“Explore the transformative insights of ‘Do Nothing’ in this comprehensive Marathi book summary. Uncover the art of doing nothing, embracing leisure, and finding balance in a fast-paced world. Discover key takeaways and practical tips in Marathi to enhance your well-being and productivity. Elevate your life with the wisdom of ‘Do Nothing’ in Marathi – a guide to mindfulness and intentional living.”
Table of Contents
ToggleDO Nothing Book Summary in Marathi
आपण जे काम करतो त्यातून आपल्याला किती समाधान मिळतं यापेक्षा आपण किती कार्यक्षमतेने काम केलं यावरच जीवनाचे मूल्यमापन करतो. खरंतर हे वास्तवात चुकीचे आहे. पैसे मिळविण्याच्या
नादात आपण जीवनात आनंद घ्यायलाच विसरून गेलो आहोत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या
विरंगुळ्याच्या क्षणाला शत्रु न मानता मित्र मानून असे निवांतपणाचे क्षण उपभोगले पाहिजेत ही संकल्पना या पुस्तकात मांडली गेली आहे.
त्यातील महत्त्वाचे मुद्दे.
१) जगण्यासाठी काम की कामासाठी जगणं?
माणसाने जीवनात सुख मिळविण्याच्या नादात अतिश्रम करून आपले जीवन दुःखी करून घेतले आहे. या वेळामध्ये आपण इतके भटकत आहोत की आपल्याला कुठे जायचे आहे, हेच आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे हसत खेळत आनंदी जीवन जगण्याची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत.
आपल्या आयुष्याचे ध्येय कठोर परिश्रम हे आहे असा संभ्रम आपल्या धर्मविषयक संकल्पना आणि अर्थशास्त्रातील संशोधन यांनी आपल्या मनात निर्माण केला आहे. त्यामुळे आपण खेळातून आनंद मिळविण्यापासून दूर होत चाललो आहोत. हे व्यस्त जीवनामुळे होत आहे. आपल्या हिताच्या गोष्टी करण्यापासून आपण दूर चाललो आहोत. त्यामुळे आपले माणूसपण हरवत चालले आहे.
माणसाचे जीवन यंत्रवत झाले आहे. आनंद मिळविण्यासाठी आपला जन्म आहे हे आपण विसरत चाललो आहोत.
आज काम करण्याला जे महत्त्व प्राप्त झाले आहे, ते नैसर्गिक नाही. पैसे मिळविण्यासाठी आपण काम करत राहतो. नोकरी करून आपल्या कुटुंबासाठी आपण पैसे मिळवत असतो. अशी नोकरी नसेल तर कुटुंबात व समाजात आपल्याला प्रतिष्ठेचे स्थान राहणार नाही, अशी भीती आपल्याला सतत वाटत असते.
पुरेसा मोकळा वेळ असणं हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते. अतिश्रम करणाऱ्या लोकांकडे असा मोकळा वेळ नसतो. कामासाठी काम करत राहणं ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. सतत काम करण्याचे काही तोटेही असतात की जे दृश्य नसतात.
२) कार्यक्षमता पंथ.
आपण कामाच्या मागे सतत पळत राहिल्याने आपली दमछाक होते. अधून मधून कामाचा वेग कमी केला तर त्यामुळे खूप फायदा होऊ शकतो.
त्यामुळेच आज स्लो मुव्हमेंटचा उदय झाला. वेगवान जीवन जगण्याच्या विषाणूने आपल्या सगळ्यांना ग्रासलं आहे. जलद आणि आयतं अशा सर्व गोष्टी मिळवण्याच्या वेडाविरुद्ध आम्ही जागृती करू इच्छितो असं स्लो फूड चळवळीच्या जाहीरनाम्यात उद् घोषित केले आहे.
स्लो मुव्हमेंटचे पुरस्कर्ते विमानाने प्रवास करण्याऐवजी ट्रेनने किंवा बोटीने प्रवास करण्याचा आग्रह धरतात. आधुनिक यांत्रिक जीवनशैलीमुळे धावपळ करण्याऐवजी शांततेने काम करण्याची पद्धत आपण निवडली तर आपल्याला थोडी स्वस्थता मिळू शकते.
पूर्वीच्या काळातील लोकांच्या काम करण्याच्या सवयी वेगळ्या होत्या. आधुनिक काळातील काम करण्याच्या कल्पना चुकीच्या आहेत.उदा. कामातून अधून मधून विश्रांती घेण्याची कल्पना इत्यादी.
३) ऑफिस मधील काम घरापर्यंत पोहोचते तेव्हा
ऑफिस मधील काम घरी आणलं की आपल्याला मुलांनी आपल्या कामात व्यत्य आणू नये असे वाटते. म्हणून आपण त्यांना दुसरीकडे खेळायला पाठवतो. आपलं काम कार्यक्षमतेने घरी व्हावे यासाठी आपण ऑफिसातील तंत्रे घरी वापरायला लागतो. ऑफिसचे काम घरी आणल्याने आपल्या विश्रांतीचा काळ आपण कॉम्प्युटरवर काम करण्यात व फोनवर काम उरकण्यात घालवतो. परिणामी आपण ऑफिसचे काम व्यवस्थित करतो पण त्याचबरोबर घरच्या कामाचे नियोजन मात्र नेटकेपणाने होत नाही. आपलं घर आता ऑफिस बनून जाते.
ऑफिस मधील काम घरी आणल्याने आपला विश्रांतीचा वेळ सतत काहीतरी करण्यात जाऊ लागला आहे.
४) माध्यमांना समाज जीवनातून दूर ठेवा.
