Rework Book Summary in Marathi :रिवर्क

Discover the essence of “Rework Book” in Marathi with this concise book summary. Learn innovative insights and strategies to revolutionize your business approach. Uncover a fresh perspective on work and productivity. Dive into the world of impactful ideas translated into Marathi for a transformative read.

Rework Book Summary in Marathi

आपण एखादा व्यवसाय सुरू करतो. तसेच जीवनात आपल्याला अनेक क्षेत्रात अपयशाला सामोरे जावं लागतं तसं व्यवसायातही. या अपयशाला आपल्यापासून दूर कसं ठेवता येईल व यशस्वी व्यवसाय कसा करता येईल याचा विचार या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने म्हटले आहे हे पुस्तक कोणत्याही शैक्षणिक सिद्धांतावर आधारित नाही. 

ते आमच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. आम्ही गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ व्यवसायात आहोत. या प्रवासात आम्ही दोनदा आर्थिक मंदी, उद्योगांमधला आर्थिक फुगवटा, व्यवसाय करण्याच्या वेगळ्या पद्धतीच्या आलेल्या फॅशन आणि तेजी-मंदीची येणारी जाणारी भाकिते हे सगळं पाहिलं. आणि तरीही या सगळ्या काळात आम्ही नफ्यात होतो.

आपण व्यवसायातल्या एकएका गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार करू. असे व्यवसाय सुरू करताना आपण आपल्या पारंपारिक पद्धती सोडून द्यायला हव्यात. आपण कंपनी कशी सुरु करायची, त्याचे मॅनेजमेंट कसे करायचे ते या पुस्तकातून शिकायला मिळेल.

ज्यांनी कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं स्वप्नही पाहिलं नव्हतं अशा आणि ज्यांचा व्यवसाय उत्तम सुरू आहे अशा लोकांसाठी हे पुस्तक आहे.

लेखक द्वय असे म्हणतात की तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी ८०-१०० तास आठवड्याला राबण्याची गरज नाही.१०ते४० तास काम करूनही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या आयुष्यात जो पैसा तुम्ही कमावलेला आहे तो त्या व्यवसायात घालण्याची सुरुवातीला गरज नाही. तुम्ही तुमची स्वतःची नोकरी करत, एखादा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्यातून पैसे मिळत राहतील. तुम्हाला ऑफिस थाटायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमचा व्यवसाय करू शकता.

जीवनात अपेक्षित यश मिळविण्यासाठी काम करण्याची पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे.

खऱ्या जगाकडे दुर्लक्ष करा:

जगात असणारे लोक हे निराशावादी आणि हताश असतात. त्यांना असं वाटत असतं की नव्या कल्पना यशस्वी होण्यासाठी नसतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी व आशावादी असाल तर ते तुम्हाला तुम्ही कसे चुकीचे आहात हे सांगण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

योजना म्हणजे अंदाजच:

आपण यशस्वी होण्यासाठी काही अंदाज बांधत असतो. अशा योजना फार मोठ्या असतात. अशा मोठ्या योजना आखू नका.
यावर्षी तुम्ही काय करणार आहात हे ठरवू नका. या आठवड्यात तुम्ही काय करणार आहात हे ठरवा.

वर्कहोलिझम:

काही लोकांना रात्रंदिवस काम करण्याची सवय असते. अशी वर्कहोलिक असण्याची सवय बिनकामाची नाही, तर मूर्खपणाची आहे. तुम्ही अति काम केल्यामुळे तुम्हाला फार कामाची काळजी आहे व तुम्ही निर्मितीक्षम आहात असा त्याचा अर्थ होत नाही . याचा एवढाच अर्थ होतो की तुम्ही जास्त काम करता. 

फार वेळ काम करत बसल्यामुळे ते अनेक समस्या निर्माण करून ठेवतात. ते फक्त आपण काम किती करत आहोत याचा दिखावा करतात. वर्कहोलिक्स हे काही हिरो नाहीत. खरा हिरो तर आपले काम पूर्ण करून केव्हाच घरी गेलेला असतो.

