Marathi Ukhane – मराठी उखाणे ग्रामीण भागात घेतले जाणारे उखाणे
१) विश्वास हा संसाररूपी सागराचा किनारा ———– रावांच्या जीवनात मी सुखाचा निवारा.
२) महालक्ष्मी मंदिरात अंबामातेची मोहक मूर्ती ———–
रावांची पसरे जगभर कीर्ती.
३) इंद्रधनुचे सप्तरंग खुलत जातात उत्तुंग आकाशात ———-
रावांचे सोबतीचे, कर्तव्याचे विविध रंग भरले माझ्या जीवनात.
४) भारतीय नारी जपते संस्कृतीचा वसा ———— चे नाव घेते क्षणभर बसा.
५) साठावं वर्ष सरल डोळ्याला आला चष्मा, तोंडात आली कवळी, हातात आली काठी तरी
———— रावांचे नाव घेते
तुम्हा सर्वांसाठी.
६) अत्रावर पत्रावळ, पत्रावळीवर जिरेसाळी भात, भातावर वरण, वरणावर लोणकडी तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा ———-च नाव घेते उखाण्याचा हट्ट सोडा.
७) श्री शंकरा करिता पार्वतीने व्रत केले हरतालीका ———-च नाव घेते सर्वजण ऐका.
८) भाद्रपदात येतात वाजत गाजत गौरी गणपती———– च नाव घेते सर्वांना मिळो सुख-समृद्धी शांती.
९) निरोपाच्या प्रांगणात पडला स्मृतीपुष्पांचा सडा——– चे सोबत चालते घेऊन आशीर्वादाचा घडा.
१०) मानवतेच्या मंदिरात मधुर वचनांची रास——–च नाव घेते तुमच्यासाठी खास.
११) कुणीच करू नये कुणाचा मत्सर, हेवा ,दावा ———-च नाव घेऊन मागते देवाजवळ सौभाग्याचा ठेवा.
१२) अंबे माते अंबे माते वंदन करते तुजला———– च नाव घेते अखंड सौभाग्य लाभो मजला.
१३) चण्याची आणि दातांची पडत नाही गाठ——— नाव घेते आता सोडा माझी वाट.
१४) एक, दोन , तीन, चार——– आहेत उत्तम शिल्पकार.
१५) रात राणीच्या सुगंधाने निशा झाली मोहित ———— ना आयुष्य मागते परिवारासहित.
१६) भगवतीची रूपे दुर्गा, कात्यायनी, कालिका ———-
च नाव घेते——–ची बालिका.
१७) आयुष्याचे वेलीवर फुलली अनंत फुले ———– चे संगतीने झाले सौभाग्य मंदिर खुले.
१८) दीपावलीच्या सणात दिव्यांची पंक्ती——– रावांना ओवाळते मनोभावे आरती.
१९) अंगणात रांगोळी, दारात तुळस, तुळशीतल्या मंजिऱ्या
वाहते कन्हैयाला——–च नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला.
२०) मुलं, सुना, लेक, जावई हीच खरी संपत्ती माझी आज नातवंडामुळे——— राव झाले आजोबा नि मी झाले आजी.
२१) संसारात रमताना मनाला हवा ब्रेक ———- राव आहेत स्वभावानी नेक.
२२) मी चाळत होते गव्हाचे पीठ
————- राव करतात सुंदर थालीपीठ.
२३) गौरी गणपती, दसरा झाला की दिवाळी येते ———– रावांच्या सहवासात प्राणज्योत तेवते.
२४) ———- रावांची पत्नी झाले
देवब्राह्मणांच्या साक्षीने आकाशी रंगाचा शालू खुलला बेलबुटीच्या नक्षीने.
२५) सडा, रांगोळी, शुभसूचक तोरण बांधले दारी लक्ष्मीच्या सोनपावलांनी———— आली घरी.
Best Marathi Ukhane – मराठी उखाणे
२६) सप्तपदी चालून सासरी आले, सासर झाले माहेर———
नी तिला मला सौभाग्याचा आहेर.
२७) आई-वडिलांनी पाजले बाळकडू, सासू-सासर्यांनी फिरवला आशीर्वादाचा प्रेमळ हात———— ची आहे मला भक्कम आणि समर्थ साथ.
२८) प्रेम लाभो, प्रेमळांना त्याग
ही त्याची कसोटी, आयुष्याचे निर्माल्य करीन———च्या स्वप्नपूर्तीसाठी.
२९) मंगलाष्टकांच्या मंगलस्वारांनी आप्त स्वकीयांचे शुभाशीर्वादांनी, सप्तपदीतील सप्त शपथांनी———-ची झाली मी आज सर्वार्थाने.
३०) सूर्या भोवती पृथ्वी फिरते तेव्हा होते दिवस रात्र———
च्या संसारात मी सुखी आहे शंका नसावी तीळमात्र.
३१) तुळशीला घालते पाणी नमुन
———– चे नाव घेते——— ची सून.
३२) सागराची गाज मनाला देते उभारी——— च नाव घेते उभी आहे अंबाबाईच्या दारी.
३३) उषःकाल होता विहंग गेले उडत गात———च्या हाती दिला साताजन्मीसाठी हात.
३४) रथसप्तमीला सूर्यापुढे घालते सप्त धान्याची रास——— चे नाव घेते तुमच्यासाठी खास.
३५) नाशिकची द्राक्षे, जळगावची केळी ———– नाव घेते——–
च्या वेळी.
३६) नित्य नियमाने घालावे तुळशीला पाणी——– ची आहे लाडकी मी राणी.
३७) घराच्या अंगणात असावी तुळस ———- च नाव घ्यायला मला नाही आळस.
३८) चंद्रमा उगवला आकाशी कमलीनी हसली तळ्यात——-नी बांधले मंगळसूत्र माझ्या गळ्यात.
३९) हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा——— आणि———– सुखी असावेत असा आशीर्वाद द्यावा.
४०) पालन कर्ता पिता जन्मदात्री माऊली———–म्हणजे माझे जीवन मी त्यांची सावली.
४१) नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा——– च्या संसारी असाव्यात आपणा सर्वांच्या शुभेच्छा.
४२) रांगोळी मध्ये असतात रंग
————- च्या संसारात मी आहे दंग.
४३) पक्वान्नाच्या जेवणाला लोणच्या चटणीची जोडी———
भांडल्याशिवाय संसारात नाही गोडी.
४४) कोकिळेचे रंगते कुंजन वसंताच्या दारात———- रावांचे नाव घेते लहान थोरात.
४५) संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती———- रावांशी लग्न झाल्यानं झाली माझी इच्छापूर्ती.
४६) शंकराची करते आराधना गौरीची करते उपासना———-
सुखी राहोत हीच माझी प्रार्थना.
४७) आंब्याच्या डहाळीवर कोकीळ पक्षी लपला——– चे नाव घेते आशीर्वाद हवा आपला.
४८) उंटावरून चालला होता लोकांचा तांडा———–मुळे लाभला मला आयुष्यात सुखाचा हंडा.
४९) सांजवेळी तुळशीपुढे लावला दिवा——– चा सहवास वाटतो मला नेहमीच हवा.
५०) चंदनाचे झाडाखाली हरिण घेते विसावा——— ना नि मला आशीर्वाद तुमचा असावा.
५१) अंगणी माझ्या रांगोळी काढते मोरांची———– च नाव घेते कन्या मी थोरांची.
५२) सत्यवानाची सावित्री, ययातीची शर्मिष्ठा———- ची कीर्ती वाढो तीच माझी प्रतिष्ठा.
५३) जग जवळ येण्यात इंटरनेटचं कार्य आहे महत्त्वाचे ———— शी
चॅटिंग करता करता सूर जुळले जन्माचे.
५४) कॉम्प्युटरला असते हार्ड डिस्क ———- शी लग्न करताना मी घेतली आहे रिस्क.
तरुण मुलींनी घ्यावयाचे उखाणे (Marathi Ukhane)
५५) उपवानातील वृक्षावर कोकिळा मधुर गीत गाते, देवाचे साक्षीने जुळते———–शी नाते.
५६) धरती आकाशाचे मिलनात क्षितिजाचे रंग खुलले ——– च्या संगतीत माहेरचे नाते भुलले.
५७) मानस सरोवराच्या काठी हंसांच्या बसल्या हरी——– च्या प्रपंचात मिटली चिंता सारी.
५८) हिमालयाच्या शिखरांनी सुंदर चांदण्याचे लेणे ———- च्या सहवासात लाभले सौभाग्याचे लेणे.
५९) सर्व चराचराला भुलवते ही ईश्वराची माया——— च्या सानिध्यात लाभली कल्पवृक्षाची छाया.
६०) लग्न झाले नी दूर पडले माहेरचे गाव——–+साठी घेतली मी अमेरिकेत धाव.
६१) संसाराच्या पटावर अचूक पडलं दान——– मुळे लाभला मला आई होण्याचा मान.
६२) चैत्र महिन्यात करतात चैत्रगौरीची आरास—–++—
ला हवाहवासा वाटतो———- चा सहवास.
६३) वैशाखात येतो अक्षय तृतीयेचा सण ———— च नाव घ्यायला नाही लागत कारण.
६४) ज्येष्ठ महिन्यात करतात वटसावित्रीची पूजा——+— च
नाव घेणे म्हणजे गोड सजा.
६५) आषाढात करतात पंढरीची वारी———- च्या सहवासात सुखी मी संसारी.
६६) श्रावणात करतात मंगळागौरीची पूजा ———– चं
नाव घेणे म्हणजे गोड सजा.
