Thor Vyakti Che Suvichar in Marathi | थोर व्यक्तींचे सुविचार

Thor Vyakti Che Suvichar in Marathi | थोर व्यक्तींचे सुविचार

thor vyakti che suvichar in marathi

सुविचार अर्थासह

स्वामी विवेकानंद सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

१) तुमचे जीवन खोल व नभाप्रमाणे असू द्या: जीवनामध्ये विचार दूरपर्यंतची दृष्टी ठेवून असलेले आचार नभाप्रमाणे विशाल असावेत.
२) तुमचे विचार, वाणी आणि कृती तिन्ही गोष्टीत प्रामाणिक रहा: विचार, बोलणे आणि काम या तिन्ही बाबींमध्ये प्रामाणिकपणा ठेवा.
३) पैसा व नावलौकिक फलदायी होत नाही: आपण मिळवलेला पैसा व काम करून मिळवलेला नावलौकिक या बाबी यश मिळवण्यासाठी उपयोगी नाहीत.
४) कीर्ती व पांडित्य फलदायी होत नाही: आपण मिळवलेली कीर्ती व पांडित्य या बाबी आवश्यकते फळ मिळवण्यासाठी उपयोगी होत नाहीत.
५) नेहमी प्रथम सेवक होण्यास शिका, आणि मगच तुम्ही मालक बनण्यास योग्य व्हाल : चांगलं सेवक म्हणून काम करण्यास शिका तरच तुम्ही उत्तम मालक व्हाल.

Table of Contents

संत कबीर यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

६) ज्याचा वाणीवर ताबा नाही व खरे पणाने वागत नाही अशा व्यक्तीला थारा देऊ नका: बडबड करणारी व असत्याने वागणारी व्यक्ती धोकादायक असते. त्यामुळे त्यास थारा देऊ नये.
७) भक्ती मुळे स्वर्गातील सुखाचा आनंद मिळवता येतो : परमेश्वराचे मनापासून भक्ती केली असता स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो.

संत तुकडोजी महाराज यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

८) संतापाशी एकची धर्म! सकल जीवांचे कल्याणकारी! मानवता हाच मुख्य धर्म : सर्वकाळ सर्व लोकांचे कल्याण करणे हाच संतांचा एकच धर्म आहे, मानवता हाच धर्म आहे.

वि.स. खांडेकर यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

९) माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते:
माणूस जन्मला परंतु चांगले वागून माणुसकी निर्माण करावी लागते.
१०) कीर्तीच्या मार्गावर फुले पसरलेली नसतात, काटे असतात: मोठी कीर्ती सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी अनेक प्रकारची दुःखे व यातना सहन करावी लागते.

गौतम बुद्ध यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

११) लोभ, द्वेष आणि मत्सर ही मानसिक पापे होत: माणसाच्या वागण्यामुळे लोभ, द्वेष करणे, मत्सर करणे हे पापे निर्माण झाली आहेत.
१२) सुख हे अत्तराच्या सुगंधासारखे आहे, की जे दुसऱ्यावर संपले असताना स्वतःवरही शिंपडले जाते:
दुसऱ्याच्या सुखाचा सतत विचार केला असता आपोआपच स्वतःलाही सुख मिळते. त्यामुळे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करणे म्हणजे अत्तराचा सुगंध होय.

संत नामदेव महाराज यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

१३) आपल्या मनाची दारे खिडक्या जो सदैव उघड्या ठेवतो, त्याच्याच हृदयात ज्ञानाचा व प्रेमाचा प्रकाश खेळतो:
जीवनामध्ये मन मोकळेपणाने सुखदुःखांचे अनुभव घेण्यासाठी आपल्या मनाची खिडक्या व दरवाजे नेहमी उघडे ठेवतो. त्याच्या जीवनात ज्ञानाचा व प्रेमाचा प्रकाश येतो.

महात्मा फुले यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

१४) ग्रंथ वाचताना मनी शोध करा. देऊ नका थारा वैरभावा:
पुस्तक वाचत असताना मनामध्ये विचार करा त्यावेळी वैरभावाला मनात थारा देऊ नका.
१५) विद्ये विना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ अविद्येने केले:
विद्या न शिकल्यामुळे आपली बुद्धी काम देईनाशी होते त्यामुळे कामे होत नाहीत. कामे होत नसल्यामुळे पैसा मिळत नाही. पैशाच्या दारिद्र्यामुळे गरीब लोक खचून जातात. या सर्व वाईट गोष्टी विद्या न शिकल्यामुळे घडतात. त्यामुळे आपण विद्या शिकणे आवश्यक आहे.