काहीतरी करायला सुरुवात करा:

जोपर्यंत तुम्ही काही निर्माण करत नाही. तोपर्यंत तुमची कल्पनाही फक्त कल्पनाच असते. अशा कल्पना समाजातील व्यक्तींकडे भरपूर असतात.

तुम्ही एखाद्या क्षेत्रात नवीन असता तेव्हा तुम्ही काहीतरी करणे गरजेचं असतं. कारण सुरुवात करणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमची कल्पना कशी व किती चांगल्या प्रकारे अमलात आणता याला महत्त्व आहे.

सुरुवातीला खूप खोलात जाऊ नका :

तुम्ही तुमची कल्पना, योजना अमलात आणा. ती अमलात आणताना तपशिलात खूप जाऊ नका. तपशिलात जर गेलात तर तुम्ही त्यातच गुरफटून जाल व तुमची जी योजना आहे ती बारगळेल. तपशिलामुळे त्या योजनेला अनेक फाटे फुटू शकतील. म्हणून थोड्या वेळासाठी तपशिलांकडे दुर्लक्ष करा. पायाभूत गोष्टी आधी हाता वेगळ्या करा व त्यानंतर तपशिलाचा विचार करा.

निर्णय घेणे म्हणजे प्रगती करणे आहे:

आपण निर्णय घेण्याला विलंब करतो. निर्णय लांबणीवर टाकतो त्यामुळे निर्णय साठून राहतात.
परिणामी कामांचा ढीग वाढतो.
त्याकडे आपले दुर्लक्ष होते त्यामुळे आपण निर्णय घाईत घेतो. परिणामी ते काम तसेच रेंगाळत राहते. मोठ मोठ्या प्रकल्पांचे निर्णय ताबडतोब घेणे गरजेचे असते. निर्णय घेण्यात जर वेळ लागला तर ते प्रकल्प पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. म्हणून वेळेत निर्णय घ्या व प्रगती करा.

तुमचे बाय प्रॉडक्ट्स विका:

जेव्हा तुम्ही काही गोष्टीची निर्मिती करतात. त्या उत्पादना बरोबरच तुम्ही इतर गोष्टी तयार करत असता. त्याला बायप्रॉडक्ट म्हणतात तज्ञ आणि हुशार कल्पक व्यावसायिक हे बाय- प्रॉडक्ट ओळखतात आणि ते विकतात. यातून ते संधी शोधतात. उदा. लाकडाच्या उद्योगात लाकडाचा भुसा, लाकडाचे तुकडे हे भागही विकले जातात. त्यातून भरपूर नफा मिळवता येतो. तुमच्याकडेही विकण्यासारखं असं काहीतरी असू शकेल. ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल.

तुमचे उत्पादन आता बाहेर काढा:

तुम्ही ज्या प्रोडक्टस् -चे उत्पादन केले आहे ते लगेचच मार्केटमध्ये आणा. तुम्ही उत्पादन करताना काही गोष्टी राहू शकतात. राहिलेल्या गोष्टींसाठी तुमचं उत्पादन बाजारात आणायला वेळ लावू नका. थोडसं राहील म्हणून सगळंच थांबवून ठेवू नका. ते ताबडतोब बाजारात आणा. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या तुम्ही नंतरही उत्तम प्रकारे दुरुस्त करू शकता. 

याबाबतीत जेसन फ्राईड व डेव्हिड हॅन्सन हे लेखक म्हणतात, उत्पादन बाजारात पाठवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज नाही, त्या बाजूला ठेवा. आता गरजेचा विचार करा. डामडौल राखण्याबद्दल नंतर काळजी करा. तुम्ही खरंच त्याबद्दल विचार करत असाल ,तर अशा खूपशा गोष्टी पहिल्या दिवशी गरजेच्या नाहीत.

