अनावश्यक सोडून द्या.

आपण परिस्थिती सुधारण्याचा आपले विस्कटलेले जीवन सावरण्याचा मनापासून प्रयत्न करतो. पण दुर्दैवाने ज्या गोष्टी समस्येचा मुख्य भाग आहे त्यांनाच आपण घट्ट चिटकून राहतो.

आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी असू शकतात. सतत सतवणारी चिंता, मनाला त्रास देणारा एकच विचार, एखादे नाते किंवा स्वतःचेच नुकसान करणारी आपली वागणूक. त्यामुळे काहीही ठीक करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो.

काही गोष्टी अधिक प्रयत्नांनी बदलत नाहीत तर एका वेगळ्या निर्णयाने बदलतात. आपण धरून ठेवलेला भार सोडून द्या. कारण जेव्हा तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टीला चिटकून राहणे थांबविता, तेव्हा खरा बदल घडू शकतो.

आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे अनेक वस्तू असल्यामुळे आपण आनंदी होऊ. पण हळूहळू आपल्या लक्षात येतं या वस्तूंमुळेच आपला आनंद कमी होऊन आपण दुःखी होतो. कालांतराने आपल्या लक्षात येते वस्तूंचा फार मोठा संग्रह करणे चुकीचे आहे.

वस्तूंचा साठा करताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की खरंच या वस्तूची मला गरज आहे का?
वस्तूंची गरज नाही, त्या वस्तू हळूहळू काढून टाका. तुम्हाला हलकं वाटायला लागेल. तुमच्या जीवनात घडणारे परिवर्तन तुम्हाला जाणवायला लागेल. तुम्ही आनंदी व्हाल. विल्यम मोरिसने म्हटले आहे ” जे उपयुक्त नाही किंवा सुंदर नाही अशा गोष्टी तुमच्या घरात ठेवू नका.

घरातून वस्तू काढून टाकायला आपण नाराज असतो. कारण आपण त्या वस्तूंशी भावनेने जोडलेलो असतो.
तुमच्या खोलीतला पसारा कमी करा. तुम्हाला लगेचच छान वाटायला लागेल. आपल्या घरातील अनावश्यक वस्तू व विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तुम्ही आनंदी व्हाल.

Leave a Comment