Best 500+ Marathi Mhani Aani Arth 

म्हणी म्हणजे काय ?

म्हणी हा आज पर्यंत होऊन गेलेल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोश असे म्हटले जाते.
म्हण ही कहानी, उखाणा याप्रमाणे मूलता: मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी पण छोटे खाणी गद्य वाङ्मय असते.

म्हणीत अर्थाच्या मानाने शब्द थोडे असतात. म्हणीतील अर्थसंकोच वारंवार वापरल्याने अशिक्षितालाही कळतो , व ती म्हण सर्वश्रुत होते. मराठी भाषेतील म्हणींना स्त्रीधन असेही म्हटले जाते. म्हणींचा उगम ग्रामीण भागातील आणि त्यांना जन्म देणाऱ्या स्त्रियाच आहेत.

सामान्यतः अनुभव सांगणारे किंवा सल्ला देणारे, बऱ्याच लोकांना माहीत असलेले एक लहान वाक्य याला आपण म्हण म्हणतो.

संक्षेपाबरोबरच यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती उपमा इत्यादी अलंकारामुळे ती चटकदार बनते. त्या त्या समाजाच्या सांस्कृती मधले विशिष्ट विषयाबद्दलचे शहाणपण तिच्यात साठवलेले असते. काही वेळा म्हणी स्थानिक अनुभवाशी किंवा उपलब्ध वाङ्मयाशी निगडित असतात.

म्हणींच्या प्रसाराला स्थळाप्रमाणे काळाच्या ही मर्यादा पडतात. मराठी भाषेत संस्कृत, हिंदी, गुजराती अशा निरनिराळ्या भाषांतून म्हणी आल्या आहेत.

नवीन म्हणी कळण्यास या ब्लॉगचा आपणास उपयोग होईल. तसेच जुन्या म्हणी आपण वाचल्यास त्या म्हणींची उजळणी होईल. त्या वाचनातून आपणास आनंद मिळेल. याचा फायदा मराठीचे जाणकार वाचक यांना, तसेच शाळेपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस निश्चित होईल.

Marathi Mhani Aani Arth List म्हणी व त्यांचे अर्थ.

50 Marathi Mhani Aani Arth List म्हणी व त्यांचे अर्थ.

१) अग अग म्हशी मला कुठे नेशी.
अर्थ: स्वतःला हवी असणारी गोष्ट आपण दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासविणे.


२) आळीमिळी गुपचिळी.
अर्थ: आपले गुपित उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे.


३) अर्धे दान महापुण्य.
अर्थ: गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते.


४) आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच म्हटले असते.
अर्थ: न होणाऱ्या गोष्टीबद्दल चिकित्सा करू नये.


५) आभाळ फाटल्यावर ठिगळ कुठे कुठे लावणार?
अर्थ: एकदम फार मोठी आपत्ती आली असता, तिचे निवारण करता येणे शक्य नसते.


६) आगीतून उठून फुफुट्यात जाणे.
अर्थ: लहान संकटातून मोठ्या संकटात जाणे.


७) आपली गाठ आपणांस दिसत नाही.
अर्थ: स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत.


८) आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार.
अर्थ: जे मुळातच नाही ,त्याची थोडी सुद्धा अपेक्षा करणे व्यर्थ आहे.


९) आवळा देऊन कोवळा काढणे.
अर्थ: स्वार्थासाठी एखाद्याला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.


१०) आयत्या बिळात नागोबा.
अर्थ: दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचा स्वतः करिता आयता फायदा करून घेण्याची वृत्ती.


११) ढोंग धतोरा हाती कटोरा.
अर्थ: ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास शेवटी नुकसान होते.


१२) तळे राखी तो पाणी चाखी.
अर्थ: कोणाकडे एखादे काम सोपविले तर त्यातून तो स्वतःला थोडा तरी लाभ घेणारच.


१३) तेलही गेलं, तूपही गेलं, हाती
धुपाटणे आले.
अर्थ: मूर्खपणामुळे फायद्याच्या दोन्ही गोष्टी जाऊन काहीही प्राप्त होत नाही.


१४) ताकापुरते रामायण सांगणे.
अर्थ: काम साधण्यासाठी दुसऱ्याची खुशामत करणे.


१५) तेरड्याचा रंग तीन दिवस.
अर्थ: कोणत्याही गोष्टीचा टवटवीतपणा किंवा नवे पण अगदी थोडा वेळ राहते.


१६) तहान लागल्यावर विहीर खोदणे.
अर्थ: एखाद्या गोष्टीची गरज भासल्यावर ती गोष्ट मिळवण्यासाठी उपाय शोधणे.


१७) तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणे.
अर्थ: सर्वसाधनसामुग्रीची अनुकूलता असताना आपले इष्ट कार्य साधून घ्यावे.


१८) ताटाखालचं मांजर.
अर्थ: दुसऱ्याच्या पूर्ण आधीन असणे.


१९) तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना.
अर्थ: एकमेकांशी झगडणे/भांडणे पण एकमेकांशिवाय न करमणे.


२०) तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो.
अर्थ: एकाचे कार्य दुसऱ्याकरता हानीकारक होणे.


२१) पाची बोटे सारखी नसतात.
अर्थ: सर्वच माणसे सारख्या स्वभावाची नसतात.


२२) पर दुःख शितल.
अर्थ: दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना कोणालाच येत नाही.


२३) पालथ्या घड्यावर पाणी.
अर्थ: केलेला उपदेश निष्फळ ठरणे.


२४) पदरी पडले नि पवित्र झाले.
अर्थ: कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नांव ठेवू नये.


२५) पी हळद नि हो गोरी.
अर्थ: कोणत्याही कामाचे फळ ताबडतोब मिळावे अशी इच्छा.

२६) पायातील वाहण पायातच बरी.
अर्थ: कोणालाही त्याच्या योग्यतेप्रमाणे वागवावे.


२७) पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याचे?
अर्थ: आपले काम सोडून नको ती चौकशी करणे.


२८) पडक्या भिंतीला लिपू किती? म्हाताऱ्या नवऱ्याला जपू किती.
अर्थ.: एखादी वस्तू किंवा व्यक्ती जीर्ण झाल्यावर त्याची जपणूक करणे कठीण जाते.


२९)पाप्याला पंढरपूर, आळशाला गंगा दूर.
अर्थ: ज्याची श्रद्धा नसते त्याच्यापासून परमेश्वर दूर जातो.


३०) पुढचे पाठ मागचे सपाट.
अर्थ: पुढचे वाचत जाणे पण मागचे वाचलेले विसरणे.


३१) मोठ्या भांड्याचा मोठा आवाज.
अर्थ: मोठ्या माणसांचा मोठा गाजावाजा.


३२) मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते .
अर्थ: दुसऱ्याचे मूर्खपणाने अनुकरण करणे.


३३) मिळेल वक्ता पण दुर्मिळ श्रोता.
अर्थ: आजकाल वक्ते मिळतात पण श्रोतेच मिळत नाहीत‌.


३४) माळी तशी बाग आणि कोळी तसा धागा.
अर्थ: कुशल माणसाप्रमाणेच कुशल काम.


३५) मारून मुटकून मुसलमान.
अर्थ: इच्छा नसताना जबरदस्तीने काम करून घेणे.


३६) मालकाच्या दारी कुत्रा शेर.
अर्थ: मालकाच्या घरी नोकराची चलती.


३७) मायेवाचून रड नाही,
आगीवाचून कढ नाही.
अर्थ: आईच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही.


३८) या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे.
अर्थ: बनवाबनवी करणे.


३९) खेळ या वखत अन् बसला ठोकत.
अर्थ: भलत्या वेळी भलते काम करणे.


४०) येग छाया पड माझ्या पाया.
अर्थ: जाणूनबुजून एखादे संकट ओढवून घेणे.


४१) काखेत कळसा गावाला वळसा.
अर्थ: जवळच असलेली वस्तू सर्वत्र शोधणे.


४२) उचलली जीभ लावली टाळ्याला.
अर्थ: अविचाराने बोलणे.


४३) आपला हात जगन्नाथ.
अर्थ: मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या कर्तुत्वावर अवलंबून असतो.


४४) आधी पोटोबा मग विठोबा.
अर्थ: प्रथम स्वार्थ नंतर परमार्थ.


४५) असंगाशी संग प्राणाशी गाठ.
अर्थ: भलत्या माणसाशी मैत्री जडली तर प्रसंगी प्राण गमवावे लागतात.


४६) जने ती जाणे वांझ काय जाणे.
अर्थ: ज्याला भोगावे लागते त्यालाच कळते. इतरांना त्याची कल्पना येत नाही.


४७) हाती दाम बिबी करी सलाम.
अर्थ: हातात पैसा असला की कोणीही आपली खुशामत करतो.


४८) क्षमेसारखे तप नाही.
अर्थ: क्षमाशील बनणे ही फार कठीण गोष्ट आहे.


४९) हत्तीला अंकुश नि घोड्याला चाबूक.
अर्थ: काहीतरी शक्ती असल्याशिवाय काम होत नाही.


५०) हातच्या कंकणाला आरसा कशाला?
अर्थ: जी गोष्ट स्पष्ट आहे त्याला पुराव्याची आवश्यकता नसते.

५१) आपल्याच पोळीवर तूप ओढणे.
अर्थ: फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.


५२) आलिया भोगासी असावे सादर.
अर्थ: आपल्या कर्मात जे काही लिहले आहे त्यानुसार भोगावे लागते, त्याबद्दल कुरकुर करू नये.


५३) आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी.
अर्थ: आधी आचरण बिघडते मग वाईट दशा होते.


५४) आयजीच्या जीवावर बायजी उदार.
अर्थ: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.


५५) आपलेच दात नी आपलेच ओठ.
अर्थ: शिक्षा करणारे आपणच आणि ज्याला शिक्षा करायची तोही आपल्यातीलच अशी अडचणीची परिस्थिती निर्माण होणे .


५६) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
अर्थ: अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.


५७) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.
अर्थ: आधीच हौस आणि त्यात अनुकूल परिस्थितीची भर.


५८) आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
अर्थ: दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून अगोदर स्वतःचेच वाईट करून घेणे.


५९) आपल्या कानी सात बाळ्या.
अर्थ: संकटांशी धैर्याने सामना करणे.


६०) आले अंगावर घेतले शिंगावर.
अर्थ: संकटाशी धैर्याने सामना करणे.


६१) आंधळे दळते कुत्रे पीठ खाते.
अर्थ: परिश्रम एकाचे फायदा दुसऱ्याचा.


६२) आयत्या पिठावर रेघोट्या.
अर्थ: दुसऱ्याच्या मिळकतीवर चैन करणे.


६३) थेंबे थेंबे तळे साचे.
अर्थ: थोडे थोडे जमवीत राहिल्याने कालांतराने मोठा संचय होतो.


६४) थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे.
अर्थ: आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने व सलोख्याने वागावे.


६५) थोराचे दुखणे आणि मणभर कुंथने.
अर्थ: मोठ्यांच्या आजाराची चर्चा सर्वत्र होत असते.


६६) थोडे बोलणे बहुत करणे.
अर्थ: बोलावे थोडे पण कृती पुष्कळ करावी.


६७) दिव्याखाली अंधार.
अर्थ: मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच.


६८) दाम करी काम.
अर्थ: पैशाने बरीचशी कामे साध्य होतात.


६९) दृष्टी आड सृष्टी.
अर्थ: आपल्या मागे काय चालले आहे याची चिंता करू नये.


७०) दगडापेक्षा वीट मऊ.
अर्थ: मोठ्या संकटापेक्षा लहान संकटे कमी नुकसान करतात.


७१) दुभत्या गाईच्या लाथा गोड.
अर्थ: ज्याच्यापासून आपल्याला लाभ होतो त्याच्याकडून होणारा त्रासही सहन केला पाहिजे.


७२) देव तारी त्याला कोण मारी?
अर्थ: देवाची कृपा असल्यावर आपले कोणीही वाईट करू शकत नाही.


७३) देखल्या देवाला दंडवत.
अर्थ: वेळ मारून नेणे.


७४) देश तसा वेश.
अर्थ: परिस्थितीनुसार वर्तनात बदल होतो.


७५) दुधाने तोंड पोळले की ताकही फुंकुन प्यावे.
अर्थ: एखाद्या बाबतीत अद्दल घडली तर मनुष्य वेळोवेळी सावधगिरीने वागतो.

७६) दिवस बुडाला मजूर उडाला.
अर्थ: मजूर कधीच अस्था ठेवून काम करत नाही.


७७) दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.

अर्थ: एखादी गोष्ट अनुकूल असते तर दुसरी नसते.


७८) दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी.
अर्थ: दोन उपयुक्त वस्तू जवळ असूनही त्या एकत्र न येणे.


७९) देव भक्तीचा भुकेला.
अर्थ: शुद्ध भावनेचे मोल देवाजवळ अधिक आहे.


८०) दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
अर्थ: अनेक गोष्टींचे कामचलाऊ ज्ञान असून एका गोष्टीत कुशल असणे.


८१) रात्र थोडी सोंगे फार.
अर्थ: वेळ थोडा असणे नि त्यामानाने कामे पुष्कळ असणे.


८२) रोज मरे त्याला कोण रडे.
अर्थ: नेहमीच घडणाऱ्या गोष्टीला महत्त्व नसते.


८३) राजा पाहिला नवरा विसरा.
अर्थ: दुसऱ्याच्या वैभवाला भुलून आपल्या पतीला विसरणारी स्त्री.


८४) राजाची राणी ती पाटलाची मेहुणी.

अर्थ: माणसाला कितीही किंमत प्राप्त झाली तरी मूळची गरिबी विसरू नये.


८५) रत्नपोटी गारगोटी.
अर्थ: सज्जन मनुष्याच्या पोटी
कुलक्षण संतती जन्माला येणे.


८६) सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
अर्थ: ज्याची जेवढी ऐपत त्याची तेवढीच झेप.


८७) सुळावरची पोळी.
अर्थ: अतिशय कठीण गोष्ट.


८८) साखर हातावर कातर मानेवर.
अर्थ: गोड बोलून गळा कापणे.


८९) साखरेला मुंग्या लागणारच.
अर्थ: जेथे पैसा आणि लाभ आहे तेथे माणसे जमणारच.


९०) सोन्याची मेख तमाशा देख.
अर्थ: पैशाने सर्व काही करता येते.


९१) संसाराचा कोड जे जे करील ते ते थोडं.
अर्थ: कितीही केले तरी कमीच पडतं.


९२) साता समुद्रापलीकडे.
अर्थ: अतिशय दूर.


९३) सांग पाटला काय लिहू.
अर्थ: दुसऱ्याच्या मताने वागणे.


९४) सोनाराने कान टोचले म्हणजे दुखत नाहीत.
अर्थ: योग्य व्यक्तीकडून काम करून घेणे चांगले.


९५) सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी.
अर्थ: अशक्य गोष्ट खरी आहे असे सांगणे.


९६) हात फिरे तिथे लक्ष्मी बसे.
अर्थ: सतत उद्योगमग्न माणसाच्या घरी संपत्तीची आवक चालू असते.


९८) हाजीर तो वजीर.
अर्थ: जो वेळेवर हजर असतो त्याला संधीचा फायदा मिळतो.


९९) हात ओला तर मित्र भला.
अर्थ: फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.


१००) हपापाचा माल गपापा.
अर्थ: लोकांचा तळतळाट घेऊन मिळवलेला पैसा त्याच मार्गाने जातो.

Marathi Mhani Aani Arth List म्हणी व त्यांचे अर्थ.

१०१) हात दाखवून अवलक्षण.

अर्थ: स्वतःच संकट ओढवून घेणे.
१०२) हिरा तो हिरा. गार ती गार.
अर्थ: गुणवंताचे गुण लपून राहत नाहीत.
१०३) अठरा विश्वे दारिद्र्य.
अर्थ :अतिशय गरीबीची परिस्थिती असणे.
१०४) अडाण्याची मोळी भलत्यासच गिळी.
अर्थ: अडाणी माणसाने एखादी गोष्ट केली असता तिचा विपरीत परिणाम होतो.
१०५) अल्पबुध्दी बहुगर्वी.
अर्थ: कमी बुद्धीच्या माणसास गर्व अधिक असतो.
१०६) अति राग भिक माग.
अर्थ: अति रागाने एखादे कृत्य केले तर त्याचा दुष्परिणाम होतो.
१०७) अंगावरचे लेणे जन्मभर देणे.
अर्थ: दागिन्यांकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे.
१०८) अति झाले असू आले.
अर्थ: एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते.
१०९) अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अर्थ: आर्थिक विवंचनेत अडकलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो.
११०) अनोळ्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये.
अर्थ: अपरिचित माणसाशी फार सलगी करू नये.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80.png

 

१११) अगं माझे बायले सर्व तुला वाहिले.
अर्थ: आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारा पुरुष.
११२) आंधळी पाण्याला गेली, घागर फोडून घरी आली.
अर्थ: अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा चुथडा होतो.
११३) अंधारात केले पण उजेडात आले.
अर्थ: कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच.
११४) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
अर्थ: दुसऱ्याच्या लहानशा चुका दिसतात परंतु आपल्या मोठ्या चुका दिसत नाहीत.
११५) दहा गेले पाच उरले.
अर्थ: आयुष्याची बरीच वर्षे निघून गेलीत आता फार थोडी वर्षे राहिलीत.
११६) दमडीची कोंबडी रुपयाचा मसाला.
अर्थ: क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च.
११७) दाम तसे काम.
अर्थ: जशी मजुरी तसे काम.
११८) दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
अर्थ: दुसऱ्याची चाकरी किंवा सेवा करून जे अन्न मिळेल ते खाऊन जगणे.
११९) दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
अर्थ: दुष्ट माणसाबरोबर संगती करण्यापेक्षा एकटे राहणे बरे.
१२०) दिवाळी दसरा हातपाय पसरा.
अर्थ: दिवाळी दसरा आला की माणसे चैन करण्यास प्रवृत्त होतात.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-1.png

 

१२१) दिवसा चूल रात्री मुल.
अर्थ: एवढे काम की मुळीच उसंत नसणे.
१२२) दही खाऊ की मही खाऊ.
अर्थ: हे करू की ते करू.
१२३) दये सारखा धर्म नाही.
अर्थ: दुसऱ्यावर दया करणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.
१२४) दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
अर्थ: जशी मजुरी तसे काम.
१२५) देह देवापाशी चित्त खेटरापाशी ( चप्पल जवळ)
अर्थ: देह देवळात परंतु मन मात्र खेटरात ( चप्पलेत).

१२६) देव आला द्यायला पादरी नाही घ्यायला.
अर्थ: वैभव प्राप्त झाले पण त्याचा उपयोग करताना न येणे.
१२७) पीठ आहे तर मिठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही.
अर्थ: नेहमी काही ना काही उणीव असणे.
१२८) पदरी पडले झोंड हासून केले गोड.
अर्थ: कोणतीही गोष्ट स्वीकारली तर तिला नावे ठेवू नयेत.
१२९) पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा.
अर्थ: पुरुषांचे डोळे आणि स्त्रियांचा स्वभाव चंचल असतो.
१३०) पुरुषांचे पीठ आणि बायकांचे मीठ.
अर्थ: स्त्री पुरुष परस्पर पूरक असतात.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-2.png

 

१३१) पोळी पुरती टाळी.
अर्थ: काम साधण्यासाठी दुसऱ्याची खुशामत करणे.
१३२) पैसे काही झाडाला लागत नाहीत.
अर्थ: श्रम केल्याशिवाय पैसा मिळत नाही.
१३३) प्राणावर आले होते पण शेपटावर निभावले.
अर्थ: थोड्यावर निभावणे.
१३४) पोटाला द्यावे ‌, काम घ्यावे.
अर्थ: कोणतेही श्रम फुकट घेऊ नयेत.
१३५) पोटात एक आणि ओठात एक.
अर्थ: मनात एक आणि जनात दुसरेच.
१३६) प्रपंचाला वित्त आणि परमार्थाला चित्त.
अर्थ: संसाराला पैसा हवा तर परमार्थाला अंत:करण हवे.
१३७) फुल ना फुलाची पाकळी.
अर्थ: पूर्ण मोबदल्याऐवजी थोडेसे देणे.
१३८) फासा पडेल तो डाव राजा म्हणेल तो न्याय.
अर्थ: राजाने दिलेला न्याय तो मनाविरुद्ध असला तरी मानावा लागतो.
१३९) फुटका डोळा काजळाले साजरा करावा.
अर्थ: आपला दोष नाहीसा होण्यासारखा नसतो, त्याचा होईल तितका उपयोग करून घ्यावा.
१४०) फिरे तो चरे.
अर्थ: खटपट करतो तो पोट भरतो.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-3.png

 

१४१) फासा त्याचा मासा.
अर्थ: जो प्रयत्न करतो त्याला यश लवकर मिळते.
१४२) फुकट जेवू तर बापलेक येऊ.
अर्थ: फुकटचे मिळाले की खूप खायचे.
१४३) फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय?
अर्थ: फुकट मिळाले म्हणून यथेच्च ताव मारणे.
१४४) बळी तो कान पीळी.
अर्थ: ज्याच्या अंगात सामर्थ्य असते तो इतरांवर अंमल गाजवतो.
१४५) बारभाईची शेती काय लागेल हाती.
अर्थ: अनेक भागीदार असल्याने फायद्याऐवजी नुकसान जास्त होणे.
१४६) बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
अर्थ: बोलण्याप्रमाणे कृती करणारा माणूस वंदनीय ठरतो.
१४७) बुडत्याला काडीचा आधार.
अर्थ: मोठ्या संकटप्रसंगी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य मोलाचे ठरते.
१४८) बोलणाऱ्याचे तोंड दिसते करणाऱ्याची कृती दिसत नाही.
अर्थ: रागाने बोलणाऱ्याचे शब्द सर्वांना ऐकू येतात, पण गैर काम करणाऱ्याची कृती कोणाला दिसत नाही.
१४९) बावळी मुद्रा देवळी निद्रा.
अर्थ: दिसायला बावळट पण व्यवहारात चतुर.
१५०) बोलाची कढी नि बोलाचाच भात.
अर्थ: बोलून सगळ्यांना चकित करायचे पण कृती मात्र शून्य.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-4.png

 

१५१) आईची माया अन् पोर
जाईल वाया.
अर्थ: फार लाड केले तर मुले बिघडतात.
१५२) आज अंबारी उद्या झोळी धरी.
अर्थ: कधी वैभव तर कधी दैन्य.
१५३) आठ हात लाकूड नऊ हात
ढपली.
अर्थ: अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
१५४) अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
अर्थ : गरजवंताला अक्कल नसते.
१५५) असू ना मासू कुत्र्याची सासू.
अर्थ: जिथे जिव्हाळा नाही तेथे प्रेम नाही.
१५६) आचार भ्रष्टी सदा कष्टी.
अर्थ: ज्याचे आचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो.
१५७) आपण सुखी तर जग सुखी.
अर्थ: आपण आनंदात असलो की सारे जग आनंदात आहे असे वाटणे.
१५८) आखाड्याच्या मेळाव्यात पहिलवानाची किंमत.
अर्थ: योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग.
१५९) आपले नाही धड, शेजाऱ्याचा कढ.
अर्थ: कोणाविषयी प्रेम नसणे.
१६०) इच्छा तसे फळ.
अर्थ: जशी वासना तसे फळ मिळते.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-5.png

 


१६१) ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
अर्थ: जन्माला आलेल्याचे पालनपोषण होतेच.
१६२) उतावळा नवरा गुडघ्यास बाशिंग.
अर्थ: अतिशय उतावळेपणामुळे होणारे मूर्खपणाचे वर्तन.
१६३) उथळ पाण्याला खळखळाट फार.
अर्थ: ज्याच्या अंगी गुण थोडे तो फार बढाई मारतो.
१६४) उचलली जीभ लावली टाळ्याला.
अर्थ: विचार न करता बोलणे.
१६५) उडत्या पक्षाची पिसे
मोजणे.
अर्थ: अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीचे परीक्षण करणे.
१६६) उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
अर्थ: एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.
१६७) उधारीचे पोते सव्वा हात रिते.
अर्थ: उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
१६८) उधारीचे तेल खवट.
अर्थ: उधारीच्या वस्तूत काही ना काही खराबी किंवा उणीव असणे.
१६९) उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे.
अर्थ: श्रीमंत माणसाजवळ खुशामत करणारे गोळा होत असतात.
१७०) उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी.
अर्थ: प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-6.png

 

१७१) उभ्याने यावे ओणव्याने जावे.
अर्थ: येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी नम्र होऊन जावे.
१७२) उसाच्या पोटी कापूस.
अर्थ: सद्गुनी माणसाच्या पोटी दुर्गुनी संतती.
१७३) ऋषीचे आणि हरळीचे मूळ पाहू नये.
अर्थ: ऋषीचे आणि हरळीचे मूळ शोधण्यास फार खोलवर शिरावे लागते.
१७४) ऋण फिटेल पण हीन फिटत नाही.
अर्थ: कर्ज फेडता येते, पण अपमानाचे शल्य कधीच काढून टाकता येत नाही.
१७५) एका हाताने टाळी वाजत नाही.
अर्थ: भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे (व्यक्तीकडे) हसत नाही.

१७६) बैल गेला नि झोपा केला.
अर्थ: एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिच्या निवारणासाठी उपाय करणे.
१७७) बापापरी बाप गेला नि बोंबलताना हात गेला.
अर्थ: जीवनाचा आधार जाणे आणि आवर घालताना उत्पन्नाचे साधन गमावून बसणे.
१७८) बडा घर पोकळ वासा.
अर्थ: दिसण्यात श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव.
१७९) बापाला बाप म्हणेना तो चुलत्याला काका कसा म्हणेल.
अर्थ: जवळच्या नातेवाईकाला मान न देणारा ,दुसऱ्यालाही मान देत नाही.
१८०) बहिऱ्यापुढे भाषण आंधळ्यापुढे दर्पण.
अर्थ: सर्व प्रयत्न व्यर्थ ठरणे.
१८१) बाईला तूप आईला धूप.
अर्थ: आईकडे दुर्लक्ष आणि बायकोचे लाड.
१८२) बारा वर्षे तप केलं गावोगावी पाप केलं.
अर्थ: पापपुण्याची वजाबाकी.
१८३) बीज तसा अंकुर.
अर्थ: जसे बी असेल तसेच अंकुर राहील.
१८४) बुवा गयावळ बाई चंद्रावळ.
अर्थ: भिन्न प्रवृत्तीचे पती-पत्नी.
१८५) बीबी आली उमरी मिया चालला कबरी.
अर्थ: बायको जवान होते आणि नवरा म्हातारा होतो आहे.
१८६) भित्या पोटी ब्रह्मराक्षस.
अर्थ: आपण एखाद्या गोष्टीस घाबरत असलो तर ती आपणापुढे उभी राहते.
१८७) भुकेला कोंडा निजेला धोंडा.
अर्थ: अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्यास माणूस राजी असतो.
१८८) भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
अर्थ: एखाद्याला आश्रय दिला किंवा त्यावर उपकार केले तर त्याचा तो गैरवापर करण्यास सुरुवात करतो.
१८९) भीड भिकेची बहीण.
अर्थ: भीडे खातर आपण नकार देऊ शकलो नाही तर शेवटी भीक मागण्याची पाळी येते.
१९०) भरल्या गाडीला चिपडाचे ओझे नसते.
अर्थ: मोठ्या कामात एखादे छोटे काम सहज होऊन जाते.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-7.png

 


१९१) भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही.
अर्थ: भीक मागून श्रीमंत होऊ शकत नाही.
१९२) भोळ्याचे देव सोळा.
अर्थ: भोळ्या भाबड्या मनुष्याचा प्रत्येकावर विश्वास असतो.
१९३) भुताच्या घरात सुताची
वरात.
अर्थ: सारख्याला सारखे भेटणे.
१९४) भलताच व्यापार केला तो अंगाशी आला.
अर्थ: ज्या गोष्टीतले आपल्याला काही समजत नाही त्यात ढवळाढवळ केली तर नुकसान होते.
१९५) भलताच मटके अन् वाटाणे
गिटके.
अर्थ: आंबटशौकीन मनुष्य.
१९६) भाताला तांदूळ नाही पाण्याला उधान नाही.
अर्थ: कशाचा काही ठिकाणा नाही.
१९७) भोळा ग बाई भोळा सगळ्या पापाचा गोळा.
अर्थ: दिसायला गरीब पण भारी व्यसनी.
१९८) म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात.
अर्थ: आपली माणसे नकोशी होत नाहीत.
१९९) बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
अर्थ: लहानपणीच माणसाला गुणदोषांची कल्पना येते.
२००) मेलेल्या म्हशीला मणभर दूध.
अर्थ: एखादा मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याचा अतिशयोक्ती गुणगौरव करणे.

This image has an empty alt attribute; its file name is %E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-8.png

Marathi Mhani Aani Arth List म्हणी व त्यांचे अर्थ.

२०१) शरम करी नरम आणि भरम करी गरम.
अर्थ: मनुष्य लज्जेने नम्र होतो पण भ्रमाने रागावतो.
२०२) शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
अर्थ: सामर्थ्यापेक्षा बुद्धीचा उपयोग करणे जास्त चांगले.
२०३) शिष्य पडला गुरु अडला.
अर्थ: दुसऱ्याच्या चुकीवरून शहाणपण शिकणे.
२०४) शेंडा ना बुडखा.
अर्थ: ना आरंभ ना अंत.
२०५) श्री च्या मागोमाग ग येतो.
अर्थ: श्रीमंतीच्या सोबत गर्व येतो.
२०६) श्रीमंताला वाटी गरिबाला नरोटी.
अर्थ: पात्रतेनुसार सत्कार होत असतो.
२०७) शुभस्य शीघ्रम.
अर्थ: चांगली गोष्ट ताबडतोब करावी.
२०८) शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी.
अर्थ: पुष्कळ लोक जमले की कामाची विल्हेवाट लागते.
२०९) संग तसा रंग.
अर्थ: मनुष्याचा स्वभाव त्याच्या मित्राप्रमाणे असतो.
२१०) सापाला दूध पाजले तरी तो विषयच ओकणार.
अर्थ: दुष्ट मनुष्यास कितीही चांगले वागविले तरी तो आपला दुष्टपणा सोडत नाही.
२११) सुंठी वाचून खोकला जाणे.
‌ अर्थ: कोणताही उपाय न करता अडथळा आपोआप दूर होणे.
२१२) वरच्यास हात खालच्यास लाथ.
अर्थ: वरिष्ठांपुढे नम्र पण
कनिष्ठ पुढे कठोर.
२१३) शितावरून भाताची परीक्षा.
अर्थ: थोडीशी चाचपणी केली असता एखाद्या गोष्टीचा निष्कर्ष काढता येतो.
२१४) शिंक्याचे तुटले नि बोक्याचे फावले.
अर्थ: एकाचे नुकसान तोच दुसऱ्याचा फायदा.
२१५) शहाण्याला शब्दाचा मार.
अर्थ: समजूतदार माणसाला समजावून सांगितल्यावर तो सुधारतो.
२१६) शेरास सव्वाशेर.
अर्थ: एकाला दुसरा वरचढ भेटणे.
२१७) सर सलामत तो पगडी पचास.
अर्थ : जिवंत राहिल्यानंतर वाटेल ते करता येते.
२१८) शिंदळीच्या घरी हत्ती पण सतीच्या घरी नाही बत्ती.
अर्थ: जगात दुर्जनांच्या घरी वैभव आढळते पण सज्जनाला दारिद्र्यातच दिवस काढावे लागतात.
२१९) शहाण्याचे व्हावे चाकर पण मूर्खाचे होऊ नये धनी.
अर्थ: सज्जन माणसाकडे नोकर म्हणून रहावे, पण मूर्खाचा मालक होऊ नये.
२२०) शाहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊ नये पेढे.
अर्थ: शहाण्याकडून अपमान झालेला पत्करला पण मूर्खाकडून होणारा सन्मान नको.
२२१) वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच.
अर्थ: एखाद्याशी उर्मटपणे वागले काय किंवा सौम्यपणे वागले काय शेवटी परिणाम एकच.
२२२) विटलेले मन आणि फुटलेला मोती सांधता येत नाही.
अर्थ: एखादी गोष्ट नावडती झाली की ती आवडणे कठीण.
२२३) वेळ ना वारी गाढव आले दारी.
अर्थ: मूर्ख मनुष्यास योग्य अयोग्य प्रसंग कळत नाही.
२२४) वर लुगड खाली उघड.
अर्थ: जेथे सोय करावी तेथे न करता भलत्याच ठिकाणी करणे.
२२५) विद्या सर्वत्र पूज्यते ‌
अर्थ: विद्येला सर्वत्र मान मिळतो.