लो. टिळक यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

१६) समोर अंधार असला तरी पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा : संकटाच्या वेळी आपणास अंधार जाणवला तरी निराश होण्याचे कारण नाही, संकट नाहीसे झाल्यावर पुन्हा जीवनात आनंद येणार आहे हे लक्षात ठेवा.
१७) जुलूम सहन करणे ही पशुवृत्ती आहे: जुलूम होत असताना त्यास विरोध न करता सहन करत राहणे म्हणजे पशु प्रमाणे वागणे होय.
१८) कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास आपण कधीही माघार घेता कामा नये: काम करताना यश मिळाले नाही तरी प्रयत्न करण्याचे थांबवू नये.

संत गाडगेबाबा यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

१९) देव आहे अंतरात, फुका शोधीशी राउळात: देव हा आपल्या मनात असतो त्याला देवळात शोधणे व्यर्थ आहे.
२०) आपण जर देशासाठी झटल तर सारे जग आपल्या पायी झुकेल: जीवनात स्वार्थ न ठेवता देशासाठी काम केले असता सर्वजण त्या व्यक्तीला वंदनीय मानतात.

रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

२१) अहंकारस जवळ केल्यास फसगत होते: अहंकाराने वागण्यास सुरुवात केल्यास त्यामुळे आपले नुकसान होऊन फसगत होते.
२२) सुखदुःखाची सर्व बंधने खोटी आहेत: जीवनात येणारे सुख व दुःख यांना फार महत्त्व देऊ नये. ती खोटी असतात.
२३) धीर धरलास म्हणून हा मंगलमूहूर्त पाहू शकलास: धीर धरल्यामुळे आपण चांगल्या बाबी पाहू शकतो, त्यासाठी धीर धरणे आवश्यक आहे.

विनोबा भावे यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

२४) मिळवण्याच्या अनंत पेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो:
यश मिळवण्यात आनंद आहे त्यापेक्षा जास्त आनंद त्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा आहे.
२५) ज्यामध्ये रस किंवा उत्साह आहे ते पूर्ण जीवन: जीवनामध्ये रस किंवा उत्साह असलेले जीवन हे पूर्ण जीवन आहे.
२६) लबाडीच्या व्यवहाराने दोन दिवस भरभराट होईल; परंतु ही फसवणूक आहे: लबाडीने वागण्याने तात्पुरता फायदा होईल परंतु ही फसवणूक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

२७) माणसापेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो: माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकाच्या सहवासाने अधिक ज्ञान मिळते, त्यामुळे माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
२८) एखादा मनुष्य कितीही थोर असला तरी आपले स्वातंत्र्य त्यास अर्पण करू नये: आपले स्वातंत्र्य इतके मोठे आहे की कोणत्याही थोर व्यक्तीला आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये.
२९) शिक्षणाशिवाय माणसाला स्वतःची ओळख होऊ शकत नाही: शिक्षणामुळे माणसाला अनेक बाबींचे ज्ञान होते. त्यामुळे त्याला स्वतःचीही खरी ओळख होते.

Other Articles:

100+ [Marathi Suvichar] शालेय सुविचार | Marathi Suvichar for School Students

60+ Marathi Suvichar: उत्तम मराठी सुविचार

Get Your Copy NowSamarthya Vicharanche (Suwichar) 

संत तुकाराम महाराज यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

३०) जया अंगी मोठेपण , तया यातना कठीण: ज्या व्यक्ती मोठ्या असतात त्यांना होणारे कष्ट यातनाही अनेक व कठीण असतात.
३१) चित्त समाधाने, तरी विष वाटे सोने, मनाच्या तळमळे, चंदनेही अंग पोळे: मनापासून समाधानी असल्यावर सोन्याबद्दल सुद्धा लोभ न वाटता ते विष वाटू लागते याउलट असमाधानी असणाऱ्या व्यक्तीला चंदनाचा स्पर्श सुद्धा पोळणारा वाटतो. त्यासाठी जीवनात समाधानी राहण्यास शिकले पाहिजे.

