100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in Marathi

भाषेत असे काही शब्द वा शब्द- समूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. रुढीने किंवा परंपरेने त्यांना मूळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो व तोच भाषेत रूढ होऊन बसतो. अशा रीतीने होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला ‘ वाक्यप्रचार ‘ (Vakyaprachar in Marathi)असे म्हणतात. यालाच काहीजण ‘ वाक्संप्रदाय ‘
असे म्हणतात.
वाक्यप्रचार : अर्थासह. Vakyaprachar in Marathi
१) कळीचा नारद -भांडणे लावणारा.
२) काखा वर करणे- जवळ काही नसणे.
३) चिरमुरे खात बसणे-खजील
होणे.
४) एरंडाचे गुऱ्हाळ- कंटाळवाले भाषण करणे.
५) कणीक तिंबने- मार देणे.
६) चेहरा काळवंडने-मन खिन्न होणे.
७) चोरावर मोर बसणे- मात करणे./वरचढ होणे.
८) काणाडोळा करणे- लक्ष न देणे.
९)छत्तीसचा आकडा- वैर.
१०) कागदी घोडे नाचविणे-
फक्त लेखनात शूरपणा दाखविणे
११) हंबरडा फोडणे – ओक्साबोक्सी रडणे. शोक अनावर होणे.
१२) हातावर तुरी देणे- फसवणूक करणे.
१३) जमदग्नी- अतिशय रागीट मनुष्य.
१४) जीव टांगणीला लागणे- चिंताग्रस्त होणे.
१५) जीवाचे रान करणे-खूप कष्ट करणे.
१६) जखमेवर मीठ चोळणे-
उणिवेवर प्रहार करणे.
१७) काकदृष्टीने पाहणे-
बारकाईने न्याहाळणे.
१८) कानावर पडणे-सहजपणे ऐकू येणे.
१९) जीवापाड जपणे-मायेने सांभाळणे.
२०) झाकले माणिक-साधा पण गुणी मनुष्य.
२१) तळहाताचा फोड-अतिशय काळजीने केलेली जपणूक.
२२) ताटाखालचे मांजर होणे-अंकित होऊन राहणे.
२३) कानउघडणी करणे-चुकीची कडक शब्दांत जाणीव देणे.
२४) कोंडमारा होणे-निरुपाय होणे.
२५) जीवाची उलघाल होणे-खूप भीती वाटणे.
२६) तारे तोडणे-वेड्यासारखे बोलणे.
२७) खडे फोडणे-दोष देणे.
२८) खसखस पिकणे-मोठ्याने हसणे.
२९) खूणगाठ बांधणे-निश्चय करणे.
३०) गळ्यातला ताईत- अतिशय प्रिय वस्तू.
३१) तोंड टाकणे-अद्वातव्दा बोलणे./बरळणे.
३२) तोंडात बोट घालणे – नवल करणे, नवल वाटणे.
३३) तोंडावर येणे-फार जवळ येणे.
३४) त्राटिका-कजाग बायको.
३५) आकाशाची कुऱ्हाड होणे-
सर्व बाजूंनी संकटे येणे.
३६) आभाळ फाटणे-सर्व बाजूंनी संकटे येणे.
३७)इतिश्री -शेवट.
३८) इतिश्री करणे-शेवट करणे.
३९) अकलेचा खंदक-मूर्ख मनुष्य.
४०) अंग धरणे-लठ्ठ होणे.
४१) अंग काढून घेणे-संबंध तोडणे./जबाबदारी टाळणे.
४२) उजेड पाडणे-मोठे काम करणे.
४३) उखळ पांढरे होणे- पुष्कळ द्रव्य मिळणे.
४४) उंटावरचा शहाणा-मूर्खपणाचा सल्ला देणारा.
४५) अंगाची लाही होणे-रागाने बेफाम होणे.
४६) अर्धचंद्र- हकालपट्टी करणे.
४७) आकाशाला गवसणी घालणे- शक्ती बाहेरची गोष्ट करून पाहणे.
४८) आकाशपाताळ एक करणे-
नाहक आरडाओरडा करणे.
४९) गाशा गुंडाळणे-निघून जाणे.
५०) गुण उधळणे-दुर्गुण दाखविणे.
