजातील अनेक व्यक्ती या रॅट मध्ये अडकले आहेत. त्यामुळे पैशासंदर्भातील निर्णय सावध राहून व विचारपूर्वक घ्या. यामुळे तुम्ही भविष्यकाळात आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल.
काम शिकण्यासाठी करा फक्त काम करायचे म्हणून करू नका.
आपण नोकरी करता करता अनेक स्किल शिकू शकतो याचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.
नोकरीमध्ये पगारापेक्षा स्किल शिकण्यावर जास्त भर दिला पाहिजे. करण माणूस जेवढी स्किल शकतो तेवढी त्याची किंमत वाढते. आणि तो जास्त पैसे कमवू शकतो.
श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. ते सिस्टीमवर काम करतात.
तुम्ही तेच बनता ज्याचा तुम्ही अभ्यास करता. करोडोपती सर्वांनाच व्हायचे आहे. पण त्यासाठी पुस्तकाचे वाचन अभ्यास कोणालाच करायला नको.
आपण तेच बनतो ज्याचा आपण अभ्यास करतो किंवा जिथे आपला जास्त वेळ देतो.
जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला श्रीमंत लोकांचा अभ्यास करावा लागेल.
आर्थिक साक्षर व्हा. हा विषय शाळेत शिकवला जात नाही. आर्थिक गोष्टींचे आपल्याला ज्ञान असले पाहिजे.
पैशाकडे पाहण्याचा व्यक्तींचा दृष्टिकोन या पुस्तकाच्या वाचनाने बदलतो.
आर्थिक दृष्ट्या सजग, साक्षर व्हावयाचे असेल तर आपण हे पुस्तक जरूर वाचावे असे मी मनापासून शिफारस करीत आहे.
Other Articles: