Do It Today Book Summary in Marathi

Do It Today!’ Book Summary: Explore the essence of taking action, its significance, and the roadmap to success in this insightful summary. Discover the power of immediate action and how it transforms your life. Uncover the secrets to achieving your goals and embrace positive change. Elevate your mindset and productivity through the wisdom shared in this compelling book summary.”

Do It Today.डू इट टुडे. आजचं काम आजच करा.

१) आजचं काम आजच करा उद्या नाही.

अत्यावश्यक अशी कामे करणे गरजेचे असताना आपण अशी कामे करायचे टाळतो.डारियस फरु म्हणतात कामे टाळण्यासाठी आपल्याकडे अनेक कारणे असतात.

उदा. माझा लॅपटॉप जुना आहे, तो नीट चालत नाही, ऑफिसमध्ये गोंधळ असतो, मला सतत फोन व ई-मेल्स येतात; त्यामुळे आवश्यक ते काम होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे अत्यावश्यक कामे करण्यास माझ्याकडे वेळच नाही. हे काम आज करण्यापेक्षा उद्या करू केव्हा ते जर आज केले नाही तर काय बिघडणार आहे? अशीच आपली धारणा असते. ती मानसिकता आपण बदलली पाहिजे.

आजचं काम आजच केलं पाहिजे, त्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे. आज करायच्या कामाची यादी आपल्याकडे असते. त्यातील एखादे काम निवडून त्यावर काम लेखक सुरू करतो व आपणासही सल्ला देतो की कामापासून पळ न काढता आजच काम आजच करा उद्या नाही.

२) माझं लक्ष लागत नाही तेव्हा मी काय करतो?

इंस्टाग्राम, युट्युब वरील व्हिडिओ पाहणे, नकारात्मक बातम्या टीव्हीवर पाहणे. मोबाईल फोन, मीटिंग, अनावश्यक घाई इत्यादींमुळे आपलं लक्ष सारखं विचलित होत असतं.


लक्ष केंद्रित करण्यासाठी अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत ‌. भूतकाळातील यशाचा विचार केल्याने आपल्या शरीरातील सेरोटिनिनची पातळी वाढते. त्यामुळे नैराश्य कमी होतं, मूड चांगला राहतो, झोप चांगली येते. त्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते.

आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. त्याच गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या करण्यापासून विचलित होऊ नका.

३) वेळ वाया घालवणे कसं थांबविणार.

वेळेकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपण सर्वजण अशी काम करत असतो की त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. यालाच वेळ वाया घालवणे म्हणतात.

आपला वेळ चांगला घालवायचा असेल तर आपल्याला आपला वेळ कुठे जातो हे माहीत असायला हवं. एक आठवड्यापूर्वी तुम्ही अमुक वेळेला काय करीत होता हे विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही. ते आठवण्या इतकी आपली स्मरणशक्ती चांगली असेलच असे नाही.

आपण केलेल्या कामांची नोंद रोजच्या रोज वहीत किंवा दैनंदिनीत केली तर आपल्याला समजू शकेल आपण अमुक वेळेला काय करत होतो. त्यासाठी लेखक म्हणतात दर तास दोन तासाला तुमच्या कामाची नोंद करा. उत्पादकतेसाठी सापडलेली ही सगळ्यात चांगली पद्धत आहे.

Do It Today Book

४) दुसरा दिवस यशस्वी करण्यासाठी आधीच्या दिवसाच्या संध्याकाळची ३० मिनिटे नियोजन करण्यात घालवा.

जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला आजच्या दिवशी कोणती कामे करावयाची आहेत या संदर्भात माहीत असते. कारण तुम्ही आदल्या रात्रीच त्याचे नियोजन केलेले असते. त्यामुळे आजचा दिवस कसा जाणार आहे याची आपल्याला कल्पना येते.

