वाबी साबी ( Wabi Sabi ) या पुस्तकाची मराठीत समरी.

नोबुओ सुझुकी या जपानी लेखकाने लिहिलेले हे सुप्रसिद्ध पुस्तक आहे. हे अपूर्णतेतील सौंदर्य आणि साधेपणा शिकविणारे एक प्रसिद्ध जपानी तत्त्वज्ञान आहे. हे पुस्तक तुम्हाला अपरिपूर्ण जीवनाचा स्वीकार करून आनंदी कसे राहायचे हे शिकविते. वाबी साबी म्हणजे क्षणिक, अपूर्ण आणि साध्या गोष्टींमध्ये सुख आणि समाधान शोधणे होय.

वाबी Wabi शब्दाचा अर्थ.

वाबी: साधेपणा, नम्रता आणि निसर्गाशी जोडले जाऊन शांततेत आणि साध्या जीवनशैलीत सौंदर्य शोधणे.
साबी Sabi काळाच्या ओघात कोणत्याही वस्तूवर पडलेली झीज किंवा वयपरत्वे येणारे सौंदर्य. एकत्रितपणे वाबी-साबी म्हणजे ” अपूर्ण क्षणभंगुर आणि साध्या गोष्टींमध्ये सौंदर्य शोधण्याची दृष्टी “.

आज वाबी या शब्दातून निश्चलता, स्थिरचित्तता, शांती, साधेपणा आणि सुंदर अपरिपूर्णता दर्शवली जाते. साबी म्हणजे सकारात्मक वगळता इतर सर्व काही असा अर्थ घेतला जाई. कालांतराने परिपक्व आणि वयामुळे ज्या सौंदर्य आणि शांततेची अनुभूती येते तिला साबी म्हटले जाते.

तात्पुरतं, कायमस्वरूपी नसणं.

जग हे सातत्याने बदलत असतं. जगातील कोणतीही गोष्ट अचल नाही. आपल्या भावना, विचार आणि ओळख वेळेबरोबर सातत्याने बदलत असते.

दुःख

जीवनात आपण दुःखी असतो कारण आपण असमाधानी असतो. आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात पण त्या मिळत नाहीत किंवा मिळविता येत नाहीत त्यामुळे आपण दुःखी असतो.

शून्यत्व.

शून्यता ही केवळ अध्यात्मिक किंवा स्थापत्य- कलेवर आधारित कल्पना नसून आपल्या आयुष्याच्या प्रणेचा स्त्रोतसुद्धा आहे.
आनंदी होण्यासाठी आपल्याला फार कमी गोष्टी लागतात.

निसर्गाकडून शिका.

वाबी-साबी तत्वाचा महागुरु म्हणजे निसर्ग होय. जे काही अपरिपूर्ण, अपूर्ण आणि नाशवंत आहे अशा सौंदर्यमागे तीच प्रेरणा आहे. निसर्ग हा मानवाचा महागुरू आहे. पण त्याच्यापासून आपण खूपच दूर गेलो, निसर्गाने शिकवलेली नम्रता विसरलो आहोत.

ताठरता ते उस्फूर्तता.

वावी साबीचा महत्त्वाचा हा धडा आहे की आपल्याला हव्या तशा गोष्टी नसून त्या जशा आहेत तशाच आहेत ‌. त्या ठराविक पद्धतीत अस्तित्वात नसतात. उलट त्या सतत बदलत असतात. गौतम बुद्धाने मानवी दुःखाचे कारण सांगताना म्हटले आहे, आपणाला एखादी गोष्ट चिरकालीन असावी असे वाटते.

अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूमात्राचं व्यक्तीत्व सातत्याने बदलत असतं. जगात प्रत्येक गोष्ट बदलत असते तसेच माणसं सुद्धा सतत बदलत असतात. या जगातील सगळं काही प्रवाही आहे. ” विश्व म्हणजे बदल, आपण जसा विचार करू तसं आपलं आयुष्य घडतं.”
मार्कस ऑरेलियन्स.

लवचिकता.

एखादी परिपूर्ण निर्मिती करणे हे कलेचे कार्य नसून, निसर्गाचा आंतरिक सुसंवाद प्रकट करणे हे कलेच उद्दिष्ट आहे. आपल्या वर्तमान व भविष्यकाळावर, आपल्या भूतकाळाचा परिणाम होऊ न देणे म्हणजे लवचिकता होय. लवचिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.

न्यूनतावाद.

आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे अनेक वस्तू असल्यामुळे आपण आनंदी होऊ. पण हळूहळू आपल्या लक्षात येते की या वस्तूंमुळेच आपला आनंद कमी होऊन आपण दुःखी होतो. कालांतराने आपल्या लक्षात येते वस्तूंचा फार मोठा संग्रह करणे चुकीचे आहे.

वस्तूंचा साठा करताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की खरंच या वस्तूंची मला गरज आहे का?
‌ वस्तूंची गरज नाही, त्या वस्तू हळूहळू काढून टाका. तुम्हाला हलकं वाटायला लागेल. तुमच्या जीवनात घडणारे परिवर्तन तुम्हाला जाणवायला लागेल. तुम्ही आनंदी व्हाल. विल्यम मोरीसने म्हटले आहे ” जे उपयुक्त नाही किंवा सुंदर नाही अशा गोष्टी तुमच्या घरात ठेवू नका. “

घरातून वस्तू काढून टाकायला आपण नाराज असतो. कारण आपण त्या वस्तूंची भावनेने जोडलेले असतो.
तुमच्या खोलीतला पसारा कमी करा. तुम्हाला लगेचच छान वाटायला लागेल. आपल्या घरातील अनावश्यक वस्तू व विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तुम्ही आनंदी व्हाल.
पुस्तकातील मुख्य शिकवण.
१) अपूर्णतेचा स्वीकार
२) तणाव मुक्ती
३) साधेपणा आणि शांतता.
सर्व वस्तू जशा, अपूर्ण आणि तात्पुरत्या असायला हव्यात तशाच त्या आहेत हे जपानी तत्त्वज्ञान म्हणजे
वाबी- साबी. आपल्या मनात आणि घरात अधिक जागा मोकळी करण्यासाठी, नको असलेल्या मानसिक आणि भौतिक बाबी दूर करण्यासाठी उपाय सुचवत, हे आराखडे आपल्याला प्रेरित करत अधिक सर्जनशील बनवतात.

वाबी- साबी.ले. नोबुओ सुझुकी. अनुवाद. डॉ. सुचिता
नांदापूरकर-फडके. मंजुळ पब्लिकेशन हाऊस, टिळक रोड, पुणे.४११००२.

Other Articles-

Don’t Sweat the Small Stuff Book Summary in Marathi

Think Straight Book Summary in Marathi

Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर ले. शरद तांदळे. या पुस्तकाची समरी

Do It Today Book Summary in Marathi

Leave a Comment