Savitribai Phule | भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाची जननी

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला. त्यासाठी सर्वप्रथम त्यांना स्वतःला शिक्षण घ्यावे लागले. शाळेत मुला-मुलींना शिकविण्यास जाणाऱ्या सावित्रीबाईंना समाजाने दगड- धोंडे मारले. शेण फेकले, असभ्य भाषेत निर्भत्सना केली. या सर्व प्रतिकाराला सावित्रीबाई धैर्याने सामोऱ्या गेल्या. म्हणूनच त्यांचे कार्य इतिहासात अजरामर ठरले आहे. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या स्त्रियांना ज्ञानाचा प्रकाश त्यांनी दाखविला. त्यांनी लावलेल्या ज्ञानज्योतीच्या प्रकाशामुळेच आज स्त्रिया प्रगतीचे विविध टप्पे पार पाडत आहेत. अनेक स्त्री- रत्ने महाराष्ट्र भूमीत जन्माला आली.” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” याही अशाच स्त्री- रत्नांपैकी एक होत.

Savitribai Phule यांचा जन्म व बालपण

नायगाव हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक लहानसे गाव. येथे ३ जानेवारी इ.स.१८३१ मध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे (पाटील) तर आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे हे होते. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती- दिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.

सावित्री बालपणापासून प्रकृतीने निरोगी व कणखर होत्या. तसेच त्या बालपणापासून साहसी वृत्तीच्या होत्या. सावित्री वडिलांबरोबर शेतात जाऊन जनावरांची देखभाल, शेतीकाम करीत तसेच ती या कामात तरबेज झाली. आईला स्वयंपाकात मदत करणे, घरातील लहान मोठ्या कामातही ती तयार झाली. नेवसे पाटील गावातील एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. गावचे पाटील म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असत. सावित्री तर या पाटलांच्या कन्या म्हणून लोक त्यांच्याकडे कौतुकाच्या भावनेने पाहत असत.

सावित्रीचा लहानपणीचा खट्याळपणा ‌.

लहानपणी त्या थोड्याशा खट्याळपणाही करायच्या त्यामुळे त्यांची आई मात्र वैतागून जायची. झाडावर चढण्यात त्यांना फार आनंद वाटायचा. कधी कधी चिंचेच्या झाडावर चढून त्या चिंचा तोडायच्या तर कधी जांभळाच्या झाडावर चढून जांभळे ही काढायच्या.

Savitribai Phule यांचा विवाह

पुण्यात राहणारे फुले कुटुंबीय आपले नाव आणि आदब राखून होते. ते फुलांचा व्यापार करायचे, म्हणून लोक त्यांना फुले याच नावाने ओळखू लागले. सगुनाबाई क्षीरसागर ज्योतिबा फुले यांची तरुण बहीण. तिने सावित्रीला पाहिले आणि ज्योतिबा सारख्या कर्तबगार व तेजस्वी पुरुषास पाहायला घरी आले. नेवसे पाटलांनाही कर्तबगार जावई पसंत पडला.१८४० साली फाल्गुन वद्य पंचमीला नायगाव येथे विवाह संपन्न झाला. तेव्हा सावित्री नऊ वर्षाच्या व जोतिबा तेरा वर्षाचे होते.

सावित्रीबाईंना पुस्तक वाचनाची आवड जोतिबा यांनी लावली.

ज्योतिबांना वाचनाची खूप आवड होती. त्यामुळे ते मिळेल तेथून पुस्तके ग्रंथ घेऊन यायचे. त्यामुळे घरात पुस्तकांची रेलचेल झाली होती. सावित्रीबाई रोज एक-एक पुस्तक पहायच्या. त्यांची पाने चाळायच्या. त्यातील चित्रे पहायच्या. असे करता करता त्यांना ती चित्रे ओळखता येऊ लागली. आपल्या पत्नीलाही पुस्तके, चित्रे पाहायला आवडतात, असे पाहून ज्योतिबा त्यांना एक एक पुस्तक वाचून दाखवू लागले. सावित्रीबाई ही मन लावून हे सर्व ऐकत असत. त्यानंतर त्या वाचावयास शिकल्या. त्यानंतर मात्र त्यांचे मन पुस्तकाच्या वाचनात मग्न होऊन गेले.

Savitribai Phule यांचे शिक्षण व वाचनाची गोडी

मुलगी जन्माला येणे हे त्या काळी अशुभ मानले जाई. स्त्रियांना शिक्षणाचा, धार्मिक कार्यात सहभाग घेण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांना अतिशय नरक यातना भोगाव्या लागत असत. समाजाच्या या अवस्थेचे कारण ज्योतिबांनी ओळखले होते. स्त्रियांचे अज्ञान व शिक्षणाचा अभाव. यांना शिकविले तर तिचे अज्ञान दूर होईल.

