“Explore the enlightening world of Ankur Warikoo books. Immerse yourself in his insightful writings on life, leadership, and personal growth. Dive into a treasure trove of wisdom with Ankur Warikoo’s thought-provoking literary creations.”
Table of Contents
ToggleAnkur Warikoo Books
Get Epic Shit Done Book Summary in Marathi
गेट एपिक शिट डन: अंकुर वारीकू. पुस्तकाची समरी.
कॉलेजचे शिक्षण घेत असताना, परीक्षेची तयारी करण्यासाठी अंकुर वारीकु यांनी मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तर असलेले एक पुस्तक विकत घेतलं.
परीक्षेची तयारी करण्यासाठी या पुस्तकाची त्यांना चांगलीच मदत झाली. याच पद्धतीने त्यांनी गेट एपिक शिट डन हे पुस्तक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संवादाच्या रूपात लिहिले.
आपल्या जीवनात भेडसावणारे 34 प्रश्न आणि त्यांची उत्तरे या पुस्तकात सामावलेली आहेत. हे पुस्तक तुमचे जगणे लक्षणीयरित्या समृद्ध करेल.
Information About Ankur Warikoo
अंकुर वारीकू हे भारताबाहेरील इंटरनेट उद्योजक आहेत. ते ‘ वेबवेदा’ द्वारे शिक्षक म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रम चालवितात. अंकुर हे फॉर्च्यून मासिकाच्या भारतीयांच्या चाळीस अंडर 40 यादीत होते.
फोर्बज् इंडियाच्या २०२२ च्या टॉप 100 डिजिटल क्रिएट यादीत होते. लिंक्डीन इंडियाच्या २०१८,२०१९ आणि २०२० चा चा टॉप व्हाईस होता. लिंक्डीन इंडियाच्या स्पॉटलाईट यादीत आणि बिजनेस टुडेच्या भारतातील 40 वर्षांखालील टॉप एक्सिक्युटिव्ह यादीत होते.
- १) तुमचे जीवन व्यवस्थापन
- २) तुमच्या कारकीर्दीचे व्यवस्थापन.
- ३) लोकांचे व्यवस्थापन
- ४) स्वतःचे व्यवस्थापन या चार विभागात हे पुस्तक लिहिले आहे.
1) मी इतरांशी स्वतःची तुलना करणे कसे थांबवू शकतो ?
शिक्षक सांगतात ही समस्या सगळ्यांसोबत होते. आजच्या काळात प्रत्येक जण आपली तुलना दुसऱ्याशी करतो. जोपर्यंत आपण आपल्यावर लक्ष देत नाही. तसेच जोपर्यंत आपल्याला वाटत राहते की मी जे करतो आहे ते बेस्ट आहे की नाही तोपर्यंत आपला आपल्यावर संशय राहील. व आपण आपली तुलना दुसऱ्याशी करत राहणार.
वेळेचा सर्वात वाईट वापर म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करणे.
2) मी माझे संभाषण कौशल्य कसे विकसित करू ?
शिक्षक: आपले संभाषण कौशल्य विकसित व्हावे असे वाटत असेल तर आपल्या आसपासची परिस्थिती आपण बदलली पाहिजे. ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांना समजून घेतले पाहिजे. आणि हे काम आपल्याला दररोज करावे लागेल.
3) मी वाढीची मानसिकता कशी बनवू?
शिक्षक: वाढीची मानसिकता ही आपण कोणते ध्येय ठेवतो व ते ध्येय गाठण्यासाठी नियोजन कसे करतो;आपल्या बोलण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावरून आपली वाढीची मानसिकता दिसून येते.
4) मी आयुष्यातील कठीण निर्णय कसे घेऊ?
शिक्षक: जीवनात जर पुढे जायचे असेल तर कठीण निर्णय घ्यावे लागतात. हे कठीण निर्णय एक तर आपल्याला पुढे नेतील किंवा बरेच काही शिकवून जातील. पण
हे कठीण निर्णय घ्यायला आपण घाबरता कामा नये. लक्षात ठेवा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नाही.
