परिचय (Introduction)(School Marathi Mhani):
मराठी भाषेतील म्हणी म्हणजे अनुभवाचे आणि शहाणपणाचे सार असलेली लहानशी वाक्यं. या म्हणी शालेय विद्यार्थ्यांना निबंध, भाषण, लेखन आणि संवाद यामध्ये खूप उपयुक्त ठरतात. या लेखात आपण ४५ हून अधिक महत्त्वाच्या मराठी म्हणी त्यांच्या सोप्या अर्थासह पाहणार आहोत. या म्हणी वाचून तुम्हाला नक्कीच भाषेचा गोडवा आणि अनुभवाचे सार समजेल.
म्हण म्हणजे काय?(School Marathi Mhani)
म्हण म्हणजे एखादा अनुभव किंवा जीवनातील सत्य थोडक्यात मांडलेली शिकवण. लोकांच्या रोजच्या व्यवहारात या वाक्यांचा वापर होतो. म्हणूनच म्हणींना “तोंडचे वाङ्मय” किंवा “अनुभवांची खाण” असंही म्हटलं जातं.
—– School Marathi Mhani —–

४५+ अत्यंत महत्त्वाच्या मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ
मराठी म्हण for School Marathi Mhani | अर्थ (सोप्या शब्दांत) |
---|---|
खाई त्याला खवखवी | चुकीचं काम केल्यावर मनात टोचणी राहते. |
गर्वाचे घर खाली | गर्व केल्यास शेवटी अपमानच होतो. |
थेंबे थेंबे तळे साचे | थोड्या थोड्याने मोठी गोष्ट साध्य होते. |
झाकली मूठ सव्वा लाखाची | आपल्या ताकदीचं प्रदर्शन करू नये. |
अति तिथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. |
वासरात लंगडी गाय शहाणी | अडाण्यांमध्ये अर्धवट शहाणालाही मोठेपणा मिळतो. |
तळे राखील तो पाणी चाखील | जबाबदारी असलेल्या व्यक्तीला थोडाफार फायदा होतोच. |
शहाण्याला मार शब्दाचा | शहाण्याला समजायला शब्द पुरतो. |
करावे तसे भरावे | जे कराल, त्याचे फळ मिळतेच. |
अंथरून पाहून पाय पसरावे | आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा. |
इतर म्हणी (क्रमशः यादी)
१) खाई त्याला खवखवी – वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते.
२) खाण तशी माती-आई बापा प्रमाणेच मुले.
३) गर्जेल तो पडेल काय- बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही.
४) गर्वाचे घर खाली- गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते.
५) घरोघर मातीच्या चुली- सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
६) चढेल तो पडेल- उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याला अपयश आले, तर त्यात कमीपणा नाही.
७) चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे- प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच.
८) चोराच्या मनात चांदणे- वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.
९) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी- आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. उपकार घेतले की लाचारी.
१०) झाकली मूठ सव्वा लाखाची- आपले गुणावगुण झाकून ठेवावेत, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये.
११) टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही- अपरंपार कष्ट केल्या वाचून वैभव प्राप्त होत नाही.
१२) तळे राखील तो पाणी चाखील-आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.
१३) थेंबे थेंबे तळे साचे- थोडे थोडे जमवीत राहिले म्हणूजे कालांतराने मोठा संचय होतो.
१४) दाम करी काम- पैशाने सर्व कामे साध्य होतात.
१५) दिव्याखाली अंधार- मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच.
१६) दुरून डोंगर साजरे- कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.
१७) नाचता येईना अंगण वाकडे- आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
१८) अति तिथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
१९) अति शहाणा त्याचा बैल रिकामा- वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते.
२०) अंथरून पाहून पाय पसरावे- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा/ करावा.
२१) इकडे आड तिकडे विहीर- दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
२२) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग- अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन.
२३) उथळ पाण्याला खळखळाट फार- ज्याच्या अंगी गुण थोडा, तो फार बढाई मारतो.
२४) एका हाताने टाळी वाजत नाही- भांडणाचा दोष एका पक्षाकडेच असत नाही.
२५) ऐकावे जनाचे, करावे मनाचे- सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे.
२६) कर नाही त्याला डर नाही-ज्याने वाईट कृत्य केले नाही,, त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
२७) करावे तसे भरावे- जसे बरे वाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे.
२८) कावळ्याच्या शापाने गाई मरत नाही- क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही.
२९) कोल्हा काकडीला राजी- क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
३०) कोळसा उगाळावा तितका काळाच- वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
३१) नावडतीचे मीठ आळणी- नावडत्या माणसाने काहीही केले, तरी ते वाईटच लागते.
३२) पळसाला पाने तीनच- कुठेही गेले, तरी मनुष्य स्वभाव सारखाच.
३३) पाचा मुखी परमेश्वर-पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.
३४) पुढच्यास ठेच मागचा शहाणा- दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
३५) पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा- द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र भरपूर करून घ्यावयाचे.
३६) बळी तो कान पिळी- ज्याच्या अंगात सामर्थ तो इतरांवर अंमल गाजवतो.
३७) बुडत्याचा पाय खोलात- अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते.
३८) भित्या पाठी ब्रह्मराक्षस-भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.
३९) मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?- धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही.
४०) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात- मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत्यावरून करता येतो.
४१) वासरात लंगडी गाय शहाणी- अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते.
४२) शहाण्याला मार शब्दाचा- शहाण्याला शब्दाने सांगितले की तो समजतो पण मूर्खाला छडी शिवाय भागत नाही.
४३) शितावरून भाताची परीक्षा- एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते.
४४) साखरेचे खाणार त्याला देव देणार- भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात.
४५) हजीर तो वजीर-जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणी का उपयुक्त आहेत?
- निबंध व भाषणासाठी उपयोगी
- भाषेतील गोडवा अनुभवता येतो
- संवाद कौशल्य सुधारते
- नीतीमूल्यांची शिकवण मिळते
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्र. मराठी म्हण म्हणजे काय?
उ: मराठीत प्रचलित असलेली बोधप्रद, अनुभवाधारित वाक्य म्हणजे म्हण.
प्र. विद्यार्थ्यांनी म्हणी का शिकाव्यात?
उ: भाषिक विकास, निबंध लेखन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणी उपयुक्त ठरतात.
🔚 निष्कर्ष (Conclusion):
या ४५+ मराठी म्हणी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात आणि आयुष्यात उपयोगी पडतील. तुम्ही या म्हणी निबंध, भाषण, संवाद यामध्ये वापरून तुमचे भाषिक कौशल्य वाढवू शकता.
या लेखासोबतच तुम्ही आमचा यासंदर्भातील मागील ब्लॉग पोस्ट देखील वाचावा:
Best Marathi Mhani मराठी म्हणी
📌 अशाच मराठीतील शैक्षणिक, प्रेरणादायी आणि कला विषयक व्हिडीओसाठी आमचा YouTube चॅनल नक्की फॉलो करा: