Best विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami & Dasara) माहिती

विजयादशमी किंवा दसरा.(Vijayadashami & Dasara)
अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami & Dasara) म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त दिवस. दसऱ्याच्या दिवशी विद्यार्थी सरस्वतीची पूजा करतात तर क्षत्रिय आपल्या शस्त्रांची पूजा करतात. या दिवशी शमी- वृक्षाची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. अपराजिता किंवा विजया देवी गावाच्या ईशान्येला असते, म्हणून त्या दिशेला गावाबाहेर जाऊन शमीचे पूजन केले जाते. नंतर ही शमीची पाने लुटून घरी आणतात. ती पाने घरातील आणि गावातील देवीला अर्पण केले जातात. शमीची पाने नातेवाईक, मित्रमंडळी व घरातील वडीलधारी माणसे यांना सोने म्हणून देतात. शमीची पाने न मिळाल्यास आपट्याच्या झाडाची पूजा करून ती पाने सोने म्हणून वाटतात.
दसरा सण सुरू झाला त्याची कथा.
कथा-१.
फार वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक क्रूर राक्षस होता. तो अत्यंत उन्मत्त झाला होता. त्रैलोक्याचा स्वामी झाला होता. त्याचा पराभव करणे अशक्य झाले होते. सर्व देव पार्वतीला शरण गेले. या संकटातून देवांना सोडवावे अशी विनवनी त्यांनी पार्वतीला केली. पार्वतीने दुर्गा- देवीचे भयंकर रूप धारण केले. दुर्गादेवी व महिषासुर यांचे तुंबळ युद्ध झाले. दुर्गा देवीने महिषासुराचे मस्तक तोडून त्याला ठार मारले.
Vijayadashami & Dasara Images


कथा दोन.
शुंभ, निशुंभ व चंडमुंड हे दैत्य पृथ्वीवर होते. ते अत्यंत उन्मत्त झाले होते. त्यांनी लोकांना त्रास दिला. त्यामुळे लोकांना त्यांचे जीवन नकोसे झाले. त्या राक्षसांनी लोकांना सळोकी पळो करून सोडले. त्या राक्षसांच्या विनाशासाठी देवीने चामुंडा रूप धारण केले. शुंभ- निशुंभ इत्यादी राक्षसांशी देवीने युद्ध केले ,व त्यांना ठार मारले. सगळ्या जगावरील संकट दूर झाल्याने पृथ्वीवर आनंदी आनंद झाला.
अश्विन शुद्ध दशमीला ही घटना घडली. हा दिवस म्हणजे देवीच्या विजयाचा दिवस, पराक्रमाचा दिवस म्हणून या दिवसाला
‘ विजयादशमी ‘(Vijayadashami & Dasara) असे नाव पडले.
कथा तीन.
पुराणात एक कथा आहे. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारादांनी प्रभू रामचंद्रास नवरात्र व्रत
आचरण्यास सांगितले. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री देवीने प्रभू रामचंद्रास दर्शन दिले,
‘ तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद दिला ‘.
प्रभूंनी ते व्रत पूर्ण करून दहाव्या दिवशी लंकेवर स्वारी केली व रावणाला ठार केले. श्री रामचंद्र विजयी झाले. तो दिवस नवरात्रानंतरचा दहावा दिवस होता. म्हणून त्यास विजयादशमी असे म्हणतात.
कथा चार
अज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमी- वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती.
पांडव विराट राजाच्या वाड्यात वेश बदलून नावे बदलून, राहत होते. एक दिवस कौरवांच्या सेनेने विराटच्या गाईंवर हल्ला केला. ते विराटाच्या गाई पळवून नेऊ लागले.
तेव्हा अर्जुनाने शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली आपली शस्त्रे बाहेर काढली व कौरव सेनेचा पाठलाग करून त्यांचा पराभव केला. व विराटाच्या गाई सोडवून आणल्या. ही घटना याच दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध दशमी या दिवशी घडली म्हणून या दिवसाला विजयादशमी असे नाव मिळाले.
आपट्याची किंवा शमीची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा, त्यासंबंधी एक कथा.
