Best Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi 2025

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण व शिक्षण.

रत्नागिरी जिल्ह्यातील अंबवडे हे आंबेडकरांचे मूळ गाव. त्यांचे आडनाव सपकाळ होते. आंबेडकरांचे आजोबा मालोजी सपकाळ हे लष्करी शिपाई होते. लष्करी शिपायांच्या मुलांसाठी छावणीत शाळा असत. तिथे त्यांच्या मुलाचे रामजीचे शिक्षण झाले. रामजींचे विसाव्या वर्षी भीमाबाईशी लग्न झाले.

विवाह नंतर रामजी पुण्याच्या पंतोजी शाळेत शिक्षकी पेशाचे शिक्षण घेतले आणि ते आधी शिक्षक व नंतर लष्करी छावणीतील शाळेत मुख्याध्यापक झाले. त्यांना सुभेदार मेजर पदापर्यंत बढती मिळाली.१४ एप्रिल१८९१ रोजी ‘भीमा’ चा जन्म झाला. भीम दोन अडीच वर्षाचा असताना त्याचे वडील सेवानिवृत्त झाले. नंतर काही काळ ते साताऱ्याला नोकरी करत होते.

भीम आणि त्यांचा भाऊ आनंद येथील लष्करी छावणीतील शाळेत जाऊ लागले. भीम आपल्या आईला ‘ बाय ‘ म्हणत असे. तो पाच सहा वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. त्यांची अत्या मिराबाई पतीशी पटत नसल्यामुळे, माहेरी राहत असे. तिने या दोन मुलांचे संगोपन केले.

सातारसारख्या लहानशा गावात त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. पण दापोलीच्या शाळेतही त्यांच्या वाट्याला अपमान आणि अवहेलनाच येत होती. शाळेत त्यांना घरून आणलेल्या पोत्यावरच बसावे लागे. काही शिक्षकांनी मात्र आंबेडकरांच्या हुशारीचे कौतुक केले. साताऱ्यातील आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी त्याला प्रेमाने वागविले. त्यांच्याच प्रेरणेने भिमाने आपले ‘सपकाळ ‘ आडनाव बदलून आंबेडकर केले.

साताऱ्याची नोकरी संपल्यानंतर त्यांच्या वडिलांनी बि-हाड मुंबईला हलवले. भीमाने एल्फिन्स्टन विद्यालयात प्रवेश घेतला. दूर अंतरावरील या सरकारी शाळेत त्याला पायीच जावे लागत असे.१९०७ मध्ये भीम मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. केळुस्करांनी भीमाने महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे, असा आग्रह धरला. बडोद्याचे दानशूर व गुणग्राहक संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी भीमाला शिष्यवृत्ती दिली. त्यामुळे भिमाने एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रा. म्युलर हे भीमाला कपडे व पुस्तके देत असत.१९१२ साली इंग्रजी व पर्शियन हे प्रमुख विषय घेऊन भीमराव बी.ए. झाले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांना त्यांनी मी दहा वर्षे बडोदे संस्थानात नोकरी करेन, असे आश्वासन दिले होते; म्हणून ते बडोद्यास गेले.

अमेरिकेला प्रयाण.

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड हे रत्नपारखी होते. त्यामुळे भीमरावांची गुणवत्ता त्यांच्या लक्षात आली. याला जर परदेशात पाठवले, तर हा निश्चितपणे नावलौकिक संपादन करेल आणि परत आल्यानंतर आपल्या संस्थानाच्या विकासाला हातभार लावील, असे त्यांना वाटले आणि पुढील शिक्षणासाठी भीमरावांना अमेरिकेला पाठवायचे ठरले.

४ जून१९१३ रोजी त्यांनी अमेरिकेला प्रयाण केले. जुलै महिन्यात तेथील ‘कोलंबिया ‘ विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे त्यांनी समाजशास्त्र, इतिहास, राजकारण, मानववंशशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास सुरू केला.

अर्धपोटी राहून त्यांनी शिष्यवृत्तीच्या पैशातून जुने ग्रंथ विकत घेतले. बचत करून घरी प्रपंचासाठी पत्नीलाही थोडेफार पैसे पाठविले. ते रोज 18 तास अभ्यास करत असत. ‘ एन्शन्ट इंडियन कॉमर्स ‘ ( प्राचीन भारताचा व्यापार ) या विषयावर प्रबंध लिहून भीमरावांनी १९१५ मध्ये न्यूयॉर्क ला एम.ए. ची पदवी संपादन केली.

अर्थशास्त्र आणि राजनीति हे त्यांचे आवडते अभ्यासविषय होते. त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांच्या भारतातील राज्यकारभाराचा अभ्यास केला आणि ‘ नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया- ए हिस्टॉरिक अँड ॲनॅलेटिकल स्टडी ‘ ( भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक आणि पृथकरणात्मक परिशिलन) हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर करून
‘ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळविली.

आंबेडकर अमेरिकेतील अभ्यास संपवून इंग्लंडला गेले. लंडनला राहून कायदा आणि अर्थशास्त्र यांच्या अत्युच्च पदव्या संपादन करूनच भारतामध्ये परत यायचे असा डॉक्टर आंबेडकरांचा मनोदय होता.१९१६ मध्ये लंडनला पोहोचताच त्यांनी ‘ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स ‘ या महाविद्यालयात D.Sc. साठी अभ्यास सुरू केला आणि
ग्रेज इन संस्थेत बॅरिस्टरच्या अभ्यासाला प्रारंभ केला. परंतु काही कारणाने त्यांना हा अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परतावे लागले.

पुन्हा लंडनला.

शाहू महाराजांचे सहाय्य घेऊन, आपला अर्थशास्त्राचा आणि बॅरिस्टरीचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी जुलै १९२० मध्ये आंबेडकर लंडनला गेले. तिथे त्यांनी अहोरात्र अभ्यास केला. ते पावाचा एखादा तुकडा आणि कपभर चहा यावर दिवस काढत असत .

१९२२ मध्ये त्यांनी The Problem of the Rupees (चलनाचा प्रश्न ) हा प्रबंध विद्यापीठाला सादर केला. त्याचवेळी ते बॅरिस्टरही झाले.१९२३ मध्ये त्यांनी ‘ डॉक्टर ऑफ सायन्स ‘ ही पदवी मिळविली. डिसेंबर १९२३ मध्ये त्यांचा तो प्रबंध ग्रंथरूपाने इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला. आता त्यांचे बुद्धी सामर्थ्य वाढले होते.

महाडचे चवदार तळे आंदोलन

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

मुंबई विधिमंडळात ठराव झाल्याप्रमाणे महाड नगरपालिकेने आपल्या अधिकाराखाली असणारे चवदार तळ अस्पृश्यांना खुले केले. परंतु स्पृश्य हिंदूंच्या भीतीमुळे तेथील अस्पृश्यांना तळ्यातील पाणी पिण्याचा आपला हक्क बजावण्याचे धाडस होईना. बाबासाहेबांना ही गोष्ट समजताच त्यांनी अस्पृश्य मंडळींना त्या महाडच्या तळ्यावर नेले आणि त्या पाण्याचा आस्वाद घेऊन परत आणले.

ही कृती काही तथाकथित हिंदूंना मानवली नाही. त्यांनी बाजारच्या दिवशी बऱ्याच अस्पृश्यांना तेथेच मारहाण केली.

त्यांनी लहान मुले व स्त्रियांनाही सोडले नाही. बाबासाहेबांनी घटनास्थळी येऊन पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना दवाखान्यात नेले. हे सर्व घडत असताना बाबासाहेबांनी आपल्या बांधवांना शांत राहण्याचा सल्ला दिला.

४ ऑगस्ट १९२७ रोजी महाड नगरपालिकेने ठराव आणून चवदार तळे खुले झाल्याचा आपला पूर्वीचा ठराव मागे घेतला. त्यामुळे आंबेडकरांनी पुन्हा सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्यांनी स्पृश्य हिंदूंचे आव्हान स्वीकारले. त्यांनी ताबडतोब सभा भरविली आणि सत्याग्रहाची योजना आणण्यासाठी एक समिती नेमली.

या सभेत २५ व २६ डिसेंबर हे दोन दिवस निश्चित करण्यात आले. चवदार तळ्याचा प्रश्न आता न्यायालयात गेला होता. दिवसेंदिवस वातावरण तप्त होत होते. बाबासाहेब सभा व सत्याग्रहाच्या योजना आखीत होते. जिल्हा अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना ‘शांत रहा, न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय घ्या.’ असा सल्ला दिला होता.

