Marathi Suvichar For Students |100+ शालेय सुविचार भाग 2
१) गाढवा पुढे गीता वाचली.
२) भ्रष्टाचारी नातगोत किंवा गुरु सुद्धा ओळखत नाही.
३) टाकीचे घाव सोसल्याखेरीज देवपण येत नाही.
४) खोट्या मैत्रीपेक्षा उघड शत्रुत्व अधिक चांगले.
५) अर्धवट ज्ञान धोक्याचे स्थान.
६) हाती आलेल्या पैसा केव्हा जाईल याचा नेम नाही.
७) पृथ्वी रंगभूमी आहे. प्रत्येक जण येथे आपली भूमिका पार पाडत असतो.
८) सद्गुनाशिवाय रूप कवडी मोलाचे.
९) हाती घ्याल ते तडीस न्या.
१०) अति तेथे माती.
११) प्रिय व्यक्तीसाठी मन चिंती, ते वैरी न चिंती.
१२) ओसाड माळरानात पडलेला विस्तव आपोआप विझतो.
१३) चढेल तो पडेल.
१४) पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
१५) अपयश ही यशाची पायरी आहे.
100+ शालेय सुविचार भाग 2 | Marathi Suvichar For Students
१६) घोड्याला पाणवठ्यापर्यंत नेता येईल पण त्याला पाणी प्यायला लावता येणार नाही.
१७) हे चंचल मन आवरण्यास खरंच कठीण आहे.
१८) मी माणुसकीने जगतो. मी जनावर नाही.
१९) सुंदर रोम शहर एका दिवसात झाले नाही.
२०) दुरून डोंगर साजरे.
२१) ठाम निर्धार असेल तर काम तडीस जाते.
२२) दाम करी काम.
२३) कोणत्याही प्रकारे परतफेडीची अपेक्षा न धरता, सत्पात्री दान, हे खरे सात्विक दान.
२४) विश्वासाने आश्रय घेणाऱ्याचा विश्वासघात करण्यात काय शौर्य आहे!
२५) लवकर निजे, लवकर उठे, त्याला ज्ञान, आरोग्य ,संपत्ती भेटे.
२६) गर्वाचे घर खाली.
२७) अति मैत्री, मानाची हानी.
100+ शालेय सुविचार भाग 2 | Marathi Suvichar For Students
२८) असतील शिते तर जमतील भुते.
२९) राग अनेक अनर्थांचे मूळ आहे.
३०) कधीकधी अज्ञानातही सुख असते.
३१) मुलगा वाईट निपजेल पण माता वाईट होणार नाही.
३२) कर्माची गती कळण्यास कठीण.
३३) पूर्वजन्मीच्या संचितावर,
इहलोकाचे आपले जीवन अवलंबून असते.
३४) कुठे इंद्राचा ऐरावत अन् कुठे शामभटाची तट्टाणी.
३५) कोणीही कोणाचे काही सुद्धा बळकावू नये.
३६) माणसाला विद्याहीन अवस्थेत जगण्याचे फल काय?
३७) काट्याने काटा काढावा.
३८) हपापाचा माल गपापा.
३९) ज्याच्या नशिबात नाही, त्याच्या हाती आलेली वस्तूही नष्ट होते.
४०) कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे.
४१) ज्याचं करायला जावं भलं, तो म्हणतो माझंच खरं.
४२) पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.
४३) अनेक गुणांमध्ये एखादा कलंक दिसून येत नाही.
४४) एक ना धड भाराभर चिंध्या.
४५) हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वास करतो.
४६) देव तारी त्याला कोण मारी.
४७) उदार मनाच्या लोकांना सर्व पृथ्वी म्हणजे एक संयुक्त कुटुंबच.
४८) उद्योग केल्यामुळे कार्य होते.
४९) पिंड खाणारा कावळाही दीर्घायुषी होतो.
५०) वेळेचा अपव्यय मुळीच नको.
५१) आधी केले मग सांगितले.
५२) कामापुरता मामा.
५३) सिंह उपाशी मरेल पण गवत खाणार नाही.
५४) ज्ञानी लोकांनी काम करीत असणाऱ्या अडाण्यांचा बुद्धिभेद करू नये.
५५) स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
५६) कुत्र्याचे शेपूट काही केले तरी वाकडेच.
५७) हातच्या काकणाला आरसा कशाला?