२२६) लग्नाला गेली आणि बारशाला आली.
अर्थ : अतिशय संथगतीने चालणारी स्त्री.
२२७) लग्नाला वीस आणि वाजंत्र्याला तीस.
अर्थ: मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यासाठी अधिक खर्च.
२२८) लोभी धनी सज्जनाला अवमानी.
अर्थ : लोभी माणसाला स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही.
२२९) लाखोश्री व भीकेश्री एकच.
अर्थ: मेल्यावर गरीब व श्रीमंत सारखेच.
२३०) वासरात लंगडी गाय शहाणी.
अर्थ: जिथे सारेच अडाणी आहेत तेथे थोडेसे जाणणारा मनुष्य पुढारीपण करतो.
२३१) विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
अर्थ: आपली सारी चीज वस्तू बरोबर घेऊन फिरणे.
२३२) वळणाचे पाणी वळणावरच जाणार.
अर्थ: निसर्ग नियमानुसार जे घडायचे असते ते घडतेच.
२३३) बोट वाकडे केल्याशिवाय तूप निघत नाही.
अर्थ: सरळ मार्गाने काम न झाल्यास थोडा तरी वाईट मार्गाचा अवलंब करावा लागतो.
२३४) व्यक्ती तितक्या प्रकृती.
अर्थ: जितकी माणसे तितकेच त्यांचे स्वभाव.
२३५) वारा पाहून पाठ फिरवावी.
अर्थ: परिस्थिती पाहून वर्तन ठेवावे.
२३६) वडाची साल पिंपळाला.
अर्थ: संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र आणणे.
२३७) वडाचे तेल वांग्यावर.
अर्थ: एकाचा राग दुसऱ्यावर काढणे.
२३८) विद्या विनयेन शोभते.
अर्थ: विनयामुळे विद्येला शोभा येते.
२३९) वाघाच्या घरी शेळी पाहुणी.
अर्थ: दुर्जनाच्या तावडीत सज्जन मनुष्य.
२४०) वाटेला नाही फाटा तर वाटे हेलपाटा.
अर्थ: सरळ रस्ता कंटाळवाणा वाटत असतो.
२४१) मुंगी होऊन साखर खावी हत्ती होऊन लाकडे मोडू नयेत.
अर्थ: नम्रता धारण करून आपला फायदा करून घ्यावा ,
ताठर वागून नुकसान करून घेऊ नये.
२४२) बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
अर्थ: लहानपणीच माणसाच्या गुणदोषांची कल्पना येते.
२४३) मान सांगावा जना अपमान सांगावा मना.
अर्थ: आपला मान सन्मान लोकांना सांगावा पण अपमान आपणच सहन करावा.
२४४) मनाला मानेल तोच सौदा.
अर्थ: आपणास आवडत असेल तीच गोष्ट करावी.
२४५) मरावे परी कीर्ती रुपी उरावे.
अर्थ: आपण जगात नसलो तरी आपली कीर्ती राहील असे काम करावे.
२४६) मौन सर्वार्थ साधनम्.
अर्थ: बडबड करण्यापेक्षा गप्प बसणे सर्वात उत्तम.
२४७) मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचे तोंड धरवत नाही.
अर्थ: दांडग्या माणसाला आवरणे सोपे पण बोलणाऱ्या माणसाला आवरता येत नाही.
२४८) मानला तर देव नाहीतर दगड.
अर्थ: कोणाला किती महत्त्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असते.
२४९) मस्करीची होते कुस्करी.
अर्थ: थट्टा करता करता परिणाम अगदी वाईट होणे.
२५०) मनी वसे ते स्वप्नी दिसे.
अर्थ: आपणास ज्या गोष्टीचा सतत ध्यास लागलेला असतो, तीच गोष्ट स्वप्नात दिसते.

२५१) मनाएवढी ग्वाही त्रिभुवनात नाही.
अर्थ: मनासारखे खरे सांगणारा साक्षीदार साऱ्या जगात नाही.
२५२) लेकी बोले सुने लागे.
अर्थ: एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे.
२५३) लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण.
अर्थ: लोकांना उपदेश करायचा आणि आपणच त्याप्रमाणे वागायचे नाही.
२५४) लाज नाही मना कोणी काही म्हणा.
अर्थ: निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टिकेची पर्वा करीत नाही.
२५५) लहान तोंडी मोठा घास.
अर्थ: योग्यतेपेक्षा मोठी जबाबदारी स्वीकारणे.

२५६) लाथ मारीन तेथे पाणी काढीन.
अर्थ: स्वतःच्या बळावर काम करण्याचा आत्मविश्वास.
२५७) लोकांचे शिकले वडगांव विकले.
अर्थ: लोकांच्या नादी लागून भलतीच गोष्ट करणे.
२५८) लोभ दचकला नि डोळा
पिचकला.
अर्थ: कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्याचे दोष दिसू लागतात.
२५९) लाथ सोसते पण बात सोसत नाही.
अर्थ: मार सहन होतो पण मनाला बोचणारे बोलणे सहन होत नाही.
२६०) मूर्ती लहान पण कीर्ती महान.
अर्थ: शारीरिक दृष्ट्या लहान असलेली माणसे कर्तुत्व करून खूप नाव मिळवतात.
२६१) रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते.
अर्थ: सरळ मार्गाने काम न केल्यास फार त्रास होतो.
२६२) रडत राऊत काय चालवील औत.
अर्थ: रड्या माणूस कोणतेही काम करू शकत नाही.
२६३) रिकामे मन कुविचाराचे धन.
अर्थ : काम नसले की मनात नाना तऱ्हेचे वाईट विचार येतात.
२६४) रुचेल ते बोलावे पचेल ते खावे.
अर्थ: योग्य तेच बोलावे व अवाका असेल तेवढेच काम करावे.
२६५) राव राबतात देव कापतात.
अर्थ: जो श्रम करतो त्याला देव देखील मानतात.
२६६) राव गेले रणी, भागुबाईची परवणी.
अर्थ: मोठ्या लोकांच्या गैरहजेरीत शूद्र माणसे आपली शान दाखवतात.
२६७) रात्री खाते तूप सकाळी पहा रूप.
अर्थ: अतिशय उतावळेपणा.
२६८) लंकेत सोन्याच्या विटा.
अर्थ: दुसरीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसणे.
२६९) मोले घातले रडायला नाही आसू नाही माया.
अर्थ: भाड्याने काम करणाऱ्या माणसामध्ये खरी आत्मीयता नसते.
२७०) मोठ्या घरी सदा भिकारी.
अर्थ: मोठ्या किंवा श्रीमंत माणसांच्या घरी नेहमीच याचक असतात.
२७१) मुंगूस पाहिला आणि साप पळाला.
अर्थ: जबरदस्त शत्रू पाहिला की दुष्ट मनुष्य पळ काढतो.
२७२) मगरी मगरी तुझी पाठ मऊ.
अर्थ: वाईट कर्मातून सुटण्यासाठी त्याच्या कुकर्मांचीही प्रशंसा करावी लागते.
२७३) मांजर कावरते खांबाला ओरबाडते.
अर्थ: रोगाचे निरर्थक प्रदर्शन करणे.
२७४) माझे घोडे जाऊ द्या पुढे.
अर्थ: जिथे तिथे आपला प्रभाव पाडणे.
२७५) मनात असेल तर मार्ग दिसेल.
अर्थ: इच्छा असली की मार्ग सुचतोच.
२७६) मांजरीचे दात पिलास लागत नाहीत.
अर्थ: आपल्या जवळच्या माणसाने कितीही दटाविले किंवा रागावले तरी त्याचा राग येत नाही.
२७७) मनात मनोरे पुढे ताट कोरे.
अर्थ: मनात पुष्कळ इच्छा असते पण दारिद्र्यामुळे कोणतीच इच्छा पुरी होत नाही.
२७८) मनात मांडे पदरात धोंडे.
अर्थ: केवळ मनोराज्यात मग्न असणे.

२७९) मनगटात जोर कोटी मनुष्याहून थोर.
अर्थ: स्वतःचा दृढनिश्चय असला तर प्रचंड बळ येते.
२८०) माय तशी बेटी गहू तशी रोटी.
अर्थ: खाण तशी माती.
२८१) मेलेले मढे आगीला भीत नाही.
अर्थ: अत्यंतिक निराश झालेला माणूस कशाचीही परवा करत नाही.
२८२) म्हातारीने कोंबडे झाकले तरी उजाडायचे राहत नाही.
अर्थ: जी गोष्ट व्हायची असेल ती होऊनच राहते.
२८३) मन चिंती ते वैरीही न चिंती.
अर्थ: आपल्या मनात जेवढे वाईट विचार येतात तेवढे आपल्या शत्रूच्याही मनात येत नाहीत.
२८४) मांजराने दूध पाहिले पण बडगा कोठे पाहिला?
अर्थ: प्रत्येकाला स्वार्थ तेवढा दिसतो, त्यापायी होणारा त्रास दिसत नाही.
२८५) माझी पोर गुणाची थोर.
अर्थ :आपला मुलगा /मुलगी गुणवान आहे असे वाटतेच.
२८६) मनसुबे केले अन् दिवस निघून गेले.
अर्थ: अति विचारात वेळ घालवल्यामुळे कार्य न होणे.
२८७) मनी नाही भाव देवा मला पाव.
अर्थ: जर मनात परमेश्वराविषयी श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्त होणार नाही.
२८८) मानेवर गळू आणि पायाला जळू.
अर्थ: रोगाच्या जागेवर इलाज न करता दुसरीकडेच इलाज करणे.
२८९) मन राजा मन प्रजा.
अर्थ: हुकूम करणारे आपले मन व तो पाळणारे आपले मन असते.
२९०) मन जाणे पाप.
अर्थ : आपण केलेले पाप दुसऱ्याला कळले नाही तरी ज्याचे त्याला कळतेच.
२९१) मनात मांडे पदरात धोंडे.
अर्थ: केवळ मोठमोठी मनोरथे करायची परंतु प्रत्यक्षात काहीही मिळत नाही अशी स्थिती.
२९२) मऊ सापडले म्हणून कोपऱाने खणू नये.
अर्थ: कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
२९३) जनाची नाही पण मनाची तरी ठेवावी.
अर्थ: एखादे पापकृत्य करताना जनाची लाज वाटली नाही ,तरी मनाला काय वाटेल याचा विचार करावा.
२९४) नियमित उद्योगाला सवयीने जोर आला.
अर्थ : उद्योग नियमित केला तर त्यात यश येते.
२९५) नदीचे मूळ नि ऋषीचे कुळ पाहू नये.
अर्थ: कोणत्याही थोर माणसाचा किंवा चांगल्या वस्तूचा मूळ इतिहास पाहू नये.
२९६) नव्याचे नऊ दिवस.
अर्थ: कोणत्याही नवीन गोष्टीचे लोक काही दिवस कौतुक करत असतात.
२९७) निंदक आमचा सखा आमची वस्त्रे धुतो फुका.
अर्थ: आपले दोष दाखविणारा मनुष्य आपले दोष नाहीसे करण्यास मदत करतो ,म्हणून तो आपला मित्रच होय.
२९८) नाही निर्मळ मन ,काय करील साबण.
अर्थ: जेथे मनच स्वच्छ नाही तेथे साबणाचा काय उपयोग ?
२९९) नाऱ्या जाणे बारा तर केशा जाणे साडेतेरा.
अर्थ: एकाहून एक श्रेष्ठ.
३००) नाव देवाचे गाव पुजाऱ्याचे.
अर्थ: देवाच्या नावावर आपला स्वार्थ साधून घेणे.