राजकीय पुढारी, विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती तसेच कंपन्यांचे सीईओज यांचं चकचकीत जीवन प्रसिद्धी माध्यमातून आपल्यासमोर येत असतं. त्यांच्यासारखं आपलेही जीवन असावं असा आपल्याला वाटत असते. पण ते वास्तवात शक्य नसते. त्यांच्याशी आपली तुलना केल्याने आपल्या मनात कमीपणाची भावना निर्माण होते.
समाज माध्यमातून व्यक्तींचे अवास्तव जीवन दर्शविलेले असते. पीटर ट्विटर किंवा स्नॅपचॅटवरील माहिती नेहमीच खरी असेल असे नाही. आपण मात्र ते चित्र व माहिती खरी समजून त्यांच्याशी तुलना करतो.
आपण केलेल्या पदार्थांचे फोटो, कौतुक इंस्टाग्राम वर पाहिल्याशिवाय आपल्याला त्या स्वयंपाकाच्या निर्मितीचा आनंद मिळत नाही. हे परिपूर्णतेचे वेड आहे. त्यामुळे समाजाचे मनस्वास्थ्य बिघडत चालले आहे.
स्वतःचे मूल्यमापन अवास्तव आणि विपर्यस्त अशा आदर्शांशी नकळत करतो तेव्हा आपले मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते. यासाठी बाकीचे लोक काय करत आहेत ,हे इंटरनेटवरून पाहणं व त्यांच्यावर लक्ष ठेवणं बंद करा
५) फुरसतीच्या क्षणांचा योग्य वापर करा.
जेव्हा तुम्ही कामावरून रजा घेता तेव्हा ऑफिसच्या कामांची चिंता करत बसू नका. त्या चिंता अलिप्त ठेवा. ई-मेल्स, मेसेजेस पाहून त्याला लगेच प्रतिसाद देण्याचा मोह होईल. करण तुमच्या मनाला लागलेली ती सवय असते. या सर्व गोष्टींपासून अलिप्त रहा.
ऑफिसमधून आल्यावर कामापासून अलिप्त राहिल्यास आपल्याला भावनिकदृष्ट्या निरोगी व समाधानी आयुष्य लाभते. काहीही न करण्यासाठी दिवसाचा काही वेळ राखून ठेवा. यावेळी तुम्ही फिरायला जा, व्यायाम करा, मित्रांबरोबर गप्पा मारा किंवा त्यांच्याबरोबर फिरायला जा, संगीत ऐका. तुमच्या फुरसतीच्या वेळेत कामाचा अजिबात विचार करू नका. हा वेळ तुमच्या पसंतीच्या गोष्टी करण्यात घालवा.
६) खरी नाती कशी जोडावीत.
लोकांत मिसळण्यासाठी दिवसाचा काही वेळ दिला पाहिजे. तो वेळ फेसबुक पाहण्यात घालवू नका. या वेळेत तुम्ही मित्रांना भेटा किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी घ्या. असा सामाजिक संपर्क ठेवणारी माणसं अधिक सकारात्मक व कार्यक्षम असतात. सामाजिक संपर्काने तुमचे जीवन अधिक निरोगी होते. समाजातील लोकांना मदत केल्याने तुम्ही वैयक्तिक स्वार्थापलीकडे विचार करू लागता. दानशूर वृत्ती हे उच्च नितीमूल्य आहे.
७) पुन्हा आनंदी जीवनाकडे.
आपले जीवन सुखी व्हावे या विचारावर लोक आपले लक्ष केंद्रित करतात. खरंतर आर्थिक भरभराटीशी माणसाच्या सुखाचा काहीही संबंध नाही.
आर्थिक संपन्नतेमुळे माणूस शारीरिक, मानसिक दृष्ट्या निरोगी राहतो असे नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे. एकमेकांच्या सहकार्याने काम केले तरच तो उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. उत्पादनक्षमतेवर भर न देता नातेसंबंधावर महत्त्व देणारी संस्कृती आपण विकसित करायला हवी. समाजात निर्माण झालेले हार्ड कल्चर बदलायला हवे. आजच्या काळात माणूसपण जपणे ही महत्त्वाची गोष्ट झाली आहे.
वेळ म्हणजे पैसा ही संकल्पना जेव्हापासून लोकांच्या मनात रुजली आहे तेव्हापासून फुरसतीच्या क्षणाचा आनंद घेणंच माणूस विसरून गेला आहे. या पुस्तकात विरंगुळ्याचे क्षण शोधण्याची आणि रिकामेपणा, काहीही न करणं याला शत्रू न मानता मित्र मानण्याची एक वेगळीच कल्पना मांडण्यात आली आहे.
सेलेस्टा हेडली म्हणतात आपली किंमत दुसऱ्यांजवळ सिद्ध करण्याचा प्रयत्न थांबवा. स्वतःचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे व्यतीत करा. माणूस म्हणून तुमचे मोठेपण सिद्ध करा.

सेलेस्टा या व्यावसायिक व्याख्यात्या व सन्माननीय पुरस्कार विजेत्या पत्रकार आहेत.
We Need to Talk…….. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रचंड खप झाल्याने त्या प्रसिद्धी पावल्या. जॉर्जिया पब्लिक रेडिओवरील One Second Thought या कार्यक्रमाच्या त्या कार्यकारी निर्मात्या आहेत. चांगल्या संभाषणाचे दहा मार्ग सांगणारे त्यांचे TEDx वरील भाषण दोन कोटी प्रेक्षकांनी पाहिले. 100 पेक्षा जास्त कंपन्या, विद्यापीठे यांच्या परिषदांमध्ये सेलेस्टा यांनी प्रतिनिधित्व केले. नॅशनल पब्लिक रेडिओवरून त्यांनी शेकडो मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. सध्या त्या वॉशिंग्टन डीसी मध्ये राहतात.