Don’t Sweat the Small Stuff Book Summary in Marathi

Don’t Sweat the Small Stuff Book Summary in Marathi

Don’t Sweat the Small stuff : Richard Carison.
मराठी अनुवाद. छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन कशाला?
अनु. पराग पोतदार. प्रकाशक
वॉव पब्लिशिंग्ज प्रा .लि. पुणे.
फेब्रुवारी- २०२३.

या पुस्तकाची मराठीतून समरी.
रिचर्ड कार्लसन (१६-५-१९६१ ते
१३-१२-२००६)
रिचर्ड कार्लसन हे अमेरिकन लेखक, मानसोपचार तज्ञ आणि प्रेरक वक्ते होते. अमेरिकेत सलग दोन वर्षे सर्वाधिक विक्री होणारे हे पुस्तक होते.
रिचर्ड कार्लसन हे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांची पुस्तके आज तागायत लोकांना प्रेरणा देत आहेत. रिचर्ड हे अत्यंत प्रामाणिक, सर्जनशील आणि मानवतेने ओतप्रोत भरलेल्या अशा लेखकांपैकी एक होते.

Don't Sweat the Small Stuff Book Summary in Marathi

क्रिस्टन कार्लसन यांनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक झोपताना कायम आपल्या उशाशी असायला हवे किंवा छोटी प्रकरणे असणारे हे पुस्तक अगदी बाथरूम मध्ये सुद्धा वाचता येऊ शकते. याशिवाय, कितीतरी लोकांनी हे सांगितलं की, त्यांना हे पुस्तक कायम स्वतः जवळ ठेवावेसे वाटते.
हे पुस्तक वाचून अनेक वाचकांनी पत्रे पाठवून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या पुढील प्रमाणे.
१) माझ्या कष्टाच्या काळात हे पुस्तक माझ्या मदतीसाठी धावून आले.
२) हे पुस्तक माझ्यासाठी बायबल सारखे आहे.
३) मी हे कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा वाचले आहे. प्रत्येक वेळी माझे मन शांत होण्यासाठी या पुस्तकांने मला मदत केली आहे.

Don’t Sweat the Small Stuff Book Summary in Marathi

पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे.

१) छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करणे सोडून द्या.

आपण जीवन जगत असताना अनेक छोट्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. अशा छोट्या समस्यांची आपण फार चिंता करतो व त्या समस्यांना मोठे करतो. खरं तर त्या समस्या मोठ्या नसतात. अशा खूप छोट्या समस्यांचा विचार करून आपण आपली खूप मोठी ऊर्जा खर्च करतो. त्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टींची चिंता न करता त्या सोडून देणेच योग्य असते.

२) अपूर्णत्वाचा स्वीकार करा.

पूर्णत्वास गेलेली व आंतरिक शांती लाभलेली एकही व्यक्ती नसते. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त न करता; आपल्याकडे जे नाही इकडे लक्ष जास्त केंद्रित करतो, व आपण असमाधानी बनतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संपूर्णता असावी या अपेक्षेतून आपण बाहेर पडले पाहिजे, तरच आपले जीवन आनंदी होईल.

३) स्वतःमधील दयाभाव विकसित करा.

आपल्याला स्वतःच्या समस्या, कष्ट जसे कळतात त्याप्रमाणे आपण दुसऱ्याचे दुःख, समस्या, अस्वस्थता समजून घेतली; तर आपल्या मनामध्ये दयाभाव निर्माण होऊन, आपण दुसऱ्या मदत करण्यास प्रवृत्त होऊ शकतो.

४) स्वतःला पुन्हा पुन्हा सांगा, जीवन हे आणीबाणी नाही.

जीवनात आपण अनेक उद्दिष्ट ठरवितो. ती साध्य करण्यासाठी खूप कष्ट करतो. त्यामुळे जीवनातील अनेक आनंददायक गोष्टींना आपण पारखे होतो. आपल्या जीवनात ताण तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी खरे तर आपणच निर्माण करतो. आपली काही कार्ये पूर्णत्वास गेली नाहीत तरी काही हरकत नसते. कारण आपले जीवन तसेही सुरू राहणारे असते. त्यामुळे आपल्या जीवनात आणीबाणीची परिस्थिती आपण का निर्माण करावी. जीवन म्हणजे आणीबाणी नाही.

५) शांत बसण्यासाठी दररोज स्वतःसाठी वेळ काढा.

स्वतःच्या एकांतासाठी एक ठराविक वेळ काढून बसल्यास आपल्याला चांगली ऊर्जा प्राप्त होते. मन शांत झाल्याने कामावर अधिक चांगले लक्ष देता येते. मनाला शांती लाभावी म्हणून काही लोक योगा करतात. शांत बसल्याने मनामध्ये चाललेल्या विचारांचा गोंधळ होत नाही. मन शांत होते व मनाचे संतुलन राखले जाऊन आपण अधिक कार्यक्षम व ऊर्जावान होतो.

६) निंदा करणे टाळा.

एखाद्याची निंदा केल्यावर कुठलीही समस्या सुटत नाही त्यामुळे आपण उगाचच टीकाकार होतो. उलट आपणास राग व निराशा प्राप्त होते. निंदा करणे ही शिव्या देण्याइतकीच वाईट सवय आहे. दुसऱ्याची निंदा करताना जगाला आपण हेच सांगतो की दुसऱ्याची निंदा करणे ही माझी गरज आहे. निंदा करण्याची ही सवय सोडून द्या किंवा थांबवा त्यामुळे तुमचा स्वभाव संयमी होईल. तुमचा आत्मसन्मान वाढेल.

७) नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करण्याचा सराव करा.

आपल्या मनामध्ये दररोज अनेक विचार येत असतात. यातील काही सकारात्मक तर काही नकारात्मक विचार असतात. नकारात्मक विचारामुळे आपणापैकी बरेच जण निराश, चिंताग्रस्त, व चिडचिड करणारे बनतात. नकारात्मक विचारांना सामोरे जाताना आपल्यापुढे दोन पर्याय असतात. अशा विचारांचा अभ्यास करणे, विचार करणे तर दुसरा पर्याय अशा विचारांना सोडून देणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे. नकारात्मक विचार आपल्या परवानगीशिवाय आपल्याला हानी पोहोचवू शकत नाहीत. हे लक्षात घेतले पाहिजे. अशाप्रकारे जर आपण नकारात्मक विचारांना त्याच क्षणी दूर केले तर आपण सकारात्मक विचार स्वीकारू शकतो. सकारात्मक विचार स्वीकारण्याचा सराव केल्यास आपल्या आयुष्यात बदल घडवून येऊ शकतो. असे लेखक सुचवितो.

Get Your Book on Amazon

८) कुठेही राहा, आनंदी राहा.

जीवन जगत असताना आपण आनंद भविष्यात शोधतो. खूप कष्टात दिवस घालवितो. त्यावेळी वाटते आपण रिटायर्ड झाल्यावर आनंदी होऊ. कधी वाटते, नवीन गाडी, बंगला, जोडीदाराबरोबर योग्य सूर जुळून आनंदाने जीवन जगता येईल. पण हे सर्व सातत्याने अंतहीनपणे सुरू राहते. तेव्हा लेखक सांगतात आनंद मिळवण्याचा कोणताही उपाय नाही. त्यासाठी आपला दृष्टिकोन बदलून प्रसन्नतेने आयुष्य जगणे, हाच त्यावरील उपाय आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी राहायला शिकले पाहिजे. हेच तर आपले आयुष्य आपल्याला शिकविते.

९) योगाचा स्वीकार करा.

मन शांत ठेवण्यासाठी योगाभ्यास हे अनेक वर्षे चालत आलेले साधन आहे. ही योगसाधना करण्यासाठी काही मिनिटांची गरज असते. या योगाभ्यासामुळे आपणाला शारीरिक फायदा तर होतोच. याशिवाय योग, स्नायू, पाठीचा मणका यांची लवचिकता व ताकद वाढवितो. योगाचे आश्चर्यकारक फायदे आपल्या शरीरास मिळतात. त्याशिवाय मनःशांती योगाभ्यासाने लाभते.

१०) आपल्याकडे कोणीतरी फेकलेला चेंडू झेलण्याची गरज नाही.

हा सल्ला लेखकाचे मित्र बेंजामिन शील्डने दिला होता. बरेचदा आपल्याला दुसरे कोणीतरी त्याच्या अडचणी सांगते व त्या अडचणी कशा सोडविता येतील याचा विचार आपण करत बसतो. यामुळे आपला आंतरिक संघर्ष वाढतो. अशा अनेक अडचणी लोक आपल्याला सांगत असतात. त्या सर्वच अडचणींचा विचार आपणाला करण्याची गरज नसते. नाहीतर आपले आयुष्य तणावपूर्ण होईल. प्रत्येक वेळी आलेला चेंडू आपल्याला झेलायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपल्या आयुष्यातून तणाव दूर होईल. याचा अर्थ आपण कुणाच्या अडचणी सोडवावयाच्या नाहीत असा होत नाही. परंतु ती निवड आपली वैयक्तिक असेल. आयुष्याप्रती आपला दृष्टिकोन गंभीर असला पाहिजे. आपल्या स्वतः प्रति असलेली जबाबदारी लक्षात घ्या.
आपल्या मर्यादा ओळखा. यामुळे आपला वेळ व ऊर्जा आपल्या कामासाठी वापरता येईल.

११) ही वेळ ही जाईल.

आपल्या आयुष्यात यश, अपयश, चांगले वाईट, प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा या गोष्टी येत असतात व जातही असतात. तेव्हा आपल्या हे लक्षात येते की आपण विनाकारणच चिंता करीत बसलेलो असतो. दुःख, कष्ट येत असतात अशा वेळी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ही वेळ ही निघून जाईल.

१२) जे आहे त्याचा स्वीकार करा.

आपल्या नियंत्रणानुसार आपले आयुष्य चालले पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात असे होत नाही. जीवनात अनेक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. त्या गोष्टींचा स्वीकार आपल्याला करता आला पाहिजे.

१३) आपल्या अपेक्षा कमी ठेवा.

आपण लोकांकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवतो. त्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत की, आपण तणावग्रस्त व दुःखी होतो. यासाठी आपण आपल्या अपेक्षा थोड्या कमी कराव्यात. त्यामुळे आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे यांच्यामुळे उद्वेग वाटणार नाही. आपले मन शांत होऊन समस्येवर आपण तोडगा काढू शकतो. येणाऱ्या समस्यांविषयी तक्रार करत बसण्यापेक्षा त्या कशा सोडविता येतील याचा विचार करावा. आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा करणे सोडून दिले तर आपले आयुष्य सरळ व सोपे होऊन जाते. आपण निराशेच्या गर्तेत जाणार नाही.

जीवनात येणाऱ्या समस्यांना तोंड कसे द्यायचे व चिंतामुक्त, तणावमुक्त आयुष्य कसे जगावे .ते या पुस्तकातून आपल्याला शिकावयास मिळते. १४१ गोष्टी संबंधीचे विवेचन यात लेखकाने केले आहे.कार्लसन यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण छोट्या गोष्टींची चिंता करत नाही, तेव्हा आपले जीवन संपूर्ण होऊन जाईल असे नाही. परंतु जीवनातील प्रत्येक गोष्टीला कमीत कमी प्रतिरोध करून त्याचा स्वीकार करणे मात्र तुम्ही नक्की शिकाल. आपले जीवन सहज भावाने प्रवाहित होऊ शकेल. आपल्या जीवनाला आपण आपल्या इच्छेनुसार आकार देऊ शकू.

Other Article – Think Straight Book Summary in Marathi

Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर ले. शरद तांदळे. या पुस्तकाची समरी

Leave a Comment