Marathi Mhani Aani Arth List म्हणी व त्यांचे अर्थ.

३०१) नवा मनू नवा धनू.
अर्थ: सुधारलेला काळ आणि सुधारलेली हत्यारे.
३०२) पाचामुखी परमेश्वर.
अर्थ: पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.
३०३) पै दक्षिणा लाख प्रदक्षिणा.
अर्थ: द्यायचे कमी पण त्याबद्दल काम मात्र भरपूर करून घ्यायचे.
३०४) प्रयत्नांती परमेश्वर.
अर्थ: कितीही अवघड वाटणारी गोष्ट सातत्याने प्रयत्न केल्याने साध्य होते.
३०५) डोंगराएवढी हाव तिळाएवढी धाव.
अर्थ: महत्त्वकांक्षा मोठी परंतु ती पूर्ण करण्याची कुवत नसणे.
३०६) ढोरात ढोर पोरात पोर.
अर्थ: वाटेल तेथे सामावणारा मनुष्य.
३०७) ढवळ्या शेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला.
अर्थ: वाईट माणसाच्या संगतीत राहून चांगलाही बिघडतो.
३०८) झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.
अर्थ: ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे.
३०९) झोपेला धोंडा भुकेला कोंडा.
अर्थ: भूक लागली की. कण्याकोंडाही चालतो. थकल्यावर कोठेही झोप येते.
३१०) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
अर्थ: अपरंपार कष्ट केल्याशिवाय वैभव प्राप्त होत नाही.
३११) टिटवीदेखील समुद्र आटवते.
अर्थ: शूद्र मनुष्यही प्रसंग पडल्यास मोठे काम करू शकतो.
३१२) टक्केटोणपे खाल्ल्या वाचून मोठेपणा येत नाही.
अर्थ: अनुभव आल्याशिवाय व व्यवहारात पडून काही ठेचा खाल्ल्याशिवाय मनुष्य महत्त्वपदाला पोहोचत नाही.
३१३) डोंगर पोखरून उंदीर काढणे.
अर्थ: खूप परिश्रम करून थोडेसेच यश मिळणे.
३१४) डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
अर्थ: कोणतीच गोष्ट साध्य होत नाही.
३१५) डोळ्यात आसू तोंडात हसू.
अर्थ: एखाद्या गोष्टीबद्दल दुःख परंतु त्याच गोष्टीबद्दल दुसऱ्या दृष्टीने आनंद.
३१६) झाड जावो पण हाड न जावो.
अर्थ: नुकसान सोसावे पण धर्म त्याग करू नये.
३१७) जशी कामना तशी भावना.
अर्थ: जशी मनात इच्छा असते तशीच भावना बनते.
३१८) जसा भाव तसा देव.
अर्थ: ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्याप्रमाणे फळ मिळते.
३१९) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
अर्थ: प्रत्यक्ष काम करू लागल्यावर अडचणी कळतात.
३२०) जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
अर्थ: ज्याच्याकडून काही लाभ होत असेल त्याचीच लोक खुशामत करतात.
३२१) जिकडे सुई तिकडे दोरा.
अर्थ: प्रमुख व्यक्तीच्या मागे तिच्या हाताखाली काम करणारे लोक असतात.
३२२) ज्याला नाही अक्कल त्याची घरोघर नक्कल.
अर्थ: मूर्ख किंवा निर्बुद्ध माणसाचा घरोघरी उपहास होतो.
३२३) जात्यावर बसले की ओवी सुचते.
अर्थ: काम करावयास प्रारंभ केला की ते पूर्ण करण्याचे अनेक मार्ग सुचतात.
३२४) झाकली मूठ सव्वा लाखाची.
अर्थ: आपले गुणावगुण झाकून ठेवावे त्याचा उच्चार करू नये.
३२५) न खात्या देवाला नैवेद्य.
अर्थ: ज्याला ज्या वस्तूची गरज नाही ,त्याला ती वस्तू देणे.

३२६) नंदी आला घरा त्याचा आदर करा.
अर्थ: नको असलेला पाहुणा घरी आल्यावर त्याचेही स्वागत करावे लागेल.
३२७) नखऱ्याची नार अन् नवऱ्याचे हाल.
अर्थ: फाजील खर्च वाढला की हाल होतातच.
३२८) नखबर सुख हातभर दुःख.
अर्थ: सुख फार थोडे असते दुःख अधिक असते.
३२९) नवरा जातो नवरीसाठी वऱ्हाड जाते खाण्यासाठी.
अर्थ: प्रत्येक जण आपला फायदा पाहत असतो.
३३०) न मागे तपाची रमा होय दासी.
अर्थ: जो मनुष्य याचना करीत नाही त्याच्याजवळ लक्ष्मी स्वतः चालून येते .
३३१) नवे ते हवे.
अर्थ: नवीन वस्तू प्रत्येकालाच आवडत असते.
३३२) नाजूक नार तिला चाबकाचा मार.
अर्थ: ढोंगी माणसाला अद्दल घडवायला हवी.
३३३) नवऱ्यामुळे पोर झालं देवाचं नाव झालं.
अर्थ: करणी एकाची श्रेय मात्र भलत्यालाच.
३३४) नारळही पाहिजे आणि खोबरेही पाहिजे.
अर्थ: दोन्हीकडून फायद्याची अपेक्षा ठेवणे.
३३५) देवाची करणी नारळात पाणी.
अर्थ: देवाच्या आघात लीलेचा
थांग लागत नाही.
३३६) नाऱ्या नागविला नि तुक्या
ऊजविला.
अर्थ: एका सत्कर्माने दुसऱ्याच्या दुष्कृत्यांचा नाश.
३३७) नेसेन तर पैठणीच नाहीतर
नागवीच राहीन.
अर्थ: एखादी गोष्ट करायची तर अत्युत्कृष्टच करायची नाहीतर काहीच करायचे नाही.
३३८) न्हावी उठला आणि खुंट फुटला.
अर्थ: बोलणारा जायला निघाला की तेथे बसलेले निघून जायला लागतात.
३३९) नेसायला आरेसे पुरायला पैसे.
अर्थ: फाटके वस्त्र नेसायचे पण गाठीला द्रव्य ठेवायचे.
३४०) निश्चयाचे बळ ! तुका म्हणे तेची फळ.
अर्थ: जर निश्चय पक्का असेल तर फळ नक्की मिळते.
३४१) नावाचा नाईक जगाचा पाईक.
अर्थ: पुढारी लोकांचा नोकर असणे.
३४२) निसत बाजारी पडला शेजारी.
अर्थ: निर्लज्ज माणसाला कोठेही असला तरी लाज वाटत नाही.
३४३) नेहमीचा पाहुणा तो तिसऱ्या दिवशी दिवाणा .
अर्थ: अधिक दिवस राहणाऱ्या पाहुण्यांचा मान राहत नाही.
३४४) एक ना धड भाराभर चिंध्या.
अर्थ: सगळेच निरुपयोगी किंवा अपूर्ण.
३४५) एकाच माळेचे मणी.
अर्थ: सगळे सारखेच.
३४६) एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत.
अर्थ: दोन कर्तृत्ववान माणसे एका ठिकाणी राहत नाहीत./
एक सारख्या स्वभावाच्या दोन व्यक्ती एकत्र राहत नाहीत.
३४७) एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवितो विडी.
अर्थ: दुसऱ्यांच्या अडचणींचा विचार न करता स्वतःचा फायदा पाहणे.
३४८) एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
अर्थ: एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचा फायदा होत असतो.
३४९) एक घाव दोन तुकडे.
अर्थ: एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल.
३५०) एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात.
अर्थ: दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणार.

३५१) एकटा जीव सदाशिव.
अर्थ: एकट्या माणसाला कशाचीच चिंता नसते, तो चैनित दिवस घालावीतो.
३५२) एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला.
अर्थ: एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
३५३) एका कानावर पगडी घरी बाईल उघडी.
अर्थ: बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य.
३५४) एका कानाने ऐकावे. दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
अर्थ: एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर सोडून द्यावी.
३५५) ऐतखाऊ गोसावी टाळभैरव बैरागी.
अर्थ: आळशी लोकांचीही कधी कधी चंगळ असते.
३५६) ओल्या बरोबर कोरडेही जळते.
अर्थ: वाईटासोबत कधी कधी चांगल्या माणसांचेही नुकसान होते.
३५७) ओठात एक आणि बाहेर एक.
अर्थ: बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे.
३५८) ओ म्हणता ठो येईना.
अर्थ: अगदीच अक्षरशत्रू.
३५९) करावे तसे भरावे.
अर्थ: जसे कृत्य करू तसेच परिणाम भोगावे लागतात.
३६०) ओठी तेच पोटी.
अर्थ: बोलावे तसे वागावे.
३६१) कर नाही त्याला डर कशाला.
अर्थ: ज्याने वाईट कृत्य केले नाही. त्याला घाबरण्याची गरज नाही.
३६२) कावळ्याच्या शापाने काय मरत नाही.
अर्थ: क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काहीच नुकसान होत नाही.
३६३) कसायाला गाय धार्जीणी
अर्थ: भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नमतात.
३६४) कुसंतानापेक्षा निसंतान बरे.
अर्थ: वाईट संतती होण्यापेक्षा संतती न झालेली बरी.
३६५) कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी.
अर्थ: सर्वांचे दिवस येतात तीच परिस्थिती कधीच राहत नाही.
३६६) काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
अर्थ: नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात निभावले.
३६७) काकडीची चोरी फाशीची शिक्षा.
अर्थ: अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.
३६८) कुठे इंद्राचा ऐरावत कोठे शाम भटाची तट्टानी.
अर्थ: अतिशय थोर माणूस व अती क्षुद्र माणूस यांची तुलना होत नाही.
३६९) कोंड्याचा मांडा करून खाणे.
अर्थ: आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे.
३७०) काना मागून आली नि तिखट झाली.
अर्थ: मागून येऊन वरचढ होणे.
३७१) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
अर्थ: आपल्याच (वंशाच्या)
नाशास आपणच कारणीभूत.
३७२) काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ: खऱ्या मैत्रीचा आगंतुक कारणांनी भंग होत नाही.
३७३) कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच.
अर्थ: कितीही प्रयत्न केले तरी वाईट खोड न सुटणे.
३७४) काट्याचा नायटा करणे.
अर्थ: एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.
३७५) करंगळी सुजली म्हणजे डोंगराएवढी होईल का?
अर्थ: जी गोष्ट लहान असते ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्यात मोठी होऊ शकत नाही.

