Think Straight Book Summary in Marathi

थिंक स्टेट पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे
Think Straight Book Summary in Marathi

थिंक स्टेट ( Think Straight)
लेखक: डारियस फरु.
अनुवाद : सरिता आठवले.
या पुस्तकाची मराठीतून समरी

1)विचारांत गोंधळ ते स्पष्टपणा :

१) हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लेखक लंडनच्या जवळ वन बीएचके सदनिका भाड्याने घेण्याचा करार करतो. सदनिका ताब्यात घेण्यासाठी तो निघतो. लेखकाला मदत करण्यासाठी त्याचे आई-वडील व त्याचा भाऊ गाडी घेऊन हॉलंडहून येतात. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सदनिका ताब्यात मिळाली नाही कारण नव्या घरमालकिणीने तिचा निर्णय अचानक बदलला. राहायला जागा नाही, सगळे सामान गाडीत भरलेले व आई वडिलांना हॉलंडहून बोलाविलेले अशा गोंधळाच्या स्थितीत लेखक सापडतो.

लेखक दुसरा पूर्ण दिवस स्वतःला दोष देत चरफडत राहतो. व दुसरीकडे राहण्यासाठी एक खोली आठवडाभरासाठी घेतो. पण त्याचवेळी काही दिवसातच पहिल्या घरमालकिणीने विचार बदलला व ती सदनिका भाड्याने लेखकाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राहण्याची चिंता मिटली. तत्पूर्वी सदनिका मिळेपर्यंत दोन-चार दिवस लेखक चिंतातूर व तणावाखाली होता. तेव्हा लेखक म्हणतो मी जरा जास्तच भावनाप्रधान झालो होतो. त्यावेळी मी मूर्खासारखा विचार करत होतो.

मी स्वतःच इतका वेळ गुंतून पडलो होतो की, मला परिस्थितीचे भानच राहिले नाही. त्यामुळे प्रचंड चिडचिड झाली. यातून लेखक स्वतःला सावरतो. काही गोष्टी गृहीत धरून निष्कर्ष काढण्यात आणि निर्णय देण्यात आपण नेहमीच घाई करतो. आपण चुका करतो कारण आपण माणसे आहोत. सुरुवातीला सुसूत्रपणे लेखकाने विचारच केलेला नव्हता. त्यानंतर लेखकाने स्वतःला बजावले साधा सरळ विचार कर.

२) आयुष्य सरळ रेषेत आखलेले नसते.

आयुष्य जगत असताना आपण काही गोष्टी गृहीत धरतो. आपण शिक्षण घेतले पदवी मिळविले की, लगेचच आपण पैसे कमवावयास लागू असे आपणाला वाटते. इथे आपले गृहीत चुकते. लेखक म्हणतो पैसा कमावणे व तुमची पदवी यांचा काहीही संबंध नसतो. एखादा व्यवसाय निवडून त्यातून पैसे कमवावयाचे असतील तर तुम्हाला एखादे कौशल्य शिकावे लागेल, किंवा मुळात ते तुमच्याकडे असले पाहिजे.

कौशल्यच तुम्हाला आयुष्यात पैसे मिळवून देईल. लेखकाने केलेला
व्यवसाय अयशस्वी झाल्यावर लेखकाला समजले आयुष्य साधे सरळ नसते. हा विचार कळल्यावर आपणास कळते की, आपल्या विचारात बदल करण्याची गरज आहे. अनेक जण एखादी गोष्ट करत असतील तर आपण ती मुळीच करू नये असा सल्लाही लेखक देतो.

३) विचारांना चाळणी लावा.
(Filter your thoughts.)

जगात प्रचंड माहितीचा साठा उपलब्ध असतो. ती सर्वच माहिती आपल्या मेंदू ने घेतली तर आपल्या मेंदूत माहितीचा खूप मोठा साठा निर्माण होईल. त्यातील बरीच माहिती अनावश्यक असेल. त्या माहितीचा आपल्याला काहीच उपयोग नसतो. आपले ध्येय गाठण्यासाठी सुकतमाकत शिकणे हे धोरण व्यवहार्य नाही. दुसरे अनुमानात्मक धोरण म्हणजे लोक काय म्हणतील, यावर आपले बरेचसे निर्णय अवलंबून असतात. तसेच परिचयाचे धोरणाचे परिणाम समाधानकारक असतातच असे नाही. तुमच्या पूर्वीच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून न राहता. आपण व्यवहार्य निर्णय घेतले पाहिजेत. यासाठी अनेक विचार गाळण्यास आपण शिकले पाहिजे. हवे ते परिणाम घडवून आणण्यासाठी काही विचारांना गाळले पाहिजे.

३) निरुपयोगी विचार करणे थांबवा :

आपल्या मनात विचार प्रक्रिया सातत्याने सुरू असते. आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांबद्दल आपण कधी विचारच करत नाही. अशा
( निरुपयोगी) विचारांचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही, पण तरीही असे विचार आपल्या मनात घोळत असतात. अशा विचारांची आपल्या मनातून हकालपट्टी आपण करू शकत नाही. आपल्या मनात येणाऱ्या विचारांना आपण रोखू शकत नाही. आपल्या मनात येणाऱ्या विचारांची जाणीव ठेवून; आपल्याला कोणत्या विचारांकडे दुर्लक्ष करता येईल व कोणत्या विचारांना महत्त्व देता येईल, याचा विचार मात्र आपण नक्की करू शकतो. काही विचार आपण जाणीवपूर्वक टाळू शकतो.

