दिल्ली विधानसभा सत्तांतर.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला. पंधरा वर्षे काँग्रेसने दिल्लीमध्ये सत्ता गाजवल्यानंतर या निवडणुकीत त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, इतका दारुण पराभव काँग्रेसचा झाला.
या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज या बड्या नेत्यांनाही पराभवाचा धक्का बसला.

केजरीवाल यांच्या पराभवाची कारणे.
केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून खूपच अहंकारी झाले होते. त्यांचे वर्तन दिल्लीचे आपण ‘ मालक ‘ आहोत असे होत चालले होते. ‘दिल्ली के मालिक हम है! ‘ असे विधानसभेत त्यांनी वक्तव्य केले होते. इतका प्रचंड अहंकार त्यांना झाला होता. दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले. दिल्लीचे मालक आम्ही जनता आहोत. लोकशाहीमध्ये जनता/लोक हेच सार्वभौम असतात. हेच तर लोकशाहीचे तत्व आहे. लोकांनी त्यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न तर सोडाच ,पण त्यांना साधे आमदार म्हणूनही जनतेने ठेवले नाही.
त्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे व विलाशी वागण्यामुळे ते लोकांच्या मनातून प्रथम उतरले, व त्यानंतर ते निवडणूक हरले. दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचे विश्लेषण सुरू झाले. आप सरकारच्या काळात देश विरोधी अजेंडा चालविला जात होता. आम आदमी पक्षाने मीडियाला भरपूर पैसे दिले व खोटा अजेंडा चालविला. मीडियातील लोकांची पोटे आम आदमी पार्टीवर भरली जात होती. इतके प्रचंड पैशाचे वाटप मीडियासाठी केले गेले.
आम आदमी पार्टी ही व्यक्ती केंद्रित पार्टी बनत चालली होती. असे राजकारण फार काळ टिकत नाही. केजरीवाल यांच्याकडे सर्व सत्ता केंद्र होते. त्यांनी लोकांना ठगविले. कुमार विश्वास व इतर अनेक मित्रांना केजरीवाल यांनी खड्यासारखे बाजूला केले. खरंतर ज्यांनी केजरीवाल यांना नेता बनविले अशा सर्वांना, ते डोईजड होऊ नयेत म्हणून पक्षातून काढून टाकले. नुसते पक्षातून काढून टाकले नाही तर त्यांनी अशा सर्वांना अपमानित करून मगच पक्षातून काढले. जे पक्षात आपल्याला प्रश्न विचारू शकतात त्यांना त्यांनी एकेकाला बाहेरचा रस्ता दाखविला. आपल्या नेतृत्वाला कोणी चॅलेंज करता कामा नये, म्हणून त्यांना वेगवेगळे आरोप करून काढून टाकले. काहींना तर मारपीट करून, अपमानित करून काढून टाकले.
कुमार विश्वास.
दिल्लीतील जनता आणि स्वतःच्या मित्रांना धोका देणाऱ्या व्यक्तीला, आपच्या कार्यकर्त्यांनी मोठे केले होते. जी महिला कधीकाळी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढली, तिला तुम्ही मारहाण करविली. आता तरी आपच्या कार्यकर्त्यांनी सावध राहावयास पाहिजे. भाजपने आता सरकार स्थापन करून मागील 10 वर्षातील जनतेचे दुःख दूर करायला हवे. अशी इच्छा ही त्यांनी मीडिया समोर व्यक्त केली.
शीशमहल.
केजरीवाल यांनी जनतेला असे आश्वासन दिले होते की ते मुख्यमंत्री झाल्यावर साध्या पद्धतीने राहतील. कोणत्याही मोठ्या घरात जाणार नाहीत, सरकारी सुरक्षा व्यवस्था घेणार नाहीत. जी त्यांची सध्या वॅग्नर गाडी आहे तीच वापरतील.
प्रत्यक्षात मात्र त्यांनी एक ते दोन कोटी ची गाडी सरकारी खर्चाने घेतली. त्यांच्या शीशमहालात/
सरकारी निवासस्थानात त्यांनी 46 लाखांचे पडदे, सतरा लाखांचे गालिचे, 39 लाखाचे किचन सामान, सोना स्पा वीस लाख, तेरा लाखांचे सोपे, 50 एसी. 19 लाखांचे जिमचे साहित्य, दहा लाखांचे दहा टीव्ही. असे सरकारी निवासस्थानावर खर्च केले. सुरुवातीला आठ कोटींचे असणारे बजेट 34 कोटी पर्यंत गेले. काही प्रसार माध्यमांनी ते 45 कोटी पर्यंत गेल्याचे सांगितले. इतका खर्च ऐशो आराम मिळण्यासाठी सरकारच्या तिजोरीतील पैसा खर्च केला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची खंत.
अरविंद केजरीवाल यांनी दारू विषयक धोरणाबाबत चुकीचे निर्णय घेतले. दारू धरणानेच त्यांचा पराभव झाला. पक्ष किंवा आलेली सत्ता ही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. सत्ता ही
स्वतःच्या स्वार्थासाठी नसते. ज्यावेळी स्वार्थी राजकारण सुरू होते त्यावेळेस माणूस संपतो. दारू विषयक चुकीचे धोरण केवळ पैशाच्या लोभापाई आखण्यात आले होते.
केजरीवाल यांना पक्ष काढण्यास सुरुवातीपासून अण्णांचा विरोध होता. पक्ष आला की स्वार्थ आला. केजरीवाल यांना राजकारणात प्रवेश न करण्याचा सल्ला अण्णांनी दिला होता.
यूपीए च्या काळात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास यांच्यासारख्या तरुणांनी आंदोलनात भाग घेतला. परंतु नंतर मात्र त्यांनी समाजकारण सोडून राजकारणाचा मार्ग स्वीकारला.
शेवटी असे म्हणायचे वाटते,
” खोटेपणाला जरी सत्ता प्राप्त झाली तरी खोटेपणाचे रूपांतर सत्यामध्ये कधीच होऊ शकत नाही. “
रवींद्रनाथ टागोर.
” दुष्कृत्याप्रमाणे चांगली कृत्ये करून सुद्धा आपल्या नशिबी द्वेष येतो. “
मॅकिआव्हेली.
केजरीवाल यांच्या बाबतीत हे विधान तंतोतंत लागू होते.