तुम्ही शाळकरी विद्यार्थी असाल किंवा शिक्षक — हे सुविचार तुमच्यासाठी प्रेरणेचा अमृतस्रोत ठरतील.
या “Marathi Suvichar for School Students” संकलनातून तुम्हाला शिक्षण, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि जीवनमूल्यांची खरी ओळख मिळेल.
दररोज एक सुविचार वाचण्याची सवय लावा आणि तुमच्या विचारांना नवा उंचीचा आधार द्या. 🌸

Marathi Suvichar for School Students | विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक मराठी सुविचार
१) सदगुणांपासून माणसाला दूर नेण्याचे कार्य असूया करते.
२) मानवजातीची शाळा म्हणजे उदाहरणे आहेत. या ठिकाणी मिळणारे शिक्षण इतरत्र कोठेच मिळणार नाही .
३) दुसऱ्यातील गुणांबाबत आपल्याला जेव्हा न्यूनगंडाची भावना निर्माण होते, त्यातूनच असूयेचा जन्म होतो.
४) आदर्शाच्या मागे सतत धावणारी व्यक्ती भ्रमाचा पाठपुरावा करत असते.
५) कोणी आपली दया करण्यापेक्षा, कोणाला आपल्याबद्दल असूया वाटणे अधिक चांगले म्हणावे लागेल.
६) काहीजण सूर्यप्रकाशात बर्फाचे पुतळे बांधतात आणि वितळू लागले म्हणून नंतर दुःख करतात.
७) उत्तम ग्रंथांनी भरलेले घर अन सुगंधी फुलांनी भरलेला बगीचा, यातूनच खरा आराम मिळतो.
८) मानवनिर्मित अशा अनेक आरामदायी गोष्टींचा खरा निर्माता ईश्वर असतो आणि त्याच्याकडून आपण या गोष्टी उधार घेतलेल्या असतात.
९) जेथे अशा संपते, येथे भयाचे राज्य सुरू होते.
१०) आपला अपमान स्वीकारण्याचा राजमार्ग म्हणजे त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे होय.
११) योग्य अभिमानाची कास प्रत्येकानेच धरली पाहिजे, करण त्यातूनच प्रत्येकाच्या सर्जनशीलतेचा जन्म होतो.
१२) अतिरेकी स्वाभिमान विनाशाच्या दरवाज्याची वाट दाखविणारा असतो.
१३) माझे नाव यात किंचितही महत्त्वाचे नाही, असे मानणारी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही.
१४) एका अपराधी भावनेच्या कलेवरातून हजारो प्रकारच्या भीतीयुक्त व पछाडणाऱ्या विचारांचा जन्म होतो.
१५) तुम्ही अज्ञानी असाल, तर तुमच्याजवळ काहीच नसते. पण ज्ञानी असाल, तर काय असत नाही, हाच विचार करा.
शिक्षणावर मराठी सुविचार (Education Quotes)
१६) ज्ञानसंपादनाची पहिली पायरी म्हणजे आपण पूर्ण अज्ञानी आहोत, हे प्रथम मान्य करणे.
१७) समाजाची घडी व्यवस्थित बसावी म्हणून प्रत्येकाला योग्य शिक्षण मिळालेच पाहिजे.
१८) एका पुरुषाला शिक्षण दिले, तर ते एका व्यक्तीला दिल्यासारखे असते. एका स्त्रीला शिक्षण दिले, तर ते साऱ्या कुटुंबाला दिल्यासारखे होते.
१९) शिक्षण माणसाला वाचायला शिकवते. पण काय वाचावे हेही शिक्षणानेच शिकवले पाहिजे.
२०) क्षमाक्षील असणे, हे ईश्वराचे कामच असते.
२१) विजयाचा गुण म्हणजे क्षमाशीलता होय.
२२) जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंडपणे शिक्षणाची प्रक्रिया चालू असते.
२३) शिक्षणाने माणसाला विचार करायला शिकवावे, केवळ विशिष्ट गोष्टींवरच विचार करावा असे शिकू नये.
प्रेरणादायक सुविचार (Motivational Quotes)
२४) सुगंध वा सुवास म्हणजे फुलांच्या भावना होत.