५१- ७० वाक्यप्रचार : अर्थासह. Vakyaprachar in Marathi
५१) उंबराचे फूल- क्वचित भेटणारी व्यक्ती.
५२) घर डोक्यावर घेणे-घरात आरडाओरडा करणे.
५३) चतुर्भुज होणे-कैद होणे, लग्न होणे.
५४) चहा करणे-स्तुती करणे.
५५) त्रेधा उडणे-फजिती होणे.
५६) तिलांजली देणे-त्याग करणे.
५७) थंडा फराळ करणे-उपाशी राहणे.
५८) वाकडे पाऊल पडणे- दूर्वर्तन करणे.
५९) वर्ज करणे-टाळणे.
६०) लंकेची पार्वती-अंगावर दागिने नसलेली स्त्री.
६१) राम नसणे-अर्थ नसणे.
६२) राम राम ठोकणे-निरोप देणे.
६३) रसातळाला जाणे-नाश होणे.
६४) दगडावरची रेघ-खोटे न ठरणारे शब्द.
६५) दात ओठ खाणे-चरफडणे.
६६) दाद देणे-मन व्यक्त करणे/प्रशंसा करणे.
६७) मेतकूट जमणे-दृढ मैत्री होणे.
६८) मुलाहिजा बाळगणे-पर्वा करणे.
६९) माशा मारणे-निरोद्योगी असणे.
७०) मुभा असणे-मोकळीक असणे.
७१- १००+ वाक्यप्रचार : अर्थासह. Vakyaprachar in Marathi
७१) पारा चढणे-खूप रागावणे.
७२) पाणउतारा करणे-अपमान करणे.
७३) हरताळ फासणे- नाश पावणे/विफल करणे.
७४) हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खाण्यास मिळणे.
७५) हात धरणे- वरचढ ठरणे.
७६) सुंबाल्या करणे-पळून जाणे.
७७) सुतोवाच करणे-प्रारंभ करणे.
७८) सारवासारव करणे-नीटनेटके करणे/संपादणे.
७९) हातचा मळ-सहज घडणारी गोष्ट.
८०) हाडाची काडे करणे-खूप श्रमणे./अति कष्ट करणे.
८१) सव्यापसव्य करणे-यातायात करणे.
८२) दीड शहाणा-मूर्ख.
८३) धूळ चारणे-पूर्ण पराभव करणे.
८४) धूळभेट-उभ्याउभ्या झालेली भेट.
८५) धाबे दणाणे-खूप भीती वाटणे.
८६) नाकी नऊ येणे-बेजार होणे.
८७) न भूतो न भविष्यती होणे-पूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे.
८८) वाखाणणी करणे-स्तुती करणे.
८९) वाऱ्यावर सोडणे-दुर्लक्ष करणे.
९०) विडा उचलणे-प्रतिज्ञा करणे.
९१) षट्कर्णी होणे-गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे.
९२) हातखंडा असणे-कुशलता असणे.
९३) हात टेकणे-निरुपाय होणे.
९४) हातपाय गळणे-धीर सोडणे.
९५) हायसे वाटणे-सुटकेचे समाधान होणे.
९६) पायमल्ली करणे-धुडकावणे.
९७) पांघरूण घालणे -दोष झाकणे.
९८) पांढऱ्या वर काळे करणे-लिहिणे.
९९) पालथ्या घागरीवर पाणी-निष्फळ श्रम.
१००) पोटास चिमटा घेणे-अर्धपोटी राहणे.
१०१) हात ओला करणे-पैसा किंवा भोजन मिळणे.
१०२) हस्तक्षेप करणे-ढवळाढवळ करणे.
१०३) हतबल होणे-असमर्थ ठरणे.
१०४) हळद लावणे-विवाह होणे.
१०५) शेणसडा होणे-परिस्थिती वाईट होणे./वाया जाणे.
१०६) पोबारा करणे-पळून जाणे.
१०७) फडशा पाडणे-संपविणे.
१०८) ब्रह्मांड आठवणे-भीती वाटणे.
१०९) ठणठणपाळ-द्रव्य व विद्या दोन्ही नसलेला.
११०) डोळे उघडणे-पश्चाताप होणे.
Other Article- अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi) व हरितालिका व्रत