90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students
90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students
.
५) आलिया भोगासी असावे सादर.
६) चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
७) नीच बोलेल तो करेल काय अन् गरजेल तो पडेल काय?
८) थोर लोक एकदा स्वीकार केलेल्या व्यक्तीचे गुणदोष पहात बसत नाहीत.
९) इतर कोणत्याही संग्रहापेक्षा धान्यसंग्रहच श्रेष्ठ.
१०) निरोद्योगी माणसाच्या जीवनाचा धिक्कार असो.
११) श्रम करून थकत नाही तोपर्यंत देवही मदत करीत नाहीत.
१२) उदार ,क्षमाशील व गुणग्राही मालक भेटणे कठीण.
१३) होणारे न चुकेल, येईल जरी ब्रम्हा तया आडवा.
१४) कुणाच्या पोटी जन्मायचं हे दैवाधीन, पण पराक्रम करून दाखविणं माझ्या हाती.
१५) वृक्ष, दगड व पशुसुद्धा त्यागामुळे पूजनीय होतात.
१६) आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड पाडून घेणे.
१७) पैसा वाचविणे म्हणजे पैसा मिळविणे.
१८) दारिद्र्य हे सर्व दुःखांचे मुळ.
१९) चोरून दूध पिणाऱ्या
मांजरास बडगा दिसत नाही.
२०) निंदकाचे घर असावे शेजारी कारण त्यांच्यामुळे मी सुज्ञ झालो.
२१) जगा आणि जगू द्या.
२२) मोठा मासा लहान माशाला खातो.
२३) स्वामी तिन्ही जगाचा, आई- विना भिकारी.
२४) जनता जनार्दनाचा आवाज म्हणजे परमेश्वराचा आवाज.
२५) थेंब थेंब तळे साचे.
२६) जो जन्माला आला, त्याला मृत्यू व ज्याला मृत्यू आला त्याला जन्म निश्चित आहे.
२७) चिंता मानवाचे शरीर पोखरून टाकते.
२८) वृक्ष फार मोठे सत्पुरुष आहेत.
२९) चंदन वृक्षतोड करणाऱ्या कुऱ्हाडीचे तोंड सुगंधित करतो.
३०) पत्नीच्या अकाली निधनाने, घराचे भयानक आरण्य होते.
३१) चार दिवस सासूचे ,चार दिवस सुनेचे.
३२) पुढे नीट पाहून पाऊल टाका.
३३) प्रत्यक्ष पाहिलं, तेच खरं.
३४) बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
Get Your Copy on Amazon
90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students
३५) अडला नारायण गाढवाचे पाय धरी.
३६) गुणाचे मोल पैशापेक्षा अधिक.
३७) गुणवान गुणांची पारख करतो.
३८) चोर सोडून संन्याशाला सुळी.
३९) दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
४०) बैल गेला अन झोपा केला.
४१) गाढवाला गुळाची चव काय?
४२) जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.
४३) आयत्या बिळात नागोबा.
४४) खायला दिल्यावर सगळे खुश.
४५) गुरुवर्यांची आज्ञा आचरणात आलीच पाहिजे.
४६) आपलं शरीर म्हणजे परमेश्वरी मौल्यवान देणगी.
४७) जबरदस्त इंद्रिये, मी मी म्हणणाऱ्या मोठ्या लोकांची मने, जबरदस्तीने भलतीकडे खेचून नेतात.
४८) भगवंताच्या भीतीनेच माणूस सरळ वागतो.
४९) अडाणी, अश्रद्ध व संशयी आपल्या दुर्गुणांनीच खतम होतात.
५०) प्रथम योग्यता प्राप्त करा आणि नंतर इच्छा करा.
५१) ज्याचे मन त्याच्या ताब्यात असते, त्याला प्रसन्नता मिळते.
५२) आळस हा आपला वैरी आहे.
५३) थोडक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणारा खरा वक्ता.
५४) अपमानाने तुटलेले हृदय, पुन्हा कसे जोडता येईल?
५४) अडाण्याच्या हाती संपत्ती टिकत नाही.
