डॉ. सुनील कुमार लवटे | दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन

डॉ. सुनील कुमार लवटे यांचे अध्यक्षीय भाषण.
गत संमेलनाध्यक्ष किशोर
बेडकीहाळ यांनी संमेलनाची सूत्रे डॉ. सुनील कुमार लवटे यांच्याकडे सुपूर्त केली. साहित्य अकादमी विजेते कादंबरीकार सदानंद देशमुख यांचे उदघाटनपर भाषण ऐकत असताना मला जाणवले की सदानंद देशमुख कादंबरीकार असूनही आई बहिणाबाईच्या पोटी आलेला हा वर्तमानातला कवी आहे. ऐरणी आणि खानदेशी भाषेचं लेणं घेऊन, वारसा घेऊन आज चांगला कवी एकीकडे गद्य रचतो आणि दुसरीकडे कविता गुणगुणत राहतो. म्हणून मराठी साहित्य लालित्यमय राहतं, याची आपण नोंद घेतली पाहिजे.वि.स. खांडेकर हे आमच्या शाळेचे अध्यक्ष असताना विविध लेखकांची भाषणे विद्यार्थ्यांना ऐकवीत असत. उंडारावयाच्या वयात पाडसाला जर दाव्याने बांधलं नाही तर ते पाडस हाताला लागत नाही.

डॉ. सुनील कुमार लवटे

तुम्ही या वयात चांगलं ऐकलं तर चांगला विचार कराल. तुमचं भविष्य उज्वल होईल. मी तुम्हाला सर्वांना असं सांगणार आहे की तुम्ही चांगले वाचले पाहिजे.३५ वे हे दमसाचे साहित्य संमेलन तर्कतीर्थ साहित्य नगरीत भरत आहे.२०२५ हे वर्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं १२५ वे जयंती वर्ष आहे. जेव्हा आपला एक पूर्वसुरी साहित्यिक सुमारे शंभर वर्षांपूर्वी विसाव्या शतकात जे काही सांगत होता, त्याचे विस्मरण गेल्या 25- 30 वर्षांमध्ये आपण केलं.१९९४ साली त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र हे विसरून गेला गेला होता की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नावाचा एक विद्वतजड मनुष्य या महाराष्ट्राने पेलला होता.

शास्त्रीजी असंच विद्वत -जड बोलायचे. हा विद्वत- जड शब्द त्यांचाच आहे. शास्त्रीजी जे बोलायचे ते वैचारिक बोलायचे, आणि ते असं म्हणायचे की नाही तरी महाराष्ट्राला वैचारिकाचे वावडे आहेच. महाराष्ट्रीयन वाचक कथा कादंबऱ्या जितक्या मनापासून वाचतो, तितक्या मनापासून वैचारिक लेखन वाचत नाही.

स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर गेल्या ६५-७० वर्षात महाराष्ट्राची वैचारिक अधोगती झाली. ती अधोगती अशीच झालेली नाही. आपण वैचारिक वाचले नाही म्हणून आपले वैचारीक अध:पतन झाले.

मतदानाचे निकाल आपण सुशिक्षित असल्याचा दाखला देत नाहीत. साहित्यिकांनी सतत सत्तेच्या विरोधातच उभं राहिलं पाहिजे. जोपर्यंत साहित्यिक आणि विचारवंत सत्तेच्या विरोधात उभे असतात तोपर्यंतच सत्ताधाऱ्यांना जाग असते. साहित्यिक आणि विचारक पेंगायला लागला की राज्य रांगायला लागतं.३५ वे संमेलन होत असताना गुडी गुडी बोलून चालणार नाही.

माझ्या दृष्टीने ३५ वे साहित्य संमेलन हे आपल्या दृष्टीने अंतर्मुख करणार साहित्य संमेलन आहे. ज्या तर्कतीर्थांच्या १८ खंडांचा मी संपादन केलं. त्या तर्कतीर्थांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी असं विचारलं/ऑफर दिली, तुम्ही राज्यसभेचे तिकीट घेऊन दिल्लीला जाता का? तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर होता का? तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होता का? तेव्हा या माणसाने साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष पद स्वीकारले. आपल्याला आलेले पर्यायांचे सडे हे निवडुंगाच्या काट्याचे आहेत की प्राजक्ताचे आहेत याची जाण तर्कतीर्थांना होती, म्हणून त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले.

१९६० पासून १९८० पर्यंत तर्कतीर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी मराठी भाषा अभिजात करण्यासाठी, जे प्रयत्न केले ते आपण खुल्या दिलाने समजून घेतले पाहिजेत. मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून त्यांनी सर्वात अगोदर प्रयत्न केले.

१९५२ च्या इलेक्शन मध्ये आपण आपलं पहिलं शासन आणलं. आपले पहिले लोकप्रतिनिधी निवडून आणले.
यापूर्वी ब्रिटिशांचं जे राज्य होतं ते सचिव चालवायचे. ते आता लोकप्रतिनिधी चालवायला लागले. जेव्हा तर्कतीर्थांना असं सांगण्यात आलं की तुम्ही इंग्रजी शब्दांना नवे प्रतिशब्द मराठी तयार करा.

