डॉ. सुनील कुमार लवटे | दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन Part – 2

डॉ. सुनील कुमार लवटे

डॉ. सुनील कुमार लवटे यांचे भाषण.
मागील ब्लॉग वरून पुढे.
उत्तर प्रदेश असेल तर अस्सलिखित हिंदी बोलता आलं पाहिजे, गुजरात मध्ये गुजराती बोलता आलं पाहिजे, महाराष्ट्रात असाल तर मराठी अस्सलिखित बोलता आलं पाहिजे.परप्रांतीय हा शब्द अत्यंत अनपार्लमेंटरी शब्द आहे.

परप्रांतीय याचा अर्थ जो प्रांत भारतात नाही असा आहे. पण आपण हा शब्द चुकीचा वापरतो. करण वर्तमानपत्रात तो शब्द आल्यामुळे व मराठीच्या प्राध्यापकांनी आपल्याला या शब्दाबद्दल न सांगितल्यामुळे, आपण इतर राज्यातील लोकांना परप्रांतीय असे संबोधतो. परप्रांतीय या ऐवजी अन्य प्रांतीय असा शब्द वापरायला पाहिजे. असे शब्दांचे खेळ आपण साहित्यिक म्हणून करता आले पाहिजेत.

व्यवसायाच्या अनेक संधी भाषा व्यवहारामध्ये निर्माण झालेल्या आहेत. एक काळ असा होता की कथा कादंबऱ्या लिहून पोट भरायचं! खरं सांगायचं तर साहित्यिकांचे पोट लिहून कधीच भरले नाही. त्यांना असे पैसे कधीच मिळाले नव्हते.
जसे वर्तमान काळात सध्याच्या लेखकांना मिळतात. अत्यंत हलकीच्या परिस्थितीत मराठी साहित्यिकांनी ‘ अक्षर जागर ‘ जागवलेला आहे. म्हणून मराठी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आपण भाषा व्यवहार आपल्या घरातून हद्दपार करत आहोत.

मी महाराष्ट्र शासनाला या व्यासपीठावरून आव्हान करणार आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी द्यायचे बंद केल्याशिवाय मराठी शाळांचा विकास होणार नाही. यात शासनाचाही दोष आहे असं नाही. तर आपलाही पालक म्हणून दोष आहे. सध्याच्या पालकांना असं वाटतं की बाळ जन्माला येतानाच एबीसीडी म्हणत याव ! अशी आपली रम्य कल्पना असल्यामुळे आपण घरात इंग्रजी रुजवत असल्यामुळे आपले सर्व व्यवहार बदलून गेले. हे शब्द व्यवहार नाहीत तर आपण आपली संस्कृतीच बदलून टाकली. आपण आपले लोक व्यवहार बदलले पाहिजेत.

साहित्यिक असं छोटं छोटं पाहतो. छोट्या छोट्या गोष्टी बदलल्याने क्रांती हळूहळू होते. अशी न दिसणारी क्रांती होते. अशी न दिसणारी क्रांती म्हणजे परिवर्तन आहे. शस्त्रांनी होणाऱ्या क्रांत्या रात्रीत अयशस्वी होतात, पण हळूहळू होणारी परिवर्तने वर्षोनुवर्षे चालतात.

मित्रांनो मराठी अभिजात भाषा झाली याचा तुमच्यासारखाच मला आनंद आहे. पण मराठी अभिजात भाषा झाली म्हणून आपली मराठी ही मोरासारखी अचानक नाचायला लागेल असे होणार नाही, त्यासाठी तुम्हाला नोबेलशी स्पर्धा करावी लागेल. अजून मराठीला नोबेल मिळालेले नाही. मी सर्व तरुण मित्रांना असं सांगणार आहे की, असं लिहा की तुम्ही लिहिलेल्या कथा, कादंबरीला, कवितेला नोबेल मिळालं पाहिजे. नोबेल मिळणं म्हणजे आपल्या भाषेला जागतिक मान्यता मिळणं आहे ‌. आणि ते असंच मिळत नाही.

