Best Good Friday Infomation 2025 | गुड फ्रायडे.

Good Friday 2025 | गुड फ्रायडे

गुड फ्रायडे (Good Friday) याला (पवित्र शुक्रवार Holy Friday/Black Friday काळा शुक्रवार/महा शुक्रवार great Friday ) असेही म्हणतात. हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे.

Good Friday

येशूच्या वधस्तंभावर चढवलेल्या आणि कॅलव्हरी किंवा गोलगोथा येथे त्याच्या मृत्यूचे स्मरण करणारा ख्रिश्चन पवित्र दिवस आहे. ईस्टर च्या आधी शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गुड फ्रायडे (Good Friday) निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालय व शैक्षणिक संस्थांना सुट्टी असते.

ख्रिस्ती धर्मातील समजूतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉस वर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोक दिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दुखवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणताही आनंददायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाही. काही भाविक लोक चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

लोकांना खऱ्या धर्माचा उपदेश करणाऱ्या भगवान येशू ख्रिस्ताला त्याच्या विरोधकांनी क्रुसावर चढवून ठार मारले. एप्रिल महिन्याचा तिसरा शुक्रवार हा येशूचा मृत्यूचा दिवस ‘ गुड
फ्रायडे ‘ या नावाने ओळखला जातो.

येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेची सामाजिक स्थिती.

येशू ख्रिस्ताच्या काळातील यहुदी लोक सुख भोगाच्या आहारी गेले होते. त्या काळातील भिक्षुकांनी, धर्मपंडितांनी धर्माच्या नावावर गरीब जनतेची पिळवणूक चालविली होती. राजसत्तेचे त्यांना पाठबळ मिळत होते. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक सगळा अन्याय, जुलूम निमूट पणे सहन करीत होते.

सत्ताधारी गोरगरिबांना तुच्छ मानीत होते. खऱ्या धर्मापासून लोक दूर गेले होते. अशा वाईट परिस्थितीत लोकांना समता, प्रेम ,अहिंसा, त्याग, सत्कर्म यांची ओळख करून देऊन परमेश्वराचा संदेश सांगणे, सत्य धर्माचा उपदेश करणे हे कठीण काम येशूने केले.

प्रभू येशूची शिकवण.

येशू सगळीकडे फिरून लोकांना उपदेश करीत असे. जे नम्र, दयाशील आहेत ते धन्य. जे अंतःकरणाने पवित्र आहेत त्यांच्यावर देव दया करतो. आपल्या शत्रूवरही प्रेम करा. परमेश्वराचे अनुकरण करा. लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून दानधर्म व परोपकार करू नका. तुमच्या उजव्या हाताने केलेले सत्कृत्य डाव्या हाताला कळता कामा नये. स्वतःसाठी धन संचय करू नका. सत्कृत्ये करून स्वर्गात धनसंचय करून ठेवा. प्रार्थनेत फार मोठे सामर्थ्य आहे.

येशूंचे बंड.

येशूंनी आपल्या हस्त स्पर्शाने दुःखी आजारी लोकांना बरे केले. अनेक चमत्कार केले. येशू हा मसीहा आहे. परमेश्वर आहे यावर लोकांचा विश्वास बसला. परंतु येशूची ही लोकप्रियता त्या काळातील भिक्षुकांना, धर्मपंडितांना जाचक होऊ लागली. येशू हे राजसत्तेला आव्हान वाटू लागले. असंख्य शिष्य येशूंना मिळाले.

मी यहुद्यांचा राजा आहे असे येशु उघडपणे सांगू लागले. प्रचलित रूढी, धर्म, धर्ममार्तंड व त्यांना पाठबळ देणारी राजसत्ता याविरुद्ध येशूंचे हे बंडच होते. यामुळे भिक्षुकांनी, धर्मपंडितांनी व राजसत्तेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून येशूला ठार मारण्याचे ठरविले.

प्रभू येशूंना पकडले.

आपले अवतार कार्य संपत आले आहे हे येशूंना माहीत झाले होते. त्यांनी आपल्या शिष्यांना शेवटचा उपदेश केला. येशू एकांतात चिंतन करीत बसले होते. मध्यरात्री अचानक काही राजाचे शिपाई तलवार नाचवत येशूंकडे धावत आले. यामध्ये येशूंचे काही शिष्यही होते. येशूंच्या अनुयायांनी अशा शिपायांना विरोध केला. पण येशूंनी आपल्या अनुयायांना प्रतिकार करण्या वाचून थांबविले. माझे संरक्षण माझा स्वर्गातील पिताच करेल असे ते म्हणाले.

प्रभू येशूंना क्रुसावर चढवले.

येशू हे पाखंडी, राजद्रोही आहेत असा त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना राजापुढे उभे करण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. त्यांना क्रूसावर चढविण्याचे निश्चित करण्यात आले. येशूला किरमिजी रंगाचा झगा चढवून त्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवला.

त्यांच्या खांद्यावर अत्यंत अवजड असा क्रॉस, शूळ दिला व त्यांना वध्यभूमीवर नेले. तिथे त्यांना सुळावर चढवून त्यांच्या हातापायांवर खिळे ठोकले. येशूंना असह्य वेदना होत होत्या पण येशूंनी शोक न करता प्रार्थना केली, ‘ परमेश्वरा या लोकांना तू क्षमा कर, कारण आपण काय करतो आहोत हे त्यांना समजत नाही. ‘

या परमेश्वराच्या प्रेषिताचे, महान संताचे, दयेच्या सागराचे क्रूसावर प्राण गेले. तो दिवस एप्रिल महिन्यातला तिसरा शुक्रवार होता. येशूंनी सत्य धर्माच्या प्रचारासाठी, मानवतेसाठी आपले प्राण दिले म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे (Good Friday) म्हणतात. दरवर्षी या शुभ शुक्रवारी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्र जमून येशूने भोगलेल्या मरणयातनांचे भक्ती- भावे स्मरण करतात.

Other Articles- Best Ram Navami Information in Marathi

Leave a Comment