तसेच तिची अवहेलना कमी होईल. सुसंस्कृत कुटुंबाची ती निर्माती होईल असे ज्योतिबांना वाटले. म्हणून त्यांनी आपल्या जीवनात स्त्री शिक्षणास महत्त्वपूर्ण स्थान दिले. स्त्री शिक्षणाचा प्रयोग स्वतःच्या घरापासून करण्याचे ज्योतिबांनी ठरविले. सावित्रीबाई व बहिण सगुणाबाई यांना शिक्षण देण्यास प्रारंभ केला.

पहिली मुलींची शाळा – ऐतिहासिक पाऊल

१८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्त्री शिक्षण म्हणजे अधर्म मानणाऱ्या पुण्यातील ब्राह्मण वर्गाने अकांड- तांडव सुरू केले. त्यामुळे शाळेत शिकविण्यास कुणी शिक्षक मिळेना. तेव्हा ज्योतिबांनी सावित्रीबाईंनाच शिक्षिका म्हणून नेमले. याचवेळी नगर येथील अमेरिकन मिशनरी पद्धतीवर १८३२ मध्ये ब्रिटिश सरकारने बुधवार वाड्यात एक इंग्रजी शाळा सुरू केली होती.

या शाळेत ज्योतिबा व सगुनाबाईंनी प्रवेश मिळवला. वयाच्या पंधराव्या वर्षाच्या आत स्वतःचे शिक्षण, शेतीकाम, सावित्रीबाईंना शिकविणे हे तिहेरी कार्य ज्योतिबांनी सुरू केले. नंतर शिक्षकी पैशाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. नॉर्मन स्कूलच्या प्रमुख मिसेस मिचेल यांच्या देखरेखी खाली सावित्रीबाई व सगुणाबाई अध्यापक की कला साध्य करून घेतली.

सावित्रीबाईंनी संत चोखा मंदिरात शाळा सुरू केली. अतिशूद्रांच्या मुलांना सगुनाबाई शिकवू लागल्या. शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या सावित्रीबाई महाराष्ट्रातील पहिल्या महिला. त्या रोज मुलींना स्वतःबरोबर शाळेत घेऊन जात. मुलींवर माया करीत. आजारी मुलींच्या घरी जात. त्यांना धीर देत. त्यामुळे मुलींना त्या प्रिय झाल्या.

१८४९-५० पर्यंत सावित्रीबाईंच्या शाळेतील मुलींची संख्या ७० पर्यंत गेली. शाळेची प्रगती होत होती. त्याचबरोबर संकटे वाढत होती. सावित्रीबाई शाळा संपून घरी जाऊ लागल्या की लोक त्यांना त्रास द्यायला सुरुवात करायचे. कोणी त्यांना खडे मारायचे. त्यांच्या अंगावर शेण, चिखलाचे गोळे फेकायचे.

अपमान कारक शब्द बोलून त्यांना सतावण्याचा प्रयत्न करायचे. सावित्रीबाई महाराष्ट्रातील पहिल्या आद्य शिक्षिका. महाराष्ट्र किंवा अन्य कोणत्याही प्रांतात यापूर्वी भारतीय महिलेने शिक्षिका म्हणून काम केल्याचा दाखला इतिहासात नाही. सावित्रीबाईंच्या वेळी फक्त मिशनरी स्त्रियाच शिक्षण प्रसाराचे कार्य करीत होत्या.

फुले दांपत्याला घरातून काढून टाकले.

याच काळात फुले दांपत्याच्या समाजकार्यात खो घालण्याचा आणखी एक प्रयत्न ब्राह्मणांनी करून पाहिला. ज्योतिबांचे वडील गोविंदराव यांचे कान त्यांनी फुंकले. सावित्रीबाईंनी कुळाची अब्रू घालविली असून, त्यांना घराबाहेर काढा असा सल्ला ब्राह्मणांनी दिला. नाहीतर तुमच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील ही भीती घातली. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

ज्योतिबांनी वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही, फुले दांपत्याला घर सोडावे लागले. याच सुमारास सनातन्यांच्या वा भोंदू धर्मगुरूंच्या विरोधात चळवळी सुरू झाल्या. महात्मा गांधी व अन्य नेत्यांच्या प्रयत्नामुळे स्त्रिया व शूद्रांच्या शिक्षणास प्रारंभ झाला. या नव्या युगाचे शिल्पकार ज्योतिबा व सावित्रीबाई होत्या.

