
Marathi WhatsApp Status
१) सरळ, साधं जीवन जगणारी, कष्टाळू; पण आनंदी वृत्तीची वत्सल स्त्री हाच कौटुंबिक जीवनाचा खरा आधार आणि पाया होय.
२) जीवन स्वीकारण्यात सुख असतं नाकारण्यात नाही.
३) मानवी मन व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणारे होऊनी जाते.
४) वाढत्या मनाबरोबर नम्रता ही वाढती ठेवा.
५) फलाची अशा न करता, यशापयशाची खंत न करता, कर्तव्य करणे हाच कर्मयोग!
६) जीवनात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत बुद्धीची स्थिरता आणि मनाची प्रसन्नता!
७) संयम आणि शांती ही सुसंस्कृत माणसाची लक्षणे आहेत.
८) खरा धर्म हाच, की माणसाला ज्या गोष्टी आपल्या बाबतीत होऊ नयेत असं वाटतं; त्या गोष्टी त्यानं दुसऱ्याच्या बाबतीत करू नयेत.
९) क्षमाशीलता हे माणसाचं प्रमुख भूषण आहे.राग हा माणुसकीचा शत्रू आहे.
१०) तू स्वतःशी जसा वागतोस, तसा दुसऱ्यांशी वाग. यापेक्षा अधिक कल्याणकारक तत्त्वज्ञान जगात दुसरं कोणतं आहे?
Inspirational Marathi WhatsApp Status
११) भांड्याला भांड लागून आवाज व्हायचाच, पण म्हणून काही भांडी फोडायची नसतात. भांडी एकत्र ठेवलीच पाहिजेत.
१२) स्तुती करण्यात अतिरेक वाईट; पण कंजूसपणा त्याहून वाईट! टीका व निंदा करणारे अनेक आहेत. त्याला फारशी बुद्धी लागत नाही.
१३) ज्याला जीवन जगायचं आहे, मानवी आयुष्याचा खराखुरा अर्थ जगण्याची इच्छा आहे, त्यानं आपल्याच अनुभवांना अधिक किंमत द्यायला हवी.
१४) जगातील निम्मी दुःखं मनुष्य आपल्या कल्पनेने निर्माण करतो हेच खरं !
१५) मागू ती गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे ,हा अहंकारच मनुष्याच्या सुखाचा सत्यानाश करीत असतो.
१६) नात्याच्या प्रेमापेक्षा ‘ प्रेमाचे नातेच ‘अधिक किमती असते.
१७) जो दुसऱ्याच्या बागेतली फुलं तुडवितो, त्याच्या बागेतीली वेलीला कधीच फुलं धरत नाहीत.
१८) आपल्या मनाजोगे पत्ते हाती आले नाहीत; तरी जी पाने हाती पडतील; त्यांनी जीवनाचा डाव खेळावाच लागतो.
१९) कोमल फुल आणि कोमल शब्द चुरगाळता येत नाहीत.
२०) नादब्रह्म आणि परब्रम्ह ही जुळी भावंड आहेत. म्हणूनच ब्रह्मानंद देण्याचे सामर्थ्य दोन्हींच्याही ठिकाणी सारखंच आहे.
Life Thoughts Marathi WhatsApp Status
२१) माझ्या सुखी अवस्थेचं सगळ्यात मोठे रहस्य म्हणजे मी स्वतः विषयी कमीत कमी विचार करायला लागलो.
२२) भीतीला सामोरे जाण्याचा एक उपाय म्हणजे लहान लहान कामात मन गुंतवणे.
२५) जीवनात संयम, समाधान, सावधानता, सौजन्य ह्या चार गोष्टी यशाची, जीवनाची, दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
२६) महापुरुषांना मोठे करणाऱ्या माताच आहेत. मानवतेवर, जीवनावर निस्वार्थ उत्कट प्रेम करायला, ते कृतीतून व्यक्त करायला त्यांनीच मुलांना शिकवलं.
२७) जग सुधारायला जाऊ नका, त्याच्या नादी लागू नका, स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.
२८) समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य व हेच खरं ऐश्वर्य!