5) मी माझ्या वेळेचे व्यवस्थापन कसे करू?
शिक्षक: आपले काम करता करता आपल्याला समजते की कोणते काम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे नाहीतर आपली नियोजित महत्त्वाची कामे करणे राहून जाईल.
6) मी लक्ष कसे केंद्रित करू?
शिक्षक: विद्यार्थ्याने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण तसे होत नाही आपले लक्ष विकेंद्रीत होते. मन हजारो गोष्टीत भटकत असते. त्याला एका वेळी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात. किंवा कुठलीच गोष्ट करावीशी वाटत नाही. अशावेळी महत्त्वाची गोष्ट ,परिस्थिती ओळखून त्याने जे महत्त्वाचे काम आहे तेच केले पाहिजे.
7) मी टीकेला कसे सामोरे जाऊ?
शिक्षक: जेव्हा आपण नवीन काही करायला जातो तेव्हा आपल्यावर टीकाही होत जाणार.
पण या तिकेकडे दुर्लक्ष करून आपण आपले काम करत राहिले पाहिजे. टीका ही खरंतर आपल्या जीवनाचा हिस्साच झालेली आहे.
ती आपला पाठलाग करणारच.
8) मी वाचनाची सवय कशी लावू?
शिक्षक: आपल्याला विद्यार्थी दशेतच वाचन करावयाचे असते. जर मी असा विचार करू लागलो की मी वाचनाची सवय कशी लावू तर हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपण वाचन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. वाचन हा कोणत्याही बाह्य उत्तेजना शिवायचा संपूर्ण व्यायाम आहे. जो तुम्हाला स्वतःला केंद्रित ठेवण्याचा सुंदर मार्ग आहे.
9) मी माझ्या जीवनामध्ये ध्यान कसे करू?
शिक्षक: तुम्हाला संपूर्ण दिवसभर ध्यानधारणा किंवा तासभर ध्यान करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही प्रत्येक दिवशी दहा मिनिटे ध्यानधारणा करू शकता. याने तुमचे मन विचलित होणार नाही व तुम्ही शांत वृत्तीने तुमचे काम करू शकाल.
10) मी विश्वास कसा संपादन करू?
जेव्हा आपण दुसऱ्याशी प्रामाणिकपणे विश्वासाने वागतो. तेव्हा समोरची व्यक्ती ही आपल्यावर विश्वास ठेवते. आपण एकमेकांशी प्रामाणिक राहून आपला विश्वास संपादन करू शकतो.
11) मी माझी आवड कशी शोधू?
शिक्षक: आपल्याला काय करायला आवडते हे प्रत्येकाने विचार करून शोधले पाहिजे. आपल्याला कशात रुची आहे, ते शोधून तुम्ही ते करत जाता वाढवता आणि कालांतराने ते सर्व एकत्र होऊन तुमची आवड बनते.
12) मी योग्य कारकीर्द कशी निवडू?
शिक्षक: आपले करियर निवडताना आपण सर्व क्षेत्रांचे मूलभूत ज्ञान मिळविले पाहिजे. त्यातून आपल्याला हे समजले पाहिजे की कोणत्या क्षेत्रात आपण टिकून राहू शकतो. ते क्षेत्र आपण निवडले पाहिजे.
13) मी माझी कारकीर्द कशी बदलू?
शिक्षक: जेव्हा तुम्हाला वाटेल की ह्या व्यवसायापेक्षा दुसऱ्या व्यवसायात अधिक यश मिळवू शकतो. तेव्हा व्यवसाय बदलण्यास हरकत नाही. तेव्हा तुम्ही नोकरीचा धोका पत्करण्यास हरकत नाही.
14) मी माझ्या कारकिर्दीत प्रगती कशी करू ?
शिक्षक: आपण आपली नोकरी करत असताना नवनवीन गोष्टी शिकत गेलो तर व्यवसायाची प्रगती होत राहील. विविध व्यावसायिक संधी न सोडता आपल्या व्यवसायात प्रगती करत गेलो तर आपला उत्कर्ष होईल.
15) मी कार्यालयीन राजकारणाला कसे सामोरे जाऊ ?
शिक्षक: राजकारण तर सर्व ठिकाणी चाललेले असते. त्यापासून आपण जाणीवपूर्वक दूर राहिले पाहिजे. तुम्ही जिंकू नये म्हणून लोक कार्यालयात राजकारण करतात. या राजकारणापासून तुम्ही जितके दूर राहाल तितकी तुमची प्रगती होत राहील.
16) मी नवीन नोकरीत पहिले 90 दिवस कसे घालवू ?
शिक्षक: कॉलेजमध्ये आलेला नवीन विद्यार्थी जसे आपल्या शिक्षणाची सुरुवात करतो. नवनवीन गोष्टी 90 दिवसात आत्मसात करतो. अर्थात ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते.
17) मी अनेक उत्पन्न प्रवाह कसे तयार करू?
शिक्षक : आज-काल कॉलेजचे शिक्षण घेता घेताच विद्यार्थी पैसे कमवायला शिकतात. ज्या कौशल्यात आपण तरबेज असतो, तो व्यवसाय आपण करायला सुरुवात केली पाहिजे.
या व्यवसायात आपण यशस्वी होऊ की अपयशी होऊ याचा विचार विद्यार्थ्यांने करता कामा नये. ज्या दिवशी व्यवसायात आपण यश मिळवू त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचे अनेक मार्ग सापडतील. उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार करणे म्हणजे इमारत बांधण्यासाठी आहे.
18) मी एक वर्ष अंतर वर्ष कसे घ्यावे ?
शिक्षक: जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी कॉलेजचे शिक्षण मध्येच सोडून (ब्रेक घेऊन) विविध व्यवसायात नाव कमाविले व व्यावसायिक यश संपादन केले. जगात अनेक बदल होत असताना ते समजून घेण्यासाठी एक वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी नाही. ती एक गरज आहे.
19) मी नाही कसे म्हणू ?
शिक्षक: जर आपणाला एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचे असेल तर तसे स्पष्टपणे आपण म्हटले पाहिजे. आपण नाही म्हटल्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होईल. परंतु ही नाराजी तात्पुरत्या स्वरूपाची असते. नंतर आपण ती दूर करू शकतो. आपणाला नाही म्हणावयाचे होते पण जर आपण त्याला हो म्हटलं तर आपणाला पुढे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नकाराला कमकुवतपणा आपण समजू नये.
20) मी मदत कशी मिळवू ?
शिक्षक : जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज असते तेव्हा ती मागितली पाहिजे. त्यात आपल्याला मदत कशी मागू अशी लाज वाटता कामा नये. स्वतःच्या गरजांसाठी मदत मागताना स्वतःला कमी लेखू नका.
21) मी माझ्या पालकांना माझ्या कारकिर्दीच्या निवडीबद्दल कसे पटवून देऊ?
शिक्षक: आपण निवडलेला व्यवसाय आपण योग्य रीतीने करू शकू असा आपणाला पूर्ण विश्वास असेल तर आपण आपल्या पालकांना ते पटवून देऊ शकतो. तुमचे पालक तुमचे अहीत कधीच चिंतत नाहीत. त्यामुळे ते हो म्हणतील. मात्र त्यांचा तो विश्वास आपण तोडता कामा नये.
22) मी मित्र कसे बनवू?
शिक्षक : लहानपणी ज्यासहजतेने आपण मित्र जमविले, तसेच मोठेपणीही आपण मित्र जमविले पाहिजेत. मित्र बनवताना कोणतेही नियोजन असे नसते. आपला स्वभाव जर मित्रत्वाचा असेल तर सहजतेने मित्र जमाविता येतात. आपल्या सुखदुःखात जे लोक आपल्याला साथ देतील त्यांना मित्र बनवा. जे लोक आपल्या मैत्रीमध्ये फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतील त्यांना मित्र बनण्यापासून दूर ठेवा. मजबूत मैत्री करण्यासाठी कधीच उतावीळपणे मित्र शोधू नका.
