50+ मराठी सुविचार स्टेटस | Marathi Suvichar Status

मराठी सुविचार स्टेटस | Marathi Suvichar Status

Marathi Suvichar Status

१) माणसाच्या जीवनात चिंता करणे योग्य अशी कोणतीच घटना कधीच घडत नाही.
प्लेटो.
२) ज्याला दूध हवे असते त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे, पाठीवर नव्हे!
३) मला जो निर्णय योग्य वाटेल त्याची मी अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करते.
इंदिरा गांधी.
४) पुस्तक नसलेलं घर म्हणजे खिडक्या नसलेली खोली.
एच.मॅन.
५) हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नव्हे!
बाबा आमटे.
६) तुमच्याजवळ दोनच आणे असतील तर एक आणा अन्नासाठी खर्च करा व दुसऱ्या आण्याचे एखादे सुंदर फुल घ्या, अन्न तुम्हाला जगवील व फुल तुम्हाला जगायला शिकवील !
कन्फ्युसियस.
७) उद्धटपणा आणि आक्रमक वृत्ती म्हणजे निर्भयता नव्हे! ही तर भेकडपणाची लक्षणे आहेत. निर्भय मनुष्य नेहमी नम्र आणि शांत असतो.
महात्मा गांधी.
८) शिक्षणाला जरी आरंभ असला तरी त्याला अंत नसतो.
अर्नाल्ड बेनेट.
९) ज्याला शिक्षक व्हायचे असेल त्याचा प्रधान हेतू स्वतःची मते विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविणे ,हा नसून त्यांची मने चेताविणे हा असला पाहिजे.
रॉबर्टसन.
१०) माझ्या हातात राजदंड नसला तरी लेखणी आहे.
व्हॉल्टेयर.

११) तुम्ही किती पुस्तके वाचली याला महत्व नसून कोणती पुस्तके वाचली याला महत्त्व आहे.
ॲरिस्टिपस.
१२) उथळ विचाराची माणसे दैवावर विश्वास ठेवतात. शहाणी व समर्थ माणसे कार्य-कारणभावावर विश्वास ठेवतात.
इमर्सन.
१३) अंगावरच्या जखमा, शरीरातील गळवे आणि गाठी या काढून टाकण्याआधी मनातील चुकीचे अपायकारक विचार, वांझोट्या गोष्टी, बाजूला काढून टाका.
एपिक्टेटस.
१४) दुःखी राहण्याचं खरंखुरं गमक कोणतं तर तुम्ही सुखी आहात किंवा नाही, हे ठरवत बसणं.
जॉर्ज बर्नार्ड शॉ.
१५) वाईट बातमीला पंख असतात, तर शुभ वार्तेला पायच नसतात.
कॅव्हेंडिश.
१६) व्यायामाची जशी शरीराला गरज असते, तशी वाचनाची मनाला असते.
जे. ॲडीसन.
१७) पैशाची किंमत कळावी असे वाटत असेल तर दुसऱ्याकडे जाऊन ते उसने मागण्याचा प्रयत्न करून पहा.
बेंजामिन फ्रँकलिन
१८) आपण पक्षांप्रमाणे आकाशात विहार करावयास शिकलो; माशांप्रमाणे पाण्यात तरंगावयास शिकलो; परंतु अद्याप माणसाप्रमाणे जगात वावरण्यास मात्र शिकलो नाही.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.
१९) कोणत्याही कर्माला वा कर्तव्याला क्षुद्र लेखू नका. कर्म कोणतेही असो, ते कशा रीतीने करतो याला अधिक महत्त्व आहे.
स्वामी विवेकानंद.
२०) मानसिकता बदलण्याची तयारी ठेवा, सर्वात वाईट काय असेल तर मनोदारिद्र्य.
डॉ. नरेंद्र जाधव.
२१) देवाला मुंगीच्या पावलांचा आवाज ऐकू येतो. त्याला भक्तीची प्रार्थना ही ऐकू येणारच. भक्त देवाकडे जातो तेव्हा देव भक्ताकडे येतो.
मोहम्मद पैगंबर.
२२) जितक्या अपेक्षा कमी, तितकी मनःशांती अधिक.
थॉमस विल्सन.
२३) सामर्थ्यही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे.
थॉमस फुलर.
२४) नीतिमत्तेचा व्यर्थ काथ्याकुट न करता बेधडक कृती करा.
ह्युगो.
२५) वादात चित्त घालू नका. लबाड आणि ढोंगी लोक तुम्हाला त्यात गुंतवून ठेवतात.
संत तुकाराम.