फुले पती-पत्नींचा सत्कार.

नव्या युगाचे शिल्पकार ज्योतिबा व सावित्रीबाई होत. त्यांच्या कार्याची दखल समाजाने घेतली नाही, पण इंग्रजांनी घेतली व त्यांचा गौरव केला. पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात हा सत्कार समारंभ झाला. मेजर कॅन्डी यांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. फुले दांपत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात या सत्कारानंतर ज्योतिबा व सावित्रीबाईंच्या कार्याचे लोकांना महत्त्व वाटू लागले.

बालहत्या प्रतिबंधक गृह – मानवतेचा कळस

( २८ जानेवारी १८५३) विधवा स्त्रियांचे जीवन म्हणजे नरक यातना. अशा स्त्रियांना खूप अत्याचार सहन करावे लागायचे. त्यातून त्यांना मुले होत असत. समाजाच्या भीतीने या स्त्रिया ही मुले कोठेही टाकून देत असत. नुकतीच जन्मलेली अशी मुले मग मरणाच्या दारात असत किंवा कोणी मिशनरी लोक त्यांना घेऊन जात. आणि त्यांचे पालन करून मोठेपणी त्यांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत असत.

सावित्रीबाईंनी अशा स्त्रियांचे दुःख दूर करण्याचे ठरविले. त्यांनी ‘ एक बालहत्या प्रतिबंधक गृह ‘ सुरू करण्याचे ठरविले. आपण असा एक आश्रम काढला आहे, हे त्यांनी हस्ते पर हस्ते इकडे तिकडे कळविले की, ‘ ज्या स्त्रियांना अत्याचारातून दिवस गेले असतील, त्यांनी होणारी मुले कोठेही टाकून न देता, आमच्या आश्रमात येऊन सुखरूपपणे बाळंत व्हावे.

आम्ही त्यांचे नाव गुप्त ठेवू. अशा मुलांचे आम्ही पालन पोषण करू. सावित्रीबाईंनी अशी व्यवस्था केल्यावर फसविले गेलेल्या, अत्याचार झालेल्या स्त्रिया त्यांच्या आश्रमात येऊ लागल्या. त्यांना होणाऱ्या मुलांना सावित्रीबाई पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळू लागल्या. त्यामुळे बालहत्या थांबली. ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे जाणारी मुले आता सावित्रीबाईंच्या आश्रमात मोठी होऊ लागली. मानवतेचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे अनाथ मुलांच्या ‘ माताच ‘ बनल्या.

यशवंतचा जन्म.

एका काळोख्या रात्री ज्योतिबा नदीकाठी विचारतंद्रीत फिरत होते. एकाएकी त्यांचे लक्ष गेले की ,एक स्त्री नदीमध्ये जीवन संपवून टाकण्याच्या उद्दिष्टाने झेपावत होती. ज्योतिबांनी तिला थांबविले. तिची समजूत काढली. तिला आपली धर्म कन्या म्हणून घरी आणले. तिचं नाव काशीबाई. ती बाल विधवा होती. कोणीतरी तिच्या असाहाय्य स्थितीचा फायदा घेऊन फसवले होते. तिला दिवस गेली होते. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना सर्व हकीकत सांगितली. सावित्रीबाईंनी तिला धीर दिला.

योग्य वेळी तिचे बाळंतपण केले. त्याचे बारसे करून त्याचं नाव यशवंत ठेवण्यात आले. ज्योतिबा व सावित्रीबाईंनी त्याला दत्तक घेतले. हा यशवंत शिकून पुढे डॉक्टर झाला. त्याचा राधाबाई या मुलीशी फुले दांपत्याने त्याचे लग्न लावून दिले.

सत्यशोधक समाजाची स्थापना.

२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात केली. जाचक रूढी परंपरा, चालीरीतींचा त्याग करून माणसांनी माणसासारखे रहावे, वागावे, माणुसकीचा धर्म पाळावा, सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत असे मानून कोणताही भेदभाव न करता एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहावे, अशी या समाजाची तत्वे होती. या कार्यात सावित्रीबाई ज्योतिबांच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. ज्योतिबांचे हे कार्य त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरूच ठेवले. म्हणूनच लोक त्यांना ‘ क्रांतीज्योती ‘ महान साध्वी सावित्रीबाई फुले म्हणून ओळखू लागले.

सावित्रीबाई फुले यांचे साहित्य.