23) मी जीवनसाथी कसा शोधू ?
शिक्षक: ज्या स्त्रीला पाहता क्षणी आपल्या मनात विचार येईल की माझे विचार व तिचे विचार जुळणार आहेत. आपण दोघे एकमेकांना चांगले समजून घेऊ शकतो व दीर्घकाळ आपण एकमेकांसोबत राहू शकतो. असे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा त्या स्त्रीला तुम्ही जोडीदार म्हणून निवडू शकता.
24) मी प्रेमभंग कसा सुसह्य करू?
शिक्षक : अनेक तरुणांना प्रेमभंगाला सामोरे जावे लागते. अशावेळी ते पूर्णपणे खचून जातात व निराश होतात. त्यांना असे वाटते की आपले आयुष्यच उध्वस्त झाले आहे. अशा स्थितीत आपण स्थिर राहून संयमाने काम केले पाहिजे. या संदर्भात वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला तर यातून नक्की मार्ग निघू शकेल.
25) मी सीमा कशा आखू ?
शिक्षक : जीवन जगताना आपण स्वतःभोवती सीमारेषा आखतो. आपल्याला वाटतं हीच आपली बॉर्डर आहे. पण तसे नसते आपल्यालाच माहीत नसते आपल्या मर्यादा. यासाठी स्वतःला नीट ओळखणे गरजेचे असते.
26) मी विषारी मित्रांशी कसे वागू ?
शिक्षक: आपल्या कार्यात अडथळा आणणाऱ्या मित्रांपासून आपण सावध असले पाहिजे. वेळीच त्यांना दूर ठेवले पाहिजे. काहीजण आपल्यासाठी त्रासदायक असतात. ते आपल्याला चुकीचे मार्गदर्शन करतात. अशा मित्रांना वेळीच ओळखा व त्यांना जीवनात दूर अंतरावर ठेवा.
27) मी संयम कसा वाढवू?
शिक्षक: आपले लक्ष निर्धारित ध्येयावर असले पाहिजे. ते विचलित होता कामा नये. त्यामुळे तुमचा संयम आपोआपच विकसित होत जाईल.
28) माझे झोपेचे वेळापत्रक कसे आखू ?
शिक्षक: सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला दिवसभरात कोणती कामे करावयाची आहेत त्याचे टाईम टेबल करा. ती कामे वेळच्यावेळी पूर्ण करा. आपले शरीर सावकाश केलेले बदल स्वीकारते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे शरीर बदलांशी लढत नसते तर सावकाश ते स्वीकारत असते. एकदा का शरीराने काम करणे स्वीकारले की सवय लागते. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होते. विश्रांतीसाठी वेळ मिळतो. त्या वेळेत विश्रांतीची सवय लागते.
29) मी चांगल्या सवयी कशाला लावू ?
शिक्षक: कोणत्या सवयी चांगल्या व कोणत्या वाईट याचा विचार ज्याने त्याने करावयाचा आहे. चांगल्या सवयी लावण्याचे काही मार्ग आहेत. चांगल्या सवयी लावण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ती गोष्ट हळूहळू करत राहणे. सवयी ही परत परत करायची क्रिया आहे जेणेकरून तुमचा मेंदू ती आपोआप करू शकेल.
30) मी अधिक आत्मजागरूक कसे होऊ ?
शिक्षक : आपल्या सभोवती काय घडत आहे त्याचे ज्ञान आपल्याला असले पाहिजे. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर जीवनात आपण मागे पडू. हे घडू नये यासाठी आत्मजागृत असणे गरजेचे आहे. जो आत्मभानाची तयारी ठेवून प्रवासाला सुरुवात करेल, त्यांना कशाची गरज आहे हे त्यांनाच लक्षात येईल.
31) मी स्वतः कसे जगू?