Other Articles:

100+ [Marathi Suvichar] शालेय सुविचार | Marathi Suvichar for School Students

60+ Marathi Suvichar: उत्तम मराठी सुविचार

Get Your Copy NowSamarthya Vicharanche (Suwichar) 

२६) लोकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करू नका. कारण वैध नि प्रामाणिक मार्गाने लोकप्रियता क्वचितच प्राप्त होते.
कॅंट
२७) आक्रमणाला प्रतिकार करणे हे केवळ समर्थनीय कृत्य नसून ते आवश्यक कर्तव्य आहे.
स्पेन्सर.
२८) माणसाला जेव्हा अज्ञानाचा परिचय होतो, तेव्हा तो ज्ञानाच्या पायरीवर पहिले पाऊल टाकतो.
कन्फ्यूशियस.
२९) थोडेसे परंतु पूर्ण समजलेले, हे पुष्कळ पण थोडेसेच समजण्यापेक्षा फार बरे असते.
प्रा. यश पाल.
३०) वाचनाची कला म्हणजे चतुराईने यशस्वी होण्याची कला.
हॅमिल्टन.
३१) पितरांची नव्हे तर जिवंत मातापित्यांची सेवा करणे म्हणजेच खरे श्राद्ध होय!
स्वामी विवेकानंद.
३२) कोणत्याही गोष्टीसाठी सत्याचा त्याग करू नका. पण सत्यासाठी मात्र कोणत्याही गोष्टीचा त्याग करा.
रवींद्रनाथ टागोर.
३३) आपण विजयी होऊच, असा ज्यांचा दृढ विश्वास असतो तेच विजयी होतात.
व्हर्जिल.
३४) आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे.
शेक्सपियर.
३५) सुंदरता ही कामाची शोभा नसून तो कामाचा गाभा आहे.
विनोबा भावे.
३६) कोणाचा गुलाम होणे जसे मला आवडणार नाही, तसेच मला कोणाचा मालक होणेही आवडणार नाही.
अब्राहम लिंकन.
३७) शहाण्या माणसाने गप्प राहणे हा मूर्खपणा होय, तर मूर्ख माणसांनी गप्प राहणे हा शहाणपणा होय !
चार्ल्स कॉल्टन.
३८) आपण स्वतःला जेवढे सुखी समजत असतो, तेवढेच आपण सुखी असतो.
अब्राहम लिंकन.
३९) मनोवृत्ती क्षुद्र असेल तर सद्गुण वाया जातात. म्हणून दृष्टिकोन विशाल ठेवा.
सिनेका.
४०) वक्त्याचे ज्ञान जेवढे कमी तेवढा त्याच्या भाषणात आरडाओरडा जास्त असतो.
स्टर्न.
४१) शेजाऱ्यावर प्रेम आवश्यक करा, पण दोन घरांच्या मध्ये असलेले कुंपण तसेच राहू द्या.
जॉर्ज हर्बर्ट.
४२) कर्माचा बरे वाईटपणा त्याच्या हेतूवरून ठरत असतो.
मोहम्मद पैगंबर.
४३) ज्यांना इतर काही चांगलं करायचं नसतं, ते ऑफिसला येतात.
ऑस्कर वाइल्ड.
४४) योग्य वेळी आणि योग्य शब्दात दिलेल्या प्रोत्साहनामुळे माणसाचा उत्साह द्विगुणित होतो व त्याच्या हातून मोठे कार्य होऊ शकते.
गटे.

४५) शहाणे लोक निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांपेक्षा व्यायामावर अधिक विश्वास ठेवतात.
ट्रायडेन.
४६) दोष आपल्या ग्रहमानत नसून आपल्यातच असतो.
शेक्सपियर.
४७) ज्याप्रमाणे सकाळ दिवस दाखवते त्याचप्रमाणे बालपण माणसाचे व्यक्तिमत्व स्पष्ट करते.
मिल्टन.
४८) प्रत्येक मूल जन्माला येतं तेव्हा असाच संदेश घेऊन येतं की, परमेश्वर मानवाच्या बाबतीत अद्याप निराश झालेला नाही. अजूनही मानवाला खूप चांगलं करता येण्यासारखं आहे.
रवींद्रनाथ टागोर.
४९) मी सुखी आहे, कारण मी कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा करत नाही.
अल्बर्ट आईन्स्टाईन.
५०) संघर्ष टाळण्यानं शांतता मिळत नाही, तर त्याला तोंड देण्याच्या तुमच्या क्षमतेतून ती मिळते.
स्वामी विवेकानंद.
५१) जुलमाने विचार मरत नाहीत. उलट ते सुदृढ होतात.
जोसेफ मॅझिनी.
५२) जो चमत्कार करतो तो धूर्त असतो. केलेला चमत्कार तपासण्यास नकार देणारा बदमाश असतो. ज्याच्यात तपासण्याचे धैर्य नाही तो भ्याड असतो आणि जो न तपासताच चमत्कारांवर विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो.
डॉ. अब्राहम कोवूर.
५३) जे अंत:करणातून निपजतं अंत:करणाला जाऊन भिडतं.
कॅलेरिज.
५४) समजेल अशा पद्धतीने सत्य सांगत गेल्यास ,कोणालाही त्याबद्दल अविश्वास वाटत नाही.
विल्यम ब्लेक.
५५) जो वेळेवर जय मिळवील तो जगावर जय मिळवील.
नेपोलियन बोनापार्ट.

Leave a Comment