सावित्रीबाई उत्तम कवियत्री होत्या. ‘ काव्य फुले,’ ‘ सुबोध रत्नाकर ‘ असे दोन काव्यसंग्रह सावित्रीबाईंच्या नावावर आहेत. सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेले भाषण, ज्योतिबांना लिहिलेली पत्रे संकलित होऊन ते संग्रहित होऊन प्रसिद्ध झाले आहेत. सावित्रीबाईंनी लिहिलेले निबंध ही विचार प्रवर्तक आहेत. त्यांच्या लेखनात क्रांतीची बीजे होती.

सावित्रीबाईंचा मृत्यू.

१८९७ साली पुण्यात प्लेगची साथ आली होती. १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाईंची प्राणज्योत मावळली. सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक आणि कवियत्री होत्या. ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखले जाते. त्यांनी शिक्षणातून स्त्रियांचे सक्षमीकरण करण्यासाठी आयुष्य वेचले.

समारोप

सावित्रीबाई ज्योतिरावांना शेटजी म्हणत. त्या दोघात पति- पत्नीत्वाचे खरे प्रेम भरले होते. सावित्रीबाईंनी नको म्हटलेली कामे ज्योतिबांनी कधीच केली नाहीत. सावित्रीबाई सुविचारी व दूरदृष्टीच्या होत्या. त्यांच्याविषयी आज तागायत मोठा आदर होता. मुलींच्या शाळांतून त्यांनी शिक्षकेचे काम केले असल्याने सुशिक्षित स्त्रियांमध्ये सावित्रीबाई विषयी पूज्यभाव वाढलेला होता. त्यांच्याकडे आलेल्या मुलींना व स्त्रियांना त्या नेहमी सदुपदेश करत असत. पुण्यातील प्रतिष्ठित सुशिक्षित स्त्रिया पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी, आणि रमाबाई रानडे त्यांच्या भेटीला येत असत.

ज्योतिबांच्या विचार व कार्यामध्ये एकरूप होऊन सावित्रीबाई कार्य करत होत्या, तरी त्यांचे व्यक्तित्व, विचार व प्रवृत्ती यामध्ये स्वतंत्रपणा होता. ज्योतिबांच्या लेखनात ब्राह्मणी शोषण व वर्चस्व विरोधात अंगार ओकणारी आक्रमकता आहे; तशी आक्रमकता सावित्रीबाईंच्या लेखनात आढळत नाही.

ज्योतिबा करारी स्वभावाचे; तर सावित्रीबाई विलक्षण मायाळू होत्या. शूद्रातीशूद्रांच्या उद्धाराची आणि स्त्री-पुरुष समानतेची त्यांची तळमळ अस्सल व अंत:करणातून आलेली होती. त्यामुळे ज्योतिबांच्या बरोबरीने शाळा काढणे, बालहत्या प्रतिबंधकगृह काढणे, शेतकरी, शेतमजूर स्त्री-पुरुषांसाठी रात्र शाळा काढणे, अनाथ बालकांचे वसतिगृह चालविणे, दुष्काळात अन्नछत्र चालवणे, सत्यशोधक विवाहाच्या आयोजनात संकटे अंगावर घेत पुढाकार घेणे अशा अनेक कार्यांमध्ये त्यांनी अपार कष्ट उपसले. ज्योतिबांच्या मृत्यूनंतर तर सावित्रीबाई यांची स्वयंप्रज्ञा ध्येयनिष्ठा व विवेकनिष्ठ कृतिशीलता नि:संशयपणे सिद्ध होते.

People Also Ask

Q1. Who was Savitribai Phule?

Answer:
Savitribai Phule was India’s first woman teacher, a social reformer, poet, and pioneer of women education who worked alongside Jyotiba Phule.


Q2. Why is Savitribai Phule famous?

Answer:
Savitribai Phule is famous for starting the first girls’ school in India and fighting social evils like caste discrimination and gender inequality.


Q3. What was Savitribai Phule’s contribution to education?

Answer:
Savitribai Phule opened India’s first girls’ school in 1848 and dedicated her life to educating women and marginalized communities.


Q4. When and where was Savitribai Phule born?

Answer:
Savitribai Phule was born on 3 January 1831 in Naigaon village, Satara district, Maharashtra, India.


Q5. Was Savitribai Phule the first woman teacher in India?

Answer:
Yes, Savitribai Phule is recognized as the first woman teacher in India.


Q6. How did Savitribai Phule die?

Answer:
Savitribai Phule died on 10 March 1897 while serving plague patients in Pune, Maharashtra.

Other Articles

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती 

Best Lokmanya Tilak Information in Marathi

Follow us on YouTube- Marathi Antarang

Leave a Comment