५५) ज्याचं काम त्याने करावं, परक्याने केल्यास, पाचर उपटणाऱ्या वानराप्रमाणे मृत्यू येईल.
५६) कुत्री-मांजरं राजेगृही शिरतात, पण हत्ती बाहेरच असतो. तरी त्याला काही कमी पडत नाही.
५७) अडचण ही शोधाची जननी .
५८) कुमार्गाने जाणाऱ्याला सख्खा भाऊ देखील साथ देत नाही.
५९) वाईट रीतीने वागणारा वाल्यासुद्धा नंतर सदाचरणाने वाल्मिकी झाला.
६०) अति तेथे माती.
६१) प्रिय व्यक्तीसाठी मन चिंती, ते वैरी न चिंती.
६२) ओसाड माळरानात पडलेला विस्तव आपोआप विझतो.
६३) मन शुद्ध असेल तर घरचे पाणीही गंगाजल दिसेल.
६४) ईर्ष्येने काम करणारा सुखदुःखाची पर्वा करीत नाही.
६५) प्रत्येक सजीव प्राण्यात परमेश्वरी चैतन्य अंश असतो.
६६) वैरही मृत्यूबरोबरच संपतात.
६७) मनुष्य मरणाधीन आहे.
६८) मनुष्य योजतो एक, दैव योजते दुसरेच.
६९) जसं मन तसं माणसाचं जीवन.
७०) माणसाच्या मनावरच बरे किंवा वाईट अवलंबून असते.
७१) मंद गतीचा मनुष्यही
सततोद्यगाने जय पावेल.
७२) ऐकावे जनाचे करावे मनाचे.
७३) आधीच मर्कट, तशातही मद्य प्याला.
७४) मरावे परी कीर्तिरूपे उरावे.
७५) जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण.
७६) मोठे लोक ज्या मार्गाने गेले तोच आपला मार्ग.
७७) मोठे लोक वायफळ बडबड करीत नाहीत.
90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students
७८) परस्त्री मातेसमान, परद्रव्य मातीसमान, सर्व भुतांना स्वतःसमान पाहतो, त्यालाच सर्वोच्च ज्ञानदृष्टी आली.
७९) माणसाचा मोठा शत्रू माणूसच असतो.
८०) सामान्य जीवन अनेक वर्षे जगण्यापेक्षा, वैभवशाली एक तास जगणे जास्त मोलाचे.
८१) मूर्ख पैशाने उन्मत्त आणि शिकूनही भांडखोर होतो.
८२) प्रयत्न करूनही अपयश आल्यास आपणाला कोण दोष देईल?
८३) सदाचरणाची सुरुवात अति कठीण वाटते पण शेवटी सुखावह वाटते.
८४) कष्टा शिवाय इष्ट साधत नाही.
८५) तीव्र इच्छा असेल, तर मार्ग सापडतो.
८६) पैशाने मनुष्य उन्मत्त होतो.
८७) ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.
८८) गंजून जाण्यापेक्षा वापरून गेलेले बरे.
८९) बोलून उपयोग होत नसेल, तर न बोललेलेच उत्तम.
९०) मौन म्हणजे अनुमती.
९१) शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी.
९२) एका हाताने टाळी वाजत नाही.
९३) अंथरूण पाहून पाय पसरावेत.
९४) जसं अन्न, तशी बुद्धी.
९५) डोंगर पोखरून उंदीर काढणे.
९६) मानला तर देव, नाही तर दगड.
९७) जनी वंद्य ते सर्व भावे करावे.
९८) पाण्यात राहून जळाशी वैर करता येत नाही.
९९) घासून, तोडून, अग्नीत तापवून आणि ठोकून, चार मार्गांनी सोन्याचा कस पाहतात. त्याप्रमाणे व्यक्तीचा कस विद्या, शील, गुण व कृती पाहून ठरवितात.
१००) शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी.
Other Articles: Best 100+ शालेय सुविचार भाग 2 | Marathi Suvichar For Students
1 thought on “Best 90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students”