२५) सहजतेने जगताना न येणे, म्हणजे न जगण्यासाठी असते.
२६) मी स्वर्गात जाण्यापूर्वी मी माझ्यातच स्वर्ग निर्माण करायला हवा.
२७) वाईट सवयींची जळमटे वेळीच झटका. नाहीतर त्यांच्याच जाळ्यात गुरफटत राहाल.
२८) आपले शरीर योग्य वेळेस किल्ली दिलेल्या घड्याळाप्रमाणे असते. पण त्याच्याशी सारखेच खेळ केले, तर वेळेआधीच गजर होऊ शकतो.
२९) जगात अन्याय नसता तर शौर्य हा गुण ठरला नसता.
३०) मृत्यूला धीराने सामोरे जाण्यात शौर्य असते. पण जेव्हा जगणेच अशक्य होते, तेव्हा त्या जगण्यास तोंड देणे ह्यातच खरे शौर्य असते.
जीवनमूल्य व सद्गुण सुविचार (Life Values Quotes)
३१) प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व चंद्रासारखे असते. कारण त्यालाही काळी बाजू असते; पण चंद्राप्रमाणे आपणही ती लपवू पाहतो.
३२) आपण ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो, त्यांच्यामुळे वा त्यांच्यापासून आपल्याला सर्वाधिक वेदना होतात.
३३) वक्ता आपल्या कल्पनांहून आपले शब्द जेव्हा लहान बनवितो, तेव्हाच तो खरा वक्ता बनतो.
३४) वृद्धत्वामुळे चेहऱ्यापेक्षा मनाला अधिक सुरकुत्या पडतात.
३५) जेव्हा माणसांच्या स्वप्नांची जागा, पश्चातापाने घेतली जाते, तेव्हा तो खऱ्या अर्थाने वृद्ध होतो.
३६) ज्या माणसाची तो लबाड नाही, अशी ख्याती असते, तोच इतरांना हातोहात फसवत असतो.
३७) उत्तम नट रंगभूमीवर अभिनय करत नाही, तर त्या भूमिकेत शिरून त्याप्रमाणे वागतो.
३८) मधमाशांच्या मोहोळात दगड टकणे म्हणजे रागावणे होय.
३९) तात्पुरते वेड म्हणजे राग होय.
४०) स्वतःच्याकडून स्वतःला फसविण्याची सवय लागली की, कोणतेही पाप करणे सोपे जाते.
४१) लबाडीचे जाळे आपण प्रथम विणतो आणि मग त्यात कोळी अडकावा, त्याप्रमाणे अडकतच जातो.
४२) खऱ्या राजकारणी व्यक्तीला काय आठवायचे अन् काय विसरायचे हे बरोबर ठाऊक असते.
४३) ज्या व्यक्तीला राज्य- शासनातून राजकारण काढून टाकायचे असते, ती नेहमी एकटी पडते.
४४) राज्यशास्त्र हे माणसांना कौशल्याने व यशस्वीपणे हाताळण्याचे शास्त्र आहे.
४५) युद्ध घडविणारे सैनिक नसतात, तर त्यांचे नेते असतात.
४६) शांततेच्या प्रश्नापासून सुटका करून घेणे, म्हणजे युद्ध करणे होय.
४७) चिकाटीमुळे यशाचे शिखर गाठणे शक्य होते.
४८) व्यक्तीच्या दुष्कृत्यांवर पडदा टाकण्याचे काम काहींचे यश करते.
४९) जी गोष्ट मूर्ख शेवटी करतो, ती शहाणा माणूस सर्वात आधी करतो.
५०) मूर्ख व्यक्तीच्या मते, ती सोडून इतर सर्वजण मूर्ख असतात.
५१) एकमेकांचे किरकोळ दोष माफ करू न शकणाऱ्या व्यक्ती, कधीच मित्रत्वाचे नाते जोडू शकत नाहीत.
५२) आयुष्यातून मित्र जाणे म्हणजे दिवसा सूर्याने न उगवण्यासारखे असते.
५३) आपल्या प्रिय व्यक्तीवर मृत्यू झडप घालतो, तेव्हाच त्याची भयानकता कळते.
