Best Marathi Mhani मराठी म्हणी

Best Marathi Mhani मराठी म्हणी

Best Marathi Mhani

म्हण म्हणजे काय?

मनुष्याला येणारा अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडून दाखविलेला असतो. अशी वाक्ये लोकांच्या सतत वापरत असतात. लोकांच्या सतत म्हणण्यात येणारी म्हणून त्यांना ‘म्हण’ असे म्हणतात. सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे छोटेसे, चटकदार, बोधप्रद, व सर्व मान्य वचन म्हणजे म्हण. अनेकांना येणारा अनुभव एक जण आपल्या शहाणपणाने छोट्या सिद्धांत स्वरूप सूत्रमय वाक्यात मांडून दाखवीतो. सर्वांकडून त्याला मान्यता मिळते व लोकांच्या सतत वापरात त्या राहतात. म्हणून म्हणींना ‘तोंडचे वाड्मय ‘किंवा अनुभवाच्या खाणी असेही म्हणतात.

१) अति तेथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
२) अति शहाणा त्याचा बैल रिकामा-वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते.
३) अंथरूण पाहून पाय पसरावे– आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
४) इकडे आड तिकडे विहीर-दोन्हींकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
५) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग– अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन.

६) उथळ पाण्याला खळखळाट फार-ज्याच्या अंगी गुण थोडा, तो फार बढाई मारतो.
७) एका हाताने टाळी वाजत नाही-भांडणाचा दोष एका पक्षाकडेच असत नाही.
८) ऐकावे जनाचे, करावे मनाचे– सर्वांचा विचार घ्यावा व आपणांस योग्य वाटेल ते करावे.
९) कर नाही त्याला डर नाही– ज्याने वाईट कृत्य केले नाही, त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
१०) करावे तसे भरावे – जसे बरे वाईट कृत्य करावे तसे त्याचे बरे वाईट परिणाम भोगायला तयार व्हावे.

११) कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात-शूद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही.
१२) कोल्हा काकडीला राजी-शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात.
१३) कोळसा उगळावा तितका काळाच-वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
१४) खाई त्याला खवखवी- वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते.
१५) खाण तशी माती– आईबापाप्रमाणे मुले.

१६) गर्जेल तो पडेल काय– बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही.
१७) गर्वाचे घर खाली– गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते.
१८) घरोघर मातीच्या चुली– सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
१९) चढेल तो पडेल-उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याला अपयश आले, तर त्यात कमीपणा नाही.
२०) चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे-प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच.

100 रोजच्या वापरासाठी महत्त्वाच्या म्हणी

Best 500+ Marathi Mhani Aani Arth 

२१) चोराच्या मनात चांदणे– वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.
२२) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी– आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. उपकार घेतले की लाचारी.
२३) झाकली मूठ सव्वा लाखाची– आपले गुणावगुण झाकून ठेवावेत, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये.
२४) टाकीचे घाव सोसल्या– वाचून देवपण येत नाही-अपरंपार कष्ट केल्या वाचून वैभव प्राप्त होत नाही.
२५) तळे राखील तो पाणी चाखील– आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडा तरी फायदा करून घेतोच.

२६) थेंबे थेंबे तळे साचे– थोडे थोडे जमवित राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
२७) दाम करी काम-पैशाने सर्व कामे साध्य होतात.
२८) दिव्याखाली अंधार-मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच.
२९) दुरून डोंगर साजरे-कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते. जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.
३०) नाचता येईना अंगण वाकडे– आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.

३१) नावडतीचे मीठ आळणी– नावडत्या माणसाने काहीही केले, तरी ते वाईटच लागते.
३२) पळसाला पाने तीनच-कुठेही गेले, तरी मनुष्य स्वभाव सारखाच.
३३) पाचा मुखी परमेश्वर-पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.
३४) पुढच्यास ठेच मागचा शहाणा-दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
३५) पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा-द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यावयाचे.

३६) बळी तो कान पिळी-ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो.
३७) बुडत्याचा पाय खोलात-अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते.
३८) भित्या पाठी ब्रह्मराक्षस– भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.
३९) मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची-धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही.
४०) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात-मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत्यावरून करता येतो.

४१) वासरात लंगडी गाय शहाणी-अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते.
४२) शहाण्याला मार शब्दाचा-शहाण्याला शब्दाने सांगितले की तो उमजतो पण मूर्खाला छडी शिवाय भागत नाही.
४३) शितावरून भाताची परीक्षा– एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते.
४४) साखरेचे खाणार त्याला देव देणार– भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात.
४५) हजीर तो वजीर-जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.

वाक्प्रचार व म्हणी यांमुळे भाषा संपन्न होते व त्यांचा अभ्यास केल्यामुळे भाषेतील सौंदर्य समजण्याला मदत होते. कोणतीही कल्पना साध्या, सरळ पद्धतीने न मांडता ती वाक्- संप्रदाय किंवा म्हण या स्वरूपात मांडल्यामुळे भाषा किती सुंदर व प्रभावी होते हे आपणास दिसून येते.

80+ Love Affirmations to Strengthen Your Relationship

Leave a Comment