Christmas information in Marathi | ख्रिसमसची माहिती 2025

Christmas information in Marathi

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६,७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.

ख्रिश्चन धर्मातील श्रद्धेनुसार नाताळ हा सण बारा दिवसांच्या “ख्रिसमस्टाईड “नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
ख्रिस्टस- मास या शब्दावरून ख्रिसमस हा शब्द सोळाव्या शतकात रूढ झाला आहे.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते.

Christmas Information in Marathi

‘ ख्रिसमस वृक्ष सजावट ‘

(ख्रिसमस ट्री.) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट केक इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. त्यामुळे लहान मुले या सणाची आतुलतेने वाट पाहत असतात.

या दिवशी प्रभू येशूच्या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळी प्रार्थना म्हणण्यात येतात.
ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळसनापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅरोल असे म्हणतात.

नाताळ हा सण सर्वत्र प्रेम शांतता व एकतेचा महान संदेश देणारा सण आहे. हा सण ख्रिस्ती बांधवांचा असला तरीही संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

ख्रिसमस इव्ह.

२४ डिसेंबर या दिवशी संध्याकाळला ‘ख्रिसमस इव्ह ‘
म्हणतात. यावेळी स्त्री पुरुष रंगीबेरंगी आकर्षक पोशाख नेसून एकत्र येतात. गाणी गातात.
(काही ठिकाणी यावेळी मद्यप्राशन करण्याची पद्धत आहे.) रात्री १२ वाजता चर्चमध्ये घंटा नाद सुरू होतो. त्यावेळी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात. लहान मुले व तरुण रात्री बारापासून पहाटेपर्यंत अनेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात.

येशू ख्रिस्ताची बालप्रतिमा.

२५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत नाताळ सण साजरा केला जातो.
यावेळी घरात आणि प्रार्थना मंदिरात दगड, पुठ्ठा, लाकूड यापासून बनवलेली गुहा पाहायला मिळते. याच गुहेमध्ये गवताच्या हिरवळीवर बागडणारी प्रभू येशूची बाल प्रतिमा असते. त्याच्याजवळ येशूची आई मेरी आणि येशूचा जन्मदाता पिता योसेफ आणि त्या अद्वितीय बालकाला पाहण्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आलेले मेंढपाळ, त्यांच्या मेंढ्या, शेळ्या, बैल, गाई अशी आरास सजविली जाते.

सांताक्लॉज.

ख्रिसमस फादर किंवा सेंट निकोलस नावाचा लांब पांढरे शुभ्र दाढी असणारा, कायम हसरा चेहरा असलेला, स्थूल देहाचा एक मुलांचा आवडता संत आहे. त्याला ‘ सांताक्लॉज ‘ असेही म्हणतात.
लहान मुले नाताळच्या आदल्या रात्री झोपी जाण्यापूर्वी पलंगाला मोजे टांगून ठेवतात. तो त्या मुलांना त्या रात्री छोट्या छोट्या भेटवस्तू देतो असे मानले जाते. सकाळी उठल्यावर त्या मुलांना मोज्यात भेटवस्तू भरलेल्या दिसतात. रात्री सांताक्लॉज धुराड्यातून घरात उतरून त्या वस्तू ठेवून गेला असे मुलांना सांगितले जाते. सांताक्लॉजला इंग्लंड मध्ये ‘ ‘ख्रिसमस फादर ‘ म्हणतात.

येशू ख्रिस्ताने समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण दिली.
येशू ख्रिस्तांना ‘ख्रिस्ती ‘धर्माचे संस्थापक मानले जाते.

Other Article:

Guru Nanak Jayanti गुरुदेव नानक जयंती

Leave a Comment