Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
१) कृतिशील पुरुषच खरा शहाणा.
२) शिकवलेली अक्कल व बांधलेली शिदोरी किती दिवस पुरणार.
३) आपल्या नित्याच्या कृतीने, जो आपल्या आई-वडिलांना संतुष्ट करतो, तोच आदर्श मुलगा.
४) अधमाच्या मदतीपेक्षा, सज्जनाकडून अपेक्षाभंग परवडला.
५) कामाची यशस्विता, अचूक कार्यपद्धती करणाऱ्यावरच असते.
६) कामात कुशलतेची जोड व्हावी.
७) जे स्वार्थ नसतानाही परहिताचा नाश करतात, त्यांना काय म्हणावे? ते कळत नाही.
८) खावं, त्यावर आणि चैन करावी, एवढेच सुखासीन व्यक्तीचे काम.
९) राजा, देवता व गुरु यांना रिक्त हस्ते भेटू नये.
१०) प्रतिज्ञापालन हे फार मोठेपणाचे लक्षण.
११) श्रीमंतांना गरिबांची व दलितांची दुःखे दिसत नाहीत.
१२) मानव आपल्या दररोजच्या कृतीतूनच आपली प्रतिमा घडवीत असतो.
१३) पी हळद की हो गोरी.
१४) बोलणं सोपं, करण कठीण.
१५) आपला शब्द जेथे सफल होण्याची शक्यता असेल, तेथेच शब्द टाकावा.
१९) वनेच्या वने जाळणाऱ्या वणव्याला वारा मदत करतो.
२०) जन्म देणारी माता, शालामाता व भारत माता यांना कृतज्ञतापूर्वक वंदन.
Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
२१) जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे.
२२) बहुजन समाजाचे हित व सुख हेच खरे ध्येय.
२३) जो विद्वान आहे तोच विद्वानाचे परिश्रम जाणू शकतो.
२४) ब्रह्मदेवाने आपल्या नशिबी लिहिलेले अटळ असते.
२५) एकमेका सहाय्य करू, धरु अवघा सुपंथ.
२६) दुसऱ्यासाठी झिजलात, तर जगलात.
२७) मूर्ख लोकांच्या संसर्गापेक्षा, जंगली लोकांबरोबर भटकणे बरे.
२८) मानी माणसाला नातेवाईकापुढे दैन्य दाखविण्यास मृत्यूप्राय दुःख होते.
२९) पोशाखावरून माणसाची पारख होते.
३०) रोग परीक्षा न होता, औषध योजना काय कामाची?
Inspirational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
३१) हत्ती विकून टाकला, आणि आता अंकुशाच्या किमतीसाठी घासाघीस कशाला?
३२) एकदा ठेच लागल्यावर, शहाणपण आले पाहिजे.
३३) अडचणीच्या वेळीही जो धावून येतो, तोच खरा मित्र.
३४) शहाण्याला शब्दाचा मार.
३५) असाध्य ते साध्य सायास करिता.
३६) कष्टाशिवाय विद्या कुठली?
३७) विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे.
३८) टाकीचे घाव सोसल्याखेरीस देवपण येत नाही.
३९) हानीच होणार असेल तेव्हा शहाणा देखील मूढ होतो.
४०) बुडत्याला काडीचा आधार.
Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
४१) संकट ही मित्र पारखण्याची कसोटी.
४२) विवेकभ्रष्ट व्यक्ती अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकते.
४३) मुलांनी वृद्ध, कर्तव्यदक्ष पालकांना सन्मानाने वागवावे.
४४) जशास तसे.
४५) श्रद्धेने दान द्या.
४६) शब्दाचा घाव तलवारीच्या वारापेक्षा अधिक वर्मी लागतो.
४७) श्रेष्ठत्व जन्मावर अवलंबून नसते, ते अंगच्या गुणावर असते.
४८) आजचे काम आजच करून उद्याचे थोडे काम आज करा.
४९) आरोग्य हीच संपत्ती.
५०) श्रद्धा, ज्ञानाचा ध्यास व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्याला ज्ञानप्राप्ती होते.
५१) खऱ्या गुरुला वाटते, आपला शिष्य आपल्यापेक्षा वरचढ व्हावा.
Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
५२) शील (चारित्र्य ) मानवाचा मोठा मौलिक अलंकार.
५३) हे पोपटा, तुझ्या मधुर- वाणीनेच तुला पिंजऱ्यात अडकवून ठेवले आहे.
५४) विशुद्ध बुद्धी हीच कामधेनु.
५५) चांगल्या कामाला विलंब नको.
५६) शूराला मरण कस्पटासारखे वाटते.
५७) चांगले अपत्य आपले घराणे प्रकाशित करते.
५८) सत्याला मरण नाही.
५९) सज्जनांची संगत सर्व काही प्राप्त करून देते.
६०) प्रामाणिकपणा ही खरी नीतिमत्ता.
Inspirational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
६१) एखाद्या समान गुणामुळे मैत्री जमते.
६२) एकच धंद्यातील लोक परस्पराशी साशंकतेने पाहतात.
६३) आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे ते कार्टे.
६४) माणसाने मिळेल त्यात समाधान मानावे.
६५)सद्- विचार आणि सदाचार, सर्व दुःख दूर करण्यासाठी उपाय.
६६) लोक श्रीमंतांना सर्व गुण चिटकवतात.
६८) मी तुझ्यासोबत आहे, तू एकटा नाहीस.
६९) सगळेच नेतेपदासाठी झगडू लागले तर त्यांचे अनुयायी कोण होणार? सर्वांचा नाशिक अटळ.
७०) एकीचे बळ.
Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
७१) चुकणं हा मनुष्यधर्म आहे.
७२) स्वतःचा विनाश होत असतानाही, सज्जन परहितदक्ष राहतो.
७३) ग्रंथ हेच गुरु.
७४) आपलं दुःख आपल्या माणसाला सांगितल्यावर जरा हलके होते.
७५) कमवा आणि शिका.
७६) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
७७) काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत.
७८) नाव मोठं, लक्षण खोटं.
७९) स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.
८०) रोजचा अभ्यास चुकवू नका.
Inspirational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
८१) साधी राहणी, अन् उच्च विचारसरणी.
८२) शिक्षण म्हणजे आपल्या अज्ञानाचा वेध घेणारा प्रगत शोध होय.
८३) आनंदी मन माणसाचा मोठा खजिना.
८४) उथळ पाण्याला खळखळाट फार.
८५) दोष काय किंवा गुण काय, संगतीमुळेच प्राप्त होतात.
८६) सज्जना दुर्जनाचे भय फार.
८७) साहस केल्याशिवाय संपत्ती मिळत नाही.
८८) सिंहाचा छवा आपल्या उपजत गुणामुळे हत्तीच्या कळपावर झेप घेतो.
८९) आपलं सुख किंवा दुःख आपणच निर्माण करतो.
९०) काही वेळा बाळाचे बोलही अनुकरणीय असतात.
Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी
९१) सोन्याची कमळे करणारे अनेक सोनार आहेत पण त्यात सुगंध भरणारा कुशल ब्रह्मदेव एकटाच.
९२) पूर्वजन्मीच्या पाप-पुण्यनुसार प्रत्येक मनुष्याला देह प्राप्त होतो.
९३) स्वतःच्या कामात रस घेऊन, काम करणाऱ्या व्यक्तीस सुयश लाभते.
९४) आळशी ज्ञानशून्य झालेला असतो.
९५) दातृत्व हाताचा अलंकार.
९६) दूध व पाणी मिश्रणातून, हंस फक्त दूध पितो.
९७) जे जे चकाकते, ते सर्व सोने नसते.
९८) अग्निदिव्यातून सोन्याचा कस कळतो.
९९) क्षणिक प्रमाद कित्येक वेळा मानवाचे पतन करतो.
१००) कणाकणाने धन आणि क्षणाक्षणाला ज्ञान जमा करता येईल.
१०१) खऱ्या सौंदर्याचा प्रत्यय क्षणाक्षणाला येतो.
१०२) जखमेला मीठ चोळणे हा एक दुर्जनांचा धंदा.
१०३) खरा वीर मोठ्या मनाने क्षमा करतो.
१०४) आपली कार्य व ज्ञान शक्ती वापरल्याने, ती वाढतच राहते.
Other Article: Best 90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students
Get Your Copy on Amazon
1 thought on “Best 100+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी”