वाचकांचे हक्क

युनेस्को : दि बुक चार्टर.
युनोस्कोच्या सर्वसाधारण सभेने
१९७२ हे वर्ष ‘ सर्वांकरता ग्रंथ ‘
यासाठी आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्ष म्हणून जाहीर केले.दि इंटरनॅशनल कम्युनिटी ऑफ बुक सेलर्स असोसिएशन्स, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन, दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेशन, इंटरनॅशनल पेन व इंटरनॅशनल पब्लिशर्स असोसिएशन यांनी या ग्रंथ सनदेचा स्वीकार केला.

वाचकांचे हक्क

ग्रंथसनद तत्वे –

१) प्रत्येकाला वाचनाचा अधिकार आहे
२) शिक्षणाकरिता ग्रंथ आवश्यक आहेत.
३) लेखकांना आपले सर्जनशील कार्य करता यावे याकरता अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणे, ही एक समाजाची खास जबाबदारी आहे.
४) राष्ट्रीय विकासाकरिता
सुसंघटित प्रकाशन व्यवसायाची आवश्यकता आहे.
५) प्रकाशन व्यवसायाच्या विकासासाठी ग्रंथ निर्मितीच्या साधनांची आवश्यकता.
६) प्रकाशन आणि वाचक वर्ग यांच्यामध्ये दुवा साधण्याचे मूलभूत कार्य ग्रंथ विक्रेते करीत असतात.
७) ग्रंथालये ही राष्ट्रीय साधन संपत्ती आहेत. त्यामुळे ज्ञान आणि माहिती यांचा प्रसार होतो आणि सुज्ञता व सौंदर्य यांचा आस्वाद घेता येतो.
८) संदर्भ साहित्यामुळे आवश्यक ती माहिती सुरक्षित राहते व उपलब्ध होत असल्यामुळे ग्रंथ लेखनास मदत होते.
९) देशा देशांमधील ग्रंथाचा अनिर्बंध प्रसार हा राष्ट्रांना लागणाऱ्या इतर गोष्टींच्या पुरवठ्याला पूरक आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सलोख्यास मदत होते.
१०) ग्रंथामुळे आंतरराष्ट्रीय सलोखा निर्माण होतो व शांततामय सहकार्यास मदत होते.

वाचकांचे हक्क :

सुमारे 30 वर्षांपूर्वी डॅनीएल पेन्नाक या फ्रेंच लेखकाने 1992 मध्ये दि राइट्स ऑफ रीडर नावाचे पुस्तक लिहिले. वाचकांचे दहा हक्क पुढीलप्रमाणे.

१) प्रत्येकास वाचनाचा हक्क आहे.
२) वाचकास कोणताही मजकूर त्याच्या इच्छेनुसार पूर्ण, अपूर्ण, मधील मजकूर गाळून, पाणी उलटवून वाचण्याचा हक्क आहे.
३) कोणतेही पुस्तक न वाचता तसेच ठेवण्याचा अथवा अर्धवट वाचून सोडण्याचा वाचकास हक्क आहे.
४) एखादे पुस्तक वारंवार वाचण्याचा वाचकास हक्क आहे.
५) वाचकास काहीही वाचण्याचा हक्क आहे.
६) पुस्तकातील जग वास्तव असा समज/गैरसमज करून घेण्याचा वाचकास हक्क आहे.
७) कुठेही, कसेही वाचण्याचा वाचकास हक्क आहे.
८) पुस्तकात गढून जाण्याचा, रमण्याचा वाचकास हक्क आहे.
९) प्रगट, मौन, आकलनमय वाचण्याचा वाचकास हक्क आहे.
१०) वाचनासंबंधी अभिप्राय, प्रतिसाद, प्रतिक्रिया देण्या न देण्याचा वाचकास हक्क आहे.

मोबाईल, टी .व्ही., लॅपटॉप तुमच्या कितीही उपयोगाची साधनं असू देत. ती मिटल्यावर चैन, शांतता, स्वास्थ्य, समाधान देऊ शकतं केवळ वाचन. कारण ते काही मागत नाही. ती देना बँक आहे. बाकी साऱ्या लेना बँक. तुरुंग आणि घर यामधलं अंतर वाचन समजावत.
थोरो मरणप्राय थंडीत जीव वाचविण्यासाठी कोट आणायला जातो आणि पुस्तक घेऊन येतो, हे वाचनवेड नाहीतर वाचनाचे महत्त्व अधोरेखांकित करतं. जगबुडी होत असताना पुस्तकं कवटाळणारा वाचक महाप्रलयात वाचण्याची इच्छा, आकांक्षा बाळगतो, वाचनाचा एखाद्यास इतका जीवनाधार वाटावा यासारखं पुस्तकाचे महत्व दुसरे कोणतं.?
एखादा प्रियजन निवर्ततो नि आयुष्य खायला उठतं. अशा दिवसात दिलासा देते ते केवळ वाचनच. वाचन खरोखरच संकटमोचक आहे.

वाचनासंबंधी काही सुविचार.

१) लेखक वाचकाला निर्मितीक्षम आनंद देत असतो.
डॉ. अरुण टिकेकर
२) वाचकांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि वाचन प्रक्रिया यावर संशोधन होणे ही वाचन संस्कृतीची गरज आहे.
श्याम मनोहर.
३) चांगलं साहित्य कोणतं तर जे तुम्हाला वाचताना थकवतं, अस्वस्थ करतात.
बाबा भांड.
४) एक चांगलं पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती असतं.
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
५) पुस्तके ज्ञान प्रसाराचे अमूल्य आणि सुगम साधन होय.
म. गांधी.
६) ग्रंथाशिवाय मी जगूच शकणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
७) सर्वसाधारणपणे एक चांगलं पुस्तक खऱ्याखुऱ्या महान व्यक्तीच्या यशाचा पाया असतो.
रॉय एल. स्मिथ.
८) वाचनामुळे आपणास स्वतःची, जग व इतिहासाची ओळख होते.
९) वाचता येणाऱ्या प्रत्येकात स्वतःची उन्नती करण्याचं, जगण्याला अनेक संदर्भ देण्याचे, पूर्णत्वाने रसरशीत आयुष्य जगण्याचं सामर्थ्य असतं.
१०) आतापर्यंत मनुष्य जातीने जे काही केले आहे, ते सर्व पुस्तकांमुळे आहे आणि ते पुस्तकातही आहे.
कार्लाईल.
११) दररोज थोडं तरी, अगदी एक वाक्य का होईना वाचा. दिवसाकाठी अशी पंधरा मिनिटे जरी मिळाली तरी आयुष्याच्या उत्तरार्धात ती तुम्हाला समृद्ध करून टाकतील.
होरेस मान.
१२) ज्याला वाचता येतं. अशी व्यक्ती खोलवर वाचायला शिकते आणि मग जीवन आतून बाहेरून बदलून जातं.
नॉर्मन कझिन्स.

(संदर्भ वाचन. डॉ. सुनील कुमार लवटे. साभार.)

Best 100+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी

Leave a Comment