हिरो बनायचा प्रयत्न करू नका:

तुम्ही आधीच एखाद्या गोष्टीवर निष्फळ वेळ वाया घातला असेल, तर ती गोष्ट सोडून देणं केव्हाही चांगलं. तुम्ही घालवलेला वेळ परत कधीही मिळणार नाही. पण त्यावर आणखीन वेळ घालवणे हे सगळ्यात वाईट आहे. अनेकदा हिरो बनण्याऐवजी खेळ सोडून देणं चांगला असतं.

लांबलचक यादीतील काम पूर्ण होत नाहीत :

कामाची खूप लांबलचक यादी करू नका. जर त्या यादीतील कामे झाली नाहीत तर तुमच्या मनात अपराधीपणाची भावना वाढते. त्यामुळे तुमच्यावरचा कामाचा ताण वाढतो. १०० कामांची एक यादी करण्यापेक्षा दहा कामांच्या दहा याद्या करा. त्यामुळे तुम्ही भांबावून जाणार नाहीत.

लहान निर्णय घ्या:

जेव्हा तुम्ही लहान निर्णय घेता तेव्हा तुम्ही मोठ्या चुका करण्याची शक्यता नगण्य असते.
काही चुकले तरी त्याचे दुष्परिणाम फार काही मोठे होणार नाहीत. मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी एका वेळी एक लहान निर्णय घेणे. ‘एकच मोठा निर्णय घेणे हा दडपवून टाकणारा अनुभव असतो. त्यापेक्षा मी समोर एका यार्डावर असलेल्या बर्फाच्या तुकड्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतो’ बेन सॉंडर्स ( उत्तर ध्रुवावर एकटा गेलेली व्यक्ती.) यांचं हे वाक्य फार महत्त्वाचे आहे.

नाही म्हणा :

लेखक म्हणतात तुमच्याकडे अगोदरच इतकी कामे असतात व अजून एखाद्या कामाला आपण हो म्हणतो, म्हणजेच आपल्या कामांचा ढीग वाढतो. त्यामुळे प्राधान्य क्रमाने तुम्हाला कोणते काम करावयाचे आहे याबाबत आपला गोंधळ उडतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या कामाला नाही म्हणायची सवय लावून घ्या. 

इतकी सोय लावून घ्या की तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पनांनाही नाही म्हणायची सवय लावा. तुम्ही हो म्हटल्यामुळे तुम्हाला कित्येक वेळेला पश्चाताप होतो. आपल्याला पश्चाताप व्हायचा नसेल तर नाही म्हणा. नाही म्हटल्यामुळे जास्त काळासाठी येणाऱ्या पश्चात्तापापेक्षा थोड्या काळासाठी येणाऱ्या अस्वस्थतेवर मात करता येते.

रात्रीतून प्रसिद्धी मागची भ्रामकता:

तुम्ही अचानक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती होणार नाही आहात. पण आपली अपेक्षा मात्र तशीच असते. ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात डोकावून पहा. तुम्हाला असं दिसून येईल की त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत कित्येक वर्षे केलेली असते. त्यामुळे रात्रीतून प्रसिद्ध होण्याचं स्वप्न पहा पण आपली प्रगती हळूहळूच होणार आहे हे लक्षात ठेवा.

औपचारिक शिक्षण विसरून जा:

लेखक म्हणतात औपचारिक शिक्षणात खूप वेळ वाया घालवू नका. जेव्हा तुम्ही कॉलेजचे शिक्षण घेऊन बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला तुम्ही शिकलेल्या गोष्टी विसराव्या लागतील. शाळेत अशी अनेक कौशल्य शिकवली जातात, जी शाळेच्या बाहेर काहीही उपयोगाची नसतात.

या पुस्तकाच्या कव्हर पेजवर छापलेलं वाक्य फार महत्त्वाचा आहे.
” हे पुस्तक न वाचण्याची जोखीम पत्करू शकत असाल, तरच या पुस्तकाकडे दुर्लक्ष करा.”
सेठ गोडिन.

1 thought on “Rework Book Summary in Marathi :रिवर्क”

Leave a Comment