५४) मृत व्यक्तीच्या सत्कृत्यांचे अनुकरण करून, आपण त्यांना मानच देत असतो.
५५) जेव्हा व्यक्ती सारे काही हरते, तेव्हा तिचे भविष्यच तिच्या हातात उरलेले असते.
५६) भीती माणसाला आंधळे आणि अगतिक बनविते.
५७) ज्याला हरण्याची भीती असते, त्याला कधीच जय मिळत नाही.
५८) ईश्वराला घाबरा म्हणजे माणसाचे भय वाटणार नाही.
५९) ज्याला दुसऱ्याला बक्षीस देण्याचा आनंद लुटता येत नाही, ती व्यक्ती खरोखरच गरीब असावी.
६०) आनंदी बालक नेहमीच सद्- वर्तनी बनते.
पुस्तके आणि ज्ञानावर सुविचार (Books & Knowledge Quotes)
६१) परिस्थिती माणसाला दुबळे किंवा बलवान बनवत नाही, तर त्याचे गुणदोष दाखवून देते.
६२) विद्वान व शहाण्या माणसांच्या विचारांची आणि अनुभवांची प्रतिबिंबे दाखविणारे
आरसे, म्हणजेच पुस्तके होत.
६३) मित्रांची निवड करता, तशीच पुस्तकांची निवड करा.
६४) पुस्तकात जीव नसतो, तरीही ती जिवंत असतात.
६५) जगण्याची कला न शिकविणारी पुस्तके कुचकामी असतात.
६६) सौंदर्य आणि सदगुण हे नम्रपणाचा कळस असतात.
६७) खोटा नम्रपणा अहंकाराचे दुसरे रूप असते.
६८) नम्र व्यक्ती कधीही स्वतःबद्दल बोलत नसते.
६९) मानवी मन हे नाविन्याचे भुकेलेले असते.
७०) जे चाक सर्वाधिक कुरकुरते, त्यालाच जास्त वंगण लागते.
७१) काहीजण खूप थोर वाटतात कारण त्यांची तुलना नेहमीच त्यांच्याहून खालच्या पातळीवरील व्यक्तीबरोबर होते.
७२) जी व्यक्ती सतत इतरांच्या मनात वास करते, तीच खरी थोर असते.
७३) थोडे प्रेमाचे शब्द आणि दयाळू कृत्ये पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करतात.
७४) सत्यवचन, नम्रता हेच माणसाचे खरे दागिने आहेत.
७५) या जगात देव व स्वतःचा आत्मा याखेरीज कोणतीच गोष्ट माहिती करून घेण्यासारखी नाही.
७६) थोर माणसांची चरित्रे ही मानवता शिकविणारे उत्तम शिक्षक होत.
७७) जे विचारी असतात, त्यांना जग ही सुखांतिका वाटते, तर जे भावनेने चालतात, त्यांना जग ही शोकांतिका वाटते.
७८) जगावर कधीच विश्वास ठेवू नका. कारण त्याच्याकडून ज्याचे वचन तुम्हाला मिळते, ते तुम्हाला कधीच प्राप्त होत नाही.
७९) इतर माझ्याबद्दल काय बोलतात, यापेक्षा मी काय बोलतो व काय करतो, यावरूनच माझी चारित्र्य घडण असते.
८०) मानवाच्या विचारांची झेप व बुद्धीची भरारी, त्याला नित्य नव्या संशोधनाच्या दालनात नेते.
८१) ज्याला आपल्या घरात आनंद मिळतो, तो जगातील सर्वात आनंदी माणूस असतो. मग तो राजा असो किंवा भिकारी.
८२) अज्ञान हा कलेचा एक मोठा शत्रू आहे.
८३) खोटे बोलणारी व्यक्ती आपल्या मित्र व शत्रूला एकाच मापाने असत्य कथन करून फसवत असते आणि शक्य झाले तर प्रत्यक्ष ईश्वराशीही ती खोटे बोलू शकते.
८४) जो आपल्या जिवलग मित्राशी मुद्दाम खोटे बोलतो, तो प्रत्यक्ष ईश्वरालाच फसवत असतो.
८५) विचार व ज्ञानाच्या प्रकाशाने, अज्ञानाचा अंधकार दूर करता येतो.