२९) ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम असला तरी तो आपण खातो; त्याप्रमाणे भगवंताने एखादेवेळी दुःख दिलं तरी ते आनंदाने सोसायला पाहिजे.
३०) भारतीय आदर्श जीवनात दया, क्षमा, शांती या तीन गुणांना फार महत्त्व दिलेलं आहे.
Motivational Sayings Marathi WhatsApp Status
३१) सूर्यापासून मिळवलेला पर- प्रकाशितपणाही चंद्राला चांदणं देऊन जातो.
३२) ज्याने आजोबा-आजीच्या आंतरिक प्रेमाचा अनुभव घेतला असेल; त्यालाच कळेल हे नाजूक प्रेमतंतू<br>तोडणं किती कठीण आहे!
३३) देवानं जग हसण्यासाठी बनवलं आहे, रडण्यासाठी नव्हे.
३४) भगवान महावीरांचं सूत्र आहे: जे आपल्यासाठी मागता, ते इतरांसाठी मागा. जे आपल्यासाठी मागत नाही, ते इतरांसाठी मागू नका.
३५) पारिजातक जसा वैराग्य वृत्तीने परोपकारी जीवन जगतो, आसमंत सुगंधी, आनंदी करून टाकतो, तसं आपलं जीवन असावं.
३६) कोणत्याही संकटास न डगमगता प्रत्येकाने धर्याने अखंड प्रयत्नशील राहावं.
३७) माणसाला सुख मिळत नसतं, हे मिळवावं लागतं,मानावं लागतं हीच तर अध्यात्माची शिकवण!
३८) प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे.तो रक्तात असावा लागतो.त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो.
३९) आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं, ही भावना फार सौख्यदायक असते.
४०) सुख-सुख म्हणजे तरी काय? समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही.
४१) माणूस निराळा वागतोय, बिघडला, कामातून गेला असं पटकन आपण एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं.त्या सगळ्यांचा अर्थ तो आपल्याला हवा तसं वागत नाही, एवढाच असतो.
४२) दुसऱ्याने दिलेला त्रास आपण मनानं स्वीकारला तरच होतो. आपण अलिप्त राहिलो, तर दुःख होणार नाही.
निंदा ऐकूनही प्रसन्नता कायम ठेवणे यात खरी तपश्चर्या आहे.
४३) दानामध्ये एक अशी अपूर्व शक्ती आहे की, ते दिल्यावर तिपटी चौपाटीन वाढत जातं.
४४) माणसातील माणूसपण जागं करते तेच खरे शिक्षण.
४५) आईचं मन ही एक विलक्षण चीज आहे. मुलांसाठी संकट झेलताना तिच्यात अपार शक्ती येते आणि आनंदी होण्यासाठी मुलाचा एखादा हुंकारही तिला पुरतो.
४६) आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असं वाटलं पाहिजे.
४७) धान्याचे शेकडो कण देणाऱ्या एका बीजाला जमिनीत गाडून घ्यावंच लागतं.
४८) गढूळ आणि गलिच्छ पाण्याचे लोटच्या लोट घेऊन नद्या समुद्राच्या तोंडात शिरतात, पण त्यापैकी एकाही नदीला समुद्रानं आतापर्यंत परत पाठवलं आहे का?
४९) बागेत माळ्याच्या मागून जाणाऱ्या पाटाच्या पाण्यासारखं आपलं मन हवं.
५०) भीती विषयापासून दूर पळण्याऐवजी तटस्थपणे त्याचे विश्लेषण करून मात करण्याचे खरे साधन आहे.
५१) भीतीकडे तुम्ही स्थिर तटस्थ नजरेने पहा,तिचे अर्धे बळ संपुष्टात येईल.
५२) नदीमुळे माणसांना जीवन मिळते, गाईमुळे दूध मिळते, झाडापासून फळे, फुले मिळतात, तसेच दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यातच मनुष्य जन्माचे सार्थक होते.
Follow Us on YouTube- Marathi Antarang
Other Articles-
Best 100+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
1 thought on “Top 50+ Marathi WhatsApp Status Quotes for 2025”