लेखक म्हणतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणायची असेल, तरी ही तीस मिनिटांची पद्धत खरोखर खूपच चांगली आहे.

५) इंटरनेट पासून लांब रहा

इंटरनेटच्या वापराला काही प्रमाणच राहिलं नाही. ॲप्स, गेम्स, व्हिडिओ,आर्टिकल, टीव्हीवरचे कार्यक्रम, नेटफ्लिक्स वरील कार्यक्रम हे सर्व पाहण्यासाठी आपला फार मोठा वेळ खर्च होतो. त्यामुळे अधिक ताणतणाव, वेळेचे अनियोजन, प्रयत्नांची कमतरता या गोष्टी लक्ष विचलित करण्यास कारणीभूत होतात.

इंटरनेट पासून दूर राहिल्यास तुमची महत्वाची कामं हातावेगळी होतील. हा थोडासा बदल केल्यास परिणामकारक रिझल्ट मिळतील.

६) चालढकल करणे टाळा.

आपल्याला एखादं काम आवडत नाही म्हणून आपण ते करायचे टाळतो. काम टाळणं हा एक प्रकारे आपला स्वभाव बनतो. इथं लेखक रमित सेठीच्या वाक्याची आठवण करून देतो. काम आणि आवड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

जेव्हा आपल्याला आपलं काम चांगलं जमायला लागतं तेव्हा ते आवडायला लागतं. यापुढे जाऊन लेखक म्हणतो टाळाटाळ करण्यावर उत्तम उपाय म्हणजे,अर्थपूर्ण काम करणे. चालढकल करण्याचा परिणाम असा होतो की तुम्ही तुमची स्वप्न आणि ध्येय देखील बाजूला ठेवून देता.

७) स्मार्टफोन तुमची उत्पादकता घटवितो.

स्मार्टफोन खरोखर घातक असतात. त्यामुळे तणाव येतो, बेचैन व्हायला होतं आणि आपल्याला नैराश्यही येते.

आपण स्मार्टफोनमुळे दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून स्मार्टफोन हाताळण्याच्या सवयी बदला. फोन मधील अनेक नोटिफिकेशन, मेसेजेस काढून टाका. स्मार्टफोनचा उपयोग काहीतरी शिकण्यासाठी करा.
स्मार्टफोनवर फार अवलंबून राहू नका. लक्ष देऊन एखादा उत्पादक काम करा.

८) परिपूर्णतेचा ध्यास तुमची उत्पादकता नष्ट करत आहे.

परिपूर्णता ही नारास्य आणि कमी आत्मसन्मान यांच्याशी निगडित आहे. परिपूर्णतेचा ध्यास घेतलेले लोक संधीची वाट पाहत थांबतात, तसेच त्यांना जास्त वेळेची गरज भासते.

चुकांबद्दल सतत काळजी केल्याने तुम्ही स्वतःवरच शंका घेता. त्यामुळे तुम्ही एखाद्या कामाला सुरुवातच करत नाही.
कारण ते काम तुम्हाला अवघड वाटायला लागते. अशावेळी आपण असाहाय्य होतो व कामातून माघार घेतो.

९) एका वर्षात 100 पुस्तक कशी वाचायची ?

आपण पुस्तके वाचतो कारण आपल्याला लोकांच्या अनुभवावरून शिकायचे असते. आपण शिक्षित असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला भरपूर वाचनाची गरज आहे. सतत वाचत रहा.

वाचणासाठी वेळ काढा. वाचणासाठी काहीही नियम नाहीत, त्यामुळे तुम्ही हवं तसं वाचू शकता. तुम्ही एका वर्षात शंभर पुस्तके वाचू शकता.

येथे लेखकाने स्वतःचा अनुभव सांगितला आहे. ते एका तासात 50 पाने वाचू शकतात. जर तुम्ही आठवड्याला दहा तास वाचन केलं, तर तुम्ही एका वर्षात 26000 पाने वाचू शकता. एका पुस्तकात सरासरी 250 पाने आहेत असे गृहीत धरल्यास तुम्ही एका वर्षात 104 पुस्तके वाचू शकता. ( हा लेखकाचा स्वतःचा फॉर्म्युला आहे.)