नोबेल मिळवणारा साहित्यिक किती श्रेष्ठ असतो मित्रांनो. जो.पो. सार्त्र फ्रेंच विचारवंत यांने आपली कथा लिहिली. तिचं नाव होतं लेमो. लेमो म्हणजे शब्द. त्याला नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याने ते नोबेल पारितोषिक नम्रपणे नाकारले. साहित्यिक आणि लेखक यात मूलभूत फरक आहे? लेखक खर्डेघाशी करतो. साहित्यिक प्रतिभेने लिहितात. आपल्याकडे रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेले नोबेल, आपल्या देशात ते नाही. ते चोरीला गेले आहे. आपल्याकडे प्रतिकृती आहे. ओरिजनल नाही तसेच गांधींचा चष्माही चोरीस गेलेला आहे.

साहित्य आणि कलाकृती किती मोठ्या असतात. लिहायचं तर असं लिहावं. चित्र काढायचे तर असं काढावं. मोनालिसाचे चित्र पॅरिसच्या म्युझियम मधून एका आंतरराष्ट्रीय चोराने ते चोरले. आंतरराष्ट्रीय चोर बाजारात मोनालिसाला ऑफर आली नाही. साहित्य आणि कलेचे मूल्य अमूल्य असतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मराठी साहित्य अशा दर्जाचं होणं हे वर्तमान आतील आपल्या पुढील आव्हान आहे.

आपण आज २०२५ मध्ये 35 वे साहित्य संमेलन आयोजित केले आहे.२०२५ जगाच्या दृष्टीने टेक्नॉलॉजिकल सेव्हिगेट झाल्यानंतरचं रोप्यमहोत्सवी वर्ष आहे. म्हणजे जग टेक्नोसॅव्ही होऊन पंचवीस वर्षे झाली. आता लेखणी परजण्याची गरज नाही.वि.स. खांडेकरांनी आपल्या हयातीत जे लिहिलं ते सर्व पेन्सिलने लिहिलं आहे. पेन्सिलने खांडेकर का लिहावयाचे? तर कल्पनेच्या गतीने लिहिता यावे म्हणून. त्यावेळी टाक आणि दौत असायची. टाक आणि दौत लिहिताना खलन म्हणजे व्यत्याईचा. म्हणून ते पेन्सिलने लिहावयाचे. आता याची गरज नाही. आज कॉम्प्युटरवर/मोबाईलवर दोन तर्जनींच्या साह्याने स्पीडमध्ये शब्द टाईप करता येतात. लेखनाच्या गतीच्या काळात जर तुम्ही बॉल पेन घेऊन लिहीत बसला तर तुम्ही तितक्याच गतीने मागे जाल. तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या गतीने पुढे जायचे असेल तर आज भाषेत नवनवीन ॲप्स आले आहेत. त्याचा उपयोग करा. डिक्शनरी आता शोधायची गोष्ट राहिली नाही, ही ऐकण्याची गोष्ट झाली आहे. तुम्हाला विविध भाषांमध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ लगेचच गुगलवर शोधता येतो. हे जे तंत्रज्ञानाचा वरदान जे भाषांना मिळालेला आहे. मराठी भारतीय भाषा म्हणून समृद्ध व्हायची तर मराठीनी ॲप ओरिएंटेड भाषांतर, संपादन ,केले पाहिजे.

आजकाल असं सांगितलं जातं की, साहित्यिकांच्या मेंदूच्या वळ्या कमी व्हायला लागल्या आहेत. करण वर्तमान साहित्यिक कमी विचार करायला लागलेत. आणि पुढे पुढे तर फ्लॅट ब्रेनची पिढी जन्माला येईल. जशी फ्लॅट अर्थ जशी निर्माण झाली. वर्ल्ड इज फ्लॅट असं काहीतरी निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठी पुढची ही नवी नवी आव्हाने आहेत. ही आपण वर्तमानात समजून घेतली पाहिजेत. लोक असं म्हणतात भारतीय भाषांमध्ये तुलनेने मराठी भाषा ही तितकी सकस आणि सशक्त नाही. हे खरं आहे. हिंदी वाचायला लागा. मग मराठी हिंदीच्या तुलनेने कशी सर्वसमावेशक नाही हे हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागेल. इंग्रजी वाचायला लागा, हिंदी जगा इतकी सर्वसमावेशक नाही हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल. भाषेच्या दृष्टीने आणि खरं म्हणजे साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने जग कुस बदलायला लागलं आहे. माझी अशी धारणा आहे की एकेकाळी मराठीमध्ये देशी वादाच मोठ समर्थन करणारे साहित्यिक निर्माण झाले. आजही त्यांचा एक मोठा संप्रदाय देशीवादाच समर्थन करणारा मी वाचत असतो. मी तुम्हाला असं सांगेन की देशीवाद, प्रादेशिक वाद, स्त्री-पुरुष वाद, ग्रामीण, दलित वगैरे असे छोटे छोटे साहित्यांचे प्रवाह जगाने केव्हाच सोडून दिले आहेत.

आता जग विचार करतं साहित्य प्रवाहामध्ये ते कॉन्टिनेंटलच्या भाषेमध्ये की एशियन कॉन्टिनेन्टल लिटरेचर काय आहे? युरोपियन कॉन्टिनेन्टल लिटरेचर काय आहे, आफ्रिकन कॉन्टिनेन्टल लिटरेचर काय आहे, आणि आता त्या त्या खंडांच्या साहित्याला एक चेहरा निर्माण व्हायला लागला आहे.

आपण आशिया खंडातील लोक आहोत. आपली स्पर्धा किमान आपल्या आशिया खंडातील ज्या भाषा आहेत, त्यातील चीन , जपान यांना जितकी नोबेल मिळाली तितकी इतर एशियन भाषांना मिळाली नाहीत. कोरियनला मिळालेलं आहे. भाषांतराची जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो.१९८० पासून मी अनुवाद करतो. ‘ खांडेकर की श्रेष्ठ कहानिया ‘ हे पुस्तक पहिल्यांदा हिंदीत प्रकाशित केले.

तेव्हा भाषांतरकार म्हणून माझं नाव इतक्या छोट्या अक्षरात लिहिलं होतं. भाषांतर कराला पूर्वी प्रतिष्ठाच नव्हती.
आज भाषांतरकार असं सांगतात की मुखपृष्ठावर माझं नाव असण्याच्या अटीवर मी भाषांतर करतो. आणि एवढेच नव्हे एका पोर्तुगीज कवीला नोबेल मिळाले. हे कशामुळे मिळालं? तर इंग्रजीमध्ये भाषांतर केल्यामुळे मिळाले. त्या पोर्तुगीज कवीला नोबेल मिळाल्यानंतर त्या इंग्रजी भाषांतरकाराने नोबेल मधील निम्मी रक्कम मागितली. यातील 50% वाटा माझा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला 50% रक्कम मिळाली पाहिजे. असं भाषांतरकार म्हणाले. मी तुमच्या कवितेचे पुर्नसर्जन केलेलं आहे भाषांतर केले नाही. मी तुमच्या कवितेला पुनर्जन्म दिला आहे. भाषांतरही पुर्नजन्माची नवी परी आहे. हे देखील आपण केव्हातरी समजून घेतले पाहिजे. अशी नवी नवी साहित्याची क्षितिज उदय पावत असतात. आपण केवळ मराठीच्या परिघामध्ये विचार करत राहू तर आपलं मराठीचं जग छोटं राहील.

आपली स्पर्धा जगाच्या श्रेष्ठ अभिजात, श्रेष्ठ भाषांशी असली पाहिजे. जगातील श्रेष्ठ भाषा स्पॅनिश, लॅटिन, इंग्लिश, जॅपनीज या जगातील अभिजात भाषा आहेत. त्यांचे साहित्य आपण वाचायला पाहिजे. मराठी कमजोर का? तर आपण अन्य भाषेतील साहित्य मराठीत आणतो. तसे मराठी साहित्याचे भाषांतर इतर भाषेत केले पाहिजे. बहुभाषिक साहित्याची आवर्तन जेव्हा निर्माण होतात, तेव्हा तेव्हा तुम्ही हळूहळू भारतीय, नंतर वैश्विक साहित्य होता. मराठी भाषा आणि साहित्य व्यवहार वैश्विक झाला पाहिजे. हे आव्हान आपण नव्या काळात पेलूया. तसे प्रयत्न मराठी साहित्यिक आणि भाषिक संशोधकांनी करावेत असे आवाहन करतो.

डॉ. सुनील कुमार लवटे | दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन

Leave a Comment