Holi Information in Marathi | होळी पौर्णिमा/होळी उत्सव
होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हा सण राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करतो. या व्यतिरिक्त, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. होळी हा रंगाचा सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशा विविध नावाने हा सण ओळखला जातो. हा सण लोक उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.

Holi Information in Marathi | होळी पौर्णिमा/होळी उत्सव
पुतना मावशी.
यासंबंधी पुराणात एक कथा आहे. कंस राजाने पुतना या राक्षसीला श्रीकृष्णाला ठार मारण्यास सांगितले. तिने आपल्या स्तनांना विष लावून श्रीकृष्णाला दूध पाजण्याच्या बहाण्याने जवळ बोलविले. परंतु श्रीकृष्णाने तिचा कावा ओळखला व तिचा वध केला. गोकुळातील सर्व गवळ्यांनी मयत पुतनाच्या देहाला गोवऱ्यात होळीत जाळून भस्म केले.
अमंगलाचा नाश झाला. त्यामुळे तो दिवस गोकुळवासीयांनी आनंदाने साजरा केला. त्या दिवसाची आठवण म्हणून होळी पेटविण्यात येऊ लागली. तीच ही होळी पौर्णिमा.
Holi Information in Marathi | होळी पौर्णिमा/होळी उत्सव
भक्त प्रल्हादाची कथा.
हिरण्यकश्यपूने भगवान विष्णूंचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तितकारा होता.
पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विष्णूंचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने प्रल्हादाला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली,
” मला वर लाभल्यामुळे आगीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन आगीत बसते.”
त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण प्रल्हादाला घेऊन आगीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण आश्चर्य घडले वर मिळालेली होलिका आगीत जळून भस्म झाली. प्रल्हाद मात्र आगीतून सुखरूप बाहेर आला.
भक्त प्रल्हादाने जणू अग्निपरीक्षाच दिली. त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते असे मानले जाते.
रघुराजाची कथा.
सत्ययुगात रघू नावाचा एक सर्व गुणसंपन्न, प्रतापी राजा होता. एके दिवशी काही लोक वाचवा! वाचवा! असे ओरडत रघु राजाकडे आले. महाराज ढुंडा नावाची एक राक्षसी आमच्या मुलाबाळांना त्रास देते. तिच्यावर कोणत्याही मंत्र तंत्राचा परिणाम होत नाही. तिची सर्वांना भीती वाटते.
हे सर्व राजाला सांगत असतानाच वसिष्ठ ऋषी तेथे आले. ते म्हणाले ही ढुंढा राक्षसी माली नावाच्या दैत्याची मुलगी आहे. तिने भगवान शंकरांची आराधना करून. ” मला देव, मनुष्य, राक्षस, शस्त्र अस्त्र इत्यादींपासून कधीही मृत्यू येऊ नये “असा वर मागून घेतला होता. हा वर देताना भगवान शंकरांनी तिला सांगितले, तुला उन्मत्त मुलांची भीती राहील. आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा आहे. या दिवशी सर्वांनी धीट बनावे.
आरडा ओरड करावा. नाचावे, गाणी म्हणावीत, लहान मुलांनी लाकडाच्या तलवारी घेऊन युद्धाचा खेळ खेळावा. लाकडे, गोवऱ्या, गवत इत्यादी गोळा करून त्यांचा ढीग तयार करावा व तो मंत्रपूर्वक पेटवावा. यालाच होळी म्हणतात. पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घालाव्यात, आरडा ओरड करावी, आक्रोश करणाऱ्या मुलांच्या तलवारीच्या भीतीने ती राक्षस पळून जाईल पुन्हा येणार नाही.
वसिष्ठांनी असे सांगितले असता रघुराजाच्या आज्ञेने त्या फाल्गुन पौर्णिमेला सगळीकडे होळ्या पेटवल्या. आरडाओरड केला. त्यामुळे घाबरलेली ढुंढा राक्षसी पळून गेली. त्या दिवसापासून हा ढुंढा राक्षसीचा उत्सव सुरू झाला. गावावरील पिडा नाहीशी व्हावी, गावावरील संकट दूर व्हावे व ते पुन्हा कधीही येऊ नये यासाठी होळीचा उत्सव करावयाचा असतो. असेही काही लोक मानतात.


होळी तयार करण्याची पद्धत.
खेडेगावात मुले घरोघरी फिरून गोव-या, लाकडे गोळा करतात. सडा टाकून मैदानाची जागा साफ करतात. त्यावर रांगोळ्या काढल्या जातात. हळद कुंकू वाहतात. गोव-या व लाकडे रचून एक उंच आकर्षक ढिगारा केला जातो. मान्यवरांकडून होळीची पूजा केली जाते. नंतर होळी पेटवतात. पेटलेल्या होळीत नारळ, पैसे नैवेद्य होळीत टाकला जातो.
बोंब मारण्याची प्रथा.
अनेक जण होळीला प्रदक्षिणा घालतात. होळी भोवती फिरतात बोंब मारण्याची पद्धत आहे. परंतु सध्या बोंब मारण्याच्या पद्धतीची जागा अर्वाच्या शिव्या व आरडा ओरड यांनी घेतली आहे. याच दिवशी भगवान शंकरांनी मदनाला जाळून भस्म केले. शिवगणांनी वाईट शब्द उच्चारून मदनाचा धिक्कार केला. म्हणूनच कदाचित, या दिवशी होळी पेटवल्यावर आचकट विचकट शिव्या देण्याची चाल पडली असावी.
काही ठिकाणी या होळीच्या दिवशी चांदण्या रात्री अनेक खेळ खेळले जातात. रात्र सर्वजण मजेत, आनंदात जागरण करून घालवितात. होळीच्या गरम राखेवर पाणी तापवून लहान मुलांना न्हाऊ घालण्याची पद्धत काही ठिकाणी आहे.
होळीचा संदेश.
जे वाईट आहे, त्रासदायक आहे, कालबाह्य आहे, हे सर्व नष्ट व्हावे. विषमता, भेद नाहीसे व्हावेत व समतेचे जग निर्माण व्हावे हाच या सणाचा संदेश आहे
Other Articles