फार प्राचीन काळी वरतंतू नावाचे एक ऋषी होते. त्यांचा आश्रम होता. त्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी येत होते. वरतंतू बारा बारा वर्षे त्यांना विद्यादान करीत. परंतु ते आपल्या शिष्यांकडून काहीही गुरुदक्षिणा घेत नसत. त्याच आश्रमात कौत्स नावाचा एक शिष्य शिकत होता. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्सने, आपल्या गुरूंना 14 कोटी सुवर्ण नाणी गुरुदक्षिणा म्हणून देण्याचा निश्चय केला.
हे धन मागण्यासाठी कौत्स अयोध्येला रघु राजाकडे गेला. पण याचवेळी रघुराजाने एक मोठा यज्ञ करून आपल्या जवळचे सगळे धन दान म्हणून दिले होते. कौत्साने रघु- राजाला 14 कोटी सुवर्ण नाणी मागितली . पण रघुराजा ते देणार कोठून? कौत्सची मागणी पूर्ण करण्यासाठी रघुराजाने स्वर्गातील कुबेरावर स्वारी करण्याचे ठरविले. ही बातमी कुबेराला समजतात कुबेर घाबरला. त्याने रघुराजाच्या भंडारात सुवर्ण नाण्यांचा पाऊस पडला.
रघु राजाचे सर्व खजिने सुवर्ण नाण्यांनी भरून गेले. मग त्याने कौत्सला हवे होते तेवढे धन दिले. उरलेले धन त्याने गावाबाहेर असलेल्या शमी वृक्षावर नेऊन ठेवले व लोकांना ते लुटून नेण्यास सांगितले. तो दिवस होता दसऱ्याचा. या प्रसंगाची आठवण म्हणून त्या दिवशी संध्याकाळी घरोघरी जाऊन आपट्यांची किंवा शमीची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा पडली.
विजयादशमी (Vijayadashami & Dasara) म्हणजे विजय देणारा दिवस. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कामात हमखास यश मिळणार, विजय मिळणार, अशी समजूत आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो.
इ.स.१६५६ साली याच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चढाई करून श्री शिवरायांनी सुपे प्रांत काबीज केला.इ.स.१७२६ मध्ये दसऱ्याच्या दिवशी थोरल्या बाजीरावांनी निजामावरील मोहिमेचे प्रस्थान ठेवले होते.
पुण्यात पेशवाईत दसऱ्याचा हा सण मोठ्या थाटामाटाने साजरा होत असे. हत्ती, घोडे, उंट यांना स्वच्छ धुऊन सजविण्यात येई. शनिवार वाड्यात समारंभपूर्वक शस्त्रांची पूजा केली जाई. या दिवशी नवा भगवा झेंडा आणि नवा जरीचा पटका उभारून पूजा होत असे.
सायंकाळी दसऱ्याची स्वारी मोठ्या थाटात निघायची. या मिरवणुकीत अनेक सरदार, सरंजामदार, मानकरी नटूनथटून सहभागी होत.
दसऱ्याचा हा सण आदिवासींमध्ये खूप लोकप्रिय आहे. आदिवासी, कातकरी,ठाकर स्त्रिया या दिवशी एकत्र जमतात. टिपऱ्यांच्या मदतीने ताल धरून गातात व नृत्य करतात.
सोने लुटणे.
दसऱ्याच्या दिवशी गावाच्या ईशान्येकडे सीमोल्लंघनासाठी जातात, तेथे शमी वृक्ष असतो तेथे सर्वजण जमतात. शमीची विधीपूर्वक पूजा केली जाते. नंतर तिथे असलेली आपट्याची पाने सोने म्हणून लोक लुटतात. प्रथम देवळात जाऊन ती पाने देवीला वाहून दर्शन घेतात. नंतर घरच्या वडीलधाऱ्यांना आणि भावंडांना सोने देतात. सोने लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते. यालाच सोने लुटणे असे म्हणतात.
“दसऱ्याच्या आपणास व आपल्या कुटुंबीयांस हार्दिक शुभेच्छा!.“
Other Articles
Amazon- Handmade Wall Decor
3 thoughts on “Best विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami & Dasara) माहिती”