शिक्षक : आजच्या तरुणांना 25 ते 30 वर्षे पर्यंत आपणाला पुढे काय करायचे आहे. हे माहीत नसते ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांना जीवनात आपले ध्येय काय आहे हे माहीत नसते. त्यांना जितक्या लवकर ह्या गोष्टी कळतील तेवढे चांगले आहे. जीवन जगताना पैसा, आरोग्य, नातेसंबंध, पैशाचे नियोजन व्यवस्थित करता आले तर आपले जीवन आनंदी होईल.
32) मी माझा राग कसा नियंत्रित करू?
शिक्षक : जेव्हा आपली महत्त्वाची गरज पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला राग येत असतो. आपण दुसऱ्यांशी नेहमी रागाने वर्तन करतो त्यामुळे आपले मित्र संबंध बिघडतात. यासाठी राग नियंत्रणात आणला पाहिजे. यासाठी मेडिटेशन करणे गरजेचे आहे. तसेच जेव्हा आपण रागवू तेव्हा तो राग व्यक्त करण्यापूर्वी एक ते दहा अंक मोजा. राग शांत होईपर्यंत ही आकडेवारी परत करा. यांने आपला राग नियंत्रणात राहण्यास मदत होईल. दिवसभरात अनेक रागाचे क्षण येतात तेव्हा रागावू नका. शांतपणे त्या गोष्टीचे निरीक्षण करा. हळूहळू तुमचा राग शांत होईल.
33) मी स्वतःला कसे उचलू?
शिक्षक: अपयश आले की आपल्याला हरल्या सारखे वाटते. खरंतर लहानपणी पडल्यावर उचलणे खूप सोपे होते. ते आठवा खरंतर हरणे म्हणजे प्रवासातले एक अपयश, प्रवासाचा शेवट नव्हे. आपण केलेल्या चुका पुन्हा न करणे. अपयश आल्यास पुन्हा परत प्रयत्न करणे व त्यात यशस्वी होणे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देऊ शकू.
34) मी स्वतःचा चांगला मित्र कसा बनू शकतो?
शिक्षक : स्वतःच स्वतःचे मित्र बनलो तर दुसऱ्यांच्या मदतीची आपणाला गरज भासणार नाही.
दुसऱ्याने तुमचे दोष दाखवण्याआधी स्वतःच ते दोष ओळखा व ते दूर करण्याचा प्रयत्न करा. मी मला स्वतःला व मित्रांनाही एखाद्या अपयशाबद्दल दोष देणार नाही. स्वतःलाच स्वतःचे चांगले मित्र बनविण्यापासून रोखू नका. स्वतःला कधीही नाकारू नका.
आपल्या जीवनात जी गोष्ट आपल्याला मिळवावयाची आहे. ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
३५) मी कामावर अपरिहार्य कसा होऊ ?
शिक्षक: आपण केलेल्या कामावर फार खुश होऊ नका, कारण तेच काम दुसरे कोणी तुमच्यापेक्षा जलद करू शकते. म्हणून ज्यांनी आपल्यावर जबाबदारी सोपवली आहे, त्यांना आपल्या कामातून काय अपेक्षा आहेत याचा विचार केला पाहिजे व त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे.
३६) मी माझ्या पालकांना कसे क्षमा करू?
शिक्षक: आपले पालक आपल्याशी वागताना बरोबर होते का चूक याचा विचार करत बसू नका. बरोबर की चूक हे सिद्ध करण्याची ही वेळ नव्हे. त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने बोला. प्रेम ही अशी शक्ती आहे जी अनेक दारे उघडते.
Get epic shit done. Ankur Warikoo.Juggernaut Books C-I-128,First Floor,
Sangam Vihah,Near Holi
Chowk,New Delhi 110080, India.
Marathi translation by Vinita Mane-Pisal.
” डू एपिक शिट “व “गेट एपिक शीट डन”या पुस्तकांच्या चार लाख प्रति विकल्या गेल्या आहेत. इतके हे लोकप्रिय पुस्तक आहे.
Other Articles:
1 thought on “Great Ankur Warikoo Books Summary 2024”