३७६) केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी.
अर्थ: अत्यंत गरीब परिस्थिती असणे.
३७७) काडी चोर तो माडी चोर.
अर्थ: क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा एखाद्या घडलेल्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.
३७८) कुडी तशी पुडी.
अर्थ: देहाप्रमाणे आकार.
३७९) कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी.
अर्थ: संसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.
३८०) कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर.
अर्थ: ऐकण्यात आणि पाहण्यात फार तापवत असते.
३८१) कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच.
अर्थ: जे घडायचे आहे ते आज ना उद्या घडेलच.
३८२) कमरेचं सोडलं डोक्याला बांधलं.
अर्थ: लाज लज्जा पार सोडून देणे.
३८३) काम नाही कवडीचं रिकामपण नाही घडीच.
अर्थ: काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो.
३८४) कुणाची म्हैस कुणाला उठबैस.
अर्थ: काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला.
३८५) काशी केली गंगा केली नशिबाची कटकट नाही गेली.
अर्थ: सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही.
३८६) काळी बेंद्री एकाची सुंदर बायको लोकाची.
अर्थ: स्वतःपेक्षा इतरांचे चांगले वाटणे.
३८७) कर्कशेला कलह गोड पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ: दुष्ट स्त्रीला कलह किंवा भांडण करणे आवडते, तर गुणवंतीला प्रेम आवडते.
३८८) केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
अर्थ: पैसे असेपर्यंत काही वाटले नाही पैसे संपताच मात्र दुःख वाटले.
३८९) का ग बाई उभी, घरात दोघीतिघी.
अर्थ: घरात काम करायला पुष्कळ माणसे असली म्हणजे आळस वाढतो.
३९०) केर डोळ्यात फुंकर कानात.
अर्थ: भलत्यात जागी भलताच उपाय.
३९१) कवड्यांचे दान वाटले गावात, नगारे वाजले.
अर्थ: करणे थोडे पण गवगवा फार.
३९२) कानाला ठणका नी नाकाला औषध.
अर्थ : रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे.
३९३) केळ्याचा लोंगर देई पैशाचा डोंगर.
अर्थ: केळीचे पीक भरपूर पैसे देते.
३९४) कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.
अर्थ: पूर्वग्रह दूषित व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात.
३९५) करून गेले काय आणि उलटे झाले पाय.
अर्थ: करायचे एक आणि व्हायचे भलतेच.
३९६) खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे.
अर्थ: बोलताना एक प्रकारे बोलणे व कृती करताना दुसऱ्या प्रकारे करणे.
३९७) खऱ्याला मरण नाही.
अर्थ: खरे कधी लपत नाही ते कधीतरी उघड होतेच.
३९८) खाऊन माजावे टाकून माजू नये.
अर्थ: पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.
३९९) खायला काळ नि भुईला भार.
अर्थ: निरुपयोगी माणूस.
४००) खाऊ जाणे तो पचवू जाणे.
अर्थ: जो मनुष्य धमकदारीने एखादी गोष्ट करतो, तो त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार असतो.

४०१) खुंट्याशी सोऊली नि झाडाले बांधली.
अर्थ: कुठेही बंधनातच असणे.
४०२) खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.
अर्थ: लहान गोष्टीची उपेक्षा केल्यास भयानक परिणाम होतात.
४०३) खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.
अर्थ: आपली कुवत नसताना व्यवहार करणे.
४०४) गर्वाचे घर खाली.
अर्थ: गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची वेळ येते.
४०५) गाड्या बरोबर नळ्याची यात्रा.
अर्थ: मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा.
४०६) गाढवाला गुळाची चव काय?
अर्थ: ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही ,त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
४०७) गाढवांचा गोंधळ नि लाथांचा सुकाळ.
अर्थ: मूर्ख लोक एकत्र जमले तर, भांडणाशिवाय काहीच निष्पन्न होत नाही.
४०८) गाव तेथे उकिरडा.
अर्थ: प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच.
४०९) गोगल गाय नि पोटात पाय.
अर्थ: बाह्यरूप एक नि कृती दुसरीच.
४१०) गुरुची विद्या गुरुला फळाली.
अर्थ: एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य.
४११) गोरा गोमटा नि कपाळ करंटा.
अर्थ: फक्त दिखावा करणे पण प्रत्यक्षात काहीच नसणे.
४१२) गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी.
अर्थ: गरिबीमुळे आपण काही करू शकत नसलो, तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे.
४१३) गावंढळ गावात गाढवी सवाशिनी.
अर्थ: जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्त्व येते.
४१४) गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य.
अर्थ: एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे.
४१५) गोफण पडली तिकडे गोटा पडला इकडे .
अर्थ: कोणत्याही कामात ताळमेळ नसणे.
४१६) गवत्या बसला जेवाया आणि ताका संगे शेवाया.
अर्थ: अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा योग्य उपयोग करू शकत नाही.
४१७) गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.
अर्थ: निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते.
४१८) गोष्टी गोष्टी अन् मेला कोष्टी.
अर्थ: लांबलचक गोष्टी करत बसलो तर, मूळ काम धंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते.
४१९) गळ्यातले तुटले ओटीत पडले.
अर्थ: कोणत्याही स्थितीत वस्तू जवळ असणे.
४२०) गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.
अर्थ: गरिबावर सावकाराचा अंमल किंवा अधिकार.
४२१) गरिबांना खपाव धनिकान
चाखाव.
अर्थ: गरिबांनी कष्ट करावे आणि श्रीमंताने मेवा खावा.
४२२) गोष्ट लहान सांगणं महान.
अर्थ : क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे.
४२३) गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.
अर्थ: एखाद्या गोष्टीची अनुकूलता असूनही उपयोग न होणे.
४२४) घोडे खाई भाडे.
अर्थ: ज्या धंद्यात विशेष फायदा होत नाही तो धंदा.
४२५) घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे.
अर्थ: स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याने काम लावणे.

४२६) घर साकड नि बाईल भाकड.
अर्थ: कोणत्याही बाबतीत अनुकूल परिस्थिती नसणे.
४२७) घरात नाही एक तीळ, पावण मिशांना देतो पीळ.
अर्थ: ऐपत नसताना ऐट दाखविणे.
४२८) घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.
अर्थ: स्वतःचा खर्च करून दुसऱ्यांची कामे करणे.
४२९) घोडी मेली ओझ्याने व शिंगरू मेले हेलपाट्याने.
अर्थ: आई काम करून थकते व तिचे मूल तिच्या मागे फिरून थकते.
४३०) घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर.
अर्थ: एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे.
४३१) घरासारखा गुण सासू तशी सून.
अर्थ: लहान मोठ्यांचे अनुकरण करत असतात.
४३२) घुगऱ्या मुठभर सारी रात मरमर.
अर्थ: कमाई थोडी पण कष्ट फार.
४३३) घरची करते देवा, बाहेरचीला चोळी शिवा.
अर्थ: आपल्या कुटुंबापेक्षा बाहेरच अधिक लक्ष असणे.
४३४) चालत्या गाडीला खीळ घालणे.
अर्थ: व्यवस्थित चालणाऱ्या कामात अडचणी निर्माण करणे.
४३५) घर चंद्रमोळी आणि बायकोला साडील चोळी.
अर्थ: घरची गरीबी पण बायकोसाठी खूप खर्च.
४३६) देवाला फुल घराला मुल.
अर्थ: ज्याप्रमाणे देवाच्या मूर्तीवर फुल शोभून दिसते, त्याप्रमाणे घराला मुलाने शोभा येते.
४३७) दूध ते दूध पाणी ते पाणी.
अर्थ: जे असेल तेच दिसेल.
४३८) दुहेरी बोलाची कवडी मोलाची.
अर्थ: दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत कमी होते.
४३९) दुष्ट मेला विटाळ गेला.
अर्थ: दुष्ट माणूस मेला तर बरी बला गेली असे लोकांना वाटते.
४४०) दिसायला भोळा मुद्द्यावर डोळा.
अर्थ: दिसायला भोळसर पण मतलब पक्के समजणारा.
४४१) दिवसभर नव्हती घरी नवऱ्यासोबत पाणी भरी.
अर्थ: केवळ देखावा करणे.
४४२) दाट पेस देई नुसता चारा.
अर्थ: खूप दाट पेरणी केल्यास चांगले पीक येत नाही.
४४३) दिवस जातो पण बोल उरतो.
अर्थ: काळ निघून जातो, पण वाईट शब्दांची आठवण कायम राहते.
४४४) दुसऱ्याची कढी धावधावून वाढी.
अर्थ: दुसऱ्याची वस्तू वाटण्यात किंवा देण्यात अतिशय उदार.
४४५) दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना.
अर्थ: दुःख स्वतः पाचवावे सुख मात्र सर्वांना सांगावे.
४४६) धर्म करता कर्म उभे राहते.
अर्थ: चांगले करायला गेल्यावर नको असलेले निष्पन्न होते.
४४७) धन दुपारची सावली आहे.
अर्थ: पैसा फार थोडा काळ राहतो.
४४८) धड तुला न मला घाल कुत्र्याला.
अर्थ: स्वतःला फायदा होत नसेल तर ,दुसऱ्यालाही लाभ होऊ नये म्हणून नासधूस करणे.
४४९) धर टीक की लाव कागदाला.
अर्थ: भरमसाठ वाटेल ते लिहिणे.
४५०) धड ना संसार ना तप.
अर्थ: सर्वच अर्धवट काम.