८६) निसर्ग, काळ आणि सहनशक्ती या तिन्हीं एवढे रामबाण औषध नाही.
८७) काहीजण फक्त दुसऱ्यांना फुकट उपदेश करण्याचे औदार्य दाखवतात. त्याचा स्वीकार किती प्रमाणात करावा, हे विचारांती ठरवावे.
८८) संकटात असलेल्या व्यक्तीचा उपदेश पारखून स्वीकारा.
८९) काहीजण दुसऱ्यावर उपकारांचे ओझे एवढ्या जोरात आपटतात की, त्याचा आवाज साऱ्या आसमंतात घुमतो.
९०) उच्चार हा त्या भाषेचा आत्मा असतो. त्यामुळेच कोणत्याही शब्दांना आत्मा व सत्य प्राप्त होते.
९१) प्रतिभावानाच्या प्रतिभेच्या अविष्कारास शारीरिक व मानसिक ऊर्जेचे खतपाणी लागते.
९२) थंड डोक्याने पण उत्साहाने काम करणाऱ्यांना सारे जग ही जिंकता येईल.
९३) भीक मागणे आणि उधारी मागणे यामध्ये फारसा काहीच फरक नसतो.
९४) सतत उधारी करणारा आपल्याच कर्जाच्या जाळ्यात अडकत जातो.
९५) सर्वांना वाचता येणारा पाठ म्हणजे उदाहरण होय.
९६) पूर्वजांच्या अनुवंशाचा दिवा अधिक तेजाने तेवत ठेवण्याचे कार्य करणाऱ्यास सुपुत्र म्हणता येईल.
९७) अनुभव मिळण्यास किंमत मोजावीच लागते.
९८) सुशिक्षित व अनुभवी व्यक्ती यांच्यात थोडा फरक असतो. दोघांनाही आपल्या चुका उमगतात. सुशिक्षित व्यक्ती या चुका परत करते, तर अनुभवी व्यक्ती त्यापासून दूर जाते.
९९) दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे न होणे, हे पटणे म्हणजेच आलेल्या अनुभवांतून काहीतरी शिकण्यासारखे असते.
१००) अनुभवाची शाळा खूप काही व चांगले शिकविणारे असते, पण मूर्ख मात्र या शाळेत शिकत नाहीत.
🌺 निष्कर्ष :
या सर्व Marathi Suvichar for School Students मधून विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखे खूप काही आहे.
प्रत्येक विचार हा एका नवीन दिशेचा किरण आहे.
दररोज एक सुविचार वाचा, त्यावर विचार करा आणि तो आचरणात आणा — हाच खरा यशाचा मार्ग आहे. 🌞
Question: What are the best Marathi Suvichar for school students?
Answer:
Here are some of the best Marathi Suvichar for School Students (विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक सुविचार):
- सदगुणांपासून माणसाला दूर नेण्याचे कार्य असूया करते.
- समाजाची घडी व्यवस्थित बसावी म्हणून प्रत्येकाला योग्य शिक्षण मिळालेच पाहिजे.
- शिक्षण माणसाला विचार करायला शिकवते.
- वाईट सवयींची जळमटे वेळीच झटका, नाहीतर त्याच्याच जाळ्यात गुरफटत राहाल.
- चिकाटीमुळे यशाचे शिखर गाठणे शक्य होते.
- आनंदी बालक नेहमीच सद्-वर्तनी बनते.
- विद्वान व शहाण्या माणसांच्या विचारांची प्रतिबिंबे म्हणजेच पुस्तके होत.
- सत्यवचन आणि नम्रता हेच माणसाचे खरे दागिने आहेत.
- प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व चंद्रासारखे असते; त्यालाही काळी बाजू असते.
- जे आपल्या घरात आनंद शोधतात, तेच जगातील सर्वात आनंदी माणसे असतात.
📘 हे सुविचार विद्यार्थ्यांना शिक्षण, नम्रता, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांचे मूल्य शिकवतात.
Other Articles
Best Motivational Marathi Suvichar
Top 50+ Marathi WhatsApp Status Quotes
Follow Us on YouTube- Marathi Antarang