५) विचार करण्यास भरपूर वेळ घ्या.

आपल्याला कुणी काही विचारले तर आपण झटकन त्यावर प्रतिक्रिया देतो. असे उत्तर काहीही विचार न करता दिलेले असते. खरंतर काही वेळा आपल्याला उत्तर माहित नसते, अशावेळी लेखक आपणाला सांगतात कुणी काही विचारले तर मला माहित नाही हे उत्तर देणे योग्यच असते. कधी कधी विचार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागला, तरी हरकत नाही. विचारपूर्वक उत्तर द्यायला आपण शिकले पाहिजे.

६) मन मोकळे करा.

आपण आपले काम सातत्याने करत असतो. काही काळानंतर आपण मानसिकरित्या खचतो. अचानक मन बधिर होते. आपण करीत असलेली अनेक कामे कुचकामी वाटायला लागतात. उत्साह मावळतो, आपले सगळे संपले अशी भावना निर्माण होते.
नकारात्मक भावना निर्माण होतात. अशावेळी लेखक म्हणतात थोडे थांबायचे असते, स्वतःला उत्तेजन द्यायचे असते. आणि माझ्या मनाला ह्या थकव्यातून बाहेर काढायचे असते. यासाठी लेखक म्हणतात
मी मित्रांबरोबर भटकतो, टेबल टेनिस खेळतो, आवडते संगीत ऐकतो, सिनेमा पाहतो. यावेळी मी पूर्ण आराम करतो. कामाचा विचार करत नाही. त्यामुळे मेंदू ताजातवाना होतो. मी परत ऊर्जास्थितीला येतो.

७) विचार न करणे महत्त्वाचे.

मनात येणारे अनावश्यक विचार झटकून टाका. अजूनही तुम्ही सातत्याने उपयुक्त विचार करत नसाल, तर तुम्ही अजूनही तुमच्या मनाला योग्य वळण लावले नाही. असा त्याचा अर्थ होतो. भूतकाळ आणि भविष्य काळाची चिंता करून काहीही फायदा होणार नाही. असे निरूपयोगी फालतू विचार जाणीवपूर्वक न करणे महत्त्वाचे आहे.

८) भूतकाळ आठवत बसू नका.

बरेच लोक भूतकाळात रेंगाळत असतात. आपले जुने व्हिडिओ, फोटो, कागदपत्रे, प्रगती पुस्तक बघण्यात रममाण होतात आणि वेळ वाया घालवतात. ते भूतकाळात जगत असतात. जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते पटकन घ्या. कारण आपण वर्तमानात जगत असतो.
त्या दृष्टीने स्वतःत बदल करा. लेखक महत्त्वाचा सल्ला देतात
” मागे वळून जरूर पहा, पण त्यातच रेंगाळू नका, कारण आपण वर्तमानात जगत असतो.”

९) अनेक प्रसंगांना तोंड देताना आपली आंतरिक शांती भंग पावते.

अशावेळी मनशांती मिळवायची असते. म्हणून लेखक सुचवितात तुम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देत असाल, तुम्हाला काहीही झाले असले, तरी त्या सर्व प्रसंगांना तोंड देताना तुमचे मन शांत, स्थिर असायला हवे.

लेखकाविषयी :

डारियस फरु यांचे डू इट टुडे Do It Today. या पुस्तकाचा ब्लॉग मी यापूर्वीच लिहिला होता. या ब्लॉगला वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी त्यांचे दुसरे पुस्तक Think Straight हे पुस्तक वाचले. ते मनाला खूपच भावले. विशेषतः तरुणांसाठी हे पुस्तक फारच प्रेरणादायी आहे. शिवाय जीवनात ज्यांना काहीतरी श्रेष्ठ करून दाखवायचे आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक निश्चित मार्गदर्शक ठरेल. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीसाठी हे उपयुक्त असे पुस्तक आहे.
डारियस फरु हे उद्योगपती व प्रसिद्ध ब्लॉगर आहेत. ते पॉडकास्टिंग करतात.
पॉडकास्टच्या त्यांच्या ” डारियस फरु शो ” या कार्यक्रमात त्यांनी अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
पदवी परीक्षेचे शिक्षण घेत असताना, त्यांनी वडिलांबरोबर धुलाईच्या तंत्रज्ञानावर आधारित एक कंपनी सुरू केली.
गेली दोन-तीन वर्षे ते व्यवसाय, उत्पादन विषयी, तसेच जीवन विषयीचे विचार ब्लॉगवर मांडत आहेत. फरु यशस्वी ब्लॉगर आहेत. आज त्यांचे ब्लॉग रोज वाचणाऱ्यांची संख्या तीस लाखापर्यंत पोहोचली आहे.
या संदर्भात फरु म्हणतात मी माझ्या ब्लॉगमधून नक्कीच काही पैसे कमवतो, आणि माझ्यातल्या 17 वर्षीय मुलासाठी हे नक्कीच चांगले आहे. मी फक्त जे शिकलो ते इतरांसाठी सांगत गेलो.
ह्या जगात मानवी मन हे सर्वात प्रभावी साधन आहे. तुमच्या विचारांची दिशा बदला….. तुमचे आयुष्य बदलून जाईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ” विचार करण्याची पद्धत बदलली तर जीवनाला वेगळी दिशा मिळू शकते. ” विल्यम जेम्स.

Other Book Summary: थिंक स्टेट

Read More book summary-Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर ले. शरद तांदळे. या पुस्तकाची समरी


Leave a Comment