त्याला जेधे आणि इतर मंडळींनी दुजोरा दिला; परंतु अस्पृश्य मंडळी ऐकायला तयार होईनात. शेवटी बाबासाहेबांनी सभेमध्ये ठराव मांडून जिल्हाधिकारी साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे सत्याग्रह स्थगित ठेवला.

मनुस्मृति दहन.

त्या रात्री डॉ. आंबेडकरांनी एक क्रांतिकारक घटना घडवून आणली. रात्री ९ वा. परिषदेच्या जागेसमोर एका खड्ड्यात एका अस्पृश्य वैराग्याच्या हस्ते ‘ मनुस्मृति ‘ ग्रंथाची होळी करण्यात आली.

एका अर्थाने जुन्या स्मृती ग्रंथाचे दहन करून डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंच्या सामाजिक पुनर्रचनेसाठी नव्या स्मृतीची मागणी केली. असे म्हणता येईल. या घटनेने सनातन्यांपासून अगदी शंकराचार्यापर्यंत सर्वांना धक्का बसला.

सत्याग्रह तहकुबीचे भाषण ऐकताच काही अस्पृश्य चांगलेच नाराज झाले. साडेदहाला सर्व प्रतिनिधींची प्रचंड मिरवणूक निघाली. चवदार तळ्याला मिरवणुकीने वाळसा घातला. स्पृश्य हिंदू दारे बंद करून आपल्या घरात बसले.

दीड तासानंतर मिरवणूक परतून परिषदेच्या मंडपात विसर्जन पावली. दहा वाजता परिषदेचे सुप वाजले. अस्पृश्य स्त्री-पुरुषांची अतोनात गर्दी लोटली.

बाबासाहेबांनी स्त्रियांना उपदेश करावा म्हणून कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली. त्यांच्यापुढे भाषण करताना बाबासाहेब म्हणाले, ‘ तुम्ही स्वतःला अस्पृश्य मानू नका. घरी स्वच्छता ठेवा. तुमच्या पोटी जन्म घेणे हे पाप ठरावे व स्पृश्य स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे हे पुण्य का ठरावे याचा तुम्ही विचार करा. तुम्ही प्रतिज्ञा करा की अशा कलंकीत स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही ‘. तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरीती सोडून दिल्या पाहिजेत.

अशा रीतीने महाडला एक प्रकारे धर्मसंग्रामाने जुन्या युगाचा अंत झाला. महाडच्या सत्याग्रहाणे अस्पृश्य जनतेवर फार खोलवर परिणाम घडवला.

या सत्याग्रहाचा धर्ममार्तंडांना प्रचंड हादरा बसला. शिवाय अस्पृश्य वर्गाच्या ठीयी असलेली जागृती व स्वावलंबन वृत्ती अधिकच तेजस्वी व्हायला मदत झाली.

काळाराम मंदिर लढा.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

१९३० साली बाबासाहेबांना नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. माणसांसारखी माणसे केवळ सामाजिक रूढींनी त्यांना अस्पृश्य ठरवले म्हणून देवाचे दार बंद असावे, ही गोष्ट बाबासाहेबांच्या बुद्धीला अजिबात पटेना.

त्यांनी सत्याग्रहात जे जे येतील त्यांना घेऊन जवळजवळ पंधरा हजार स्त्री-पुरुषांचा मोर्चा काळाराम मंदिराकडे नेला . पण सर्व हिंदूंनी प्रवेश द्यायचा तर राहोच उलट सत्याग्रहींना पांगविण्यासाठी दगडफेक करून कित्येक अस्पृश्यांना जखमी केले. कित्येक दिवस दलितांवर गावामध्ये बहिष्कार टाकला. दलितांना पानवठा बंद झाला. दुकानातून वस्तू मिळेनाशा झाल्या. हा लढा जवळपास १९३५ पर्यंत चालला.

डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

१५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटिश साम्राज्य शहांच्या जोखडातून भारत मुक्त झाला. सरदार पटेलांच्या सूचनेनुसार व
म. गांधींच्या सल्ल्यानुसार काँग्रेस नेतृत्वाने घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉ. आंबेडकरांना देण्याचे एक ऐतिहासिक औचित्य दाखविले. डॉ. आंबेडकरांच्या खेरीज त्यावेळी दुसरी जाणती व अधिकारी व्यक्ती असूच शकत नव्हती.

घटनातज्ज्ञ, सामाजिक शास्त्राचे व्यासंगी अभ्यासक तर होतेच, पण त्याहीपेक्षाही अस्पृश्य समाजासह सर्व बहुसंख्य दलितांच्या दुःखांची, समस्यांची खोल जाणीव व अनुभूती असणारे असे त्यांचे नेते व प्रवक्ते होते. अमुलाग्र समाज परिवर्तनाच्या या जाणिवा राज्यघटनेत प्रतिबिंबित व प्रतिध्वनीत करण्याचे आवश्यक कार्य बाबासाहेबांनी केले.

घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अन्य नेत्यांच्या व तज्ञांच्या सहाय्याने कालबाह्य झालेल्या मनुस्मृतीला आंबेडकर स्मृतीचा पर्याय दिला.पं. नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यने नियतीशी नवा करार केला. एक नवे पर्व व नवे युग निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे प्रस्थान डॉ. आंबेडकरांच्या या संहितेने केले.

घटना परिषदेच्या चर्चा व दुरुस्त्या यांच्या अनुषंगाने मसुदा समितीने सुधारणा करून ३९५ कलमे व आठ परिशिष्टे असलेल्या प्रस्तावास राज्यघटना म्हणून अंतिम स्वरूप दिले. घटना मसुदा समितीच्या कामकाजाचे बहुतांशी सर्वकाम डॉ. आंबेडकरांनाच करावे लागले. करण या समितीतील अन्य सभासद या ना त्या कारणाने कामकाजात सातत्याने उपलब्ध होऊ शकले नाहीत.

डॉ.आंबेडकरांना उद्याच्या राष्ट्र- उभारणीच्या राज्यघटना निर्मितीचे पायाभूत आव्हान बहुतांशी एकट्यानेच स्वीकारणे भाग पडले व आपली प्रज्ञा, प्रतिभा, प्रकृती आणि लोकनिष्ठा पणाला लावून त्यांनी अतिशय परिश्रमाने राज्यघटनेचा मसुदा पूर्ण करण्याचे काम केले. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद , पं. नेहरू, श्री फ्रॅंक अँथनी, श्री.टी.टी. कृष्णम्माचारी इत्यादींनी डॉ. आंबेडकरांच्या या घटना निर्मितीच्या संदर्भातील कार्याचा मुक्त मनाने गौरव करून भारतीय जनता त्यांची सदैव ऋणी राहील अशा स्वरूपाच्या कृतज्ञतेच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉ. आंबेडकर यांचे जीवन चरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एखादी बुद्धिमान व्यक्ती धुळीतून धुरंदर कशी होऊ शकते, हे त्यांच्या चरित्राच्या आधारे लक्षात येते. पददलित समाजाला माणुसकीचे हक्क मिळावेत, त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी, भारतातील अस्पृश्यता नष्ट व्हावी आणि भारत बलशाली व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

१९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी पार पाडली.पं. जवाहरलाल नेहरू यांचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर खूप लोभ होता.

त्यांनी विधिमंडळात बाबासाहेबांना महत्त्वाचे जबाबदारी दिली. ती बाबासाहेबांनी आपल्या कामाने सार्थ ठरवली. पैसा, मंत्रीपद, बहुमान यापेक्षा समाजाचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा ध्यास विषय होता. यासाठी बाबासाहेबांना अनेक लढे द्यावे लागले. महाडचा चवदार तळ्याचा मुक्तिसंग्राम, नाशिकचा काळाराम सत्याग्रह हे त्यातील महत्त्वाचे टप्पे होत. कुठेही कटुता येऊ न देता, कुणाच्याही भावना न दुखविता त्यांनी हे कार्य केले.

डॉ. आंबेडकर जयंती महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी मान्यवरांची व्याख्याने, परिसंवाद, भिमशाहिरांची गाणी असे कार्यक्रम होतात.

Other Articles- Yashwantrao Chavan Information in Marathi | यशवंतराव चव्हाण

Leave a Comment