४५१) धड दिसेना नि मन बसेना.
अर्थ: वस्तू जर चांगली नसेल तर तिच्याबद्दल आवड निर्माण होत नाही.
४५२) धर्म केलेला कधी वाया जात नाही.
अर्थ: पुण्य कर्म केल्यास त्याचे फळ केव्हातरी मिळतेच.
४५३) धनाची कर माया उडत्या पाखराची छाया.
अर्थ: पैसा आज आहे उद्या नाही.
४५४) ध्वनी तसा प्रतिध्वनी.
अर्थ: जशी क्रिया तशी प्रतिक्रिया.
४५५) धीर धरील तो खीर खाईल.
अर्थ: संयमी असतो त्याचाच शेवटी फायदा होतो.
४५६) धान्य तेथे घुशी.
अर्थ: जेथे द्रव्य (पैसा) असते तेथे लोभी लोक जमा होतात.
४५७) नावडतीचे मीठ अळणी.
अर्थ : नावडत्या माणसाने केलेली प्रत्येक गोष्ट वाईट मानणे .
४५८) निंदकाचे घर असावे शेजारी.
अर्थ: निंदकाकडून आपल्याला चुका समजतात.
४५९) नाकापेक्षा मोती जड.
अर्थ: वरिष्ठा पेक्षा कनिष्ठ शिरजोर.
४६०) नाचता येईना अंगण वाकडे.
अर्थ: आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणे.
४६१) नाक खाजे नकटी खिजे.
अर्थ: चांगल्या दृष्टीने जरी एखादी गोष्ट म्हटली, तरी ती वाईट आहे असे समजणे.
४६२) नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.
अर्थ: नाव मोठे पण कर्तृत्व लहान.
४६३) चोराची पावले चोरालाच ठाऊक.
अर्थ: वाईट माणसांनाच वाईट माणसांची लक्षणे कळतात.
४६४) चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
अर्थ: काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
४६५) छातीला हात लावून सांगणे.
अर्थ: खात्रीपूर्वक सांगणे.
४६६) छक्के पंजे करणे.
अर्थ: हात चलाखी करणे.
४६७) छाती फाटणे.
अर्थ: भयंकर घाबरणे.
४६८) जळतं घर भाड्याने कोण घेणार?
अर्थ: नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
४६९) जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
अर्थ: बाहेरून एखाद्या माणसाणे देखावा केला तरी, त्याच्या अंगी गुण येत नाहीत.
४७०) जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगते उध्दारी.
अर्थ: स्त्री कडून जगाचा उद्धार होतो.
४७१) ज्याच्या हाती ससा तो पारधी.
अर्थ: ज्याच्या हातात सत्ता आहे तो स्वतःच श्रेय घेऊ पाहतो.
४७२) जन्मा आला हेला पाणी वाहता मेला.
अर्थ: आयुष्यात काहीही काम न करणाऱ्याचा जन्म फुकट जातो.
४७३) जशी देशावळ तशी धुनावळ.
अर्थ: पैसा प्रमाणे काम करणे.
४७४) जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
अर्थ: ज्याच्याजवळ घरदार नाही असा मनुष्य.
४७५) जशी नियती तशी बरकत.
अर्थ: ज्याप्रमाणे आपली भावना असेल, त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळते.

४७६) जे फार भुंकते ते चावरे नसते.
अर्थ: जो मनुष्य फार बडबड करतो त्याच्या हातून काहीच होत नाही.
४७७) जेथे धूर तेथे तेथे अग्नी.
अर्थ: कार्य आहे तेथे कारण असतेच.
४७८) जनता बुवा मनात कावा.
अर्थ: बाह्य जगात सज्जन, पण मनात कपट.
४७९) अंगापेक्षा भोंगा मोठा.
अर्थ: खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच मोठे.
४८०) कुंपणाने शेत खाल्ले.
अर्थ: ज्याच्या हाती रक्षणाचे काम त्यानेच नुकसान केले.
४८१) गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडते.
अर्थ: ज्याच्याकडे पिढीजात विद्या आहे, तो मनुष्य एखादे काम करू लागला तरी ते पद्धतशीर करत असतो.
४८२) ज्याचे कुडे त्याचे पुढे.
अर्थ :जो दुसऱ्याचे वाईट चिंतितो त्याचेच वाईट होते.
४८३) तहान लागल्यावर विहीर खणणे.
अर्थ: अगदी आयत्यावेळी कामाला लागणे.
४८४) दगडावरची रेघ.
अर्थ: कायमची अगर खात्रीची गोष्ट.
४८५) दिलमे चंगा तो काठवटमे गंगा.
अर्थ: मन शुद्ध असले तर त्याला गंगा स्नानासाठी काशीला जाण्याची गरज नाही. घरच्या पाण्याने स्नान केले तरी गंगास्नानाचे श्रेय त्याला मिळते.
४८६) पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवेल.
अर्थ: जी अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा घडून येईल.
४८७) फार झाले हसू आले.
अर्थ: दुःखाचा अतिरेक झाला म्हणजे त्याबद्दल खेद वाटण्याचे बंद होते.
४८८) राजाला दिवाळी काय माहित.
अर्थ: जो नेहमी सुखात राहणारा असतो ,त्याला अमकाच एक दिवस आनंदाचा असा नसतो.
४८९) लागो भागो दिवाळी.
अर्थ: दिवाळीचा सण साजरा करावयाचा म्हणजे ,नशिबावर अवलंबून राहून चैनीत कमी पडू द्यावयाचे नाही.
४९०) वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला.
अर्थ: वाऱ्यावर वरात देणे म्हणजे बे जबाबदारीचे काम.
४९१) सगळे मुसळ केरात.
अर्थ: मुख्य महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे.
४९२) सोन्याहून पिवळे.
अर्थ: फार उत्तम.
४९३) अकाबाईचा फेरा.
अर्थ: वाईट दिवस येणे, दारिद्र्य प्राप्त होणे.
४९४) अंगावर शेकणे.
अर्थ: बरीच मोठी हानी किंवा शिक्षा म्हणून भोगावे लागणे.
४९५) अटकेस झेंडा मिरविणे.
अर्थ: मोठा पराक्रम गाजविणे.
४९६) अंडी पिल्ली बाहेर काढणे.
अर्थ: गुपित जाहीर करणे.
४९७) अत्तराचे दिवे जाळणे.
अर्थ: उधळपट्टी करणे.
४९८) अकांततांडव करणे.
अर्थ: गजबजुन सोडण्यासारखे कृत्य करणे.
४९९) अंधळे गारुड.
अर्थ: लबाडी. जवळ वस्तू असूनही ती न दिसणे.
५००) अवदसा आठवणे.
अर्थ: संकट प्राप्त होईल असे कृत्य करण्याची बुद्धी होणे.

५०१) अळवा वरचे पाणी.
अर्थ: क्षणभंगुर.
५०२) अक्षदा पडणे.
अर्थ: विवाह होणे.
५०३) आकाश पाताळ एक करणे.
अर्थ: मोठ्याने ओरडणे.
५०४) आकाशाला गवसणी घालणे.
अर्थ: माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे.
५०५) उकिरडा फुंकणे.
अर्थ: अतिशय गरीबीची परिस्थिती येणे.
५०६) उठता लाथ बसता बुक्की.
अर्थ: सदा सर्वदा मार देणे.
५०७) उडत्या पाखराची पिसे मोजणारा.
अर्थ: फारच हुशार मनुष्य.
५०८) एरंडाचे गुऱ्हाळ.
अर्थ: कंटाळवाणे लांबलचक भाषण.
५०९) हात ओला होणे.
अर्थ: द्रव्यप्राप्ती किंवा भोजनप्राप्ती होणे.
५१०) कढी पातळ होणे.
अर्थ: आजारपणामुळे दुखणे इत्यादींमुळे जर्जर होणे.
५११) कळी उमलणे.
अर्थ: चेहरा प्रफुल्लित होणे.
५१२) काट्याचा नायटा होणे.
अर्थ: सुरुवातीला क्षुल्लक असणारी गोष्ट नंतर हानिकारक होते.
५१३) कास धरणे.
अर्थ: आश्रय घेणे.
५१४) कुत्रा हाल खाईना.
अर्थ: अतिशय वाईट परिस्थिती.
५१५) कुत्र्या मांजराचे पाय.
अर्थ: वाईट हस्ताक्षर.
५१६) काखा वर करणे.
अर्थ: जवळ काही नाही हे दाखविणे.
५१७) गजांतलक्ष्मी.
अर्थ: दाराशी हत्ती झुलण्याइतकी संपत्ती.
५१८) गाढवाचा नांगर फिरवणे.
अर्थ: जमीनदोस्त करणे.
५१९) गुळ खोबरे देणे.
अर्थ: लालूच दाखवून फसविणे.
५२०) गुलाबाचे फुल.
अर्थ: नाजूक शरीरयष्टी.
५२१) ग्रामकेसरी.
अर्थ: कुत्रे.
५२२) घटका भरणे.
अर्थ: विनाशकाळ प्राप्त होणे.
५२३) घटकेचे घड्याळ.
अर्थ: क्षणभंगुर वस्तू.
५२४) घडा भरणे.
अर्थ: मर्यादा पुरी होणे.
५२५) घरकोंबडा.
अर्थ: आपल्या घरापासून फारसा दूर न जाणारा.

५२६) घर डोक्यावर घेणे.
अर्थ: अतिशय गोंगाट करणे.
५२७) घर ना दार देवळी बिऱ्हाड.
अर्थ: ज्याला बायका पोरे नाहीत असा एकटा मनुष्य.
५२८) घोडे पेंड खाते.
अर्थ: अडचण उपस्थित होणे.
५२९) चंगीभंगी.
अर्थ: व्यसनाधीन व्यक्ती.
५३०) चऱ्हाट वळणे.
अर्थ: कंटाळा आणण्याजोगी गोष्ट सांगणे.
५३१) चालत्या गाड्यास खिळ घालणे.
अर्थ: सुरळीतपणे चाललेल्या कामात विघ्न आणणे.
५३२) घर भरणे.
अर्थ: स्वतःचा फायदा करून घेणे.
५३३) घरीदारी सारखा.
अर्थ: सर्व ठिकाणी सारखे वर्तन करणारा.
५३४) जंग जंग पछाडणे.
अर्थ: कमालीचा/ जास्तीत जास्त प्रयत्न करणे.
५३५) जीवाचे रान करणे.
अर्थ: अतिशय कष्ट सोसणे.
५३६) झाकले माणिक.
अर्थ: बाहेरून डौल न दाखविणारा ,पण खरोखरी गुणी मनुष्य.
५३७) टंगळमंगळ करणे.
अर्थ: कामाचा आळस करणे.
५३८) टेंभा मिरविणे.
अर्थ: दिमाख दाखविणे/ डामडौल दाखविणे.
५३९) डांगोरा पिटणे.
अर्थ: जाहीर करणे.
५४०) डाळ शिजणे.
अर्थ: दाद लागणे.
५४१) राजाअंती नरक आणि नरकाअंती राज्य.
अर्थ: पापे केल्याशिवाय राज्य मिळत नाही आणि राज्य चालविणे, टिकवणे पापाशिवाय शक्य नाही.
५४२) डोंगर पोखरून उंदीर काढणे.
अर्थ: मोठे प्रयास करून फार थोडी कार्यनिष्पत्ती होणे.
५४३)तापल्या तव्यावर भाजून घेणे.
अर्थ: एका कार्यात अनायासे दुसरे कार्य करून घेणे.
५४४) ता म्हणता ताकभात समजावा.
अर्थ: लहान सुचक चिन्हावरून तर्काने सबंध गोष्ट चटकन ओळखावी.
५४५) तारे तोडणे.
अर्थ: वेड्यासारखे भाषण करणे.
५४६) तिखट मीठ लावून सांगणे.
अर्थ: स्वतःची कल्पना चटकदार बनवून गोष्ट सांगणे, अतिशयोक्ती करून सांगणे.
५४७) तुणतुणे वाजविणे.
अर्थ: एखादी क्षुल्लक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत सुटणे.
५४८) तैल बुद्धी.
अर्थ: विषयाचे आकलन करण्यास समर्थ अशी बुद्धी.
५४९) थंडा फराळ करणे.
अर्थ: उपाशी राहणे.
५५०) दगडाखाली हात सापडणे.
अर्थ: अडचणीत सापडणे.

