जीवनाला प्रेरणा देणारे १००० हून अधिक विचार
सामर्थ्य विचारांचे
सध्याच्या गोंधळलेल्या मन स्थितीत बहुसंख्य लोकांना अशा सुविचारांची नितांत आवश्यकता आहे. ‘ सामर्थ्य विचारांचे ‘ या पुस्तकात महान विचारवंतांचे विचार समाविष्ट केलेले आहेत.हे विचार विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांना मार्गदर्शक ठरणारे आहेत.
आम्हा चित्रपट मालिका लेखकांना संवाद अतिशय टोकदार लिहावे लागतात तेव्हाच कुठे ते प्रेक्षकांच्या काळजात घुसतात. त्यातही काही थोरामोठ्यांच्या संदर्भासहित त्यांची वचने, मते ही संवादात आली तर त्यातली प्रगल्भता सुद्धा दिसून येते. यासाठी वाचन हवेच. पण त्यासाठी तितका वेळ सुद्धा द्यावा लागतो. आपल्याला आवडलेल्या ओळी स्मरणात किंवा टिपणात ठेवाव्या लागतात हे सगळं काही सोपं काम नाही. त्यामुळे सुर्यवंशी सरांनी केलेले हे पुस्तक बायबल सारखे उपयोगी पडणार याची खात्री आहे. फक्त आमच्या सारख्या सिने लेखकांनाच नव्हे तर शिक्षक, विद्यार्थी, मोटिवेशनल स्पीकर, नेते मंडळी या सगळ्यांनाच हे पुस्तक सुविचार किंवा विविध दाखले देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वाढदिवसाला शेकडो लेखकांच्या शब्दसुमनांना एकत्र केलेला हा बुके भेट म्हणून दिल्यास या खेरीज दुसरी कोणती उत्तम भेट असूच शकत नाही. या पुस्तकाबद्दल एवढेच म्हणावे लागेल. वाचा. प्रेरित व्हा आणि यशस्वी व्हा !
प्रा. सतीश सूर्यवंशी माझे शिक्षक, त्यांनी संकलित केलेले सुविचार हे आपल्या जीवनात दिशादर्शक आहेत. धकाधकीच्या, तणावग्रस्त जगण्यात सूर्यवंशी सरांनी संकलित केलेला संग्रह दिलासादायक आणि मार्गदर्शक ठरेल ,याची मला खात्री आहे.
जगभरातील विविध क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तींच्या जीवनानुभवातून घेतलेले हे सुविचार. त्यात थोरो, लिंकन पासून विनोबाजींपर्यंत सर्वांचे विचार आपल्याला आढळतात.
विशेषतः तरुणपिढीसाठी हा संग्रह मार्गदर्शक ठरेल.
प्रा. सतीश सूर्यवंशी यांनी महत् प्रयत्नाने सुमारे दोन हजाराहून अधिक सुविचार संग्रहित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा मानस केला आहे. या 'सु'बोध सुविचार संग्रहामध्ये त्यांनी
थोरामोठ्यांचे सुविचार नमूद केलेले आहेत. त्यामध्ये समाजातील विद्वान, तत्वज्ञ,
शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, साहित्यिक,
लेखक, संत, समाजसुधारक, राजकीय मोठ्या व्यक्ती इत्यादींच्या सुविचारांचा समावेश केला आहे. प्रस्तुत साहित्यास
' सु ' बोध सुविचार किंवा 'सु'बोध
वचने असे म्हटले तरी चालेल.
यामध्ये आपल्या भारतीय तसेच पाश्चात्त्य विद्वानांचे सुविचार एकत्रितरित्या वाचावयास मिळतात, ज्यामुळे सुशिक्षित, सुसंस्कृत व सजग समाज घडविण्यास मदतच होईल.
तसेच भावी पिढी, वाचक, हितचिंतक या सुविचार संग्रहाचे उस्फुर्त स्वागतच करतील.प्रा. सतीश सूर्यवंशी यांच्या या स्तुत्य उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा.
मानवी जीवन हे अनेक चिंता आणि घटना यांनी वेढलेले आहे. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. चिंतनातून आणि अनुभवातून स्फुरणारे शब्द नि:संदेश व्यथितांना दिलासा देतात. पथदर्शक होतात. सहजी त्यांना सुविचार, सुभाषिते, चिंतनिका यांचे स्वरूप प्राप्त होते. ज्ञानसागरातील असे शिंपले
प्रा. सतीश सूर्यवंशी यांनी आपल्या मर्मज्ञ नजरेने वेचून घेतले. ते टिपले. त्याचा हा संग्रह. सर्वसाहित्यविश्वात फेरफटका मारून त्यांनी संग्रहित केलेले विचारधन आता सर्वांपर्यंत पोचविण्याचे त्यांनी केलेले हे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. वाचा. विचार करा. प्रभावित व्हा.याचा पुढचा भाग म्हणजे एकाच विचारवंतांची वा एकाच विषयावरची वचने, असाही उपक्रम हाती घेता येईल.
आपण आजपर्यंत केलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच,भारतीय अनेक थोर विचारवंत आणि पाश्चिमात्य थोर विचारवंत यांच्या विचार संग्रहाचा आपण गेल्या पाच वर्षांपासून अभ्यास करून, त्यातील काही मौलिक सुविचारांचा आजच्या तरुण पिढीला आणि भावी पिढीला उपयोग व्हावा व त्याचे आचरण व्हावे, या दृष्टीने आपण पुस्तक प्रकाशित करत आहात याचा मला अभिमान आहे.
आपण प्रकाशित करत असलेले हे मौलिक सुविचारांचे पुस्तक, आजच्या तरुण पिढीला आणि भावी पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. आपल्या या कार्यास आणि प्रकाशित होत असलेल्या पुस्तकास शुभेच्छा.
भारतीय व पाश्चात्य विचारवंत,
महान विभूती यांच्या विचारांनी अवघे विश्व समृद्ध केले आहे. महनीय विचारवंतांची सुवचने, सुविचार मानव समाजाला सदैव प्रेरणादायक ठरतात. जीवनाची वाटचाल करताना सुविचार हे सावलीसारखे सोबत करतात त्यातून माणसाचे जीवन योग्य दिशा घेते. संस्कृतीला अलंकाराप्रमाणे सुविचार सुसौंदर्य देतात.
माझ्या वाई विधानसभा मतदारसंघातील प्रा. सतीश सूर्यवंशी यांनी पाच वर्षे
उत्तमोत्तम सुविचारांचा शोध घेतला, त्यांचे संकलन केले व सकाळ प्रकाशन पुणे यांच्याकडून ते पुस्तक रूपात प्रकाशित होत आहेत, याचा खूप आनंद वाटला.
प्रा. सतीश सूर्यवंशी यांच्या सुविचार संकलन पुस्तकाने अनेक विचारांचा सुवर्णस्पर्श होईल, प्रेरणा लाभेल. आपण ह्या सुविचारांचे पुस्तक आवर्जून वाचाल असा मला विश्वास आहे.
प्रा. सतीश सूर्यवंशी यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
Previous
Next