म. गांधी यांचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

३२) प्रेमाने जे मिळते ते कायम टिकून राहते: आपण प्रेमाने जे मिळवतो ते कायमचे टिकून राहते.
३३) स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या खालोखाल महत्वाची आहे: ईश्वराची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या खालोखाल स्वच्छता महत्त्वाची आहे.
३४) देह आपला नाही. ती आपल्याकडे असणारी ठेव आहे: आपल्याला देह मिळाला आहे तो देह आपणाकडे ईश्वराची असणारी ठेव आहे. त्यावर आपला हक्क नाही.
३५) प्रार्थनेचा अर्थ सदाचारी असला पाहिजे: आपण जी प्रार्थना करतो त्याचा खरा अर्थ आपण सदाचारी वागण्यास शिकले पाहिजे.
३६) अपंगाच्या रूपाने भगवान नेहमी आपल्या दर्शनाला येतो:
साक्षात परमेश्वर आपणास भेटण्यास अपंगाच्या रूपाने येतो. त्यासाठी अपंगांना मदत केली पाहिजे.
३७) गरिबांना पोटभर खायला मिळत नसेल तर स्वराज्याला काही अर्थ नाही: स्वराज्यामध्ये गरीब माणसाला पोटभर खाण्यास मिळत नसेल त्या स्वराज्याला काहीही किंमत नाही

३८) खवळलेल्या सागरातून श्रद्धाच माणसाला सुरक्षित बचावून नेऊ शकते: खवळलेल्या सागराप्रमाणे असणाऱ्या संकटातून श्रद्धेमुळेच माणूस बचावून जाऊ शकतो.
३९) आपले काम करण्याकरता धुळीच्या कणाइतके आपण नम्र झाले पाहिजे: आपले काम होण्यासाठी आपण धुळीच्या कणापेक्षाही लहान बनून नम्र झाले पाहिजे.
४०) अहिंसा हा वीरांचा धर्म आहे; भित्र्या व दुर्बलांचा नाही:
अहिंसा ही भित्र्या आणि दुर्बलांच्या वागण्यात असली पाहिजे असे नाही, तर ती वीरांच्या वागण्यात असली पाहिजे.
४१) दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकणार नाही: हुतात्मा झालेले थोर लोक खंबीर मनाचे होते ,त्यामुळे दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकणार नाही.

सानेगुरुजींचे सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi)

४२) दुसऱ्यासाठी रडणे कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते: दुसऱ्यासाठी रडणे कठीण असते, कारण रडू हे अंत:करणापासून येत असते. त्यासाठी माया करणारे अंत:करण हवे.
४३) प्रामाणिकपणाचा कोणताही उद्योग तुच्छ नाही: कितीही हलका समजला जाणारा उद्योग प्रामाणिकपणे केला असता तो कमीपणाचा मानला जात नाही.
४४) आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप: स्वतःच आपल्या जीवनाचा नाश करणे हे सर्वात वाईट काम व पाप आहे.
४५) वादळ येते ते शांत होण्यासाठी: जीवनात वादळे येतात त्याप्रमाणे ती कायम न टिकता शांतही होतात.
४६) स्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला संधी: स्वातंत्र्याचा अर्थ समाजातील सर्वांच्या विकासास संधी हा होय.
४७) मनभर चर्चेपेक्षा कणभर सेवा मोलाचे असते: भरपूर चर्चा करण्याऐवजी थोडा वेळ जरी सेवा केली तर ते अतिशय महत्त्वाचे ठरते.
४८) थोर मन ही सर्वात मोठी दौलत आहे: थोर मनाची माणसे ही समाजामध्ये खऱ्या अर्थाने दौलत असतात.
४९) जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान: आपण जीवनात जगताना जे अनुभव घेतो ते अनुभव म्हणजे ज्ञान होय.
५०) करीम मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे : जी व्यक्ती मुलांचे मनोरंजन करेल त्या व्यक्तीचे नाते प्रत्यक्ष परमेश्वराशी जुळते.
५१) मनुष्य जवळची नम्रता संपली की, त्याच्या जवळची माणुसकी संपली असे समजावे. :
वागण्यामध्ये नम्रतेला अतिशय महत्त्व आहे. नम्रतेने वागण्याचे सोडल्यास माणसांमध्ये माणुसकी राहणार नाही.

