मद्य गद्य साहित्य

Sahitya

मद्य गद्य साहित्य (Sahitya) 2023

1. अशोक नायगावकर
2. उमेश सणस यांच्या सांगावा मधून

दारू पिणाऱ्यांना मी
अजिबात जवळ करत नाही
एखाद्यानं थोडी मागितली मला
नाही म्हणायला जमत नाही.

3. भाऊसाहेब पाटणकर

भिन्न मद्यांच्या चवी आम्ही क्रमाने चाखतो
पेल्यातली घेऊन आधी ओठातली मग चाखतो
वेगळी कॉकटेल, ऐसी एकत्र ना मिसळायची
सांगतो याची मजा चौघात नाही यायची

4. भाऊसाहेब पाटणकर

उन्मेश ज्यांच्या यौवनाचा, काहीच ना झाला कमी
प्यायले जे खूप, ज्यांच्या वाटे, परी झाला कमी
निर्मिली मी फक्त माझी, त्यांच्याच साठी शायरी
सांगतो इतरास, बाबा, वाचा सुखे ज्ञानेश्वरी

5. भाऊसाहेब पाटणकर

पेल्यातील प्या मद्य, पण ओठातले प्राशू नका
स्पर्शणे तर दूर राहो, बघितले नुसते तरी
याची नशा, मी सांगतो, उतरते मेल्यावरी.

मी केलेला पराक्रम.
पूर्वी माझ्या टेबलावर अभ्यासाच्या फायली होत्या.आता विविध हॉस्पिटलच्या फायली आहेत.पूर्वी बाटलीतील औषध घेत होतो,
आता औषधांच्या गोळ्या घेत आहे.
एकूण काय तर औषध घेणे सुरू आहे.

मद्य गद्य साहित्य (Sahitya) 2023

खुशवंत सिंग

खुशवंत सिंग म्हणजे एक बहुरंगी आणि बहुढंगी असे व्यक्तिमत्व. साहित्य, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील स्तंभलेखक यामुळे ते भारतात व परदेशातही वाचक प्रिय लेखक झाले.

जनमानसात माझी प्रतिमा जाम दारुड्या अशीच आहे. अशी प्रतिमा तयार होण्यास मुख्यता मीच जबाबदार आहे असे खुशवंत सिंग म्हणतात.

संध्याकाळ झाली की मी स्कॉच कडे आपोआप वळतो. दिवसभरातील व्यायाम, मित आहार आणि कामाचं समाधान यामुळे स्कॉच पोटात उतरवताना मला छान उबदार वाटते. स्कॉच पीत असताना मी माझा अगदी एकटा असतो.

एकट्यानं स्कॉच पिता पिता संगीत ऐकणे किंवा टी.व्ही पाहणं ही माझी आवडती सवय आहे. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी माझ्या घरी रात्रीच्या जेवणाची पार्टी असते. तसा मी 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पीत नाही. आयुष्यात मी कधीही झिंगलो नाही. अशा अवस्थेतही माझा कधीच तोल गेला नाही.

खुशवंत सिंग पुढे लिहितात स्कॉचचा पेग घेतल्यानंतर त्यांचे वडील वयाच्या 90 व्या वर्षी मृत्यू पावले. वडिलांच्या नंतर आठ वर्षांनी त्यांची आई वयाच्या 94 व्या वर्षी मृत्यू पावली. कोमात जाण्यापूर्वी तिनेही व्हिस्की मागितली होती.

मलाही अशी खात्री वाटते की जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा मी सुद्धा हातातला दारूचा ग्लास उंचावून सर्वांचा निरोप घेईल आणि त्यानंतर शेवटचे घोट पिता पिता अखेरचं जाता येईल.

खुशवंत सिंग म्हणतात मी आयुष्यात पोहण्याचे दोन तलाव भरतील इतकी स्कॉच पिलो आहे.( खुशवंत सिंग हे श्रीमंत असल्यामुळे त्यांना हे परवडले. आपल्याला एक चपटी घेताना सुद्धा नाकी नऊ येते.)

खुशवंत सिंग (Khushwant Singh)यांची महत्त्वाची वाक्ये:

Other Articles:

  1. 40+ Marathi Suvichar 

सामर्थ्य विचारांचे

- प्रा.सतीश सूर्यवंशी.