५८) आपला आत्मा
जन्म मृत्यू विरहित आहे.
५९) भाव तेथे देव.
६०) निव्वळ दिव्याचे नाव घेऊन अंध:कार दूर होत नाही.
६१) निश्चयाचे ऐसे बळ, तुका म्हणे तेचि फळ.
६२) प्राण देण्याची वेळ आली तरी सज्जनांचा स्वभाव बदलत नाही.
६३) सज्जनाचा पहिला गुणधर्म कृतज्ञता.
६४) असाध्य ते साध्य, सायास करिता.
६५) गुहेत पडून राहिलेल्या सिंहाच्या भक्षस्थानी कोणता प्राणी पडेल?
६६) ज्ञानासारखी पवित्र वस्तू, या जगात दुसरी कोणतीही नाही.
६७) जो स्वपराक्रमाने श्रेष्ठत्व मिळवतो, तो स्वतः अनभिषिक्त राजाच असतो.
६८) स्त्रीचा मोठा अलंकार शील.
६९) विचार केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकू नये.
७०) नाक दाबले की तोंड उघडते.
७१) आसक्ती व अहंकार विरहित व्यक्तीला खरी मनःशांती लाभते.
७२) लाज सोडलेला नेहमी सुखी.
७३) गुणवानास दाही दिशा मोकळ्या असतात.
७४) सापाला दूध पाजणं म्हणजे विषाची वाढ करणे.
७५) दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे क्वचितच.
७६) दुसऱ्याचे हित जपणारे, स्वतःच्या सुखाकडे दुर्लक्ष करतात.
७७) पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
७८) सज्जनांचे सर्व ऐश्वर्य, इतरांच्या सुखासाठी असते.
७९) दुसऱ्यासाठी झिजलास तर जगलास.
८०) पुण्य ते उपकार, पापते
परपीडा .
८१) लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण.
८२) प्रगतीला पुढे आणखी एक पाऊल टाकता येते.
८३) दररोज काम करून अंगातून घाम निघाल्याशिवाय अन्न नाही.
८४) मनुष्याने रोज आपल्या आचरणाचे आत्मपरीक्षण करून, पशूशी तुल्य माझ्यात काय आहे? सज्जनाशी तुल्य असे माझ्यात काय आहे? हे पहावे.
८५) पहिल्याच घासाला माशी.
८६) देवाची करणी अन् नारळात पाणी निर्माण केल्यामुळे, नारळ प्यालेल्या पाण्याची आयुष्यभर परतफेड करतो.
८७) चूक निस्तारित बसण्यापेक्षा, ती न केलेली बरी.
८८) बुद्धी असूनही जो ती वापरत नाही त्याला कठोर शिक्षा पाहिजेच.
८९) आलिया भोगासी असावे सादर.
९०) वाहत्या गंगेत हात धुवून घ्या.
100+ शालेय सुविचार भाग 2 | Marathi Suvichar For Students
९१) नाचायला येईना, अंगण वाकडे.
९२) दुधानं तोंड पोळलं की ताकही फुंकून प्यावं लागतं.
९३) बळी तो कान पिळी.
९४) खायला काळ अन् भुईला भार.
९४) गरजेल तो पडेल काय?
९५) बहुत सुकृताची जोडी तरीच विठ्ठल आवडी.
९६) उत्तम लोक हाती घेतलेले काम अर्धवट टाकीत नाहीत.
९७) कावळा उंच राजवाड्यावर जाऊन बसला, तरी त्यास कोणी गरुड म्हणत नाहीत.
९८) प्रिय बोलण्याने सर्वांना आनंद होतो.
९९) या पृथ्वीवर तीन रत्ने म्हणजे पाणी, अन्न व सुभाषिते.
१००) संघटित दुर्बलही महत्कार्य करू शकतात. य:किंचित अनेक धागे वळून केलेल्या दोराने मत्त हत्तीलाही बांधता येते.
१०१) शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
१०२) पोटाची खळगी भरण्यासाठी मनुष्य काहीही करेल.
१०३) देव भावाचा भुकेला.
१०४) भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिणे जे लाजिरवाणे.
Other Article: 100+ [Marathi Suvichar] शालेय सुविचार | Marathi Suvichar for School Students
1 thought on “Best 100+ शालेय सुविचार भाग 2 | Marathi Suvichar For Students”