६७) भाद्रपदात करावे गणरायाला वंदन——— आवडते म्हैसूरचे चंदन.
६८) अश्विनात करतात कोजागिरीचे दुग्धपान——–
रावांचे आहे उच्च खानदान.
६९) कार्तिकात येतो दिवाळीचा सण मोठा——-+++- च्या संसारात नाही आनंदाला तोटा.
७०) मार्गशीर्ष महिन्यात येते थंडीची लाट——— ना बसायला लागतो चंदनाचा पाट.
७१) पाऊस महिन्यात करतात तिळगुळ समारंभ——- बरोबर केला संसाराला प्रारंभ.
७२) चहा, कॉफी, फराळ यावर सर्वांचा डोळा मी आहे पक्की पण माझा——- आहे भोळा.
७३) सत्यवानाचे प्राणासाठी सावित्रीने पुरविला यमदेवाचा पिच्छा——- दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरा पाशी इच्छा.
७४) अंबाबाईचे देवळात सुवर्णाचं जोतं ————- च नाव घ्यायचं माझ्या मनातच होतं.
७५) बकुळीच्या फुलांचा सडा पडला अंगणात ———– च नाव सारखंच असतं मनात.
७६) गौरव पांडवांचे युद्धात श्रीकृष्णाने केले अर्जुनाचे सारथ्य
————च्या संसारात होईल सर्वांचाच आदरातिथ्य.
तरुण मुलांसाठी/ वरांसाठी उखाणे (Marathi Ukhane)
७७) इंटरनेटवर भावला मला केतकीचा गंध गंधवेड्या मला लागला——— चा छंद.
७८) रंग जिचा सोनसळी नाक तीचे चाफेकळी गाली जिच्या खळी———– च नाव घेतो स्वागत समारंभावेळी.
७९) फ्रेंडशिप बँड मी 50 जणींना बांधले माझे कंकण मात्र——-ला लाभले.
८०) बकुळ फुलांचा मस्त असतो गंध———– होते त्या गंधांनी धुंद.
८१) चांदीच्या ताब्यात गुलाबाचा हार———- चे पुढे मला गावी लागते हार.
८२) रात राणीचा गंध धुंद करतो मनाला———– चा छंद तसाच लागला आहे मला.
८३) संसाराचे सारीपाटावर दान अचूक पडलं——— मुळे बाबा होण्याचं भाग्य मला लाभलं.
८४) मंदिरातील मूर्ती पुढे शांत तेवते वात ———— मुळे मला लाभली जन्मजन्मांतरीची साथ.
८५) सात सुरांच्या संगतीत हरीणी रान भुलते——— च्या प्रेमाने संसाराची बाग फुलते.
८६) लक्ष्मीच्या पावलांनी आली माझ्या घरी———- वर माझं प्रेम आहे भारी.
८७) तिने केली जादू, जिंकलं एका क्षणात, प्रथमदर्शनीच भरली
————– माझ्या मनात.
८८) स्वच्छ चारित्र्य रंभेसारखं रूप ———— लाभली आहे
मला अनुरूप.
८९) ही मायेची नगरी प्रेमाचा हा संसार———– चा माझ्या जीवनाला आधार.
९०) चंद्र पाहून नभीचा भरती येते सागराला——— साथ संगत आहे माझ्या जीवनाला.
९१) जाई, जुई, मोगऱ्याचा दरवळतो सुगंध——— च्या सहवासात मी होतो धुंद.
९२) नळे आकाश, निळा सागर, हिरवे भोवती रान———- च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.
९३) कपाटाच्या खणात ठेवला आहे भरजरी शालू———-च्या नावाची अट नका घालू.
९४) चौकोनी आरसा त्याला सोनेरी फ्रेम, माझ्या लाडक्या ——– माझ्यावर खरं प्रेम.
९५) हत्तीच्या पाठीवर शोभे मखमली झूल——— मी जसं नाजूक गुलाबाचं फुल.
९६) हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट
————- च्या हौसेसाठी घातला एवढा घाट.
९७) उगवला सूर्य मावळली रजनी
———– च नाव सदैव माझ्या मनी.
९८) ऊन पावसाच्या खेळात हसत इंद्रधनुष्य———– सुखी ठेवण्यासाठी वेलन सारं आयुष्य.
९९) पान, सुपारी ,कात, चुना, यांचा बनतो विडा ——- च नाव घेतलं आता वाट सोडा.
१००) कोवळी काकडी कुरकुर वाजे काळी चंद्रकळा——– ला साजे.
१०१) कोरा कागद काळी शाई
———– रोज फिरायला जायची घाई.
१०२) आई, वडील, भाऊ, बहिणी गोकुळासारखं माझं घर त्या माझ्या गृहसौख्यात आता
————ची भर.
Other Book Summary: थिंक स्टेट
other article- https://marathiantarang.com/marathi-ukhane/