पुस्तके वाचताना त्यावर नोट्स काढा. महत्त्वपूर्ण उतारे लिहून काढा. तुम्ही जे वाचले आहे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही किती वाचता यापेक्षा त्याचे किती अनुकरण करता हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

१०) काम करताना अधून मधून सुट्टी घ्या.

सतत काम करत राहिल्याने मेंदूवर ताण वाढतो. तो येऊ नये म्हणून कामांमध्ये एका ठराविक वेळेनंतर पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. अशी विश्रांती घेतल्याने तुमची सर्जनशीलता व उत्पादकता वाढते. तसेच तुमच्यावर आलेला ताणही कमी होतो.

११) टाईम ब्लॉकिंग.

तुमची महत्त्वपूर्ण कामे कॅलेंडरवर लिहून ठेवा. वेळेचा एक हिस्सा अतिशय महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवणे याला टाईम ब्लॉकिंग म्हणतात. उद्याच्या कामाचे नियोजन आदल्या दिवशी संध्याकाळी दहा मिनिटे करा. एखाद्या कामाला जितका वेळ लागणार आहे त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही नियोजनात धरावयास पाहिजे.

१२) ऑफिस मधील काम घरी आणू नका.

ऑफिस मधील काम ऑफिसमध्ये पूर्ण करून घरी निघून जा. ऑफिस मधील काम घरी नेल्यास तुमच्यावरचा ताण वाढेल, याचा परिणाम तुमच्या झोपेवर व बुद्धिमत्तेवर होईल.

१३) मूलभूत गोष्टी वारंवार करा.

मूलभूत गोष्टी क्रमाक्रमाने जोपर्यंत तुम्ही साध्य करत नाही ,तोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण करू शकत नाही. व्यवसायातल्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे असे लेखक म्हणतात. तुमच्या क्षेत्रातल्या मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत ते शोधा आणि त्या गोष्टींची पुनरावृत्ती करा.

लेखक डारियस फरु यांच्या विषयी.

डारियस फरु हे उद्योगपती व प्रसिद्ध ब्लॉगर आहेत. तसेच ते पॉडकाॅस्टींग करतात. पॉडकास्टच्या त्यांच्या ‘ डारियस फरु शो ‘ या कार्यक्रमात त्यांनी अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

पदवी परीक्षेचे शिक्षण घेत असताना त्यांनी वडिलांबरोबर धुलाईच्या तंत्रज्ञानावर आधारित एक कंपनी सुरू केली.

गेली दोन-तीन वर्षे ते व्यवसाय, उत्पादन विषयी, तसेच जीवनाविषयी चे विचार ब्लॉगवर मांडत आहेत. फरु यशस्वी ब्लॉगर आहेत. आज त्यांचे ब्लॉग रोज वाचणाऱ्यांची संख्या तीस लाखापर्यंत पोहोचली आहे.

यासंदर्भात डारियस फरु म्हणतात मी माझ्या ब्लॉगमधून नक्कीच काही पैसे कमावतो आणि माझ्यातल्या 17 वर्षीय मुलासाठी हे नक्कीच चांगले आहे. मी फक्त जे शिकलो ते इतरांना सांगत गेलो.

डू इट टुडे. डारियस फरु . आजचं काम आजच करा.
अनुवाद अमृता देशपांडे.
मधुश्री पब्लिकेशन. प्रकाशक शरद अष्टेकर.७०३, भगवंत कृपा बिल्डिंग, पहिला मजला, सकाळ कार्यालय समोर, बुधवार पेठ पुणे.४११००२.

Darius Foroux

1 thought on “Do It Today Book Summary in Marathi”

Leave a Comment