५५१) दडी देणे.
अर्थ: लपून बसणे.
५५२) दादा बाबा करणे.
अर्थ: गोड बोलून मन वळविणे.
५५३) दिवसा मशाल लावणे.
अर्थ: पैशाची उधळपट्टी करणे.
५५४) दिवे लावणे.
अर्थ: कर्तुत्व दाखविणे.
५५५) पदर पसरणे.
अर्थ: नम्रपणे प्रार्थना करणे, क्षमा मागणे.
५५६) पदरी पडणे.
अर्थ: ताब्यात येणे, मिळणे.
५५७) पांग फिटने.
अर्थ: कोणत्याही प्रकारची उणीव दूर होणे.
५५८) पाण्यावरची रेघ.
अर्थ: क्षणभर सुद्धा न टिकणारे वचन.
५५९) पाताळयंत्री.
अर्थ: गुढ मनुष्य, गुढ स्वभावाचा मनुष्य.
५६०) पेढे चारणे.
अर्थ: फसविणे.
५६१) पैशाचा धूर निघणे.
अर्थ: श्रीमंती येणे.
५६२) फुटक्या तिन्हीसांजा.
अर्थ: ऐन संध्याकाळी.
५६३) बगळ्या चोर.
अर्थ: संधी सापडताच वस्तू चोरणारा भामटा.
५६४) बाणा मिरविणे.
अर्थ: अभिमान व्यक्त करणे.
५६५)बेंड फुटणे.
अर्थ: गौप्य बाहेर पडणे.
५६६) बोल बाला होणे.
अर्थ: उत्कर्ष होणे.
५६७) बोळवण करणे.
अर्थ: निरोप देणे, रवानगी करणे.
५६८) बोळा फिरविणे.
अर्थ: पुसून टाकणे.
५६९) बोळ्याने दूध पिणे.
अर्थ: बुद्धीहीन असणे.
५७०) भंडारा उधळणे.
अर्थ: जयजय कार करणे.
५७१) भरारी मारणे.
अर्थ: फार वेगाने जाणे.
५७२) भाकड कथा.
अर्थ: निष्फळ, रिकाम्या गोष्टी.
५७३) भांगेमध्ये तुळस.
अर्थ: वाईट आई-बापांच्या पोटी चांगली संतती.
५७४) भिजत घोंगडे ठेवणे.
अर्थ: एखादी गोष्ट निकाल न लावता तशीच पडून राहू देणे.
५७५) भिड घालणे.
अर्थ: विविध उपायांनी अनुकूलता मिळविणे.

५७६)भीड चेपणे.
अर्थ: सवयीने भीती कमी वाटू लागणे.
५७७) भोळा सांब.
अर्थ: भोळा मनुष्य.
५७८) भ्रमाचा भोपळा फुटणे.
अर्थ: एखाद्या गोष्टी पासून मोठा लाभ होईल ,हा भ्रम एकाएकी दूर होणे.
५७९) मधु माक्षिकेचे व्रत.
अर्थ: ज्याच्या ठिकाणाहून चांगल्या गोष्टी मिळतील त्या त्या घेणे.
५८०) मन बसणे.
अर्थ: अतिशय आवडणे.
५८१) मन मानेल तसे करणे.
अर्थ: इच्छेस येईल तसे करणे.
५८२) मन मोठे करणे.
अर्थ: उदारपणा धारण करणे.
५८३) मनात गाठ बांधणे.
अर्थ: मनात गोष्ट पक्की ठेवणे.
५८४) मनात मांडे खाणे.
अर्थ: व्यर्थ मनोरथ करणे.
५८५) मनातून उतरणे.
अर्थ: पूर्वी आवडत असलेली वस्तू किंवा गोष्ट ,मागाहून काही कारणांमुळे नावडते होणे.
५८६) मसणात गोवऱ्या जाणे.
अर्थ: मरणाच्या पंथाला लागणे.
५८७) माशी शिंकणे.
अर्थ: काम बंद करण्यासाठी काहीतरी खोटे निमित्त पुढे करणे.
५८८) मी मी म्हणणारे.
अर्थ: स्वतःच्या कर्तुत्वाविषयी ऐट मिरविणारे.
५८९) मुंडी मुरगाळणे.
अर्थ: सर्वस्वी नाश करणे.
५९०) मुली उजविणे.
अर्थ: मुलींची लग्ने करणे.
५९१) मुळावर जन्मणे.
अर्थ: ज्याच्या योगाने दुसऱ्याचा नाश होईल अशा नक्षत्रावर जन्म होणे.
५९२) मेतकूट जमणे.
अर्थ: स्नेह जुळणे, मित्रत्व होणे, मनास मन मिळणे.
५९३) मेल्या आईचे दूध प्यालेला.
अर्थ: कर्तुत्व शून्य.
५९४) या कानाचे त्या कानास कळू न देणे.
अर्थ: अतिशय गुप्त ठेवणे.
५९५) योगक्षेम चालविणे.
अर्थ: संसाराची एकंदर व्यवस्था पाहणे.
५९६) राक्षसी झोप.
अर्थ: फार गाढ झोप.
५९७) वरवंटा फिरविणे.
अर्थ: नाश करणे.
५९८) वाचाळपंचविशी लावणे.
अर्थ: वाचाळता करणे, फोल बोलणे.
५९९) वाच्यता करणे.
अर्थ: एखाद्या गुप्त गोष्टीचा स्फोट करणे. बोलू नये अशी गोष्ट दुसऱ्याकडे बोलणे.
६००) वाट लावणे.
अर्थ: निकालात काढणे.

६०१)वारा न घेणे, वारा न पडू देणे.
अर्थ: अगदी अलिप्त राहणे.
६०२) वारे फिरणे.
अर्थ: बदल होणे.
६०३) वाहत्या गंगेत हात धुणे.
अर्थ: सहजरित्या येणे.
६०६) वेड घेऊन पेडगावास जाणे.
अर्थ: इच्छित कार्य साधण्यासाठी मुद्दाम वेड्याचे सोंग करणे.
६०७) वेड लावणे.
अर्थ: अतिशय नादी लावणे.
६०८) वेडा पीर.
अर्थ: वेडगळ मनुष्य.
६०९) शब्द टाकणे.
अर्थ: शिफारस करणे.
६१०) शितावरून भाताची परीक्षा करणे.
अर्थ: एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थांची परीक्षा करणे.
६११) शिळ्या कडीला ऊत आणणे.
अर्थ: जुन्या विसरलेल्या गोष्टी पुन्हा उकरून काढून त्यांची चर्चा करणे.
६१२) साखरेची साल काढणे.
अर्थ: अतिशय कसून तपास करणे.
६१३) सुताने स्वर्ग गाठणे.
अर्थ: एखाद्या गोष्टीचा. यत्किंचित अंश समजल्याने , बुद्धीप्रभावाने ती गोष्ट पूर्णपणे तर्काने जाणणे.
६१४) हरताळ लावणे/फासणे.
अर्थ: कलंक लावणे.
६१५) हिंगाचा खडा.
अर्थ: गडबड करणारा अथवा त्रास देणारा मनुष्य.

६१६) इन मिन साडेतीन.
अर्थ: अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
६१७) ओळखीचा चोर जीवे न सोड.
अर्थ: ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
६१८) करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल का?
अर्थ: जी गोष्ट लहान असते, ती तशीच राहते, कितीही प्रयत्न केला तरी ती मोठी होऊ शकत नाही.
६१९) कुठे जाशी भोगा तर तुझ्यापुढे उभा.
अर्थ: जे संकट येऊ नये अशी आपली मनोमन इच्छा असते तेच संकट पुढे येणे.
६२०) कुंभारणीच्या घरातील किडा कुंभारणीचा.
अर्थ: दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो.
६२१) खर्चणारे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते.
अर्थ: काम करणाऱ्यास झीज सोसणारेच नुकसान होते. काहीही न करणाऱ्याचे निष्कारण पोट दुखते.
६२२) साप साप म्हणून भुई थोपटू नये.
अर्थ: संकट नसताना त्याचा आभास उत्पन्न करणे.
६२३) झाडाजवळ छाया, बुवा जवळ बाया.
अर्थ: जेथे प्रेमाची सावली मिळते तेथेच लोक जमतात.
६२४) पडलेलं शेण माती घेऊन उठते.
अर्थ: चांगल्या माणसाने त्याच्यावरील ठपक्याचे निवारण केले, तरी थोडाफार दोष शिल्लक राहतोच. वाईट माणसांच्या संगतीत सज्जन माणूस काही काळ जरी राहिला , तरी त्याच्यावर शिंतोडे उडतातच.
६२५) पिकते तिथे विकत नाही.
अर्थ: स्थानिक वस्तूचे किंवा व्यक्तीचे विशेष महत्त्व वाटत नाही.
६२६) भिकाऱ्याच्या पोराला ओकारी फार.
अर्थ: जो भिकेचे खातो त्याला मस्ती फार असते.

६२७)मी मरेन तुला रंडकी करीन.
अर्थ: स्वतःचे नुकसान करणे,आणि दुसऱ्याचेही नुकसान करणे.
६२८) मार शेजाऱ्याचा साप, मी मुलाचा बाप.
अर्थ: दुसऱ्याकडून धोक्याचे एखादे काम करून घेणे.
६२९) याचे दार, त्याचे दार, उठ
मेल्या खेटर मार.
अर्थ: दुसऱ्याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे.
६३०) रडतराऊत, काय चालवील औत.
अर्थ: रड्या माणूस कोणतेही काम करू शकत नाही.
६३१) वेळ ना वखत, गाढव गेले भुंकत.
अर्थ: मूर्ख मनुष्य वेळी अवेळी वाटेल तसे ओरडत असतो.
६३२) वेताळा मागे भुतावळ.
अर्थ: जसा पुढारी तसे अनुयायी.
६३३) वैद्यची पोर गालगुंडाणे मेली.
अर्थ: आपल्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग नसणे.
६३४) वरल्या देवाची तुटली दोरी,
खालचे देव बोंब मारी.
अर्थ: जेथे मोठमोठ्या लोकांचे काही चालत नाही तेथे गरिबांची काय दाद लागणार.
६३५) विहीण झाले नाही तरी मांडवावरून केले आहे.
अर्थ: प्रत्यक्ष अनुभव नसेल पण दुसऱ्याचे पाहून माहिती करून घेतली आहे.
६३६) साप साप म्हणून भुई थोपटू नये.
अर्थ: संकट नसताना त्याचा अभास करण्यात अर्थ नाही.
६३७) सुपातल्यांनी जात्यातल्यांना हसू नये.
अर्थ: जे संकट आज एकावर आहे तेच उद्या दुसऱ्यावर येते, म्हणून कोणीही कुणाचा उपहास करू नये.
६३८) स्मशानी बसावे पण एकटे नसावे.
अर्थ: माणसाने नेहमी संगत करावी.
६३९) हत्तीचे ओझे हत्तीनेच उचलावे.
अर्थ: थोर लोकांची कामे ,थोर लोकच करू जाणे.

Marathi vakyapracara va mhani- view on Amazon

1 thought on “Best 500+ Marathi Mhani Aani Arth ”

Leave a Comment