दैनंदिन उपयोगी पडणारे सुविचार

१) संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हावे. : संपत्तीने मोठे झाले तरी मनाने मोठे होणे हे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
२) विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. : सर्व धनापेक्षा विद्या हे सर्वश्रेष्ठ असे धन आहे.
३) उद्योग हीच भाग्याची जननी. :
उद्योग करणे हेच चांगले भाग्य मिळवण्यासाठी उपयोगी आहे.
४) अभ्यास व चिंतनाने मनुष्य मोठा होतो. : अभ्यास व त्यावर चिंतन केल्यामुळे मनुष्य मोठा होतो.
५) मैत्री वाईट बोलल्याने संपते. :
कितीही गाढ मैत्री असली तरी ती वाईट बोलल्याने संपते.
६) विद्यार्थ्याचे मनोरथ पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु होय.
: गुरु विद्यार्थ्याचे मनोगत पूर्ण करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी गुरु सर्वश्रेष्ठ आहे.
७) माणसाने शिक्षणाला रामराम केला म्हणजे तो संपला.
: माणसाने शिक्षण घेण्याचे सोडले असता त्याची प्रगती होत नाही. त्याची किंमत शून्य होते.
८) पुस्तके ही जीवनरूपी समुद्रात दीपगृहाचे काम करतात.
: समुद्रामध्ये दीपगृहामुळे जहाजांना मार्गदर्शन होते तसेच माणसाला जीवनात पुस्तकांमुळे मार्गदर्शन होते.
९) बुद्धी हे शक्तीपेक्षा श्रेष्ठच आहे.
: शक्तीमुळे आपण मोठमोठी कामे करू शकतो परंतु बुद्धीही शक्ती पेक्षा श्रेष्ठ आहे.
१०) आत्मविश्वास हे यशाचे रहस्य आहे. : आत्मविश्वासाने काम केल्यास यश निश्चित मिळते.
११) हास्य ही जीवनाची संजीवनी आहे. : हास्यामुळे जीवनात काम करण्यास उत्साह प्राप्त होतो म्हणून ती जीवनाची संजीवनी आहे.
१२) एकाग्रता हे सामर्थ्याचे रहस्य आहे. : सामर्थ्य मिळवणे हे एकाग्रतेने काम करण्यामुळेच शक्य आहे.
१३) श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. : श्रीमंत होण्यापेक्षा अनेक गुण अंगी बाणवून गुणवंत व्हा हेच मोठेपणाचे खरे लक्षण आहे.
१४) शिस्तीचे महत्व जीवनाच्या सर्व विभागात आहे. : शिस्तीने वागल्यामुळे जीवनाच्या सर्व विभागात प्रगती होते.
१५) काळजी घ्यावी पण काळजी करू नये. : एखादे काम करताना ते काळजीपूर्वक करा परंतु ते काम कसे होईल ही काळजी करू नका.
१६) नीती हाच परमार्थाचा पाया आहे. : चांगले काम करणे हे दुसऱ्याला मदत करण्याची सुरुवात आहे.
१७) जेवढे बोलता त्याच्या दुप्पट काम करा. : आपण जेवढे बोलतो त्याच्या दुप्पट काम केले पाहिजे त्यामुळे यश निश्चित मिळते.
१८) सहकार्य मिळवावे लागते ते अधिकाराने मिळत नाही. : आपल्या चांगल्या वागण्याने सहकार्य मिळवावे लागते अधिकाराने वागून सहकार्य मिळत नाही.
१९) प्रत्येक दिवस हा जीवनात शेवटचा दिवस समजून जगा.
: जगात शिकण्यासारखे भरपूर आहे त्यासाठी प्रत्येक दिवशी नवीन नवीन कामांनी सुरुवात करा.
२०) मला हे कळत नाही हे सांगायला लाजू नये. : एखाद्या कामामधील कळत नसल्यास स्पष्टपणे सांगण्यामध्ये कधीही लाजू नये.

Leave a Comment