मुंबईचे जे सचिवालय/ सेक्रेटिएट होतं आता झालं मंत्रालय. हे असंच झालं नाही.
तर्कतीर्थांना जेव्हा सांगण्यात आलं तुम्ही प्रतिशब्द तयार करा, त्यांनी इंग्रजी सेक्रेटीएटच भाषांतर मंत्रालयास केलं. त्याकाळचे सर्व विद्वान तर्क- तीर्थांवर तुटून पडले. तुम्हाला इंग्रजी येते की नाही? सेक्रेटिएटच रूपांतर सचिवालय व्हायला पाहिजे मंत्रालय कसं? तेव्हा तर्कतीर्थ म्हणाले मी तुमच्यासारखं शब्दशः भाषांतर करणारा पाटी टाकू भाषांतरकार नाही. मी माझ्या जाणीवांनी आणि माझ्या तर्काने भाषांतर करतो. तुम्हाला हे कळायला हवे की पूर्वी ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांचे राज्य हे सचिवांचं राज्य होतं. लोकशाहीनंतर हे मंत्र्यांचं राज्य/ लोकप्रतिनिधींचे राज्य आहे, म्हणून सेक्रेटिएटच रूपांतर मी मंत्रालय असं केलं. मंत्रालय हा शब्द तुम्हाला सांगेल येथून पुढे लोकशाहीचे प्रतीक आहे. हा छोटा बदल शासनामध्ये क्रांती आणू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी महाराष्ट्रात शिष्टाचार बदलण्यात तर्कतीर्थानी केल्या. मला तर्कतीर्थ हे महाराष्ट्राचे चरित्र बदलणारे साहित्यिक वाटतात.

साहित्यिकांनी राज्याचे चरित्र बदलले पाहिजे. जनतेचे चरित्र बदलले पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. साहित्यिक जेव्हा अशी जबाबदारी स्वीकारतो तेव्हा त्याची जोखीम पण असते. जोखीम आणि जबाबदारी खांद्यावर घेऊन जो साहित्यिक चालतो त्या साहित्यिकाच्या मागेच जनता उभी असते. तर्कतीर्थानी मराठी भाषा समृद्ध केली. तर्कतीर्थानी जगातल्या बऱ्याचशा अभिजात ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले.

पूर्वी ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिले जायचे. विशेषता 50 च्या पूर्वीची आपली पिढी इंग्रजी वाचणारी व लिहिणारी होती. तेव्हा तर्कतीर्थ म्हणत इंग्रजी लिहिताय तर लिहा पण मराठीत पण थोडं लिहा.
इंग्रजीत तुम्ही फिजिक्स लिहिता मग मराठीत भौतिकशास्त्र का लिहीत नाही? तर्कतीर्थांनी मराठीत कोश तयार केला.
जसा पदनाम कोश तयार केला. तसा स्थापत्य शिल्पकोश तयार केला.

प्लास्टिकला मराठी शब्द, आकार्य असा आहे. प्लास्टिकचे वैशिष्ट्य असं की ज्या मोडमध्ये घातलं जातं त्याचा आकार येतो. ज्याचा स्वतःचा आकार नसतो. अशा कितीतरी शब्दांची भर शास्त्रींनी दिली. त्यांनी एक ज्ञानी समाज मराठीत निर्माण केला.
वाई ही दक्षिणकाशी मानली जाते. पण वाई ही एकेकाळी महाराष्ट्राची बौद्धिक राजधानी होती. या वाईमध्ये ३५०
घरे अशी होती की जी परंपरेने वेद अभ्यास करावयाची. वर्षांनुवर्षे वेदाभ्यास व वेदपठन वाईत चालायचे. पेशव्यांच्या काळात इतिहास सर्व पंडितांना वर्षासने होती. पेशवाईनंतर कुठल्यातरी ब्रिटिश अधिकाऱ्याला समजले की ही ३५० लोकांची वर्षाशने खालच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने बंद केली होती. त्यावेळी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले आपले पहिले काम ज्ञान जिवंत ठेवणे आहे, माणूस आपोआप जिवंत राहतो. ज्ञान जोपर्यंत जिवंत राहणार नाही तोपर्यंत माणसाच्या जिवंत असण्याला काही किंमत नाही. ब्रिटिशांनी ३५० वर्षासने पेशवाईनंतर चालू ठेवली होती. म्हणून वेद आपल्यापर्यंत येऊन पोहोचले.

वाईच्या प्रज्ञा पाठ शाळेमध्ये पन्नास हजार पोथ्या आहेत. विद्यार्थ्यांना उद्देशून डॉक्टर लवटे म्हणाले “तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा संशोधक व्हा.” बदलता काळ हा संशोधनाचा काळ आहे. पत्रकारितेचा काळ आहे, संपादनाचा काळ आहे, भाषांतराचा काळ आहे.

Other Articles- गुढीपाडवा माहिती मराठी 2025

Leave a Comment